मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सगळीकडे कधी न पाहिलेली हत्यारं विकायला ठेवलेली >> कळला 'चोर बाजारा'चा पसारा ? इतक्या वेळां जावूनही ह्या 'हत्यार गल्ली'चा मला पत्ताच नाही !!

पूर्वी म्हणजे १९८० सालापर्यंत मूळ धक्क्यावरून कोंकण लाईन च्या बोटी सुटत. <<
या अश्या प्रवासाच्या सुरस व चमत्कारीक कथा नवर्‍याकडून ऐकलेल्या आहेत.
आदल्या रात्री लालबागमधल्या नातेवाइकांकडे जाऊन रहाणे कारण बोट पहाटेची असे वगैरे. साबांकडून ऐकलेल्या हकिकती अजून सु व च आहेत. ते असो.
हल्ली भाऊचा धक्का फंक्शनल नसतो का?

या अश्या प्रवासाच्या सुरस व चमत्कारीक कथा नवर्‍याकडून ऐकलेल्या आहेत. >>> मी अशा लाँचमधून आवासला प्रवास केला आहे आणि त्या प्रवासाची एकच अप्रिय आठवण आहे. साताठ वर्षांची असताना आईची मावशी आणि तिची मुलं ह्यांच्याबरोबर गेले होते. बोटीत बसल्याबसल्या मावशीने एक कडक बुंदीचा लाडू हातात ठेवला आणि लाडू संपल्याशिवाय बोलायचे नाही असे सांगितले. नंतर आवास आले तरी मी चिकट हात घेऊन तो लाडूच कुरतडत बसले होते. त्यानंतर कडक बुंदीच्या लाडवाला हात लावलेला नाही Proud

मस्त माहिती मिळते आहे ह्या धाग्यावर. मजा येतेय वाचायला Happy

आता फक्त रेवस, मांडवा,मोरा वगैरे अ‍ॅक्रॉस द क्रीक प्रवासबोटी सुटतात. कोंकणाची जलवहातूक कधीचीच बंद झाली आहे. एन्.एच.१७ मुळे रस्त्याने कोंकण गाठणे सोपे आणि कमी वेळाचे झाल्यामुळे बोटींकडे कुणी वळेना आणि आधीच डबघाईला आलेली ही वहातूक पूर्ण बंदच केली गेली. धक्क्याचे एक्स्टेन्शन फिशिंग ट्रॉलर्समधून मासळीचा चढ-उतार आणि लिलावासाठी वापरले जाते.

उरणच्या मोर्‍यावरून आम्ही मुंबईला जाण्यासाठी भाउचा धक्का गाठायचो. लहानपणी आमच्या उरणमध्ये आईस्क्रिमची दुकाने माझ्या माहीतीत तरी नव्हती. कुल्फी वगैरे मिळायची. पण कप मधली आयस्क्रिम भाऊच्या धक्यावर मिळायची. त्यामुळे मुंबईला लाँचने जायचे म्हणजे वडील आयस्क्रिम देणार हा आनंद असायचा. भाऊच्या धक्यावरून वरळीची बस पकडायचो. (आता नंबर आठवत नाही) शेवटचा स्टॉप वरळी असायचा.

मुंबईला वर्षातून एकदा किंवा दोनदा जाणेव्हायचे. सगळे वडीलांकडचे नातेवाईक मुंबईतच पण तेच आमच्याकडे सुट्टीत यायचे. त्यामुळे मुंबईत जाण्याचा जास्त प्रश्न आला नाही. वडील मात्र रोज कुर्ल्याला अप-डाउन करायचे. तेही मचव्याने. संध्याकाळि ८ चा मचवा पकडायचे. सकाळी ९ च्या मचव्याने परत. घरच्यांसाठी कायमची नाईट शिफ्ट घेतली होती. त्यांना मुंबईची खडा-न खडा माहीती होती. भायखाळा, चेंबूर, गिरगाव, वरळी, विक्रोळी येथे नातेवाईक होते. त्यांच्याकडे मधुन मधुन जाणे व्हायचे.

गोरेगावात काका रहायचे. तिथले ओ.पी गार्डन अजुन आठवते. देवकेळीची फुले फुललेले ते गार्डन डोळ्यासमोर अजुन आहे.

ओ.पी गार्डन. >>. छोटा.काश्मिर. आरे. ़कॉलनी आतुन न्युझिल.न्डहॉस्त्टेल कडुन जो रस्ता जातो तो भाग खुप सन्द्र्र आहे , दुसर्‍य्या. बाजुला वर येक रस्ता. सेन्ट्रल डेरीक्डे जातो. ऊन्चावर असल्याने येथुन मस्त व्यु मिळतो इथेच आरे गार्ड्न रेस्टॉरन्ट.आहे

पुर्वी mhada सारखी Bombay Development Department ( BDD ) अशी येक बॉडी होती त्यानी मुंबईत बांधलेल्या चाळी येव्हढेच माहिती आहे

१ मध्ये प्रथम प्रकाशित झालेले व आता पुनः प्रकाशित झालेले गोविंद नारायण माडगावकरांचे मुंबईचे वर्णन हे छान पुस्तक आहे बरीच जुनी माहिती दिलेली आहे पण छायाचित्रे जवळपास नाहीतच. .इथे मी त्यावर लिहिलेला review :

<< पुर्वी व्हिटीसमोर ट्रामचे रुळ दिसायचे म्हणे.>>त्याही पूर्वी ट्रॅममधून व्हीटी पण दिसायची ! Wink

कांही ट्रॅम दुमजली असत व कांही दोन डब्यांच्या. ड्रायव्हरला केबिन नसे. शिवाय तो उभा राहूनच ट्रॅम चालवी. त्यामुळें त्याच्या पायाला पट्ट्या गुंडालेल्या असत असंही अंधुकसं आठवतं. हॉर्न नसे, त्याऐवजी पायाखाली असलेली लोखंडी चकती तो दाबत राहिला कीं 'घण घण' अशी ट्रॅमची वैशिष्ठ्यपूर्ण घंटा वाजे. स्टॉप असले तरीही चालत्या ट्रॅममधे चढणं व ट्रॅममधून उतरणं सहजशक्य असायचं व तें फार गैरही मानलं जायचं नाही. एकंदरीतच वाहनांची गर्दी नसल्याने ट्रॅमच्या मार्गावर तो अडथळा सहसा नसायचा. [ ट्रॅमचे रुळ रेल्वेसारखे नसून जमीनीत असत व त्यांच्या खांचीतून ट्रॅमची चाकं जात. त्यामुळे रेल्वे क्रॉसींगसारख्या गाड्या ट्रॅमच्या मार्गावरूनही जाऊं शकत.]

मुंबईला लोकल स्टेशनवर दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म असणे हि पुर्वी पर्वणी वाटायची. महालक्ष्मी रोड, जोगेश्वरी आणि कुर्ला येथे ते पूर्वापार होते. पण ते अनुक्रमे घोडे, म्हशी आणि बैल यांच्यासाठी होते.
आता डब्यातल्या डब्यातच स्टेशन कुठल्या बाजूला येतेय ते कळते पण पुर्वी तशी सोय नव्हती. त्यासाठी सहप्रवाश्यांच्या मार्गदर्शनाशिवाय किंवा स्वतःच्या जी.के. वरच अवलंबून रहावे लागे. तरीही एखादा वाट चुकलेला बकरा निघेच. त्याला मात्र कितीही गर्दी असो, वाट करुन दिली जात असेच.
कुर्ला, दादर ( नवा प्लॅटफॉर्म झाल्यानंतर ) या ठिकाणी मात्र गाडी अचानक साईड बदलत असे. त्यावेळी लटके यांची दूरदृष्टी कामाला येत असे. ( कधी काळी मी पण लटका होतोच.)

चर्चगेटला पूर्वापार दोन्ही बाजूला होते पण व्ही. टी: ला नव्हते. त्याकाळी संध्याकाळच्या वेळी, व्ही. टी. स्टेशनमधे शिरणार्‍या लोकलमधले उतरणारे प्रवासी, विरुद्ध बाजूला अंग चोरून उभे रहात असत.
सध्या तशी सोय नाही, त्यामूळे व्ही.टी. च्या दिशेने पाठ लावून उभे रहावे लागते. धाडधाड आत शिरणार्‍या प्रवाश्यांपासून वाचण्याचा तोच एक उपाय आहे.
व्ही. टी. ला हि सोय मात्र रोजचे ट्राफिक संभाळत आणि मूळ बिल्डींगला धक्का न लावता केली गेली. त्याबद्दल
रेल्वे प्रशासन खरोखर अभिनंदनाला पात्र आहे.

आता एक पी. जे.

हम दोनोंमे.

|
|

अर्ज किया है
|
|
|
हम दोनोंमे कभी न पडे कोई दरार
|
अर्ज किया है
|
|
|
हम दोनोंमे कभी न पडे कोई दरार
|

अगला स्टेशन विरार, पुढील स्टेशन विरार, नेक्स्ट स्टेशन विरार Happy

भाऊच्या धक्क्याबद्दल माहितीबद्दल धन्यवाद.

मी डॉकयर्ड स्टेशनजवळच्या हॉस्टेलमधे राह्त अस्ताना आठवड्यातून एकदातरी भाऊच्या धक्क्यावर जाऊन यायचेच. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच दरम्यान तिथे माझे वडील एका जहाजाच्या कामासाठी आलेले होते. त्यामुळे त्यांना भेटायला उर्फ एटीएम सर्व्हिस वापरायला जहाजावरती जाणे व्हायचेच. तिथेच धक्क्यावर माझ्या एका मित्राचे ट्रॉलर्स असल्यामुळे ऑफिस होते. त्या ऑफिसात बसून चकाट्या पिटणे हादेखील फार आवडता उद्योग. तिथले काही खलाशी जुन्या काळच्या बोटींबद्दल वगैरे सांगत बसायचे. त्यावेळी ऐकताना खूप मजा वाटायची. खासकरून रात्रीच्या बोटप्रवासाचे कौतुक ऐकताना, ते सर्व अनुभव मी तेव्हाच लिहून ठेवायला हवे होते. Sad

भाऊच्या धक्क्यावरून मी दोन तीनदा मासेमारीलादेखील गेलेली आहे. गळ टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता.

>>> पुर्वी व्हिटीसमोर ट्रामचे रुळ दिसायचे म्हणे. <<<<
.>>त्याही पूर्वी ट्रॅममधून व्हीटी पण दिसायची ! <<<< Lol Lol Lol
आत्ताच मी त्या "अमानवीय.." या भूतान्च्या धाग्यावरुन आलो अन वाचले की "व्हिटीसमोर ट्रामचे रुळ दिसायचे", अन केव्हडा तो दचकलो म्हणता! Proud
मला कळेना की भूतान्च्या धाग्यावर रूळ अन व्हिटी कसे काय? अन मुम्बैच्या धाग्यावर रूळान्चे भूत कसे काय? Lol की मीच धागा चूकलोय? भ्रम हो तो निव्वळ भ्रम!

>>> सर्व अनुभव मी तेव्हाच लिहून ठेवायला हवे होते. <<< अजुनही आठवून बघना, आठवतील अग. लिहून काढ जसे जेवढे आठवेल ते, मग सुसन्गतवार लावायचे.

दादर टि. टि. ( आताचे खोदादाद सर्कल ) म्हणजेच ट्राम टर्मिनस ना ? अगदी पुर्वी तिथे फ्लायओव्हर नव्हता आणि ३८५ रस्त्याच्या मधूनच सुटायची.

देवनार बस डेपोच्या कुंपणासाठी ट्रामचे रुळ वापरले होते. माझ्या वडीलांनी ते मला मुद्दाम दाखवले होते.
मला वाचलेले आठवतेय, एक ट्राम वडाळा डेपोमधे ठेवली होती आणि जब्बार पटेल यांच्या आंबेडकर चित्रपटासाठी वापरली होती.

शिवाजी मंदिरच्या बाजुला असलेल्या उसाच्या रसाच्या दुकानात नेहमी तो चरक चालु असायचा, त्या चरकाला लावलेले मोठे घुंगरु अजुनही आठवतात.
त्या दुकानात काम करणारी माणसं सगळी एका सुरात गाणी म्हणत असत.

पूर्वी बेस्टच्या डबल डेकर बसेस शिवाय ट्रेलर बसेस पण असायच्या, त्यात ड्रायव्हर केबिन वेगळी असायची.
१,६ लि, ८ लि, ७०.७१, ७४,३०५,३५१ ह्या रुटवर जास्त चालायच्या ह्या ट्रेलर बसेस.

7ltd also My favorite bus during school time. Grab front seat & watch trailer during turn was really enjoying

गेले ते दिन,

<<पण ट्राम बन्द का पडल्या? त्या बन्द पडल्या तेव्हा गर्दीचा प्रश्न तर तितकासा नव्हता, मग बन्द पडायचे कारण काय? >>
प्रमुख कारण त्यांची मंदगती चाल असावं. मुंबईच्या वेगात (टॅफिक, लोकसंख्या) ट्रॅमसेवा कोलमडली.

आंबेडकर रोड - दादर-परळ दरम्यान ट्रॅमचे रुळ बघितलेले आठवतायत.

लोकल ट्रेन्सच्या प्लॅटफॉर्म संबंधी - बहुतेक वेस्टर्न रेल्वेच्या ड्ब्यांमधे (फर्स्ट क्लास) दरवाजावर इंडिकेटर असायचा. प्लॅट्फॉर्म ज्या बाजुला येणार आहे त्या बाजुचा इंडिकेटर ब्लिंक व्हायचा... Happy

<< ते सर्व अनुभव मी तेव्हाच लिहून ठेवायला हवे होते >> अहो, इथं काय कुणी लिहून ठेवलेलं थोडंच लिहीतंय ! आठवतं तें लिहायचं; लिहायला लागलं कीं तसं आठवतही जातंच ना ! [नंदिनीजी, बोटीचं नांव काढलं कीं तुम्हीं हजर होणार याची खात्रीच होती Wink ]

दादर टि. टि. ( आताचे खोदादाद सर्कल ) म्हणजेच ट्राम टर्मिनस ना ? अगदी पुर्वी तिथे फ्लायओव्हर नव्हता आणि ३८५ रस्त्याच्या मधूनच सुटायची.

>>>>> आठवतेय दिनेशदा. आजीकडे घाटकोपरला रहायला आलो की याच बसनं सायनच्या किल्ल्यात येत असू आम्ही.

<कुर्ला, दादर ( नवा प्लॅटफॉर्म झाल्यानंतर ) या ठिकाणी मात्र गाडी अचानक साईड बदलत असे.>

बोरिवली लोकल अंधेरीत कधीकधी साइड बदलते त्यामुळे अंधेरीला उतरणारे गाडीतल्या गाडीत सैरावैरा पळतात.

आठवतं तें लिहायचं; लिहायला लागलं कीं तसं आठवतही जातंच ना ! >>>> भाऊकाका, त्यावेळेला तेवढ्या लक्षपूर्वक ऐकलं पण नाही... त्याची व्हॅल्यू लक्षात आली नाही तेव्हा. पण खलाशी लोकांचे अनुभव मात्र मी एकदा खरंच लिहिणार आहे. अगदी मुद्दाम ठरवून हा प्रोजेक्ट करणारे. त्यासाठी अर्थात मला मुंबईत आणि रत्नागिरीत यावं लागेल. Happy

http://www.maayboli.com/node/32325<<< इथे भाऊच्या धक्क्याचा उल्लेख येऊन गेलेला आहे.

मस्जिद स्टेशनची लांबी पुर्वी कमी होती. प्रत्येक लोकल तिथे दोनदा थांबायची. मग त्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली.

हार्बर लाईनच्या डॉकयार्ड स्टेशनवरून सँडहर्स्ट रोडचे इंडिकेटरदेखील दिसतात इतकी त्यामधले अंतर कमी आहे. सेम वाशी आणि सानपाडा. वाशी स्टेशनमधे उभं राहिलं तर सानपाड्याचे इंडिकेटर दिसतात.

Pages