मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे

Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21

हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.

आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो बेफिकीर आम्हाला ही राग येत असे. पण आत्ता तो ( आठवी ) बर्यापैकी शांत झालाय. एक एक वय असत म्हणायचं का ? अगो अगदी मुद्देसूद प्रतिसाद
<<मुख्य म्हणजे आई-बापाची मुलांना आवरायची इच्छा आहे की नाही, ते पहिल्या ५ मिनिटात समजते.>> अगदी अगदी

देवकीताई, अहो तुम्ही असे कसे करता. तुमच्या सकाळच्या धांदलीत दारात आलेले दुसर्‍याचे मूल हे सुद्धा शेवटी मूल आहे हे विसरणे चुकीचे आहे. तुम्ही त्याला दारातून आत घेवून पाठीत प्रेमानेच एक जोरात रटटा मारून मग तेवढ्याच प्रेमाने जवळ घेवून समजावायचं ना, बाळा तु कितीही गोड असलास तरी सकाळच्या घाईत तुझी आई नासमज पणे माझ्यकडे सोडून गेलीय ते तिने असे करावयास नको. पण तुला सांभाळायची व तुझे मस्तीखोर चाळे सहन करायची मला सवय नाही व झेपत सुद्धा नाही तेव्हा गुमान पणे घरी जा.

तुम्ही सध्या कुठल्या चाळीत रहाता? तिथे असे प्रेमाचे धडे नाही देत तुम्हाला कोणी? दुसर्‍यच्या मुलाबद्दल असे कसे लिहिता? भले कितीही ते मूल वाईट असले व तुम्हाला त्रास झाला वरचे वर तरी काय झाले. मुले हि फुले असतात. दुसर्‍यची असली म्हणून काय झाले. Proud

मुले हि फुले असतात. >>> मी साने गुरुजींची शिष्या नव्हे. बरेचदा मुले ही देवाघरची फुले नसून सैतानाघरचे काटे असतात.

आणि हो, सकाळच्या धांदलीत आपली मुले दुसर्‍याच्या घरी सोडणारे बेशिस्त पालकांचे बिलकूल वाईट वाटून घेवु
नका. तुम्हाला अश्या गोष्टी कशा हाताळाच्या ह्याचे धडे इथे मायबोलीवरच नाहितर कुठल्याश्या चाळीत हुशार व प्रेमळ व्यती कडून मिळतील अशी आशा करते.

Assumption : 'मुलं' ही आई-वडिलांची पूर्णतः जबाबदारी आहेत.

इथे बरीच मंडळी मला लहान मुलांचे 'विक्टीम' झालेले दिसतात, कोणाला जर स्वतःच्या 'right to say NO ' ची जाणीव नसेल तर कोण काय करणार? अर्थात जेव्हा आपण 'right to say NO ' वापरतो तेव्हा मग समोरच्या माणसाच्या Good books मध्ये आपण राहणार नाही ह्या भिती/भीडे मुळे 'नाही' म्हंटले जात नाही का?

१. बेल मारून पळणारी मुलं - दार उघडायच का नाही हा choice आपला आहे. दुपारी झोपतान बेलचा स्विच ऑफ करून ठेवता येतो. आजकाल (महत्त्वाचे) कोणी एकमेकांकडे फोन न करता जात नाही. समजा नाही उघडले दार तर काय मोठा फरक पडतो? आपण त्रास देऊन ही समोरच्याला त्रास होत नाही हे एकदा उपद्व्यापी मुलांना कळले की बघा बंद होते की नाही.

२. बसमध्ये मागून लाथा झाडणार्‍या मुलांच्या आई-बापांना कडक शब्दांत समज द्यायला हवी गरज पडल्यास बाचाबाची करायची तयारी हवी.

३. आपल्याला जर लहान मुलं आलेली चालत नाहीत तर ज्यांना लहान मुलं आहेत अश्या स्नेहींना त्यांची मुलं कळत्या वयाची होईपर्यंत, आपल्या घरी न बोलावण्याचा पर्याय आहेच की.

४. आपाल्याला काही करायची इच्छा नसेल (मुलांशी खेळणे, त्यांना रमवणे, खाली खेळायला घेऊन जाणे) तर सरळ त्यांना टी.वी. लावून द्यायचा आणि रिमोट त्यंच्या हातात द्यायचा. आजकालची बरीच मुलं तासन्तास टी.वी.समोर पुतळ्यासारखी स्तब्ध बसू शकतात. हे यजमान, आई-वडिल सगळे करू शकतात.

बरेचदा मोठे आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, मावशी/आत्या-काका हे त्यांच्या रिस्पेकट्व्ह नातवंडांच्यात / भाचरांत तुलना करतात. एखाद मूल मोठ्याच्या मनाप्रमाणे वागत नसेल तर लगेच, बघ! तो अमका-तमका कसा शहाणा आहे लगेच माझं ऐकतो, नाहीतर तू? अश्याने मुलं बिथरतात आणि चांगल/ व्यवस्थित वागायच्या ऐवजी अजूनच अंगात आल्यासारख करतात.

हाणामार्‍या करणं, न-कळ्त्या मुलांना नावं ठेवणं किंवा त्यांच्या आई-वडिलांच्या दुर्लक्षाचे सुरस- रम्य वर्णनानी प्रश्न सुटणार आहेत का? (अर्थात, प्रश्न सोडवायचे असतील तर... नुसत्यात गप्पा मारायच्या असतील तर काही उपाय नाहित, माझ्याकडे तरी.)

रिया:
तुमचा काहीतरी गैर्समज झालाय माझा पॅरा वाचुन. अजुन एकदा वाचा. त्यातील नेमका मेसेज ल्क्षात येइल.

आज खुप गडबड आहे, पण इथे रुमाल. रात्री लिहिन.

एकंदरीत आपल्याला मुलांचे आणि पालकांचे सुद्धा वेगवेगळे नमुने दिसतात.

१. मवाळ मुले. जी इतरांच्या घरी खूप शिस्तीने वागतात अणि एका जागी बसून राहतात.

२. अशी मवाळ मुले जी इतरांच्या घरी खूप वेळ शिस्तीने वागतात पण त्यांना काही करायला / खेळायला मिळाले नाही, एकटेपणा वाटायला लागला की वेड्यासारखी वागतात. भूणभूण करणे, वस्तूंना पाहायला जाणे मग पाहून झाले की कुतुहल म्हणून हात लावणे. मग खिडकीत डोकावणे, खिडकीतून दिसत नसेल तर मग सोफा, गादी अशा ठिकाणी चढणे. (निवांत ह्यांनी लिहिलेले स्वगत ह्या मुलांना लागू पडते)

३. अशी मुले जी संयमित वात्रटपणा करतात पण ओरडा मिळाला की गप्प बसतात.
(निवांत ह्यांनी लिहिलेले स्वगत ह्या मुलांना लागू पडते)

४. अशी मुलं जी खूप बेशिस्त असतात, ढालगज आगाऊ असतात, ज्यांचा बेशिस्त्पणा पाहिला की मुलांच्या आधी पालकांचा राग येतो. जी कोणालाच जुमानत नाहीत.

१. जे पालक वरील २ क्रमांकाच्या मुलांना कशात तरी गुंतवतात आणि मग यजमानांची माफी मागतात.

२. जे पालक वरील २-३ क्रमांकाच्या मुलांना ओरडतात आणि तिथेच शिस्तीने वागायला लावतात.

३. असे पालक ज्यांना वरीलपैकी ३-४ क्रमांकाच्या मुलांना आवरायचे असते पण त्यांना काय करू कसे करू हे सुचत नसते,

४. असे पालक जे ३-४ क्रमांकाच्या मुलाकडे दुर्लक्ष करतात. यजमान त्या मुलांना ओरडले तर त्या ओरडण्याकडेही दुर्लक्ष करतात.

५. असे पालक जे ४ क्रमांकाच्या मुलांचे कौतुक करतात आणी त्यांना कोणी ओरडले तर त्यांना राग येतो. (बेफि यांची राजश्री आणि तिचे पालक)

धाग्याचा विषय जरी "मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे" असा असला तरी आपल्याकडे पाहुणे म्हणुन लहान मुल आली तर त्यांचाही पाहुणचार हा झालाच पाहीजे Happy जस त्याला त्याचा वयानुरुप खेळणे उपल्बध करुन देणे. त्यालाही तेवढच महत्त्व देउन त्याच्याशी त्याच्या कलेने त्याच्या आवडी च्या गप्पा मारव्या. अधुन्-मधुन त्याच्याकडे लक्ष असु द्यावे. Happy काही खोड्या करत असेल तर समजावुन सांगणे/समज देणे. (त्याच्या आई-वडीलांना वाईट वाटले तरीही)

एखाद्यातरी पोस्टमधे "मी तेव्हा त्याला/तिला (जितक्या हक्काने) धपाटा घातला, पण नंतर (तितक्याच आपलेपणाने) जवळ घेऊन समजावलं की 'बाळा, असं केलं तर तुला किंवा इतरांना त्याचा त्रास होतो, तेव्हा तू असं करत जाऊ नकोस.'" असं वाचायला मिळेल असं वाटलं होतं. असो.
>>
स्वाती, असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत पण तो धाग्याचा विषय नसल्याने मी सांगितले नाही.
मुलांना प्रेमाने शिक्षा केल्यावर काही समजुन सांगितलं (जे आमच्या घरी नेहमीच परी बाबत होतंच) तर त्यांच्या आई वडीलांना काही प्रॉब्लेम नसेल तर आम्हाला त्या मुलांचा त्रास होत नाही(हे मी वरती एका पोस्टीत लिहिलय). लहान मुलं त्रास देणारच.. पण म्हणून त्यांना पाठीशी घालणार्‍यांचा राग येतो म्हणून अशी मुलं नकोशी असतात.

राजसी, तुझ्या पोस्टला हे माझ्याबाबतीत स्पष्टिकरण -
मुलांनी काय केलं तर आपण काय करायला हवं ही चर्चा इथे चालू नाहीच आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्या त्या वेळेला उपाय शोधतोच!
त्या उपद्व्यापी मुलांमध्ये आपली मुलं येऊ नयेत म्हणुन काय करावं अशी चर्चा अपेक्षित आहे.
आणि मुळात आपण त्या मुलांना काही समजवायला गेलो तर अनेक पालकांना चालत नाही ओ!
हा प्रॉब्लेम आहे त्याचं काय करावं असा प्रश्न पडलाय मला Sad

माझ्या मामाचा मुलगा आजीला मारतो. जेंव्हा मी मामीला म्हणाले की 'तुझ्या मुलाला जरा वळण लाव' त्यावर तिला राग आला आणि मी नातेवाईकांमध्ये उद्धट म्हणून फेमस झाले. त्याने मला काहीच फरक पडत नाही पण आईला फुकटचा मन:स्ताप झालाच ना?
बाकी माझ्या घरात माझ्यापेक्षा मोठी माणसं असल्याने मला 'त्या नातेवाईकांना न बोलावणं' हा निर्णय घेता येणं शक्य नाही. आणि माझी आई प्रचंड सहनशील वगैरे आहे त्यामुळे असल्यांना ती काही बोलत नाही. तेंव्हा जे काही करावं ते मलाच करावं लागतं आणि असल्या लाडावलेल्या मुलांचा मला त्रास होतो!
आणि आता मला कळालय की तो अनेकांना होतो.. फक्त मीच नाहीये.
तेंव्हा अशा दिवट्यांना त्यांच्या आई वडीलांनी वळण लावायला हवंच!

मी इथे मगाशी पोस्ट टाकली होती....ती दिसत नाहीये.... Sad
परत लिहिते....

त्या दिवशी बस मधे मी चढले..एका मुलाला आई ने धपाटा मारला...काय झाले ते कळले नाही पण तो मुलगा रडत रडत बोल्ला तुझ्या आई@@###**%%##
मी आणि बस मधले बाकी प्रवासी शॉक्ड...मुलगा रॉक्ड.... Sad
आणि साध्या बस मधे नाही एसी बस मधे... आई एकदम वेल एज्युकेटेड इंग्लिश बोलणारी...
आई ला सहाजिकच लाज वाटली आणि अजुन एक लाउन दिली त्या मुलाला परत तो मुलगा रडत रडत बोल्ला मा@@##&%%.....
मी सर्द..........
न रहावुन विचारले की ," हाउ ओल्ड युअर सन इज? "
ती बोल्ली " ही इज जस्ट ७ "

७?? आणि तोंडात ईरसाल शिव्या?? आई साठी?????
लगेच ईतर बायकांनी कुत्सित वगैरे कटाक्ष टाकलेच.....मला ही कळेना झालं......की हे नक्की काय???
त्या मातेने परत पोराला हात लावला नाही...नाहीतर डिक्शनरी उघडायची एक सो एक शब्दांची......पण ती लगेच नेक्स्ट स्टॉप ला उतरली........

या प्रकाराला काय म्हणावं?????

'तुझ्या मुलाला जरा वळण लाव' >> हे खरेच रूड वाटू शकते. मूळ इश्यू बाजूला राहून, ती सासुर वाशीण बाई तिला तुझा मुलगा असे म्हटले तर तिला वाइट वाटेल ना? ते दोघांचे मूल आहे. कदाचित ती समजावत असेल मुलगा ऐकत नसेल. विषयांतरा बद्दल क्षमस्व.

घाईत आहे, थोडक्यात लिहीते. अनिश्काचा मुद्दा खरा असेलच, कारण नुकतीच अशी घटना आमच्या शेजारच्या सो. त घडली. नेमके माझ्या चुलतसासर्‍यानी ती बघीतली. फरक हाच तिथे मुलाच्या आई ऐवजी वडील होते. लहानपणापासुन त्या मुलाने जर शिव्यान्ची ओवीच ऐकली असेल तर तो काय पसायदान म्हणणार?

अमा, खरचं रुड वाटेल का?
म्हणज ती माझी मामी आहे. मी आणि मामा बर्‍यापैकी क्लोज आहोत.
रच्याकने सख्खी मामी नाही. पण मामाचं-माझं नातं सख्ख्यासारखं आहे Happy
आणि तिच्या लग्नाला अनेक वर्ष झालीयेत (किमान ७ तरी). बरं मी मामा समोर असता तरी त्यालाही 'तुझं मुल'च म्हणाले असते. आणि मुख्य म्हणजे जेंव्हा तिचा मुलगा माझ्या आजीला (इथे लक्षात घ्या माझी आजी ती त्याची सख्खी आजी नाही) मारतोय आणि तीने त्याला आवरायचं सोडुन ' तो इतका मारतोय तरी त्या त्याला समजावायला कशाला जातात काय माहीते' असं सांगतेय मला तेंव्हा मी तिला दिलेलं उत्तर रुड असू शकेल? Uhoh
आणि समजावत असेल पण ऐकत नसेल कॅटेगिरी असती तर खरच मी तिला तसं म्हणालेच नसते Happy
ती तिच्या मुलाची सायकॉलॉजी वगैरे जपते म्हणे!

सुदैवाने आजुबाजुला चंडप्रतापी मुले नसल्याने असे अनुभव नाहीत. त्यात आमच्या स्पष्टोक्तीची सगळ्यांना कल्पना असल्याने आम्ही नणंदा, जावा, भावजया एकमेकांच्या मुलांचे कौतुक आणि "कोड"कौतुक समान प्रेमाने करतो.

जेंव्हा लेक लहान होती आणि आताही, कुठेही जाताना तिची खेळणी, थोडासा खाऊ, एकादे पुस्तक घेऊन जाते, ज्यामुळे ती बोर होत नाही.

एकादे मस्तीखोर मूल लेकीच्या गृपमध्ये मिसळत असेल तर त्यांच्याशी सुसंवाद हळू हळू कमी करतो. (स्वार्थीपणा म्हणू शकता) पण निदान त्यामुळे उरलेला गृप तरी शांत रहातो.

लेकीला साधारणतः चारचौघात वागायचे नियम शिकवलेले आहेत. कोणी आले असले किंवा कोणाकडे जायचे असल्यास, त्या पाहुण्यांशी कसे वागावे, घरी कोण असेल, लहान मूल असेल तर काय करू नये, हे तरी सांगायचो. सध्या तिला हे सांगावे लागत नाही.

इतर कोणा मुलामुळे लेकीला चुकून त्रास होत असेल तर माझ्या मुलीला अमुक त्रास होतोय तेंव्हा आता आवरा असे स्पष्ट सांगते. आणि लेकीने चुकून मस्ती केलीच तर तिलाही आता आवरा असे सांगते.

त्यामुळे माझे आयुष्य सोपे होते. लोकांना काय जातयं "मुलच ती, मस्ती करायचीच" म्हणायला? माझं मूल बेशिस्त झालं तर मला वैताग. आणि लोकांची मूलं बेशिस्त वागली तर मनस्ताप.

लहान मुल जर वयोवृद्ध माणसाला मारत असेल (खरं तर कोणालाही मारत असेल) तर त्याच्या हातातुन ज्या वस्तुने तो मारत असेल ती लगेचच काढुन घेणे आणी त्याला एक फटका देणे/ किमान त्याला डोळे मोठे करून रागे भरणे एवढा हक्क आसपासच्या मोठ्यांना (मग ते मुलाच्या सो कॉल्ड 'डे टू डे अपब्रिंगींगमध्ये' सहभागी असोत किंवा नसोत) असला पाहिजे असं मलातरी वाटतं. कारण मारणारे मुल अजाणतेपणी मारत असले तरी मार खराखुराच लागतो ना. तुमच्याशी नातं टिकावं म्हणुन/ तुम्हाला काय वाटेल हा विचार करून गपगुमान मार खाणार्‍या माणसाचा अब्युज होत नाही का?

कोणाला जर स्वतःच्या 'right to say NO ' ची जाणीव नसेल तर कोण काय करणार? अर्थात जेव्हा आपण 'right to say NO ' वापरतो तेव्हा मग समोरच्या माणसाच्या Good books मध्ये आपण राहणार नाही ह्या भिती/भीडे मुळे 'नाही' म्हंटले जात नाही का?

>> राजसीच्या पोस्टमधला हा भाग पटला. गुड बुक्स मध्ये राहण्यासाठीच असं नाही, पण काही वेळेला नातं इ. बघुन गप्प बसावे लागते. (आणी ते चुकिचं आहे हे पटतंय Sad ).

रीया, कशाला इतकं समजवत बसलात लोकांना? ज्याला त्रास होतो तो बोलतो. बोलणारच. सगळे बोलतात.
ज्यांना कल्पना येणं कठीण आहे ते उगाच बोलणार, की कशाला दुसर्‍यांच्या मुलाला नावं ठेवतात वगैरे. दुर्लक्ष करा त्यांना. त्यांच्या घरात काही मोठं नुकसान झाले की कळेल त्यांना.

राजश्री (बेफींनी लिहिलेली गोष्ट) सारखी मुलं असतातच. मी सुद्धा पाहिलीत्/अनुभवलीत व आता ती करण्याची आवड नाही. का म्हणून दुसर्‍याची बेशिश्त मुलं सहन करा?

एक उदाहरण म्हणून ,
आमच्या कडे एक बाबाच्या मित्राचे मुलगा मंदार म्हणून जो दुसर्‍यच्या घरी आल्यावर, फ्रीज सारखे उघडे ठेवणे, मेन डोअरच्य लॅचशी खेळणे,फोनशी खेळणे(लँडलाईन), वस्तु फेकणे, घरातील खेळणी तोडणे, शोकेस मधले चीजा काढून घेणे, नाही दिल्या तर हट्ट करणे, लोळणे व लोळताना मध्येच फेकाफेक करणे. खायला दिलेली वस्तु नाही आवडली तर तिथेच थुंकणे, टीवीचा रीमोट तोडणे वगैरे.

अश्या मुलांना , का नाही पालक बाहेर घेवून जायच्या आधी बौद्धिक घेत. स्वतःला नाहीच जमत तर डॉकला भेटत?

पाहुण्चाराचा काय प्रश्ण आहे इथे, तो कोण करत नाही. दुसर्‍याचा आदर करायला लावणंही हा भाग आहे व पालक तेच शिकवत नाहीत हाच मुद्दा आहे. अश्या मुलांना डॉ़ किंवा मानसोपचाराची गरज असते त्यांच्या पालकांसहित. पण हेच समजत नाही व लोकं मुद्दाम्हून समजून घेत नाही कारण त्यांचं काही नुकसान होत नाही.

राजश्री , मंदार सारख्या मुलांना व त्यांच्या पालकांना डॉक ची गरज तर नक्कीच आहे.

जाईजुइ, एकदम योग्य पोस्ट.
-------------------------------------------------------------------------------
हेच तर काही पालकांना समज्त नाही. आणी वर म्हणतात मूल आहे हे विसरता कामा नये. अहो हि मुलच विसरायला लावतील इतका धुडगुस घालतात...

>>>> स्वतःला नाहीच जमत तर डॉकला भेटत? <<<< हो ना,सहमत,
(अन डॉकलाही नाही जमल तर आमच्यासारख्या कुडमुड्याज्योतिषान्ना तरी भेटायला लागतच लागत. Proud )
सध्या माझ्या नजरेसमोर अजुनच एक भन्नाट प्रकार दिसतो आहे.
काय होते ना की हल्ली नवश्रीमंत बरेच आहेत, अन आम्हाला नाही मिळाले म्हणुन आमच्या पोरान्ना आम्ही सर्व काही उपलब्ध करुन देतो, शिवाय आधुनिक एकविसाव्या शतकाशी जुळवुन घेण्याकरता त्यान्ना याबाबी माहितीच असायला हव्यात या अन अशा येडचाप खुळचट समजुतीन्च्या आहारी जाऊन, दुसरीकडे पैशाची कमतरता नसल्याने दहा पन्धरा हजारांचे मोबाईल खेळण्यासारखे दोनचार वर्षाच्या मुलांच्या हाती बिनधास्त देतात. वर सान्गतात की माझ्याकरता काय, दहा हजार पोराच्या खेळण्याकरता गेले तर गेले, नैतरी कुणाकरता कमावतोय!
इथवर प्रॉब्लेम नाही, पोरग त्यान्चे, पैका त्यान्चा, मोबाईल त्यान्चा, अन दोनचार वर्षान्चा पोरगा मोबाईलच्या रेन्जमधे सारखा वावरल्याने जे व्हायचे ते पोराचे व पडझडीमुळे फुटतूट ती त्यान्च्या मोबाईलची होणार. मला काय त्याचे? Proud
पण प्रश्न इथेच उभा रहातो, की हेच कार्टे पाहुणे म्हणून दुसर्‍याकडे गेले की दुसर्‍याच्या हातातील असाच मोबाईल "सवईने" सहज हिसकावून घेते, न मिळाला तर भोकाड पसरते-हातपाय आपटते-वस्तू फेकते वगैरे चाळे करते, भीडभीकेला बळीपडून तो यजमान मोबाईल घेऊ देतो, अन नेमका तो पडला/बिघडला की कर्माला दोष देतो. कित्येकवेळेस, त्याचेकरता तो मोबाईल "महत्वपूर्ण, दुर्मिळ, खर्चिक" बाब असते. नवश्रिमन्ताइतकी पोरान्चे करता मोबाईल शहिद होऊ देण्याची क्षमता त्याची नसते.
माझे आजुबाजुला सर्रास अशीच कार्टी भरलेली आहेत, अन मी नुकताच सॅमसन्ग ग्रॅण्ड घेतला आहे म्हणून माझ्या मोबाईलचे संरक्षण कसे करावे या विवंचनेत असताना हा विषयही आठवला, तो मान्डला इतकेच. Happy

अगोची पोस्ट आवडली.

हे काही अनुभवाचे बोल :

१. लहान मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते, शक्ती असते, ती कितीही वेळ खेळू -दंगा करू शकतात. जर तुमच्या घरात त्यांना खेळण्यासाठी किंवा दंगा करण्यासाठी एखादी खोली तात्पुरती उपलब्ध करून दिलीत, तिथे कोणी मोठ्या वयाची व्यक्ती त्यांच्यावर देखरेख करायला असेल आणि मुलांना जो काय दंगा धुडगूस घालायचा असेल तो त्याच खोलीत हे व्यवस्थित समजावलेत तर ही मुलं आरामात त्या खोलीत दंगा करण्यात व्यस्त राहू शकतात व त्यांचे पालक आणि घरातील इतर माणसे निवांत गप्पा मारू शकतात.

परंतु घरी आलेल्या लहान मुलांना जर असे खेळण्यास किंवा दंगा करण्यास स्कोप मिळाला नाही, एकाच ठिकाणी बसावे लागले तर ती अस्वस्थ होतात, चुळबूळ करू लागतात व त्यांचे 'उद्योग' सुरू होतात.

ह्यावर एक उपाय म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी त्यांचे आवडते गेम्स (जसे लेगो, रुबिक क्यूब, पझल्स इ.) किंवा स्केचबुक, खडू, रंगवायचे साहित्य इ. जवळ बाळगणे व आपल्या लेकराला त्यात एंगेज्ड ठेवणे.
अन्यथा ज्यांच्या घरी हे मूल आले असेल त्यांनी त्याला रंगवायचे, स्केचिंगचे साहित्य उपलब्ध करून देणे व चित्र काढायला सांगणे.

२. लहान मूल खाता-पिताना सांडलवंड करणार हे ओघाने आलेच! त्या सांडलवंडीची काळजी वाटत असेल, किंवा आपल्या घरातल्या किमती सामानाची / फर्निचरची काळजी वाटत असेल तर सरळ मुलांना खाली जमिनीवर सतरंजी / चटई / जाजम घालून त्यावर खायला बसवावे. वाटल्यास जुनी वर्तमानपत्रे अंथरावीत. खाण्याच्या प्लेट्स, ग्लास इत्यादी अनब्रेकेबल असावेत. पाण्याची सांडलवंड करण्यास स्कोप देऊ नये. एकाच ठिकाणी बसून खायचे आहे हे अगोदरच सांगावे. उठत - बसत - हिंडत, कचरा करत खाणार असेल तर त्याची प्लेट सरळ उचलून ठेवून द्यावी. भूक लागली की मुकाट्याने एका ठिकाणी बसून खाल्ले जाते. आणि मुख्य म्हणजे रडारडीला घाबरू नये. त्याचे आईवडील काय म्हणतील ह्याला घाबरू नये. घर तुमचे आहे तर तुमचे नियम.

३. ज्या कार्यक्रमांना लहान मुले येणार आहेत हे माहिती आहे अश्या ठिकाणी त्यांची वेगळी व्यवस्था ठेवणे, त्यांच्यासाठी योग्य खान-पान व्यवस्था ठेवणे हे आयोजकांचे काम असते. तसे नसल्यास त्याचा त्रास मुलांना व मोठ्यांना, दोघांनाही भोगावा लागतो. मुलं अशा कार्यक्रमांना बोअर होतात, किरकिर करतात, भोकाड पसरतात किंवा उपद्व्याप - इतरांना त्रास देणे सुरु करतात. लहान मुलांची वेगळी व्यवस्था, त्यांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम किंवा खेळ, वेगळी खानपान व्यवस्था व देखरेख करण्यास मोठी माणसे असतील तर अशा ठिकाणी लहान मुलांचा इतरांना जो काही 'उपद्रव' होतो तसा होणार नाही.

घरातही लहान मूल आल्यास त्याचा 'ताबा' घरातल्या एखाद्या मोठ्या माणसाने घेणे हे सोयीचे ठरते. ती व्यक्ती मग त्या मुलाला काय हवे-नको आहे ते बघणे, त्याच्याशी खेळणे, त्याचे मनोरंजन करणे, त्याला हिंडविणे इत्यादी गोष्टी करू शकते. पण असे कोणी नसल्यास थोड्या वेळात ते मूल कंटाळणार आणि त्रास देऊ लागणार हे गृहित धरावे. मोठ्यांच्या गप्पांमध्ये लहानांना रस नसतो. त्यामुळे तुम्ही गप्पा मारत असाल तर तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी ते अचाट उपद्व्याप करणारच!

वेळप्रसंगी घरातला हैदोस, दंगा आवरता घेण्यासाठी आवाज चढवावा लागला तर तसे करण्यास अजिबात घाबरू नये.

३. काही मुले दुसर्‍याच्या घरात शिरल्या शिरल्या कोणाला न विचारता घरातल्या उपकरणांना हात लाव, रिमोटशी खेळ, सोफ्यावर उड्या मार, पडद्याला लोंबकळ... असे उद्योग करणारी असतील तर 'त्यांना कसे रागावू?' असा विचार करण्यापेक्षा त्यांना व त्यांच्या आईबापांना तिथेच 'हे असे प्रकार आमच्या घरी चालणार नाहीत' हे ठणकावून सांगितलेले त्यांच्यासाठी व आपल्यासाठी कधीही बरे ठरते. मग कोणाला त्याचा राग आला तर येऊ देत! ते मूल रडले, धिंगाणा घातला तरी आपण ठाम राहावे. मेसेज पोचला पाहिजे. खायचे-प्यायचे लाड करणे, मुलाला प्रेमाने समजावणे, थोपटणे हा वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग झाला. दर वेळी प्रत्येकाकडे तेवढा वेळ, उसंत व संयम असेलच असे नाही.

मुल निदान शाळेतल्या मोठ्या वर्गात जाईपर्यंत तरी, बाहेर किंवा घरातही कसे वागते, मस्ती, मारामारी, उद्धट वागणे, मोठ्यांना मारणे वगैरे जे काही करते त्याची सर्वस्वी जबाबदारी आई वडिलांकडेच जाते. आपले मुल जर इतरांकडे गेल्यावर वेडे चाळे करत असेल, सांगूनही ऐकत नसेल, त्रास देत असेल तर याचा अर्थ फक्त एव्हढाच की आईवडिल एक पालक म्हणून त्या मुलाला समजावायला, समजून घ्यायला, धाक लावायला अपुरे पडले आहेत. दोष मुलांचा नाही. अगदिच एखादा न्यूरॉलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर वेगळा प्रश्न. पण तेव्हा तर उलट आईवडिलांनी जास्त काळजी घ्यायला हवी.

मी असे अनेक आईवडील पाहीले आहेत जे त्यांच्या मुलांना कोणीही काही बोललं, मग योग्य कारणांवरुनही असेल, तर लगेच ऑफेन्ड होतात. अनेक पालकांना वाटतं आपण बालमानस शास्त्राची पुस्तके ऐकली आणि लेक्चर्स ऐकली की आपल्याला ते कळले, पण खरं तर त्यांना त्यातला मुलांना मारु नये, लाड करावे, वेळ द्यावा इतकाच भाग तोही धड समजलेला नसतो. एकच मुल असल्याने, न्यूक्लिअर फॅमिलीमुळे पारंपारिक शिस्त, धाक,प्रसंगी शिक्षा हा भाग माहीत नसतो किंवा तो कालबाह्य म्हणून वापरला जात नाही, पण मग आपल्या मुलाला नक्की कसं समजावून घ्यायचं, तो जर ओव्हर अ‍ॅक्टीव्ह, कमी अटेन्शन स्पॅन किंवा मस्तीखोर असेल तर कसं ट्रीट करायचं याबद्दल हे पालक कौन्सेलिंगही सिरियसली घेत नाहीत. माझी एका शाळेत असलेली कौन्सेलर मैत्रीण सांगत असते अशा पालकांचे किस्से. त्यांना वेळोवेळी वॉर्न करुनही काहीही सुधारणा नसते (पालकांच्या वागण्यात).

घरी आजी-आजोबा, काका-काकू, अनुभवी शेजारी असले तर अनेकदा ते आपल्या परीने घरातल्या मुला-मुलीवर संस्कार (हा अतीशय व्हेग शब्द आहे पण तरीही) करु पहात असतील तर आईबाबांनी त्याकडे पॉझिटिव्हली पहायला पाहिजे. त्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला पसंत नाहीत त्या मोकळेपणाने त्या लोकांना सांगायला हवं. मी 'सावली; नावाच्या एका वृद्ध आजीआजोबांच्या (साठ-सत्तरच्या पुढे) ग्रूपमधे कधी कधी त्यांच्याशी गप्पा किंवा त्यांना वाचून दाखवायला जाते, ते आजीआजोबा स्पष्ट सांगतात की नाही आवडत आमच्या मुलांना (यात मुलगा-सून दोन्ही येतात) आम्ही नातवाला काहीही बोललं तरी. एक आजी म्हणाल्या मुलगा शाळेतून आला की अखंड नेटवर, फोनवर असतो म्हणून मी त्याला एकदा म्हणाले की अरे, जरा वाचत जा, माझ्याशी गप्पा मार तर त्या नातवाने आईबाबांकडे तक्रार केल्यावर एव्हढा इश्यू झाला की मुलगा दुसर्‍या दिवशी डायरेक्ट बाहेर सांभाळायला. मला माहीत आहे यात एकच बाजू मी मांडते आहे पण बरेच अनुभव आले आहेत मला अशा पालकांचे ज्यांना आपल्या मुलाला जराही कोणी तो चुकीचे वागतो आहे असे बोललेले आवडत नाही.

माझ्या धाकट्या मुलीच्या पाचव्या वाढदिवसाला एकदा घरी आलेल्या एका सहा-सात वर्षांच्या मुलाने आमच्या कडे मुलींना सांभाळायला आजी होत्या त्यांच्या अंगावर उगीचच जाऊन चुळ टाकली होती. यात जराही अतीशयोक्ती नाही. आणि यावर तो मुलगा आणि त्याची आई फिदी फिदी हसायला लागले. मी त्या आईला म्हटलं तुमच्या मुलाला आजींना सॉरी म्हणायला सांग. ती बाई मला म्हणाली असं डोक्यावर चढवू ठेवायचं नसतं 'मोलकरणींना'. त्यावर मी तिला म्हटलं की मी खूप मोठा इश्यू करीन या गोष्टीचा जर तू आत्ताच्या आता या शब्दाबद्दलही माफी मागीतली नाहीस. तिने धुसफुसर सॉरी म्हटले आणि मुलाला खेचत घेऊन गेली. आजतागायत ती बाई माझ्याशी बोलत नाही.

अशा बेजबाबदार (मुलांना सांभाळण्याच्या बाबतीत, शारीरिक नाही, मानसिक) पालकांची संभावना बेशरम शब्दानेच करायला हवी. आपली मुले एक सुजाण नागरीक, उत्तम माणूस बनवण्याकरता त्यांना काहीही कष्ट घ्यावेसे वाटत नाहीत. म्हणून मुले अशी वागतात. मुलांना नावं ठेवण्यात, मारण्यात काय पॉइंट (दुसर्‍यांच्या) त्यांच्या आईबाबांना समज द्यायला हवी, वेळप्रसंगी उद्धट भाषेत, वाईटपणा घेऊनही.

वाह!
मी आतापर्यंत जेजे काही माझ्या वचकट स्टाईलने लिहिले आहे, तेच या वरच्या प्रतिसादात शर्मिला फडके यांनी लिहिलेय.
धन्यवाद! व संपूर्ण पोस्टिसाठी प्लस कितीही.

Pages