खाण्यापिण्यातील चुकीचे संयोग!!!!

Submitted by हर्ट on 4 March, 2013 - 02:51

बर्‍याचदा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, कडधान्ये, मसाले एकत्रित करुन भाज्या करतो. पण असा संयोग....मिश्रण योग्य कि अयोग्य हे आपल्याला माहिती नसते.

इथे आपण अशा चुकीच्या संयोगाबद्दल...मिश्रणाबद्दल लिहिणार आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमन,
धन्यवाद.
आपण 'त्या'पैकी नाहीत याची खात्री पटली, माझ्याबाजूनेही वाद नव्हताच, तोही मिटला आहे.
कलोअहेवि

"यत्‌ किंचिद्‌ द्रव्यं दोषमुत्क्लेशयति न तु निर्हरति, तत्‌ सर्वं विरुद्धम्‌।।' - अर्थात, "जे द्रव्य सेवन केले असता (वात-पित्त-कफादी) दोषांमध्ये बिघाड करते पण बिघडलेल्या दोषांचा निचरा करत नाही ते सर्व विरुद्ध होय.'
"विरुद्ध'ची ही संकल्पना समोर ठेवून आयुर्वेदाने त्यासंदर्भात काही नियम घालून दिलेले आहेत. ह्या नियमांच्या विरुद्ध असे ते सर्वच अहितकर समजावे. उदाहरणार्थ - जांगलदेशामध्ये (कोरडा, रूक्ष, खडकाळ प्रदेशात) रूक्षतीक्ष्णादिगुणांचे औषध देणे किंवा आनूपदेशामध्ये (पाणथळ प्रदेशात) स्निग्धशीतादिगुणांचे औषध देणे देशविरुद्ध आहे. त्याचप्रमाणे शीतकाळामध्ये शीत-रूक्ष व उष्णकाळात कटू-तिखट व उष्ण पदार्थांचे सेवन करणे हे कालविरुद्ध, सम-विषम-मंद-तीक्ष्ण अशा चारही प्रकारच्या अग्नीच्या विरुद्ध आहार खाणे किंवा अग्निमांद्य असताना पचावयास जड असे पदार्थ खाणे हे अग्निविरुद्ध, समप्रमाणातील तूप-मधाचे मिश्रण असा संयोग करणे मात्राविरुद्ध, केवळ गोड-थंड पदार्थ मानवणाऱ्यांनी तिखट-उष्ण पदार्थ घेणे हे सात्म्यविरुद्ध, समान गुणांच्या अभ्यासाच्या विरुद्ध जी औषधयोजना ती वातादिदोषविरुद्ध, शीत-वीर्य द्रव्य उष्ण-वीर्य द्रव्याबरोबर घेणे वीर्यविरुद्ध, क्रूरकोष्ठीला (जड कोठ्याच्या व्यक्तीला) विरेचनाच्या औषधाची मात्रा कमी पडणे किंवा कमी क्षमतेचे औषध घेणे कोष्ठविरुद्ध, श्रम(व्यायाम) वा मैथुन झाल्यावर म्हणजेच ज्यांचा आधीच वातप्रकोप झाला आहे त्यांनी वातप्रकोपक आहार घेणे तसेच खूप झोप येत असताना किंवा आळस आलेला असताना कफ वाढवणारे पदार्थ खाणे हे अवस्थाविरुद्ध, मलमूत्रविसर्जन झालेले नसताना अतिभूक लागून किंवा मलमूत्र विसर्जनानंतरदेखील भूक लागलेली नसताना अन्न खाणे हे कर्मविरुद्ध, तूप खाऊन वरून थंड पाणी पिणे ह्यासारखे परिहारविरुद्ध, त्याज्य इंधनावर (उदाहरणार्थ- वाळवी लागलेले लाकूड) वा अपुऱ्या आचेवर शिजवलेले, कच्चे राहिलेले किंवा अतिरिक्त शिजलेले किंवा करपलेले अन्न हे पाकविरुद्ध, दुधाबरोबर आंबट पदार्थ अशा प्रकारचे सेवन हे संयोगविरुद्ध, जे मनास रुचत नाही ते हृद्‌विरुद्ध, ज्यात रसपरिपोष नाही किंवा एखाद्या रसाचा अतिरेक झालेला (उदा. खारट, तिखट) तर ते संपद्‌विरुद्ध, चित्त स्थिर न ठेवता सेवन केले जाणारे अन्न हे विधिविरुद्ध - असे विरुद्धान्नाचे अनेकविध प्रकार आहेत.

'साती' ,रक्तगट आणि आहार यावर बरेच संशोधन झाले आहे . दूध आणि कडधान्य याची अपचनाची तक्रार करणाऱ्‍यांमध्ये ए पाझटिव च्या व्यक्ति जास्त असतात .

शरद, आहार पचन आणि रक्तगट यांवर संशोधन खरेच खूप झाले आहे पण त्यातून कुठलाही ठोस निष्कर्ष निघाला नाही. आधुनिक वैद्यकशास्त्राने त्यातील निश्कर्ष मान्य केले नाहीत. मूळात ही एका नॅचरोपॅथची- पिटर डी अ‍ॅडॅमोची कल्पना आहे पण त्याच्या अभ्यासात शास्त्रीय पद्धती वापरल्या नाहीयेत आणि निश्कर्ष ढोबळ म्हणता येतील अशा प्रकारचे आहेत.
ते निश्कर्ष म्हणजे आपण जसे सरदारजींचा आय क्यू लो असतो , मराठी लोक फक्त नोकरीपुरते अशाप्रकारचे आधारहीन वक्तव्य करतो , केवळ ढोबळ निरीक्षणांवर आधारीत तसे आहे.

हरीहर
उत्तम प्रतिसाद,

१०००% अनुमोदन,..

अगदी विषय उल्गडून दाखवलात.

बाकी कोणी काहीही म्हणो आयुर्वेदात ईतका विस्त्रुत विचार केला आहे हेच लोकांना माहीत नाही,
त्यामूळे आयुर्वेदाला थोतांड म्हणण्यापर्यंत काहींची मजल जाते.

खाण्यापिण्यातील चुकीचे संयोग!!!!
ह्या गोष्टीला सुद्धा आताच्या आधुनीक वैदक शास्त्रात जागा मिळाली आहे, ह्या विभागाला ट्रोफोलॉजी असे संबोधण्यात येते.

Trophology is the study of correct food-combining, that is, the art of knowing which foods go best with which others. Foods can be grouped according to their main constituents.

स्त्रोतः
१. http://www.thesmith.org.uk/words/food/diet/trophology.html
२. http://www.detoxifynow.com/Food_diet.html
३. http://www.mindbodygreen.com/0-3615/10-Common-Food-Combinations-That-Wre...
४. http://cancer.vg/en/foods-combinations

वरील वेबसाईट्स वर विरुद्दान्नावर अत्यंत विस्त्रुत चर्चा केलेली आहे, ईच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा.

ता.क.
त्याच काय आहेना, ईथे काही सभासदांच अस ठाम मत आहे की आयुर्वेद सांगतो म्हणजे ते खोडुन काढलच पाहीजे, आयुर्वेद आजच्व्या वैद्यकीय शास्त्राच्या पुढे काहीच नाही. त्यामूळे कुठल्या ही मुद्द्यावर गुगलून, मिळालेल्या पुराव्यावर, आयुर्वेद व तत्सम विषयाला बुकलून काढण्यात धन्यता मानण्यात येते.

काही गुगलप्रेमी लोकांना वरील विषयाची माहीती मिळाली नाही असे दिसतेय.

Pages