आमच्यापण भाजूक तुकड्या

Submitted by दिनेश. on 3 June, 2013 - 09:20

सर्वात आधी सगळ्यांनी दिवे घ्या बरं !

तर काही मायबोलीकरणी आमचा अगदी अंत बघतात. आता मी जागू, अवल असे कुणाचेही नाव न घेता, "काही" असा शब्द वापरलाय. त्यामूळे नावे घेतली नाहीत तरी चाणाक्ष मायबोलीकरांना ती ओळखता आली असतीच.
सॉरी, जरा डुप्लिकेशन झाले. मायबोलीकर चाणाक्ष असतातच, त्यामूळे वेगळे लिहायची गरज नव्हती.

आता जे मायबोलीकर चाणाक्ष नाहीत, त्यांनी आपल्या सदस्यत्वाबाबत गांभीर्याने विचार करावा हे बरं.

तर त्या आमचा अंत बघतात म्हणजे काय करतात, तर इथे भाजूक तुकड्या वगैरे काही(बाही) लिहितात.
असा विचार करत नाहीत, आम्हाला का मन नसतं, आम्हाला का असे काही खावेसे वाटत नाही.. ( हि शैली
साने गुरुजींची आहे निळू फुले यांची नाही, हे पण चा.मो. नी ओळखले असेलच. तरी आजकाल आम्ही सगळ्या
माहितीचा सोर्स सांगत असतो.)

पण आम्ही काही साने गुर्जी नाही आहोत, आम्ही पण भाजुक तुकड्या करु शकतो, आणि इथे टिच्चून डकवू
शकतो.

आणि याची कृती पण लिहू शकतो (बरं. )

तर अशा तुकड्या करुन घेतल्यावर वेगवेगळ्या प्रकारे करता येतात. म्हणजे कधी हळद + वाटलेला लसूण + मीठ असे वाटण लावायचे आणि मग वरुन मिरपूड शिवरायची. किंवा याच मिश्रणात लाल तिखट मिसळायचे.

नाहीतर हिरवे वाट्ण आहेच. हिरवे वाटण म्हणजे, एवढी बरी कोथिंबीर + बोटभर आले + उगीच थोडासा पुदीना + सोसतील एवढ्या मिरच्या आणि नावाला लसूण असे एकत्र वाटायचे. आणि त्या वाटणात मीठ घालून
तुकड्या जरावेळ मुरु द्यायच्या. आणि मग शॅलो फ्राय करायच्या.

या इतक्या मस्त लागतात ना कि "त्यांना" पण मोह आवरत नाही. पण असे एकदम "तोपासु" असे शेरे मारू
नका. न चाखताच असे शेरे लिहिलेत तर (पुण्यातील) जागतिक चित्रपट + नाटक + सकल कला निर्माता
संघाच्या अध्यक्षांतर्फे तूमचा (वारंवार) जाहीर उद्धार सॉरी सत्कार केला जाईल. ( आम्ही गूगल क्रोम वापरत
असल्याने ब्याक्स्पेस चालत नाही, म्हणून वारंवार सॉरी म्ह्णावे लागतेय. चा.मो. ते जाणतातच.)

असा उद्धार सॉरी सत्कार ( कॉपी पेस्ट केलेय, कठीण शब्द क्रोमात टायपता येत नाहीत. ) न चाखताच वाखाणणारी, तू तिसरी असे सन्मानपत्र दिले जाईल. मी तिसरी तर पहिल्या दोन कोण, असा कालवा करु नका.

कारण तिसरी आणि कालवा, हि दोन्ही माश्यांची नावे आहेत. पण याची खात्री करण्यासाठी मंगळवेढ्यांच्या
मायबोलीकरांना विचारू नका, कारण ते तिसर्‍या म्हणजेच कालवं म्हणजेच शिनोणे असे खात्रीपुर्वक सांगतील,
कारण त्यांच्या गूगलवर तसेच दिसते.

अर्र् . तुकड्या कसल्या त्या लिहायचे राहिलेच.

डिशमधे वरच्या अंगाला पाण्याचा एक थेंब आहे, तो मुद्दामच ठेवला आहे, कारण मग बशीत चर्चा कसली करणार ? कपात करुन चालणार नाही.

तर असे काही करुन बघितल्यावर, आणि अशी डिश समोर ठेवल्यावर, शाकाहारी बायको आहे हेच विसराल.

आताच मुशोंनी सांगितले कि "शाकाहारी बायको आहे हेच विसराल" असे लिहिणे चूकच आहे. त्या ऐवजी
" बायको शाकाहारी आहे हेच विसराल" असे पाहिजे. यात नेमका काय फरक आहे ते आम्हाला न कळल्याने,
हवा तो पर्याय निवडावा.

आता हे मी असे का लिहिलेय, याचे कारण अवल आणि जागू, (अ‍ॅडमिन) काका आम्हाला वाचवा, असा टाहो
फोडणार नाहीत. फारतर " बघ ना कसा हा दादा, मला चिडवायचं, हाच याचा धंदा" असे गाणे म्हणतील.

पण त्याची फिकिर करु नये, फारतर स्वतःला दादासाहेब म्हणवून घ्यावे, कसं ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
लेखन मस्तचै!
अशाच कचर्‍या (काप) नीरफणस,फ्लॉवर, बटाटा ,वांगे इ.च्या करता येतील.तांदळाच्या पिठात घोळवून घेतल्यास
कुरकुरीत होतात.

२. या तुकड्या सालासकट खायच्या की साले काढून?
१. तुमच्याकडे विकत घेताना केळणी केळी सोलून देत नाहीत काय?
३. शॅलो फ्राय करायला तेल कोणते वापरावे?
४. तंदूर वा ओव्हनमधे करता येईल काय?

५. " हे पण चा.मो. नी ओळखले असेलच." यात चामो ऐवजी चामा हवे काय? Wink

दिनेशदा, दिवे घ्या

इब्लिस..

आपापल्या चॉईसप्रमाणे सालासकट किंवा सालाशिवाय खाता येतात. जागतिक चॉईस वेगळे असतात, जपानात म्हणे अळूचे देठ खातात आणि पाने फेकतात आणि चीनात म्हणे कलिंगडाच्या बिया खातात आणि गर फेकतात.
खरेखोटे ते गूगलूनच कळेल.

आमच्याकडच्या केळणी, निखार्‍यावर भाजूनही देतात. तेही सालासकट किंवा सालाशिवाय. ( निखार्‍यावर भाजलेली केळी आणि शेंगदाणे हा इथला लोकप्रिय प्रकार आहे. )

शॅलो फ्राय करताना, एरंडेल सोडून कुठलेही तेल वापरले तरी चालेल. Happy तसा तेलाचा काही प्रश्न नाही कारण या तुकड्यांना तेल फार कमी लागते.

तंदूर किंवा अवनमधेही करता येईल पण तव्यात करणे सोपे पडते.

आणि चामांना ना, ता वरून ताकभातच काय, तायक्वांडोंसुद्धा ओळखता येते.

मस्तं मस्तंच.
दिनेशदा, मधल्या दोन तुकड्या अगदी माशाच्या वाटतायत.

रेसिपीला प्रस्तावनेची फोडणी पण चरचरीत बसल्येय!
Wink

निळूफुले आणि सानेगुरूजी बाबत सही लिहीलंय.
मनातल्या मनात दोन्ही स्टाईलनी म्हणून पाहिलं.

शाकाहारी बायको अस्ली तर विसरुन चालणार नाही. कारण मग एक प्लेट तुकड्या तिच्यासाठीही कराव्या लागतील.
Wink

मस्त.. अग्दी उचलुन घेऊन खाव्याशा वाटल्या ह्य भाजुक तुकड्या...

( निखार्‍यावर भाजलेली केळी आणि शेंगदाणे हा इथला लोकप्रिय प्रकार आहे. )

यातली केळी आणि शेंगदाणे की फक्त केळीच की फक्त शेंगदाणेच - यातले नक्की काय निखा-यावर भाजले जाते तेही स्पष्ट करा.. हे आम्हाला गुगलुन थोडेच पाहता येणार आहे.. Happy :दिवे:

हो ना साती, कधी कधी आम्हालाही असं झणझणीत लिहावे लागते. ( झणझणीत लिहिणारे काय फक्त बाबूरावच आहेत, आँ ? )

साधना, दोन्ही निखार्‍यावरच पण केळी थेट तर शेंगदाणे प्यानमधे.
शेंगदाण्याला इथे जिंगुबा आणि केळ्याला बनाना म्हणतात. गूगलल्यावर हे पण कळलं Happy

दिनेशदा
>>एवढी बरी कोथिंबीर + बोटभर आले + उगीच थोडासा पुदीना + सोसतील एवढ्या मिरच्या आणि नावाला लसूण >> हे खासच प्रमाणशैलीतलं चाणाक्षपण Happy
(आम्ही तांदळाच्या पिठातही लोळवतो या भाजूक तुकड्या, येळेकरांनी लिहिलंय तसं , जास्तच मस्त्याहाराकडे झुकतो दृष्य परिणाम.)

साने गुरुजी अन निळू फुलेंच्या मध्यबिंदूवर तोललेली खमंग रेसिपी आवडली.

आपापल्या चॉईसप्रमाणे सालासकट किंवा सालाशिवाय खाता येतात. जागतिक चॉईस वेगळे असतात, जपानात म्हणे अळूचे देठ खातात आणि पाने फेकतात आणि चीनात म्हणे कलिंगडाच्या बिया खातात आणि गर फेकतात.
खरेखोटे ते गूगलूनच कळेल.>>> हा हा हा हा Happy

हे इतके माहिती नाही पण इथे सिंगापुरात गवती चहाची पाने फेकतात. ती विकतही मिळत नाही. पण देठ मात्र जुडीने विकायला येतात.

हो बी, आमच्याकडे पण तेच. गवती चहाची पाने रस्त्यावर विकायला असतात. हे लोक मलेरियावर औषध म्हणून काढा पितात आणि देठ सुपरमार्केटमधे खास सेक्शनमधे असतात.

आभार बरं का मामे !

असं प्रत्येकाला शेप्रेट शेप्रेट आभार म्हटंलं, कि प्रतिसादाची संख्या आपसूक वाढते, हा माझा चाणाक्षपणाच नव्हे काय ?

मस्त फोटो! आधी वाट्लं नॉन्व्हेज असावं..नंतर सगळं वाचल्यावर खुश Happy
नक्की ट्राय करेन

दिनेशदा | 3 June, 2013 - 20:40 नवीन
<<
माझ्या "इब्लिस | 3 June, 2013 - 20:32" ला मस्त प्रतिसाद! जियो!!

>>( झणझणीत लिहिणारे काय फक्त बाबूरावच आहेत, आँ ? )<<
अवांतरः
काल गुरुनाथ नाईकांचा ७५वा वाढदिवस होता Happy
..जितक्या वेगाने तो उसळला, तितक्याच वेगाने शांतही झाला..

पण आम्ही हे मासे आणि हे प्रकार दोन्ही एकाच ताटात खाऊ शकतो. Lol आणि हो जळवण्यासाठी काही प्रची टाकतेच उद्या. Lol

लेखन आणि रेसिपी दोन्ही छान.

हात्तिच्या! केळी होय..

निळ्या ताटलीत मधल्या कापाच्या (तुकडी म्हणवत नाही, केळ्याचा असल्यामुळे) वर आणि खाली काय आहे ते?

दिनेश, मस्त कथा लिहा. Happy बरेच दिवसात कथा नाही आली.
केळ्याचे काप दिसताहेत छान. मी बटाट्याचे करुन खाईन. Happy

वॉव दिनेश, तुम्ही कसले कल्पक आहात.
तुम्ही नोकरी सोडा आणि पाकृ चे क्लास घ्या भारतात. मी शिकायला येईन नक्कीच.

Pages