मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ महाभारतात घटोत्कच तसाच मोठा होतो, असेच लिहिले आहे.>> कमाल आहे नाही. जैवतंत्रज्ञान फारच पुढारलेले होते तेव्हा... आता असे पाहिजे होते. मुलं सांभाळायची कटकटच मिटली असती.
पण... आई-बापाचं लग्न झाल्यावर एक-दीड वर्षातच मुलाचंही लग्न करावं लागलं असतं. आणि त्यांच्याही मुलांची लग्ने एक-दीड वर्षात करावी लागली असती. बापरे...

द्रौपदी स्वयंवरा आधी बकासूराचा वध होतो.
पण त्यांनी ते दाखवलेच नाही. की माझी काहितरी चुक होतेय?

दुर्योधन एकदम कूल व्हिलन आहे. स्वयंवराचा पण ऐकून शकुनी त्याला विचारतो "कर पाओगे भांजे"

त्यावर एकदम कूलपणे "नही मामाजी, इतनी धनुर्विद्द्या नही आती" Proud उगाच जाऊन त्या रावणासारखं छाताडावर धनुश्य घेऊन हसं करवून घ्याय्चं नाही.

शिवाय असंही काहीतरी म्हणतो की कोई भी स्त्री इतनी मह्त्त्वपूर्ण नही हो सकती जिसके लिये हार की बेइज्जती सहनी पडे..! मला पण स्मार्ट वाटलं ते Happy

हो मैत्रेयी, तो पुढचा डायलॉग होता. Happy पण तो ज्या तर्‍हेने त्या खुर्चीवर रेलून अगदी थाटात "नही मामाजी" म्हणतो ते क्लास होतं.

कितीही मधाच बोट लावल , द्रौपदी गर्विष्ठ नाही दाखवली , अगदी क्रुष्णाची आयडीया आहे अस दाख्विल तरी ,
"मी सूतपुत्राला वरणार नाही" हे चूकच .
आता आंधळ्याचे पुत्र आंधळॅ हे कस जस्टीफाय करतात ते पाहूया .

वाईट इतकच वाटतय की हे लोक महाभारताची एकता कपूर सिरियल करतायत Sad

केदार,
कदाचित तुम्हाला पटणार नाही ,पण द्रौपदी ने नाही म्हणले कर्णाला ते चुकले असे मला नाही वाटत.
१. Dhristadhumna ने स्वयमवराचा पण सान्गताना सान्गितलेच होते कि क्षत्रीयाने यावे म्हणुन.तसेही कर्णाला निमन्त्रण नसतेच..तो दुर्योधनासोबत जातो ना.
२.द्रौपदिचे स्वयम्वर होते ,Krishna ने सान्गितल्याप्रमाणे तीला अधिकार होताच नकार देण्याचा...

त्याकाळाचा विचार केला तर कर्ण सुतपुत्र होताच...आणि राजकन्येला सुतपुत्राची पत्नी होणे मान्य नसणे ,यात फारसे चुक आहे असे मला तरी नाही वाटले.

द्रौपदिचे स्वयम्वर होते ,Krishna ने सान्गितल्याप्रमाणे तीला अधिकार होताच नकार देण्याचा... >>
हे माझ्या मते मालिकेत अ‍ॅड केल आहे .
माझा तिने नाकारण्याला आ़क्षेप नाहीच आहे . फक्त ती अगदी सद्गुणांचा पुतळा वगैरे होती हे दाखवायच्या प्रयत्नावर आहे . Happy
महाभारत माणसांची गोष्ट आहे , देव वि राक्षसांची नाही इतकच .

माझा तिने नाकारण्याला आ़क्षेप नाहीच आहे . फक्त ती अगदी सद्गुणांचा पुतळा वगैरे होती हे दाखवायच्या प्रयत्नावर आहे . >>> बरोबर. शिवाय तिचं आधीपासून अर्जुनावर क्रश असल्याचं दाखवलंय ते तर अगदी पुचाट.

द्रौपदी इथे कर्णाचा अतिशय तीव्र शब्दांत जो अपमान कारते तो महाभारतातला एक अमहत्त्वाचा प्रसंग आहे. द्रौपदीला "हिरॉइन" करण्याच्या नादात तिच्या कॅरेक्टरचे इतर डायमेन्शनच घालवून टाकले आहेत. नाही आवडलं!!

Happy

माझा तिने नाकारण्याला आ़क्षेप नाहीच आहे . फक्त ती अगदी सद्गुणांचा पुतळा वगैरे होती हे दाखवायच्या प्रयत्नावर आहे . >>> +१

तिचं आधीपासून अर्जुनावर क्रश असल्याचं दाखवलंय ते तर अगदी पुचाट.>>> +१

कालचा एपिसोड तर अजिबात आवडला नाही. मी इतके दिवस समजत होते की, अर्जुन ब्राह्मणाच्या वेषात येऊन स्वयंवरामधे भाग घेतो, कारण त्याला राज्य परत मिळवण्यासाठी द्रुपदाची मदत घेता आली असती असा विचार.

पण काल अर्जुन अगदी नाईलाजाने "धर्म कार्य" म्हणून स्वयंवर मंडपात येतो काय आणि नजर चुकवत उभा राहतो काय... (आणि द्रौपदी सात जन्माचा नवरा असल्यासारखी त्याला ओळखते वर टकामका त्याच्याकडे बघत बसते!!!) सगळी बॉलीवूड स्टोरी करून टाकली. अगदी सुरूवातीला पात्रांच्या मानसिकतेचा वगैरे विचार केला होता, ते सगळं गुंडाळून ठेवलंय आणि नुसती गाणी, क्लोजप्स आणि नाचणं वगैरेच आचरटपणे चालू आहेत. एकता कपूरच्या वाटेवर चालली ही मलिका.

नंदिनी+१०००००
असं वाटतं होतं की अर्जुनाला भरीस पाडतायेत ये बाबा कसाही करुन आनि तो पण जिंक आनि मला घेऊन जा एकदासा..

पण काल अर्जुन अगदी नाईलाजाने "धर्म कार्य" म्हणून स्वयंवर मंडपात येतो काय आणि नजर चुकवत उभा राहतो काय... (आणि द्रौपदी सात जन्माचा नवरा असल्यासारखी त्याला ओळखते वर टकामका त्याच्याकडे बघत बसते!!!) सगळी बॉलीवूड स्टोरी करून टाकली. अगदी सुरूवातीला पात्रांच्या मानसिकतेचा वगैरे विचार केला होता, ते सगळं गुंडाळून ठेवलंय आणि नुसती गाणी, क्लोजप्स आणि नाचणं वगैरेच आचरटपणे चालू आहेत. एकता कपूरच्या वाटेवर चालली ही मलिका. >> +१

काल मी बऱ्याच दिवसांनी टीव्हीवर बघितले, नाहीतर youtubeवर बघते, टीव्हीवर स्लो वाटते, youtube वर मस्त पुढे पुढे नेता येते. परवा कर्णाला लास्ट मोमेंटला सांगते द्रौपदी, आधी तरी सांगायचे बिचारा एवढी मेहेनत करतो. त्या कर्णाला कृष्ण, धर्माचे महत्व सांगतो पण कर्णावर जन्मापासून अन्याय झाला, नंतर पावलोपावली झाला तेव्हा हा अधर्म नव्हता का?

शिवाय असंही काहीतरी म्हणतो की कोई भी स्त्री इतनी मह्त्त्वपूर्ण नही हो सकती जिसके लिये हार की बेइज्जती सहनी पडे..! मला पण स्मार्ट वाटलं ते
>>
या महाभारतात दुर्योधनच कुल आहे. Happy

बाकी स्वयंवर आहे का चेष्टा असे झाले आहे. सरळ अर्जुनाशी लग्न करुन टाकायचे ना. फक्त कर्णाचा व दुर्योधनाचा अपमान करायचा म्हणुन कृष्णाने योजलेले स्वयंवर होते. नियतीने सगळे ठरवलेले आहे.

वरच्या सर्व मतांशी सहमत.

काय तर म्हणे नुसते सामर्थ्याच्या बळावर लग्न ठरवले तर भूत, राक्षस इ. जण पण येतील!!

अहो, आपण मनुष्यजातीबद्दल बोलतो आहोत. कर्ण कुणि भूत, राक्षस नव्हता.

खरे तर जर मी खालच्या जातीचा असेन तर मला ५० टक्के राखीव जागात ५० टक्के द्रौपदी मला मिळाली पाहिजे अशी मागणी कर्णाने करायला पाहिजे होती. नाहीतरी पुढे तिची पाच नवर्‍यात वाटणी होतेच!

काहीहि दाखवायचे ठरवल्यावर निदान तो मागणी करतो असे दाखवून काहीतरी नवीनच धर्म बनवून त्याची मागणी फेटाळली असे दा़खवावे.

इथल्या धर्माची शिकवण पाहिल्यावर शंकाच येते की आपला धर्म असा होता??

हे असले महाभारत पाहून लोकांनी हिंदू धर्माबद्दल वाईट मते बनवली तर काय चुकले?
Sad

सारखा जमिनीवर लाथा मारून खड्डे पडतोय.
तो आजकाल बहुतेक पुण्यात रहातो, म्हणूनच पुण्यातल्या रस्त्यांवर खड्डे!

कालचा भाग बघताना आधी मला वाटले द्रौपदी मोजून मोजून मुंगीप्रमाणे पावले टाकीत येईल आणि हार बहुतेक सोमवारच्या भागात घालेल पण आली तशी लवकर आणि हार घातला एकदाचा.

कुठे ती "पाहूनि रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला" नि कुठे ही द्रौपदी!<<<<

ती रामायणात, ही महाभारतात!!!! Happy

आजच्या भागातलं द्रौपदीची काय नाटकं चालू होती, वैताग आला.

किती त्रासदायक बॉलिवुड धर्तीचा होता हा भाग....खरंतर...अर्जुन, इतर पांडव आणि द्रौपदी स्वयंवर झाल्यावर घरी परत जाईपर्यंतची ही वाट नीट हाताळायला हवी होती, एवढाच काळ द्रौपदीने नॉर्मल स्वप्न रंगविली असतील अर्जुनाबरोबरच्या संसाराची....पण ही स्टार प्लस द्रौपदी म्हणजे महामाया आहे....वडिलांचे घर सोडून सासरी जाताना फारसा काही फरक नाही पडलेला दिसला (अर्थात 'सागर' रामायणासारखी दोन चार एपिसोड वाली बिदाई नक्कोच) ....दोन टिपं तरी गळावीत डोळ्यातून....( आजही एकाच गावात सासर माहेर असलं तरी अन कितीही ठरवलेलं असलं तरीऐन वेळेला गंगायमुनाच वाहतात असा अनुभव आहे) .....वर ही बया अर्जुनाचीच फिरकी घेत होती, खोटं रडण्याची खोटी अ‍ॅक्टिन्ग....सगळा प्रकार कीव येणारा होता....

या मालिकेमध्ये महाभारतामध्ये घडलेले प्रसंग खास करून पांडव/ कुंती, द्रौपदीचे निर्णय जस्टीफाय करणे भाग आहे. म्हणून तर श्रीकृष्ण सुरुवातीला कर्णाला स्वयंवरात भाग घ्यायला हरकत घेत नाही, निर्णय सर्वस्वी द्रौपदीवर सोपवतो वगैरे दाखवले आहे. तसेच क्षत्रिय राजे/कुमार पण जिंकू शकत नाही तेव्हा कुणी ब्राह्मण युवा तो पण जिंकू शकेल का हे सुचवताना तो वेगळाच युक्तिवाद करताना दाखवतो. वास्तविक वर्ण उतरंडीमध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ अशी तत्कालीन धारणा होती त्यामुळेच क्षत्रिय कन्या- ब्राह्मण युवक, वैश्य कन्या - क्षत्रिय / ब्राह्मण युवक, शुद्र कन्या- ब्राह्मण / क्षत्रिय/ वैश्य युवक असे अनुलोम विवाह/ संबंध होणे तेव्हा नवीन नव्ह्ते. उलट ते समाजमान्य होते. मात्र आज जर असे वर्णश्रेष्टत्व वगैरे दाखवत/ जस्टीफाय करत राहिले तर काहीजण आक्षेप घेवू शकतात.कारण आज आपल्या राज्यघटनेनुसार कुणीही श्रेष्ठ- कनिष्ठ नाही आणि हेच योग्य देखील आहे यात वाद नसावा. म्हणून द्रौपदी - ब्राह्मण युवक विवाह जस्टीफाय करण्यासाठी तत्कालीन समाजातील धारणा न वापरता किंचित वेगळा युक्तिवाद दाखवत हुशारी केली आहे .हाच न्याय द्रौपदी कर्णाला नकार देताना लावता येइल. क्षत्रिय कन्या ती सुद्धा राजकन्या एका सारथ्याच्या मुलाला (भले तो अंगदेशाचा राजा असला तरी ) वरू इच्छित नाही याला मुख्य कारण म्हणजे वर्णश्रेष्ठत्व हेच होते असे मानावायाला जागा आहे. आता पुढील भागात द्रौपदी पाच पांडवांशी विवाह कोणत्या परीस्थित करते करते याला जस्टीफाय करण्यासाठी पार्श्वभूमी केली जात आहे (कुंतीचे अनुष्ठान, मातेची आज्ञा वगैरे).शेवटी महाभारत घडले त्या काळानुसार नियोग , अनुलोम विवाह, वर्णश्रेष्ठत्व बहुपत्नीत्व आणि अगदी अपवादात्मक स्थितीमध्ये बहुपतीत्व आदी गोष्ठी समाजमान्य/ रूढीमान्य होत्या.

मला हा भाग रादर विनोदीच वाटला, अर्जुनाने पण जिंकला की द्रौपदीने तरातरा येऊन अर्जुनाला हार घातला अन दॅट्स इट, लगेच लांबूनच बापाला म्हणाली आग्या दिजिये, अन चालूच पडली तिथून!! अरे जरा बहीण, भाऊ वगैरेंचा निरोप तरी घे की बये! घाई कसली एवढी! Happy

साकल्य यांचे विवेचन खूपच अभ्यासपूर्ण आहे.
साकल्या जी , अगदी योग्य आणि मनातले बोललात.
१००% +++

Pages