मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे

Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21

हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.

आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय म्हणणार या पुढे?
<<
प्रेशर कुकर इफेक्ट.
शेजारी/बाहेर कुठे आला तेव्हा आईबाबा सोबत असतील, तर कसा वागतो?

आईबाबांचा जो डायलॉग आहे ना, 'तुम्हीच कळ काढलेली असणार' तोच सजेस्टिव्ह आहे. घरात लै धाकात असेल पोरगं.

ते म्हणतात नं की पूर्वी, 'शाळेत मास्तरने मारलं' अशी तक्रार घरी केली, तर बाप पहिले अजून २ रट्टे घालत असे. मग आधी तू काय चुकलास ती चौकशी अन मग नंतर मास्तरने का मारलं त्याचा विचार. अर्थात विनाकारण शिक्षा करणारच नाहीत अशा चारित्र्याचे मास्तरही असत त्या काळी.

रिया, मी तुझ्या जागी असते तर काय केले असते माहीत नाही>>>>

माझ्या मुलाच्या बाबतीतला किस्सा आहे.तो २ वर्षांचा होता.त्याच वयाचा त्याचा मित्र आमच्याकडे आला .
त्याच्या हातात छोटी पण कडक रॅकेट होती. मी माझ्या मुलाला भरवत होते.एका हातात पेज दुसर्‍या हातात चमचा. नवर्‍याला सांगितले होते की त्या मित्रावर लक्ष ठेव. कारण तो घरी भांडी वगैरे फेकून मारायचा.तर एका क्षणात त्याने माझ्या मुलाच्या डोक्यात दोन हातांनी रॅकेट उभी करून मारली.माझा मुलगा पाठमोरा होता इतका कळवळला.पण मी त्या मुलाला ईछा असूनही नाही मारु शकले ग.नवर्‍यालाच जाम फैलावर घेतले.
कारण एकच असावं ,दुसर्‍याचं मूल ,त्याला हात कसा लावू .

माझ्या नवर्‍याच्या मित्राची बायको - क्ष म्हणूया तिला - स्वतःच्या नवर्‍यासोबत पावणे दोन वर्षाच्या मुलीला घेऊन नवर्‍याच्या दुसर्‍या मित्राकडे गेली होती. त्याचा मुलगा सात वर्षाचा. त्या मुलाने ह्या पावने दोन वर्षाच्या मुलीच्या खाडकन थोबाडीत मारली. मुलगी कळवळली. त्या मुलाची आई जागेवरूनच असं का केलं असं नसतं कराय्चं वगैरे समजावू लागली. क्षल प्रचंड संताप आला. पण दुसर्याच्या घरात त्याच्याच मुलाला कसं रागवायचं म्हणून मुलीला जवळ घेऊन बसली. आणि नवर्‍याकडे प्रचंड संतापी कटाक्ष टाकला. तोवर मुलाची आई "गो से सॉरी एवढच बोलत होती." क्षचा नवरा अरे ठीक आहे तो पण लहान आहे वगैरे बोलू लागला. क्ष नवर्‍यालाच खाऊ का गिळू अशी बघत होती. मिनिटभराने त्या मुलाचे वडिल बाहेर क्षच्या नवर्‍याचा मित्र बाहेर आल्यावर मात्र त्याने मुलाचे दोन्ही हात धरून तुला मे असच मारू का हे विचारलं. आता क्षने ठरवलं आहे की तो मुलगा जिथे असेल तिथे मुलीला घेऊन जायचं नाही.

रश्मी.., माझ्या मुलाला शिस्त भरपूर आहे, काळजी नसावी.
माझा आधीच प्रतिसाद वाचलात तर तिथे लिहीलेले दिसेल, बाहेर मुलांनी बिहेव्ह करणे ही दोघांची जबाबदारी आहे, पालक व मूल. मी कधीही व केव्हाही माझ्या मुलाला असं वागायचा चान्स देणार नाही. अ‍ॅट द सेम टाईम, कधी तो वावगं वागलाच, तर मला दुसर्‍या कोणी माझ्या मुलाला अशी वागणूक दिलेली मला आवडणार नाही. यात आपला तो बाब्या काहीही नाहीये. मीदेखील कुठल्याही मुलाला अशी वागवणार नाही. मी पालकांशी बोलीन..

इकडे माझी लेखनसीमा.

अहो मॅडम माझे पोस्ट वाचुन ते लग्गेच स्वतःवर ओढवुन घेऊ नका. मी फक्त माझे मत व्यक्त केले. दुर्दैवाने ते नेमके तुमच्या वाक्याशी जोडले गेले. तुम्ही दुखावल्या गेल्या असाल तर सॉरी. मी तुम्हाला जनरलाईज केलेले नाहीये हे लक्षात घ्या. तुम्हाला आणी तुमच्या मुलाला शिस्त आहे म्हणजे ते आम्हाला नाही असाही गैरसमज करुन घेऊ नका.

इथे आम्ही बोललो म्हणजे लग्गेच इतर आगाऊ मुलाना बदडायला बसलोत असे नाही. सोशल एटिकेटस ही असतात काही. दुसर्‍यान्चे सोडा माझ्याच मुलीला, ती तीन वर्षाची असताना एका नातेवाईक मुलाने खूप मारलेय. मी गप्प बसले कारण घरात काही तमासखोर मन्डळी. ( त्यात महिला पण आहेत) पण आता मुलीला कणखर बनवतेय. की जी दुसर्‍याला मारणार नाही आणी स्वतःही मार खाणार नाही.

आणी मी तुम्हाला आणी तुम्ही मला ओळखतच नाही तर तुम्हाला बेशिस्त कशी म्हणेन मी?

माझी पण लेखनसीमा समाप्त.

प्रेशर कुकर इफेक्ट.
शेजारी/बाहेर कुठे आला तेव्हा आईबाबा सोबत असतील, तर कसा वागतो?

आईबाबांचा जो डायलॉग आहे ना, 'तुम्हीच कळ काढलेली असणार' तोच सजेस्टिव्ह आहे. घरात लै धाकात असेल पोरगं.

>>

इब्लिस भाऊ,

एकदम बरोबर. आईबाबांचा बराच धाकात आहे तो मुलगा.

बस्के, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा!
तुम्ही तुमच्या मुलाला योग्य ती शिस्त लावता, तू असं करुच नकोस म्हणून सांगता म्हणुन इतर कोणी तुमच्या मुलाला शिकवायला गेलं तर तुम्हाला ते पटत नाही. तुमचं मुलं चुकलंच तर तुम्ही स्वतः त्याला हँडल करता म्हणून तुम्हाला त्याला दुसर्‍याने हँडल केलेलं पटत नाही.
आणि हे बरोबरच आहे.
मुळातच आई वडील स्वतः मुलाला सांगतायेत तिथे दुसर्‍यांना संगायची गरज नाही. पण आई वडील दुर्लक्ष करत असतील तर दुसर्‍यांनी आपल्या पद्धतीने त्याला समजावलं तर आई वडीलांना राग येण्याचं कारणच नाही. नाही तर घरात ठेवा तुमच्या मुलाला. आमच्याकडे आणुच नका.
आय होप तुला समजत मी काय म्हणतेय!
लहान मुलं चुका करणारच! तुम्ही त्या चुकांना सांभाळून घ्या! त्याला हे करु नकोस म्हणून सांगा मग पुढच्याला सांगायची गरजच नाही.
माझ्या सगळ्या पोस्टींमधुन मला हेच सांगायचय!

एक उदाहरण (हे लिहायलाच आले होते इथे खरं तर) -
काल आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेले होतो. तिथे एकच जागा शिल्लक होती आणि ती जागा वॉशबेसिन जवळ होती.
म्हणजे वॉशबेसिन आणि खुर्ची मध्ये एक पार्टीशन होतं पण ते अपुरं होतं. म्हणजे कोणी जोरात पाणी सोडलं अस्तं आणि नळाखाली चुकीच्या पद्धतीने हात धरला असता तर पाणी त्या खुर्चीवर बसलेल्याच्या अंगावर उडलं असतं!
उपाय नसल्याने आम्ही तिथे बसलो. आणि मध्ये एकदा जेवताना तिथे एक लहान मुलगी हात धुवायला आली. तीचं निम्मं लक्ष खेळण्यात होतं आणि तिला काय मज्जा वाटत होती देव जाणे. ती बराच वेळ पाण्याखाली हात धरुन उभी होती. उंची पोहचत नसेल किंवा काहीही पण पाणी माझ्या मित्राच्या अंगावर उडत होतं.. खुप नाही. शिंतोडेच! पण जेवताना कोणी हात धुतय आणि ते पाणी आपल्या अंगावर उडतय हे थोडंसं किळसवाणंच आहे. त्याने एकदा मागे वळून पाहिलं कोण आहे ते अणि पुन्हा माझ्याशी बोलायला लागला.
काही मिनिटांचाच कालावधी. इतक्यात तिची आई तिथे आली आणि पटकन नळ बंद करुन म्हणाली,' रेवा, दादाच्या अंगावर उडतय ना पाणी? बंद कर नळ! सॉरी म्हण दादाला'
आम्ही त्यांना एक स्माईल दिली आणि ती रेवा पटकन हसुन म्हणाली 'सॉरी दादा!' हे झाल्यावर तीची आई पण म्हणाली, 'सॉरी हं'
नंतर पुन्हा ती मुलगी तिच्या मित्राला/ भावाला का कोणाला तरी घेऊन हात धुवायला आली तेंव्हा त्याला सांगत होती,' हळू धू हं हात! दादाच्या अंगावर पाणी उडेल' Happy
मला इतकं आवडलं ना हे! याच बीबीची आठवण आली.

शहाणी मुलं आणि शहाणे आई बाबा म्हणतेय ना मी
ते हेच!

तुम्ही तुमच्या मुलाला योग्य ती शिस्त लावता, तू असं करुच नकोस म्हणून सांगता म्हणुन इतर कोणी तुमच्या मुलाला शिकवायला गेलं तर तुम्हाला ते पटत नाही. तुमचं मुलं चुकलंच तर तुम्ही स्वतः त्याला हँडल करता म्हणून तुम्हाला त्याला दुसर्‍याने हँडल केलेलं पटत नाही.
आणि हे बरोबरच आहे.
मुळातच आई वडील स्वतः मुलाला सांगतायेत तिथे दुसर्‍यांना संगायची गरज नाही<<<

रिया, तू बस्केंना उद्देशून जे लिहिले आहेस त्याबाबत मला असे वाटते:

पालक आपल्या मुलाला समजावत असतील तर इतरांवर त्या मुलांना समजावून सांगण्याची वेळ येणारच नाही हे तुझे म्हणणे मर्यादीत अर्थानेच बरोबर आहे असे मला वाटते. ह्याचे कारण हे, की असेही होऊ शकते की काही वेळा काही पालक त्यांच्या अपत्याला जे काही शिकवतात / समजावून सांगतात ते इतर पालकांच्या मते मुळातच अपुरे, असंबद्ध असे असू शकते.

उदाहरणार्थः

क्ष कुटुंब य कुटुंबाकडे गेले. क्ष च्या अपत्याने तेथे एक छोटी काचेची वस्तू फोडली. आता क्ष पालकांच्या मते स्वतःच्या पाल्याला एक धपाटा / बर्‍यापैकी ओरडणे / ताबडतोब तेथून घेऊन जाणे हे पुरेसे असेल तर य कुटुंबाच्या मते त्यांनी नुकसानभरपाईही विचारणे आवश्यक असेल (डिपेंडिंग अपॉन संबंध्स कसे आहेत किंवा कदाचित इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ दॅटसुद्धा). पण क्ष कुटुंबियांनी तसे केले नाही तर?

किंवा, ह्याच उदाहरणात, क्ष कुटुंबियांनी ताबडतोब नुकसानभरपाई देऊ केली व एक शिष्टाचार म्हणून य कुटुंबाने ती नाकारली, पण क्ष कुटुंबीय आपल्या पाल्याला दोन वाक्ये बोलण्यापलीकडे काहीच करत नाहीयेत, अश्यावेळी त्या पाल्याला (अगेन डिपेंडिंग अपॉन रिलेशनशिप किंवा अदरवाईजही) य कुटुंबियांनी त्याला बोलावे की बोलू नये? (माझ्यामते बोलावे, कारण पालकांशिवाय इतर कोणीतरी पालकांसमोर आपल्याला रागवू शकते ही भावना मुले सिरियसली घेत असावीत).

त्यामुळे, आपल्या पाल्यावर उत्तम संस्कार आहेत व त्याला आपण जितके रागावतो तितके पुरेसे असून त्या भानगडीत इतरांनी पडू नये ही अपेक्षा (इतरांच्या घरी आपण आपल्या मुलांना घेऊन गेल्यानंतर) सपशेल फोल ठरते व चुकीची आहे.

(बस्के - नथिंग पर्सनल)

हो बरोबर आहे पण मी ते फक्त माझ्याबद्दल लिहिलय!
म्हणजे त्या व्यक्तीने त्या मुलाला त्याची चुक दाखवली आणि समजावलं तरी माझ्यासाठी ते तेवढं पुरेसं अस्तं! Happy

किंवा, ह्याच उदाहरणात, क्ष कुटुंबियांनी ताबडतोब नुकसानभरपाई देऊ केली व एक शिष्टाचार म्हणून य कुटुंबाने ती नाकारली, पण क्ष कुटुंबीय आपल्या पाल्याला दोन वाक्ये बोलण्यापलीकडे काहीच करत नाहीयेत, अश्यावेळी त्या पाल्याला (अगेन डिपेंडिंग अपॉन रिलेशनशिप किंवा अदरवाईजही) य कुटुंबियांनी त्याला बोलावे की बोलू नये? (माझ्यामते बोलावे, कारण पालकांशिवाय इतर कोणीतरी पालकांसमोर आपल्याला रागवू शकते ही भावना मुले सिरियसली घेत असावीत).
>>>
माझ्यामते बोलू नये! म्हणजे मी बोलणार नाही. ही भावना मुलांचं मन दुखावू शकते! अर्थात हे माझं मत आहे Happy मी बोलणार नाही पण कोणी माझ्या मुलाला(होईल तेंव्हा) किंवा आत्ताच्या केसमध्ये माझ्या बहिणीला बोललं तर मी कसं रिअ‍ॅक्ट करेन मला माहीत नाही.
कदाचित मलाही आवडणार नाही (इथे जे बस्के म्हणतेय तेच) किंवा काहीच वाटणार नाही (जर रागवणारी व्यक्ती खुप जवळची असेल तर)

कधी कधी शाळेत मुले इतरांचे बघून शिकतात. घरची शिकवण नसली तरी. आणि प्लेस्कूल पासूनही इतर मुलांचे बघूनही शिकतात. मुलांवरही दिवस भर अनेक स्ट्रेस दड्पणे येत असतात त्यांची तब्येत नाजूक असते. अनेक कारणांनी त्यांचे बिहेविअर थोडे असह्य होउ शकते. बरेचदा आईबाबा हपिसातून येतात, मुलाला पाळणाघर्/ शाळा/ संभाळायला ठेवलेल्या दीदी कडून पिकप करून गाडीत घालून परत तसेच बाहेर जातात. ह्यात ते मूल दिवस भराचे चिडलेले, कंटाळलेले असते. आईबाबांनी जवळ घ्यावे, आपले ऐकावे थोडे लाड, थोडा खाउ मिळावा, टीचर/ बस भैया रागवलेले आपन त्यांना सांगावे हे देखील पुरे होत नाही. त्यामुळेही कधीकधी बॅड बिहेविअर ट्रिगर होऊ शकते. इन स्पाइट ऑफ बेस्ट एफर्ट्स बाय पेरेंट्स. आपली जीवन शैली बघता वर्किंग डे ला रात्री वगैरे मुलांना बाहेर नेउ नये, स्कूल नाइट्स ना रात्री लवकर झोपवावे. त्यांचे पोट नीट भरले आहेना? काही दुखत खुपत नाहीना हे बघावे. हे महत्त्वाचे. सोशल कॉल्स काय सवडीने करता येतात. ते वीकांताला ठेवावे. आता एकुणच कुणाकडे अचानक जावे अशी परिस्थिती नसते. शिवाय जिथे लहान मुले येणे अपरिहार्य आहे तिथे
थोडी आउट डोअर अ‍ॅक्टिव्हीटी जसे पार्कात खेळणे , कागद काम, रंगकाम, इत्यादी त्यांच्या आवडीचे केल्यास असे वागणे कमी होईल. त्यांचे मानसिक ताण ते नीट बोलू शकत नाहीत. आपण तरी कुठे बोलतो? थोडी वाफ दवडू दिल्यास शांत झाल्यावर त्यांचे वाइट वाग्णे कमी होईल. असे वाट्ते.

कदाचित मलाही आवडणार नाही <<<

रिया, ताणायची इच्छा नाहीच, पण तुझ्या आधीच्या प्रतिसादानंतर तू संपादीत केलेल्या प्रतिसादातील हे वर कोट केलेले वाक्य अतिशय महत्वाचे आहे व तोच माझा मुद्दाही आहे.

उद्या तुझ्या अपत्याला कोणी काही बोललेले तुला आवडेल की नाही हे तुला आत्ता सांगता येत नसले तरी कदाचित नाही आवडणार असेही तू म्हणू शकत आहेस. ह्याचा अर्थ, आपल्याकडे पालकांच्या मनात पाल्याबाबत असलेला पझेसिव्हनेस इतका अधिक असतो की पुढे कधीतरी हा पाल्य जगाच्या शाळेत फेकला जाईल आणि आपण केलेले संस्कार कुचकामीही ठरू शकतील किंवा उत्तमही ठरू शकतील हेच त्यांच्या पचनी पडत नाही. आज तो त्यांच्या कह्यात असताना त्यामुळेच इतर कोणी त्याला उद्देशून काही बोलणे हे त्यांना अनावश्यक व आगाऊपणाचे वाटू शकते. त्याचवेळी, जो समोरून बोलणारा असतो त्याच्यावर पूर्णपणे भिन्न संस्कार झालेले असल्याने त्याच्यामते तुमच्या पाल्याला 'हे हे एवढे एवढे' बोलणेसुद्धा आवश्यक असतेच.

आता दोन भिन्न संस्कारातून पालक झालेल्यांच्या विचारांची अलाईनमेंट तर कधीच शक्य नाही. मग बेस्ट पॉलिसी काय? तर आपल्या पाल्याला त्याने ज्यांचे काही नुकसान केलेले आहे (कळत / नकळत) त्यांचे समाधान होईपर्यंत समजावून सांगणे! ह्यातून आपण एक जबाबदार व संवेदनशील माणूस घडवत असतो जो पुढे इतरांचे मन जाणू शकतो.

ह्म्म्म!
तसही मी माझ्या पुर्ती मतं मांडतेय. आत्ताचं सांगु शकत नसले तरी मी इतकं नक्की सांगु शकते की माझ्या मुलांनी तीच चुक पुन्हा पुन्ह करू नये हे माझं मोटीव्ह असेल
बाकी वरच्या प्रतिसादात तुला काय म्हणायचं ते कळालेलं नाहीये.
पुढच्याला बरं वाटेल इतकं मुलाला बोलण्यापेक्ष मुलाला कळेल आणि तो ती चुक करणार नाही असं बोलावं असं मला वाटतं!

पुढच्याला बरं वाटेल इतकं मुलाला बोलण्यापेक्ष मुलाला कळेल आणि तो ती चुक करणार नाही असं बोलावं असं मला वाटतं!<<<

धाग्याचे शीर्षकः मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे?

आता तो मुलगा पुन्हा तीच चूक करणार नाही इतपत त्याला बोलणे हे फक्त तुझ्या सोयीपुरते झाले ना? (म्हणजे तुझ्या मुलाची ती चूक पुन्हा झाली नाही इतपत संस्कार तू त्याच्यावर केलेस असे इतरांनी मान्य करणे ही तुझी सोय झाली ना? किंवा फार तर मुलाची सोय झाली). पण त्याच्या बेशिस्त वागण्याचे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे काय? Happy

दुसर्‍याच्या मुलाला हात लावू नये हे बरोबर जरी असले व मारु नये असे मी समर्थन करते. तरी काहि पालक खूपच उद्धट असतात.
त्यांना जराही वाटत नसते व समजून घ्यायचे नसते की त्यांचा मुलाने काय नुकसान केलेय किंवा करु शकतो.

पण अश्याच व्रात्य मुलाने जर तुमच्या मुलाला शारीरीक इजा केली तर कोणाचे लक्ष व वेळ त्या व्रात्य मुलाला समजवण्यात राहिल?
लोकं असे सल्ले देतात कारण अजून त्याचे(अश्या व्रात्य मुलांपासून झालेले) सिरियस ईफेक्ट भोगले नसतात.
समजा, व्रात्य मुलाने तुमच्या मुलाचा डोळा फोडला काही वस्तु भिरकावून, तुमच्या मुलाला सायकलवरून ढकलले, घरातील काचेची शोपीस फोडून इजा केली तुम्हाला व तुमच्या मुलाला तर तुम्ही त्या क्षणी काय कराल मग?

व्रात्य मुलाला समजवत बसाल? खात्री आहे की रागाने त्या व्रात्य मुलाला फोडून काढावेसे वाटेल. पन सामाजिक बंधनाने नसाल मारत तुम्ही पण काही लोकांना सहन होत नाही(आणि का करावे त्यांनी व्रात्य मुलाने केलेली इजा?) ते असतील मारत. कारण व्रात्य मुलाचे पालक नसतील सांगत तर हिच वेळ असते पालकांना देखील सुचवायची की, बस करा तुमच्या मुलाचे चाळे.

२-४ वर्षाच्या मुलांच्या झोपाळ्यावर झोके घेणे व झोपाळे तोडणे तरी पालक बाजूला बसून गप्पा मारतात. किंवा तिथेच मोठ्या बॅटने खेळणे,मोठ्या मुलांना वेगळी क्रिकेट साठी जागा असताना ह्याच गोष्टी त्रासदायक झालेल्या पाहिल्यात. बॅटीचा बॉल येवून बसून डोळ्याला गंभीर इजा झालेली माझ्या भाच्याला. पालक नुसते वरवर सॉरी म्हणून गेले पण आपला ७-८ वर्षाचा मुलगा २-४ वर्षांच्या मुलांसाठीच्या सेपरेट जागेत येवून त्याच्या मित्राबरोबर खेळतोय तेव्हा का बोलले नाहीत? पण त्यावेळी मग इतरांनी ओरडून सांगितले असते तर मिरची झोंबली असती. त्यामुळे अश्या नालायक पालकांच्या मुलांसकट त्यांना ओरडले तरी हरकत नाही.

उगाच फालतु सल्ले देणार्‍यांचे काय जातय की दुसर्‍याच्या मुलाला ओरडणे चुकीच, मारणे चुकीच. प्रसंगानुसार त्या त्या वेळी केलेली कृती व आपल्या मुलाला जपायला केलेली कृती बरोबरच आहे. कारण जर व्रात्य मुलाचे पालक पण आपल्या मुलाच्या चुकाच जपत असतात ना? तसाच प्रत्येक पालकाला आपल्या मुलाची चुकी नसताना त्याला झालेली इजा झालेली पाहून त्यांनी असे रीयाक्ट केले/मारले तर चुकले कुठे?

'प्रत्येक वेळी संस्कार हा रेलेटीव आहे' हा मुद्दा आणायची गरज नाही. बाहेर वावरताना काही कॉमन सेन्स बाळगणे काय कठिण आहे? जसे रीयाने सांगितलेले उदाहरण, की शिंतोडे उडणे मोठी गोष्ट नाही पण मुलाला सांगितले की राजा, असे हात धुवु नकोस. तुला भिजवले किंव तुझ्यावर पाणी उडाले तर चालेल का? (हि जी गोष्ट म्हण्ज कॉमन सेन्स आहे .)

'प्रत्येक वेळी संस्कार हा रेलेटीव आहे' हा मुद्दा आणायची गरज नाही<<<

हेही वाक्य (एकुणच, फक्त ह्या चर्चेसंदर्भात असे नव्हे) फार महत्वाचे वाटले. सापेक्षता सर्वत्र अमाप भरलेली असूनसुद्धा यंत्रणा, समाज इत्यादी बाबी 'लार्जली' (लार्ज मासेसच्यामते) सुरळीत चालण्यासाठी काही प्रमाणात अलिखित अ‍ॅबसोल्यूट असे काहीतरी गृहीत धरावे लागते.

अश्विनीमामी प्रतिसाद आवडला. म्हणजे बॅड बिहेविअर ट्रिगर व्हायला 'मुलांचा स्ट्रेस' हे कारणीभुत ठरेल कि नाही याबाबत मला काहिच माहित नाही. पण मी माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटलं तसं मुलांना गृहित न धरता, त्यांच्या मताला/ भावनांना योग्य तो आदर दिला आणी त्यांना क्वालिटी टाईम मध्ये सुसंवादातुन कसे वागावे ह्याचे धडे दिले तर नक्की गुणी बाळं घडवु शकतो आपण. (असं मला वाटतंय).

समजा, व्रात्य मुलाने तुमच्या मुलाचा डोळा फोडला काही वस्तु भिरकावून, तुमच्या मुलाला सायकलवरून ढकलले, घरातील काचेची शोपीस फोडून इजा केली तुम्हाला व तुमच्या मुलाला तर तुम्ही त्या क्षणी काय कराल मग?

>> कल्पनाच नाही करू शकत. त्यातही 'डोळा फोडणे' वै. घटना अतीशय दुर्दैवी म्हणता येतील. अश्या वेळेला काय करू आपण? मागे कुठेतरी वाचले होते कि मोठ्या मुलाने डॉक्टर डॉक्टर खेळतांना थर्मामिटर लहान मुलाच्या कानात इतक्या जोरात खुपसला कि त्याला हिअरींग अ‍ॅबिलिटी लॉस झाला. अश्या वेळी आपल्या हातात काय उरते? Sad

समजा, व्रात्य मुलाने तुमच्या मुलाचा डोळा फोडला काही वस्तु भिरकावून, तुमच्या मुलाला सायकलवरून ढकलले, घरातील काचेची शोपीस फोडून इजा केली तुम्हाला व तुमच्या मुलाला तर तुम्ही त्या क्षणी काय कराल मग?>> पहिल्यांदा मुलाला कडेवर घेउन शक्य तितक्या लवकर हॉस्पिटल गाठेन हे नक्की. क्रॅमर वर्सेस क्रॅमर मधला सीन अगदी लक्षात आहे. अपघातात आपण पहिले काय बघतो. मेडिकल अटेन्शन मिळाले पाहिजे. ही संस्कार, दुसृया मुलाला झापण्याची वेळ नक्की नाही.

पहिल्यांदा मुलाला कडेवर घेउन शक्य तितक्या लवकर हॉस्पिटल गाठेन हे नक्की. क्रॅमर वर्सेस क्रॅमर मधला सीन अगदी लक्षात आहे. अपघातात आपण पहिले काय बघतो. मेडिकल अटेन्शन मिळाले पाहिजे. ही संस्कार, दुसृया मुलाला झापण्याची वेळ नक्की नाही.

>> थँक्स अमा. तुमचा हाही प्रतिसाद आवडला. खरं तर हा कॉमनसेन्स आहे. पण एकदम घाबर्‍याघुबर्‍या स्थितीत आपल्याला हे सुचेल का इतकीसुद्धा खात्री वाटत नाही. कदाचित आई झाल्यावर हे आपसुक येत असावं. Happy

असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व.

आता तो मुलगा पुन्हा तीच चूक करणार नाही इतपत त्याला बोलणे हे फक्त तुझ्या सोयीपुरते झाले ना? (म्हणजे तुझ्या मुलाची ती चूक पुन्हा झाली नाही इतपत संस्कार तू त्याच्यावर केलेस असे इतरांनी मान्य करणे ही तुझी सोय झाली ना? किंवा फार तर मुलाची सोय झाली). पण त्याच्या बेशिस्त वागण्याचे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे काय?
>>>
त्या क्षणी त्याचं नुकसान हे आपल्या मुलामुळे झालय आणि ते फार मोठं नसलं तरी नुकसान झालय म्हणून त्यांची माफी मागणं, मुलाला मागायला लावणं, आणि फार मोठं नुकसान असेल तर भरपायी ची तयारी दाखवणं (हो म्हणजे त्याने कप फोडला म्हणुन तुम्ही पैसे द्यायला गेलात तर ते असभ्य आणि मग्रुरीचं लक्षण दिसेल. पण टिव्ही फोडला तर नुसती माफी म्हणजे मुर्खपणाचं लक्षण दिसेल) हे योग्य ठरेल. आणि त्याच बरोबर त्यांच्यासमोर मुलाला समज देणं आणि नंतर घरी जाऊन आधिक प्रेमाने आणि शांतपणे तू कसा चुकलास हे समजावुन सांगणं माझ्यामते पर्फेक्ट आहे. आणि पुन्हा दुसर्‍या वेळेस त्याने तीच, तशीच चुक परत केलीच तर त्याला ताबडतोब चांगलीच शिक्षा करणं (कारण समजावुनही तिच चुक पुन्हा करतोय याचा अर्थ तो मुद्दाम करतोय असाच होतो) माझ्या मते बरोबर!

हे सगळं मी नॉर्मल मुलाबद्दल बोलतेय, स्पेशल मुलांबद्दल नाही हे लक्षात घ्या. स्पेशल मुलांबाबत त्यांना समजावता येईलच आणि ते पुन्हा ती चुक करणार नाहीतच याची खात्री नसते.

चांगली चर्चा चालू आहे.
कालच एक विचित्र अनुभव घेतला. ट्रेन मधुन जाताना बाजुच्या सीट वर एक मुस्लीम फॅमिली बसली होती, दोन बायका आणि एक ७/८ वर्षाचा मुलगा. मुलगा मोबाईल वर मोठ्या आवाजात गाणे लावून ऐकत होता. खरोखर इरीटेट होत होते. मी थोड्या वेळाने त्या बाईला सांगितले की त्याला ईअर फोन लावून गाणे ऐकायला सांगा, ती बाई म्हणाली की मी सांगिर्तले पण तो ऐकत नाही. मग म्ह्णाली की 'आप को ही इतनी तकलीफ हो रही है , सामने जो बठे है उनको कुछ् प्रोब्लेम नही' वैगरे. मी म्हणाले की ' प्रोब्लेम होत असेल पण त्या बोलत नसतील'.

त्याने गाणी बंद केली. थोड्या वेळाने त्यांच्या समोरची एक मराठी मुलगी माझ्याकडे तावातावाने बघून त्या बायकांना बोलायला लागली ' उसने बोला, लेकीन आपने कैसे सून लिया? बच्चा तो है , बोअर होगा तो गाने सुनेगा ना.कुछ गलत तो नही कर रहा था' मी अवाक.

मी तिला म्हटले ' त्याने गाणी बंद पण केली , तुम्हाला एवढ्या वेळाने बोलायला सुचले का आणि ही पब्लिक प्लेस आहे, घरी तुम्ही जोरजोरात गाणी ऐकू शकता, माझे काहीच म्हणणे नाही.'

तिचे उत्तर - तुम्ही मगाशी म्हणालात बाकिच्यांना पण त्रास होत असेल , म्ह्णजे माझ्याबद्दल पण बोललात. मला विचार करायला वेळ लागला. माझा मुलगा असता तर मी नसती गाणी बंद करायला दिली.

मी - अहो, हे बेसिक कॉमन सेन्स आहे की बस्/ट्रेन मधे मोठ्या आवाजात गाणी ऐकू नये. त्यात ही तुम्हाला विचार करावा लागला. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी बोरिवलीला उतरल्यावर त्याला पु न्हा गाणी लावायला सांगा आणि ऐका.

ती मुलगी माझ्या बरोबर बोरिवलीला उतरली आणि कुणाशी तरी फोन वर मोठ्या आवाजात मला ऐकायला जाईल असे बोलत होती 'काय काय आगाऊ लोक असतात वैगरे वैगरे' खूपच पोरकट वाटले हे वागणे आणि खरोखर तिची किव आली.

सामी,

ही सवय लहान मुलांनाच काय, मोठ्यांनाही असलेली पाहिलेली आहे आणि अत्यंत इर्रिटेटिंग आहे.

अमा,
>>पहिल्यांदा मुलाला कडेवर घेउन शक्य तितक्या लवकर हॉस्पिटल गाठेन हे नक्की. क्रॅमर वर्सेस क्रॅमर मधला सीन अगदी लक्षात आहे. अपघातात आपण पहिले काय बघतो. मेडिकल अटेन्शन मिळाले पाहिजे. ही संस्कार, दुसृया मुलाला झापण्याची वेळ नक्की नाही.<<

अहो हे तर कोणीही नक्की करेलच. मी उपाय नाही विचारलाय. इथे वरची प्रेमळ (?)लोकं फुकटच सांगताहेत की, व्रात्य मुलाला प्रेमाने समजवा वगैरे ; म्हणून प्रश्ण विचारला की आपल्या मुलाला जखम झाली अश्या मुलांमुळे तर "त्या प्रसंगी" काय प्रेम दाखवणार त्या व्रात्य मुलाला व आपण काय करु शकतो आपल्या नुकसानाबद्दल? त्या व्रात्य मुलाचे थोबाड फोडून 'पण' उपयोग नाही अश्या केसेस मध्ये. ( btw , it was अ sarcastic statement ma'm)
म्हणून त्या व्रात्य मुलाच्या पालकांनाच नंतर बदडलं पाहिजे शब्दांनी.

असं काही इमॅजिन सुद्धा नाही करता येत. पण माझ्या मुलाने असं काही केलं कारण काहीही असलं तरी मी ते खपवून घेऊ शकणार नाही. तो असं करणार नाही अशी सध्या तरी खात्री वाटते.

पण माझं मुल असेल किंवा दुसर्‍याचं मारण्याची शिक्षा केल्याने झालेलं नुकसान भरून येऊ शकत नाही. की चूक करणार्‍या मुलाला चूक समजत नाही. अशा वेळी चूक करणार्‍या मुलाला जवळ घेऊन त्याला समजावणं जास्त महत्वाचं असतं. अर्थात काय परिणाम झालाय ह्यावर अवलंबून असतं आपण काय मनस्थितीत आहोत आणि आपण काय रिअ‍ॅक्ट करू. ह्यात रिअ‍ॅक्ट करणाराही चूकीचा नसतो.

पुन्हा ह्यात प्रत्येकाचे व्हॅल्युज वेगळे असतात. म्हणजे माझ्या घरी मुलं येऊन मस्ती करतात उड्या मारतात चालतं, पण न विचारता बाजूला काढून ठेवलेली खेळणी घेऊन खेळतात चालतं पण जर एखादं बॉक्स पॅक खेळणं असेल तर ते नको सांगितलेलं असताना उघडलेलं मला आवडत नाही. तसेच आत्ता तुला भूक लागली अएल तर मी जेवायला वाढते असं सांगितलेलं असतानाही माझं लक्ष चुकवून फ्रीजमध्य्३ए हात घालून चॉकलेटस घेतलेली मला आवडणार नाही. मी पालकांकडे नक्कीच तक्रार करणार. आणि पुन्हा हे असे झाले तर मी त्या मुलाला घरी खेळायला येऊ नकात असेही सांगणार.

नातं कुठलही असलं तरी माझ्या घरी माझे नियम हे सांगयला मला काहीही वातत नाही. समोरचा काय विचार करेल ह्याने मी स्वतःला काही फरक पडून घेत नाही. अर्थात माझ्या बोलण्यात रूडपणा नसतो (असं मला वाटतं)

ही सवय लहान मुलांनाच काय, मोठ्यांनाही असलेली पाहिलेली आहे आणि अत्यंत इर्रिटेटिंग आहे.>>>>+१

माझे मत. मला वाटत कि मुलांना आपण सुप्पोर्त केला पाहिजे म्हणजे माझा भाचा ( नंडेच मुलगा) कीस्मास्च्या सुत्ठीत आमच्या घरी आला होत. त्याचे वय वषर ११ . त्याच्याच वयाची मुले आमच्या ब्ल्दिंग मध्ये आहेत. काही चांगली तर काही वात्रट त माझा भाचा ( सिधू) त्याचाशी खेळायला जायचा चांगला खेळायचा पाहुणा असल्या कारणाने सुटणे वेगेरे बाजूला ( तुला खेळायचे आहे तर तुझ्यावर राज्य )अस काही तरी चलय्च.
एके दिवशी असाच एक पाहुणा एका च्या घरी आला तो सगळ्यावर बोस्सिंग करू लगल. मी मुलाशी जर बोलकी असल्या मुले मुल मला संगु लागली कि हा मुलगा शिव्या देतो म्हनॊनंइ मुलांना बोलली कि जाऊ दे तो बाद बोय आहे लक्ष देऊ नक.

तयच रविवारी माझे काम संपून मी जुस्त गल्लरी मध्ये उभी होती तर तो मुलगा त्या सर्व मुअलन समोर माझ्या भाच्या ला फार घाणेरड्या अशा शिव्या देत होत. तर मी थेट खाली जाऊन त्याला विचारे कि तुझ्या आई वडिलांनी तुला हेच शिवले का ?. तर तो मुलगा मला घाबरेल अशी अपेक्षा होती कि तो सुद्धा लहान त्याला त्या शिवीचा अर्थ तरी माहित आहे कि नाही देव जाने . पंतो उद्धट मुलगा मला हि उलट सुलट बोलू लागला.तर मी त्याची आई वडिलांना बोलावले कि ह्या बोलाची शीड=स्त आहे कि नाही तो काय बोलतो याची काही समच तर त्याचे आई वडील त्याने काय बोलला हे ऐकण्या एवजी त्याल समर्थन करूलगले सो मी त्यांना खूप लेत्फ रिघत घ्र्तले.

त्यानंतर मुला थोडी आपले अप्शाब्ध वापरणे कमी झाले ( थोडक्यात इथाकेच मुल चुकत असेलतर त्याला रोकने जरुरीचे आहे. जेणे करून मुला आपल्या आई वडिलांचे एकवे असा सारासार विचार करत नहि.त्यनि दुसर्या मोठ्या माणसाचे एकवे हेच आहे)

एकदाही कसलीही निवडणूक न लढलेले लोक, राष्ट्रीय राजकारणावर मते कशी देऊ शकतात...तसा हा धागा!

Pages