मुखवासाचा प्रकार : जवस आणि बडीशेप

Submitted by नलिनी on 7 January, 2014 - 08:43
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बडीशेप अर्धी वाटी
जवस १ वाटी
तिळ अर्धी वाटी
धनाडाळ पाव वाटी
सैंधव मीठ पाव टिस्पून
पादेलोण मीठ पाव टिस्पून
लिंबू रस १ टेबलस्पून

क्रमवार पाककृती: 

badishep.jpg

एका भांड्यात सैंधव मीठ, पादेलोण मीठ, लिंबू रस एकत्र करून घ्यावे व ह्या मिश्रणात जवस टाकून चांगले हलवून एकत्र करून घ्यावे. १५ मिनिटे तसेच राहू द्यावे.

बडीशेप, धनाडाळ, तिळ व जवस वेगवेगळे मेंद आचेवर चांगले भाजून घ्यावे. जवस लिंबूरसात भिजवल्यामुळे जरासे एकमेकांना चिकटतात परंतू भाजायला सुरवात केली ते सुटे व्हायला लागतात.

वाढणी/प्रमाण: 
वाढणी प्रमाण कसे सांगणार?
अधिक टिपा: 

काळे तिळ तसेच आपल्याला बडीशेपसोबत आवडतात ते कोणतेही पदार्थ घेवू शकता.

साहित्य वरील प्रमाणातच घ्यायला हवे असे काही नाही.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवस अख्खे खाल्ले तर त्याचा फायदा होत नाहि.ते डायजेस्ट न होता तसेच पास होतात. जर जवस थोडे भाजुन ग्राईंड करुन घेतले तर ते जास्त चांगले.

पण प्रिया जवस चावले तरी ते भरडल्यासारखेच झाले ना तरीही ते बारिक करूनच खाय्चे कां?

हा माझा जेन्युयन प्रश्न आहे.

बडीशेप व ओवा छान भाजून त्यात मिताचे पाणी घालून ते पुन्हा तव्यावर कार्पूस म्हणजे कोरडे होए पर्यंत भजावे. पचन क्रिया चांगली होते .