निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोमालियात संसदेवर दहशतवादी हल्ला; Sad

भाजपा सत्तेवर आल्यावर संसदेवर हल्ला होतो ही परंपरा कायम राखली गेली म्हणायचे Wink

How is THIS for a conspiracy theory?

Congress Working Committee चे जनरल सेक्रेटरी मोहन प्रकाश यांनी दावा केला आहे की काँग्रेसच्या पराभवाला इस्त्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद जबाबदार आहे.

नाही, ही थाप नाही....हे पहा

http://www.dnaindia.com/india/report-congress-pins-blame-on-mossad-among...

Rofl

Pages