गझल विभाग व गझलेवरचे प्रतिसाद

Submitted by एक प्रतिसादक on 29 December, 2012 - 04:12

हे मनोगत बरेच दिवसांपासून लिहायचे होते. मायबोलीमधे काय सुधारणा करता येतील या बाफवर लिहायचे निश्चित केले होते. पण गझलविषयक असल्याने विचारांती स्वतंत्र लेख म्हणून पेश करत आहे.

सर्वप्रथम प्रस्तुत लेख हा गझल अथवा गझल लिहीणारे यांच्या विरोधात नाही हे स्पष्ट करतो. गझल हा एक मराठी साहीत्याला समृद्ध करणारा प्रकार आहे याबद्दल दुमत नाही. मायबोली हे संकेतस्थळ असे आहे कि इथे अनेक जण अनेक कारणांसाठी येतात. हे काही गझलेला वाहीलेले अथवा साहीत्यविषयक संस्थळ नाही तर इथल्या सदस्यांची अभिरूची, लेखनशैली आणि संयोजक व प्रशासनाचे उपक्रम यामुळे ईसाहीत्यामधे आपली छाप सोडणारे एक संस्थळ म्हणून मायबोली सर्वदूर ज्ञात झाले आहे.

अशा या संकेतस्थळावर आपले लेखनकौशल्य अजमावून पहावे म्हणून अनेक जण येतात. काहींचे लिखाण अगदीच कच्चे असते तर काहींचे आश्वासक. अशा आश्वासक लिखाणाला इथे नेहमीच प्रोत्साहन आणि चांगले सल्ले मिळालेले आहेत. एखाद्या शिकण्याची इच्छा असलेल्याला चांगले मार्गदर्शन देखील मिळालेले आहे. आजवर इथे कधीही मूळ लिखाणावर वरताण असे लिखाण प्रतिसाद म्हणून पाहण्यात आलेले नाही. आपल्याला जे म्हणायचे आहे ते कमीत कमी शब्दात जेव्हा म्हणता येते तेव्हाच त्यात प्रतिसादक पारंगत आहे हे जाणवते.

गेल्या काही दिवसांपासून गझल या विभागातले प्रतिसाद हा चर्चेचा विषय बनलेला आहे. छोट्याशा गझलेवरही एका छोट्या पुस्तिकीएव्हढा प्रतिसाद आणि उलटसुलट वाद हे नेहमीचे झाले आहे. प्रतिसादक सल्ला किंवा मार्गदर्शन याऐवजी उर्दू शायरी, गझलेचा इतिहास इथपासून सुरू करतात आणि थांबता म्हणता थांबत नाहीत. कधीकाळी कंपूशाही विरुद्ध शंख फुंकलेल्यांना इथे स्वतःच्या कंपूद्वारे एखाद्या नव्या गझलेवर तुटून पडताना काहीच चुकीचे वाटत नाही.

पर्यायी शेर, ;पर्यायी शब्द असावेत का, हे शब्द सुचवताना ते वृत्तात बसतात का याची शहानिशा न करता आलेल्या अनेक सूचना टाळता येण्याजोग्या असू शकतात असं वाचकांना वाटतं. गझल आवडली म्हणून प्रतिसाद द्यावा तर त्यावर उसळलेल्या वादामुळे नकोसे वाटते. कारण प्रतिसादकालाही हल्ली असा प्रतिसाद का दिला म्हणून विचारणा होऊ शकते याची जाणिव वाचकांना आहे.

एखाद्याला एकच गोष्ट वारंवार सांगूनही तो ऐकत नसेल तर काय करायचं याचं शिक्षण बालपणापासून इसापनीती, पंचतंत्र सारख्या बोधकथांमधून मिळालेले असते. प्रतिभावंतांना त्याबद्दल काय सांगायचं ? असं सांगून कुणा प्रज्ञावंताचा अवमान हातून व्हावा असं वाटत नाही.मायबोली चालवण्यासाठी आहे तेच लोक समर्थ आहेत. त्यांना शिकवण्याचा किंवा अवमान करण्याचा इथे हेतू नाही. मायबोलीवरच्या अकरा लाख वाचकांपर्यंत एक दमदार गझलविभागच पोहोचावा हा एकमेवर विचार यामागे आहे. गझलविभागाची सद्यस्थिती पाहता त्याबाबत काहीतरी पावले उचलण गरजेचे आहे. एक जुनीच सूचना कराविशी वाटते. सध्या हा विभाग क्लोज ग्रुप करण्यात यावा या मागणीला बहुतेक मायबोलीकरांचा पाठिंबा असेल असं वाटतं.

लेखाच्या लेखकाचा गझलेतले ज्ञान असल्याचा बिल्कुल दावा नाही. गझल तांत्रिक दृष्ट्या आणि आशयदृष्ट्या कशी आहे हा प्रतिसाद त्यातले जाणकारच देणार ( जाणकार देणारच !). काय प्रतिसाद द्यावा हे त्यांनीच ठरवायचे, पण प्रतिसाद कसे असावेत हे समजायला तज्ञ असण्याची काहीच गरज नाही. इथे काही उत्तम प्रतिसाद देणारेही आहेत. सध्याच्या या अवस्थेमुळे ते कुणाच्याही गझलेवर प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. नावं घेऊ नयेत पण मिल्या, ज्ञानेश, अनंत ढवळे, डॉ कैलास गायकवाड यांच्या गझला या सहजसुंदर आणि उच्च दर्जाच्या आहेत. यांचे प्रतिसादही तसेच सहज आल्याचे दिसतात. क्रांती, प्राजक्ता, ममता या कवयित्रींच्या गझलादेखील खणखणीत आहेत. गझल लिहू शकणारे पण न लिहीणारे असे उल्हास भिडे यांचे प्रतिसाद देखील न दुखावता नेमक्या त्रुटी स्पष्ट करणारे असतात. विद्या विनयेन शोभते !

या सर्व परिस्थितीचा विचार करून ज्यावेळी काही प्रतिसादकांचा स्वतःचा अभ्यास पूर्ण होईल आणि प्रतिसाद थोडक्यात व रसभंग न करणारे येऊ लागतील तेव्हाच हा विभाग सार्वजनिक व्हावा. सध्या मिळून करूयात अभ्यास वैश्विक गझलेचा, पाळा माझे नियम, ठेवा मान माझ्या शब्दांचा अशी जी अवकळा या विभागाला आली आहे त्यातून हा विभाग बाहेर पडेपर्यंत या व्हेंटिलेटरचा विचार व्हावा ही नम्र विनंती.

धन्यवाद

सूचना

१. गझलेवर चर्चा करण्यासाठी कवी आणि कविता असा एक स्वतंत्र विभाग आहे त्यात अभ्यासपूर्ण चर्चा झडू शकतात हे लक्षात घेतलं तर ब-याच गोषटी टाळता येतील अशी एक सूचना कराविशी वाटते.

२. पुन्हा एकदा नम्र विनंती : ही वैयक्तिक टीका नाही. संबंधितांनी अयोग्य वाटल्यास निषेध जरूर करावा पण योग्य वाटल्यास कळवावे. धन्यवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर्दा, अगदी मनातलं लिहिलीयत.
मी खरंच हल्ली तुम्ही वर लिहिलेल्यांच्या गझला वाचणेही सोडलंय.

सध्या हा विभाग क्लोज ग्रुप करण्यात यावा या मागणीला बहुतेक मायबोलीकरांचा पाठिंबा असेल असं वाटतं. >>>
.
.
माझा

बहुतेक मायबोलीकरांच्या मनातलेच लिहिलेय.
प्रा. देवपूरकरांचे प्रतिसाद बघून आता त्यांना समुपदेशनाची गरज आहे असे वाटू लागले आहे.
सर्वच गझलांचा मतितार्थ एकच, मी किती ग्रेट, मला जगाने किती छळले.. आणि वर मी म्हणजे कुणीही, अगदी देव सुद्धा असू शकेल, अशी मल्लीनाथी.
मायबोलीवरची हालचाल वाढून प्रशासनाचा काय फायदा होत असेल ते असो, पण एकंदरच गझल या प्रकाराबद्दल माझ्या मनात घृणा निर्माण करायचे कार्य मात्र प्राध्यापकांनी नक्कीच केलेय.

दिनेशदा!
आपल्या काव्यबोधाची, सौंदर्यबोधाची, अभिरुचीची व जाणीवांची वाहवा करावी तेवढी थोडीच आहे!
मायबोलीचा ठेका वगैरे घेतला नाही ना? की विचार करताय?
टीप: अरे वा! मथितार्थ आपणासही केव्हापासून कळू लागला?
जो आपला प्रांतच नाही तिथे घृणा काय, रुची काय अन् आवड ती काय?
आपल्या मनोदौर्बल्याला आपणच जबाबदार असतो!
उगाच दुस-याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेही असतात हे सुज्ञाने जाणावे!
याऊपर ते काय बोलावे?
लवकरात लवकर मनोविकारतज्ञांना भेटून तपासण्या करून घ्या! इतरांच्या दृष्टीने तरी ते हितावह आहे!

झोपेचे सोंग घेतलेल्यांना बैलछाप काय, गायछाप काय, कोणताच जर्दा जागे करू शकणार नाही असेच चित्र दिसत आहे! बेताल शब्दांचे तोबरे भरलेले ठेकेदार इथे मायबोलीला बेरंग करताना दिसत आहेत, मायबोलीकरांनो, शिंतोड्यांपासून सावध रहा! अशा ठिकाणी कसली अपेक्षा करावी?

नावं घेऊ नयेत पण मिल्या, ज्ञानेश, अनंत ढवळे, डॉ कैलास गायकवाड यांच्या गझला या सहजसुंदर आणि उच्च दर्जाच्या आहेत. यांचे प्रतिसादही तसेच सहज आल्याचे दिसतात. क्रांती, प्राजक्ता, ममता या कवयित्रींच्या गझलादेखील खणखणीत आहेत. गझल लिहू शकणारे पण न लिहीणारे असे उल्हास भिडे यांचे प्रतिसाद देखील न दुखावता नेमक्या त्रुटी स्पष्ट करणारे असतात. विद्या विनयेन शोभते !
------ काही गझलकरांना जाणतेपणी टाळले आहे असे मला वाटले... Wink

छान लेख.... चांगली गझल असेल तर काळाच्या ओघांत टिकेल. नाहीतर गझल वाचल्यावरच विसरुन जाईल. माझ्यासारखे वाचक निव्वळ मनोरंजन म्हणुन बघतात.

उदय, त्या यादीत पुलस्ती, वैभव, आनंदयात्री यांचीही नावे असायला हवीत.

असो एकेकाळी गझल वाचायला खूप आवडायचे. गझल तंत्रातले काहीही कळत नाही मला. पण समोर ठेवलेले काव्य हे सच्चे, प्रामाणिक, अनवट, सुंदर आहे की नाही इतपत कळण्यासाठी तंत्राची गणिते पाठ असण्याची गरज नाही असे मला वाटते. गेल्या वर्षभरात गझला अजिबात वाचू नये असेच वाटायला लागले आहे. हल्ली फिरकणेही बंद केलेय.

गझलांचा पाऊस, तंत्र की आशय की भावना इत्यादी मारामार्‍या खड्ड्यात जाऊदेत पण कुणीतरी दर महिन्यातल्या दर्जेदार गझला या शीर्षकाखाली काही निवडक गझलांच्या लिंक्स आणि त्यांना त्या गझला दर्जेदार का वाटतात याबद्दल थोडक्यात प्रस्तावना असे प्रसिद्ध करेल तर कदाचित माझ्यासारख्या अनेकांनी जे गझला वाचणे बंद केले ते परत सुरू करतील. अशी विनंती आहे.

पण समोर ठेवलेले काव्य हे सच्चे, प्रामाणिक, अनवट, सुंदर आहे की नाही इतपत कळण्यासाठी तंत्राची गणिते पाठ असण्याची गरज नाही असे मला वाटते.>>> अनुमोदन, पण इथे अनेक 'डबल ढोलकी तज्ञ' आहेत. उत्तम आशय असलेले लिहीले की 'तंत्र कुठाय' म्हणायचे, तंत्र असले की अभिव्यक्ति सुमार असे जाहीर करायचे असा त्यांचा खाक्या. मी मानतो तेच ग्रेट, कारण मीच ग्रेट; यांच्या तावडीतून सुरेश भट सुट्ले नाहीत तर बाकीच्यांची काय कथा.

आगाऊ | 30 December, 2012 - 20:24

पण समोर ठेवलेले काव्य हे सच्चे, प्रामाणिक, अनवट, सुंदर आहे की नाही इतपत कळण्यासाठी तंत्राची गणिते पाठ असण्याची गरज नाही असे मला वाटते.>>> अनुमोदन, पण इथे अनेक 'डबल ढोलकी तज्ञ' आहेत. उत्तम आशय असलेले लिहीले की 'तंत्र कुठाय' म्हणायचे, तंत्र असले की अभिव्यक्ति सुमार असे जाहीर करायचे असा त्यांचा खाक्या. मी मानतो तेच ग्रेट, कारण मीच ग्रेट; यांच्या तावडीतून सुरेश भट सुट्ले नाहीत तर बाकीच्यांची काय कथा.

<<
++++१

चांगलं लिहीलंय.
सध्या आलेला गझलांचा महापूर बघता क्लोज ग्रुपचा पर्याय दिल्यास माझ्यासारखे बरेच लोक दुवा देतील. ;)
पण समोर ठेवलेले काव्य हे सच्चे, प्रामाणिक, अनवट, सुंदर आहे की नाही इतपत कळण्यासाठी तंत्राची गणिते पाठ असण्याची गरज नाही असे मला वाटते.
>> +१.

पहिल्या ३ पानांवर फक्त गझला दिसल्या की वैतागुन एखादीही बघितली जात नाही.
काही लोकांना तर मायबोली म्हणजे ब्लॉग वाटते की लिहीलेली प्रत्येक गोष्ट इथे टाकलीच पाहीजे जणु. Uhoh

मी मास्तरांना केलेली विपु , वरील लेखात जे सांगायचय तेच मी ....... भाषेत सांगण्याचा केलेला दिन प्रयत्न.
मी गझलद्वेष्टा नाहीये पण आपल्याला काही नम्र विनंत्या करु इच्छितो.
१. गझलांसाठीच्या वेगळ्या विभागातल नविन लेखनात फक्त विभागात नविन काहीतरी आहे हेच कळावे. सगळ्या गझला दिसु नये. जेणेकरुण गझल सम्राटांच्या गोटीबंद गझला आणि त्यावरच्या प्रतिसादाचा किस हवाबंद डब्यात बंद राहतील. यामुळ गझलसम्राटांची त्या धाग्यावर चाललेली साठमारीच्या गंभीर काव कावेमुळ होणारा वात कमीतरी होईल.
२. गझलविभागात प्रवेशासाठी काटेकोर नियम बनवावेत जसे की ज्याला या विभागात प्रवेश हवाय त्याने स्वतःच्या १० गझला / ५ हजला विभागप्रमुख आणि निवड समितीला पाठवाव्यात. जर त्यांना त्या गझला तंत्र आणि मंत्र युक्त वाटल्यातरच त्या व्यक्तिला त्या विभागात प्रवेश द्यावा. विभाग प्रमुख दर महीन्याला बदलावा आणि निवडसमिती, सद्य गझल पुर पहाता आठवड्याला बदलावी. म्ह्ण्जे कंपुगिरी करायला सगळ्यांनाच वाव मिळेल. वि.प्र. आणि नि.स. ला हवाबंद न राहील्यामुळ नासलेल्या गझला आणि प्रतिसादांचा कीस माबोवरुन काढुन टाकता याव्यात.
३. गझलसम्राटांनी आणि विभागातल्या लोकांनी गझलेवरच्या सगळ्या चर्चा फक्त त्याच विभागातच कराव्यात जेणेकरुन गझलदिंडीचा माझ्या सारख्या इतर अतिसामान्यजणांना त्रास होणार नाही.
खरच काहीतरी करा हो......

प्राध्यापकसाहेब, अगदी कळकळीने दिलेल्या सल्ल्याबद्दल आभार. समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ वेगळे असतात हो ? अर्थात मला गरज भासलीच तर दोघांपैकी कुणाकडेही जायला अजिबात कचरणार नाही.

आणि अर्थातच माझी लायकीच नाही, त्यामूळे तूमच्या तोंडाला याउप्पर लागणार नाहीच. नववर्षाच्या शुभेच्छा.

उदय,
>>>>
------ काही गझलकरांना जाणतेपणी टाळले आहे असे मला वाटले... Happy <<<

हो ना...
मी आतापर्यंत अनेक याद्या वाचल्या आणि मला वाटू लागले की मी गझल लिहितच नाही की काय... कि लोक प्रतिसाद देतात आणि नाव विसरतात..? Lol

(अर्थात मला त्याच्याशी देणेघेणे नाही. )

@ अ अ जोशी
यादी हा या बाफचा विषय नाही. तरीदेखील..
तुम्ही मायबोलीवर कमी वेळा येत असावेत. तुमचे प्रतिसाद जवळपास पाहण्यात आलेले नाहीत. तुमचं नाव एखाद्या यादीत नसण्याने तुमचं काहीच बिघडणार नाही हे वै. म.. तुमची गझलच अशा यादीचा समाचार घ्यायला समर्थ असेल. असो.

यादी संपूर्ण वगैरे नाहीच. नीधप यांनी म्हटल्याप्रमाणे सध्या सर्वत्र ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या वैभव जोशींचंही नाव राहीलेलं आहे. आनंदयात्री, शाम, शायर बदनाम यांचीही नावं राहून गेली आहेत. उदय यांना काय अपेक्षित आहे हे मात्र तेच स्पष्ट करू शकतील.

उदय यांना काय अपेक्षित आहे हे मात्र तेच स्पष्ट करू शकतील.
---- मी केवळ गमतीने लिहीले होते... आणि पुढे स्मित पण टाकले होते.

वरती हित्गुज, रंगीबेरंगी वगैरे लिंका आहेत, तिथे काव्य विभाग असे टायटल द्यावे. त्याला क्लिक केले की गझला, काव्य यांचे इंडेक्स पेज ओपन होईल... रेग्युलर इंडेक्सवर कविता घेऊच नयेत.

२००% अनुमोदन... काहि काहि तर इतके भन्नाट प्रतीसाद असतात कि "गझल लिहिणे हि जगातली सर्वात अवघड गोष्ट आहे कि काय असंच काहिसं वाटतं".....

इथे जी चर्चा अपेक्षित आहे ती समजून घेतल्याबद्दल मायबोलीकरांचे आभार. प्रतिसादच नसावेत हा विपर्यास कुणीच केलेला नाही.

एक प्रतिसादक,
>>> @ अ अ जोशी
यादी हा या बाफचा विषय नाही. तरीदेखील.. <<<
तुम्ही नको तो विषय गांभीर्याने घेतलात. Happy

>>> तुम्ही मायबोलीवर कमी वेळा येत असावेत. तुमचे प्रतिसाद जवळपास पाहण्यात आलेले नाहीत. तुमचं नाव एखाद्या यादीत नसण्याने तुमचं काहीच बिघडणार नाही हे वै. म.. <<<
तुम्ही नवीन आहात बहुदा... Happy

>>> तुमची गझलच अशा यादीचा समाचार घ्यायला समर्थ असेल. <<< Lol

अ.अ. जोशी

या बाफचा विषय आहे प्रतिसाद कसे असावेत. कसे असावेत या मधे प्रतिसाद असावेत हे अर्थातच गृहीत धरलेले आहे. काय असावेत (तंत्र-मंत्र इ. ) हे जाणकारांनीच ठरवायचेय हे स्पष्ट केलेले आहे. हा विषय मागे पडून विषयांतर होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. धन्यवाद.

Quota ठरवून दिला पाहिजे ह्या कविंना. महिन्यातुन एक गजल खुप झाली.

फार मानसिक त्रास होतो ह्यांनी पाडलेली काव्य आणि गजला वाचताना.

Pages