प्रवेशिका - १२ ( jayavi - का बंध रेशमाचे ... )

Submitted by kaaryashaaLaa on 1 October, 2008 - 00:06

का बंध रेशमाचे जुळले कधीच नाही
चित्रात रंग माझ्या भरले कधीच नाही

त्या सावळ्याच होत्या रात्री फिरून माझ्या
देहात चांदणे मग फुलले कधीच नाही

बरसात ही सुरांची तव मैफ़लीत होते
मज त्या सरींत भिजणे जमले कधीच नाही

डोळ्यात जागलेल्या रात्री कितीक माझ्या
स्वप्नात भेटणे तुज सुचले कधीच नाही

जखमा दिल्या जगाने, बुजल्या तशाच सार्‍या
का घाव तू दिलेले भरले कधीच नाही

जग जिंकले सदा मी, जिंकेन मी पुन्हा ते
का जिंकणे तुला मज जमले कधीच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौथा शेर आवडला
३/१०

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

बरी आहे गझल. पण एकाच सुरात असलेल्या कवितेसारखी झालीये. गझल वाटण्यासाठी काहीतरी कमी पडतय. गुण ५

व्वा! मस्तच. फारच आवडली.. माझे ७ गुण..

Pages