मुलांचे इतर लोकांकडे गेल्यावर बेशिस्त वागणे कसे सांभाळावे

Submitted by वेल on 2 January, 2014 - 00:21

हे आणि ते - १: पाहुणचार इथे बेफि यांनी मांडलेल्या मुद्द्याला पकडून हा धागा सुरू करत आहे.

आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा ती काय काय गोंढळ धालतात, आपण तो कसा सांभाळतो किंवा आपल्याकडे कोणी येतं तेव्हा आपण पाहुण्या मुलांची मस्ती कशी सांभाळून घेतो त्यावेळी त्यांचे आई वडिल कसे वागतात. काही मुलं कशी गुणी असतात हे सगळे इथे लिहावे. ह्यातून आमच्यासारख्या पालकांना खूप काही शिकता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटत की आपण आपल्या मुलांना कोणाकडे घेऊन जातो तेव्हा तिथल्या घरातील वातावरणाची मुलांना थोडासा धाक बसेल अशी पूर्व कल्पना द्यावी....
आणि आपल्या मुलांना आई वडीलांचा धाक हा हवाचं...

निवांत पाटील | 2 January, 2014 - 08:24

:लहान मुल मोड ऑनः

काय हे गेला अर्धा तास झाला कुनाच ल्क्षच नाहिय माझ्याकडे. तेच तेच बोलताना ह्या लोकांना कंटाळा येत नाही का? किती बोअर मारतात हे लोक. काल त्या काकांकडे तर बरोब्बर उलट काहीतर सांगत होते. श्या त्यापेक्षा सोसायटीत वॉच्मन्काकाकडे सोडुन आले असते तर बरं झालं असतं. नाहितर एकटचं घरी बसलेल परवडलं. पण ऐकुन कोण घेतयं. कित्ती वेळ बसायच अवघडुन असं. ह्या आई बाबा लोकांना ह्यांचे आई बाबा असे कुठे घेउन जात नसतील बहुतेक. गेले तरी इतक काय 'इग्नोर' करत नसणार. नाहितर इतक्यात विसरले कि काय असे केल्यावर कसे वाटतयं.

आता नेमके काय केल्यावर यांचे माझ्याकडे 'नीट' लक्ष जाइल. ह्यम....

:लहान मुल मोड ऑफः

>>>

लहान मुलं कंटाळणार, वैतागणार हे मान्य आहेच.
तुम्हीही लहान होता, तुम्हीही कंटाळत , वैतागत असणार. पण म्हणून तुम्ही हे अस्लं केलेलं आठवतं का तुम्हाला कधी? ऐकलय का कोणाकडुन? केलं असेल तर तुमचं कौतुक केलं गेलय का? त्याबद्दल शिक्षा झालेली आठवतेय का तुम्हाला?

मला मी अशी वागलेली आणि त्याचं समर्थन केलं गेलेलं, किंवा मी चुक केली म्हणून मला कोणी (यजमानाने) रागवल्यावर त्याच्या माझ्या पालकांना राग आलेला कधीच आठवत नाही.
मी लहान असेल म्हणून माझं बालपण मला आठवत नसेल पण माझ्या बहिणीच्या बाबतीतही मला हे अस्लं काही कधी दिसलं नाही.

लिंबुभाऊ म्हणतात तसं, माझ्या बहिणीची रास वृश्चिक आणि तिच्या पत्रिकेत मंगळ आहे. तीने एकदाच लहानपणी माझ्या आत्याच्या घरातला फ्लॉवर पॉप्ट रागाने संतापुन आपटला होता... त्यावर आत्याने 'मंगळाची शांत करुन घे ... किती चिडतेय ती.. त्यामुळेच होतय हे सगळं' असं आईला समजावलं... आईने मंगळ बिंगळ मला माहीत नाही. तिने काय केलय ते तिला कळायलाच हवं म्हणुन माझ्या बहिणीला शिक्षा केली होती.
ती शिक्षा सौम्यच होती पण 'तुला कसा त्रास झाला? तसाच त्रास आत्याला झाला असेल' हे तिला समजावुन सांगितलं होतं... त्यानंतर कितीही भडकली तरी माझी बहिण अजुनही कोणतीही गोष्ट फेकुन मारत/देत नाही.

कारण असं करायचं नसतं हे मनावर बिंबलय. आत्याने स्वतःच आईला उत्तर/ सोल्युशन दिलं होतं. आईने हे केलं नसतं तरी चाल्लं असतं पण आईला त्यात कौतुक वाटलं नाही.

आत्ता इतकं नाही जमत पालकांना?

आमच्या नात्यातली एक मुलगी आहे. वर वर्ष दिड वर्ष...
तिला नको असेल ती गोष्ट आपण करायला गेलो.. म्हणजे तिला कडेवर घ्यायला गेलो, पाणी पाजायला गेलो, नाव सांग म्हणलं (ती फार चुरुचुरु बोलते) की ती लगेच रडवेला चेहरा करुन रडायला लागते (म्हणजे डोळ्यातुन पाणी नाही पण तोंडातुन आवाज काढते तसे) आणि लगेच तीचे आई वडील,' नाही नाही, कोणी बाळा? हात करू हं आपण ताईला/दादाला/आजीला' म्हणून समोरच्या 'हात' करतात Angry

मुलीला मोठेपणी ही सवय लागली तर नवल काय त्यात?

तरीही धाक असायला हवा इत्यादी!
>>>>>>>
हे मान्य पण .. वेगळ्या द्रूष्टिकोनातुन पाहिल तर ... जुन्या काळातिल पाल्यावरील अवाजवी धाकही नकोच.. आत्ताचे पालक थोडे मित्र सदरात मोडतात.. तेही चांगलच आहे ..

थोडक्यात काय तर 'सुवर्णमध्य' साधता आला पाहिजे...

>>>> मुलीला मोठेपणी ही सवय लागली तर नवल काय त्यात? <<<
माझ्या सध्या बघण्यातली बहुसन्ख्य मुलेमुली सर्रासपणे कोणत्याही बाबतीत आईबापावर देखिल हातपाय काहीही उगारुन मारत असतात, दोनचार वर्षाची होईस्तोवर त्याचेही कौतकच होताना बघतो, अन मनातल्या मनात माझ्याच कपाळाला हात लावून घेतो. उद्या हीच पोरे बाहेरच्यांशी देखिल असेच वागू पहातात. लहानमोठ्याचा काहीच पाचपोच नसतोच, पण हीच वृत्ती नन्तरच्या आयुष्यात "ते काय फक्त वयानेच मोठ्ठे आहेतना, मग काय दिवे लावले त्यान्नी? आधी जन्माला आले इतकेच ना? मग नुस्ते वयाने मोठे म्हणून मी का त्यान्ना वाकून/उभारुन नमस्कार करू?" इत्यादी अक्कलेची सुमने पाजळतात,
इथे मायबोलिवरही सर्च लावलात तर बघायला मिळतील. Proud

युरोपिअन/अमेरिकन संस्कृतीतल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे "भ्रष्ट व सोईस्कर" अनुकरण करुन घेऊन गेल्या पाचपन्चवीस वर्षात मात्र एकूणच समाजाने सर्वच व्यवहारात बेशिस्तीच्या कळस गाठला आहे.
>>>
हे वाक्य उगाच आहे Sad
तिकडंचे पालक मुलांना बेशिस्त वागायला शिकवतात का? Uhoh
चर्चा भरकटवणारं वाक्य Sad

असो बाकी तुमची आणि माझी पोस्ट वेगळ्या शब्दात पण एकच आली Happy

रश्मी, तुझंही पटतय. इथे मी माझ्या घरातलं उदाहरण देतेच!
माझी आजी माझ्या बहिणीला अनेक बाबतीत पाठीशी घालते पण तरीही आई-बाबांचा धाक आहेच!!!!!!!!!!!!!!!

अर्थात हे तुमचे आणि तुमच्या घरातल्या बुजुर्ग लोकांचे संबंध कसे आहेत त्यावरही डिपेंड आहेच.
पण तुझा मुद्दा अनेकदा पटतोय Sad

रिया +११
मुलांना वळण लावले तरंच ते लागते.... त्यांच्या बेशिस्त वागण्यावर जर पालक आक्षेपच घेत नस्तील तर त्यात त्या मुलांना तरी कस कळणार कस वागायच ते....
माझे १ नातेवाईक आपण काहि मुलांना ओरड्लो तर... 'लहानच आहेत ति, मस्ती तर करनारच ना! ते नाही मस्ति करणार मग तुम्ही करता का???' म्हणजे मुलांच्या बेशिस्त वागण्यावर खत पाणी घालायचं!!!

>>> हे वाक्य उगाच आहे
तिकडंचे पालक मुलांना बेशिस्त वागायला शिकवतात का? <<<<
असे मी कुठेही म्हणलेले नाही, उलट माझे वाक्य नीटपणे पॉझ घेत वाचलेस तर काय अर्थ निघतो बघ...

>>> युरोपिअन/अमेरिकन संस्कृतीतल्या व्यक्तिस्वातंत्र्याचे <<<<< हे सर्वमान्य आहे की तिकडे व्यक्तिस्वातंत्र आहे, हे मान्डणे गैर नाही ना?
>>>> "भ्रष्ट व सोईस्कर" अनुकरण करुन घेऊन <<<<< त्यान्चेकडे जे आहे त्यावर भाष्य नाही, मात्र तिथल्याचे इथे जे अनुकरण विचित्रपणे केले जाते त्यास भ्रष्ट म्हणले आहे, तिकडच्या पालकांचा संबंधच कुठे येतो?
>>>>> गेल्या पाचपन्चवीस वर्षात मात्र एकूणच समाजाने सर्वच व्यवहारात बेशिस्तीच्या कळस गाठला आहे <<<< हा स्वानुभव आहे.

माझ्याकडे माझी चुलतबहीण तिच्या मुलासोबत २-३ दिवस राहायला आली होती. तिच्या मुलाने आल्या दिवसापासुन माझ्या वडिलांच्या पोटावर उड्या मारायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा ते झोपायचे (माझे वडील जमिनीवर झोपतात, पलंगावर वै. नाही) तेव्हा त्यांच्या पोटावर जबरदस्त उड्या मारायचा. ह्याने बाबा आजारी पडले आणी त्यांच्या पोटात खुप दुखु लागले. बाबांचा स्वभाव भिडस्त असल्याने त्यांनी बहिणीला न सांगता मला सांगितले. आणी मी तसं माझ्या बहिणीला सांगितल्यावर म्हणाली.."मारु दे कि उड्या. तुला मुलं होतील तेव्हा ती पण त्यांच्या पोटावर उड्या मारतील त्याची प्रॅक्टीस नको का त्यांना?" Uhoh

अरे.. तुला कोणी सांगितले कि मला मुलं झाली कि ती माझ्या वडिलांच्या पोटावर अश्या उड्या मारणारेत? आणी तू कोण होतेस इथे येऊन त्याची प्रॅक्टीस घेणारी? बरं.. समोर २ दिवसात आजारी पडलेला, पोटावर हात घेऊन कळवळणारा माणुस दिसतोय तरी तुला जाणीव नाही त्याची?

त्या मुलापेक्षा माझ्या बहिणीच्याच वाजवावीशी वाटत होती. पण गप्प बसले. त्याक्षणी मला तिचा इतका राग आला होता कि हि पोटात असतांना काकुच्या पोटावर कुणी उडी का नाही मारली असा विकृत विचार मनात डोकावुन गेला. Sad

मुलांपेक्षा त्यांच्या अश्या वागण्याचं समर्थन करणार्‍या पालकांचा जास्त राग आहे.

चला म्हणजे माझ्यासारखे 'तुसडे' अनेक आहेत तर!
मला वाटत होतं मीच आहे ती जी लहान मुलांना समजुन (म्हणजे नेमकं काय? Uhoh ) घेत नाही

लिंबुभाऊ, ओकेज Happy

>>>> पण गप्प बसले. <<<< हेच तर चूकते.
आपल्याकडे वाईटपणा यायला नको म्हणून आपण लोकांच्या पोरांना बोलू नये हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागल्यावर "वाईटपणा" घेणेच भाग असते.
तरी ती चूलत बहिण आहे, नव्यानवरीच्या नणंदा/भावजया/जावा अन त्यान्ची विधूळी "कार्टी" सामोरी असतील तर काय होणार/करणार या प्रश्नानेच सध्या माझ्या पोटात गोळा येतोय.

दुसर्‍याच्या घरी गेल्यावरच का? दूरपल्ल्याच्या ट्रेनमध्ये दुसर्‍या प्रवाशांना लाथा मारणारे, बसच्या मागच्या सीटवरचा भावी मॅरॅडोना, दुकानांत खरेदीत रमलेल्या आईच्या लाडक्या बाळाचे अ‍ॅक्रोबॅटिक्स , सोसायटीच्या अ‍ॅन्युअल गेट टुगेदरात हातातल्या अवजड प्लेटचे पळापळ करणार्‍या मुलांपासून रक्षण करताना पोटात आलेला गोळा तसाच ठेवून त्यात अन्नाचे गोळे ढकलणे.

बेशिस्त वागण्यात पब्लिक ट्रान्स्पोर्ट मध्ये सीट फाडणे - त्यावर रेघोट्या ओढणे - लोकांना त्रास देणे / सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, रस्त्यावर थुंकणे, लोकांच्या अंगावर दगड भिरकावणे, रस्त्यावरच्या कुत्र्यांना किंवा जनावरांना विनाकारण दगड मारणे / त्रास देणे, रस्त्यावर कचरा टाकणे, जरा जाणत्या वयाचे झाल्यावर रस्त्यावर मलमूत्रविसर्जन करणे, विजेच्या खांबांना लोंबकळणे, धावत्या वाहनातून डोके / हात / अंग बाहेर काढणे, इतरांच्या वाहनांचे आरसे वाकविणे / त्यांच्या वाहनांचे नुकसान करणे / टायरमधील हवा काढणे इत्यादी गोष्टींचाही जरुर अंतर्भाव करावा.

बसच्या मागच्या सीटवरचा भावी मॅरॅडोना >> Happy
+१००
अनेकदा अनुभवलेय हे . आणी मागे वळून बघावे तर त्याचे आई बाबा आपल्याकडेच रोखून बघतात .
अन हे पेले आणी मॅरेडोना अगदी कुक्कुली बाळ ही नसतात .

रिया , बेफीकिर बहुतेक पोईंट्स पटले. होस्टनी मुलांना सूट देणं वेगळं पण पेरेंट म्हणून तुमची काहीतरी स्ट्रॅटेजी आहे हे होस्ट्ना कळलं तर ते रिस्पेक्ट करतील ना तुमचा.

>> दुसर्‍याच्या घरी गेल्यावरच का? दूरपल्ल्याच्या ट्रेनमध्ये दुसर्‍या प्रवाशांना लाथा मारणारे, बसच्या मागच्या सीटवरचा भावी मॅरॅडोना, दुकानांत खरेदीत रमलेल्या आईच्या लाडक्या बाळाचे अ‍ॅक्रोबॅटिक्स , सोसायटीच्या अ‍ॅन्युअल गेट टुगेदरात हातातल्या अवजड प्लेटचे पळापळ करणार्‍या मुलांपासून रक्षण करताना पोटात आलेला गोळा तसाच ठेवून त्यात अन्नाचे गोळे ढकलणे.

भरत Lol
वाचून हसू आलं तरी असं आपल्या बाबतीत झालं की जाम डोक्यात जातं. आईवडलांनी सांगायला पाहिजे यार.
एका लग्नात एका बाईची दोन मुलं खेळत असताना कॅज्युअली तिथं असलेल्या फिल्टरचा टॅप उघडून पळत होती. असं खूप वेळा झाल्यावर कुणीतरी त्या बाईकडे तक्रार केली. तर बाई नुस्तं बसल्या जागेवरून ए विहान , असं नको करू SSSSS असं शांतपणे म्हणाल्या आणि परत गप्पा मारायला लागल्या. बहुतेक त्यांना सवय आणि कंटाळा असेल असल्या तक्रारी हँडल करायचा. हे अस्ले संत लोक असतात बहुतेक त्यांच्याच बाबतीत लोक नंतर म्हणतात की अहो हे लोक इतके शांत आणि सज्जन आहेत आणि मुलं मात्र अशी कशी निघाली?
तुमच्या घरी जी पाहिजे ते सूट द्या मुलांना पण इतरांवर ते सोसायची जबरद्स्ती कशाला? आपल्या मुलांवर इतर लोक चिडतायत , इरिटेट होतायत याची पेरेंट्सनाच लाज नाही का वाटत? इतरांनी आपल्या मुलांना नावं ठेवण्यापेक्षा आणि हिडिस फिडिस करण्यापेक्षा स्वतः वेळेवर दोन फटके द्यावेत.

बसच्या मागच्या सीटवरचा भावी मॅरॅडोना >> अगदी अगदी. हा अनुभव मी माझ्या मुलांच्या बाबतीत घेतलाय. तेही असच करायचे. एक दिवस बसमधुन उतरलो आणि घरी येऊन दोघांनाही घरी बसल्यावर हळूहळू धक्के द्यायला सुरुवात केली. आणी 'का मारतोय' ला, 'तू काकांना का लाथा मारत होता' असं बरेचदा विचारलं, तेंव्हा दोघानांही शेवटी कंटाळुन Happy सॉरी म्हटलं. आता बसमध्ये बसताना शक्यतो समोरच्या सीटवर बसतो आणि बसण्यापुर्वीच "लाथा मारणारा गाढव बनणार का?" विचारतो. Happy
पण बसमध्ये त्यांच्याशी सतत बडबड करावी लागते, जी कोरियात अयोग्य मानली जाते. Sad असो.

रिया, धन्यवाद.

आजकाल बालमानसशास्त्रातील ऐकीव माहितीनुसार (आपल्याच) मुलांना ओरडणेही अयोग्य मानले जाते. मारणे दूरच.
शेजारच्या घरात जाऊन मुले काय काय उद्योग करू शकतात? आमच्या घरी वॉटर फिल्टरचा नळ सोडून देऊन जमिनीवर तळे करण्यात आले. खिडकीत सुकत असलेल्या कपड्यांना लावलेले चाप काढून खाली (घरात नव्हे - बाहेर -कंपाउंडमध्ये) फेकले गेले. आपली डोअर बेल ही शेजारच्या मुलांच्या गंमतीसाठीच असते. त्यांचीही डोअरबेल त्यांच्या मुलांच्या गंमतीसाठीच असते. तिचा आवाज आपण सहन करायचा. बेल वाजवली जाते तेवढे वेळा आमच्या टीव्ही-रेडियोत खरखरही व्हायची.
(ही कामे बर्‍यापैकी समजूत आलेल्या वयाच्या मोठया बहिणीने(वय १०+) आपल्या लहान भावाकडून (वय ४-५)करवून घेतली.)
सोसायटीच्या बागेला पाणी देण्यासाठी बनवलेला नळ उघडून पाणी वाया जाऊ द्यायचे. चिखल करायचा.
हुश्श . तो मुलगा आता मोठा झाला.

रिया , बेफीकिर बहुतेक पोईंट्स पटले. होस्टनी मुलांना सूट देणं वेगळं पण पेरेंट म्हणून तुमची काहीतरी स्ट्रॅटेजी आहे हे होस्ट्ना कळलं तर ते रिस्पेक्ट करतील ना तुमचा.
>>
अरे!!!!!!!! येही बोलना चाहती थी मै कितने दिनोंसे Happy

बालमानसशास्त्र एक वेगळाच ताप आहे डोक्याला Sad

विजयजी, कोरीया Sad
आता काय सांगू!!!!!!!!!

तरी ती चूलत बहिण आहे, नव्यानवरीच्या नणंदा/भावजया/जावा अन त्यान्ची विधूळी "कार्टी" सामोरी असतील तर काय होणार/करणार या प्रश्नानेच सध्या माझ्या पोटात गोळा येतोय.>>>लाखमोलाच बोललात....

आमच्याकडे फक्त आमच्या घरी आल्यावर फ्रीजच दार हजार वेळा जोरात उघडणे आणि लावणे, सोफ्यावर उद्या मारणे (आता तो जीर्ण झाला आहे),T V शी खेळणे ई.ई. स्वताच्या घरी अगदी शहाण्या सारखे वागणे. मामा बोलला कि लगेच आई आणि आजी ला खूप राग येतो. मग मामा मामी वाईट.भले ती मामी काही न बोलो . Sad Uhoh

नाही, मला म्हणायचं होतं
इथे सरसकट एकच नियम सगळ्यांना लागू होतो ना
बाहेरच्या देशात मुलांना वागवण्याबाबत नवे नियम, कायदे आणि मॅनर्स आहेत. त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही कारण मला त्याची माहिती नाही.
म्हणुन म्हणलं की मी काय सांगणार आता. माझ्याकडे काहीच सांगण्यासारखं नाही.
इथलं सगळं तिकडे लागु पडेलच असं नाही Happy

त्या मुलापेक्षा माझ्या बहिणीच्याच वाजवावीशी वाटत होती. पण गप्प बसले. त्याक्षणी मला तिचा इतका राग आला होता कि हि पोटात असतांना काकुच्या पोटावर कुणी उडी का नाही मारली असा विकृत विचार मनात डोकावुन गेला.<<<

युरी,

वाचून नवलाचा कळस वाटला आणि संताप आला. अविश्वसनीय!

असल्यांना अक्षरशः तश्याच उड्या मारून दाखवले पाहिजे त्यांच्या पोटावर!

मुलांच्या आई वडीलांना ना?
मारतच असतील मुलं त्यांच्याही पोटावर उड्या....
त्यांना सहन होतं असेलही आणि Sad
म्हणून तर आहे हे असलं सगळं!

सॉरी! मला इथे 'बेशिस्त'मुलांपेक्षा 'असंस्क्रुत' पालकांची उदाहरणे दिसत आहेत The apple doesn't fall far from the tree. तो ह्या बीबीचा विषय नाही.

रिया, तो तिखटाचा मुद्दा. तिखटाचा डबा लहान मुलाच्या हाती लागेपर्यंत सगळी मोठी माणसं कायं करत होती? त्यात तू पण आलीस. ते मूल स्वयंपाकघरात गेल्यागेल्या आधी त्याच्या आईने आणि ती अदरवाईज बिझी असल्यास इतर मोठे का त्याच्या मागे-मागे गेले नाहीत? जो अपघात माशांच्या बाबतीत झाला तो त्या लहान मुलाच्या बाबतीत ही होऊ शकला असता. त्या माशांच पुढे काय झाल? ते जिवंत आहेत का? (प्रश्नाचे कारण मला मासे/फिश्तँक बद्दल काहिही महिती नाही. ते जिवंत राहिले नसल्यास तू त्या मुलाला धपाटा घातल्याने ते मासे परत येणार होते का? ज्याअर्थी (एवढी महत्त्वाची गोष्ट होऊनही) तुझी आई त्या बाईशी गप्पा मारण्यात रमली त्याअर्थी ते मासे तितकेच महत्त्वाचे असणार नाहीतर ह्या बाबतीत घरांतल्या मोठ्यांनी नक्कीच पुढाकार घेतला नसता का?

आजीला मारणारे मूल -- त्याच्या घरांतले मोठे असेच एकमेकांची मारहाण करत असणार, मुलं अनुकरणप्रिय असतात.

दुसर्‍या लहान मुलाला मारणारे मूल -- लहान मूलांचे खेळ मारामार्‍यांचेच असतात म्हणून मोठ्यांचे लक्ष असावे ते काय करतात त्याकडे म्हणजे गोष्टी हाताबाहेर जाणे टळ्ते.

लहान मुलांना एखादा धपाटा घालायचा अधिकार माझ्यामते तरी आई,वडिल, आजी, आजोबा आणि इतर मोठी माणस जी त्या लहान मुलाच्या day to day upbringing मध्ये सहभागी आहेत त्यांनाच आहे इतरांना नाही. मुळांत लहान मुलांना मारणे हेच phyical abuse and abuse of power मध्य मोडते (माझ्यामते). माझे बाबा एक संस्क्रुत वचन नेहमी सांगायचे -- पांच वर्षापर्यंत लाड, आठ वर्षांपर्यंत ताड्न (मारणे) आणि सोळा वर्षांचे मूल झाले की त्याला/ तिला मित्राप्रमाणे वागवावे. त्याची सत्यता आता मला पटते आहे.

सॉरी! मला इथे 'बेशिस्त'मुलांपेक्षा 'असंस्क्रुत' पालकांची उदाहरणे दिसत आहेत <<<

त्यात सॉरी काय! बेशरम पालक हे तर पहिल्याच प्रतिसादात (माझ्या) म्हंटलेले आहे. अर्थातच ह्या बीबीवर बेशिस्त / बेशरम पालकांचीही उदाहरणे येणार!

फक्त तिखटाचा डबा हाती लागूच कसा दिला, मोठेही एकमेकांना मारहाण करत असतील हे जरा पटले नाही कारण काही वेळा किंचित दुर्लक्ष झाले तरी लहान मुले अनेक प्रकार करून दाखवतात. घरी आईला वडिलांनी कधी एक अपशब्द बोललेला नसेल तरी इतर कोणालातरी मारणारी मुले अस्तित्वात असू शकतात ह्यावर माझा (तरी) दृढ विश्वास आहे. Happy

माझ्या मावस बहिणीचा मुलगा घरात शिरल्या शिरल्या धावत येउन पहिल्यांदी टीव्ही लावायचा ( बंद असेल तर).. माझ्या आईकडे म्हणजे त्याच्या मावशी आजी कडे. आईला खूप त्रास व्हायचा . परत हे उचल ठेऊन दे. ते उचलून बघ. सांड लावंड . पाण्याचा ग्लास. हे तर चालूच . फ्रीजचा दार दोन- तीनदा उघडून बघ. पलंगावर उड्याच उड्या.टीव्ही सारखा बंद करणे परत लावणे. लगेच काही तरी खायला दे ची भुण भुण . धुमाकूळ व्हायचा नुसता घरात शिरल्या शिरल्या वादळ आल्यासारखा..
म्हणूनच मावस बहिण त्याला कुठेही घेऊन जात नसे . घाबरायची. तो ऐकायचाच नाही. सारख त्याच्या पाठी पाठी. हे उचलेल ते फोडेल म्हणून भीती .तरी ती सांगायची सारख बजावून बजावून न्यायचं. अस वागायचं नाही तस वागायचं नाही बर मावस बहिण एकदम सालस . ती आणि नवरा दोघेही मवाळ ( खर तर अस होत नाही . आई वडिलान मधला एक तरी शिस्त लावणारा असतो ) . अशानी ती जायचीच नाही कोणाकडे.मावसबहीण कधीतरी क्वचित येणारी म्हणून त्याची मस्ती सांभाळून घ्यायची म्हटलं तरी ते होत नसे आमच्या कडून. रागावल जायचच Happy

Pages