Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दाद, कांद्याच्या आत मधे उडून
दाद, कांद्याच्या आत मधे उडून जाणारी गंधकाची संयुगे असतात. गरम हवेशी संपर्क आल्याबरोबर त्यांची वाफ होते आणि तिच डोळ्यांना झोंबते. कांदा फ्रीजमधे ठेवल्याने, हि वाफ होण्यासाठी पुरेसे तपमान मिळत नाही.
जनरली गूळ चिरूनच डब्यात भरून
जनरली गूळ चिरूनच डब्यात भरून ठेवतात. मी तरी तसाच ठेवते. पुण्यात आई तेच करायची.
आता मुंबईतही मी तेच करते.
माझ्याकडाचा गूळ फ्रीजमधे नसतो. काचेच्या बरणीत भरून ठेवलेला आहे.
गूळ चांगल्या क्वॉलिटीचा असेल तर गळून सिमेंटचा लगदा टाइप प्रकार होत नाही. तसेच ओला हात लागणार नाही हे पण बघायला हवे.
पण अगं मुंबईत इतका गुळ असेल
पण अगं मुंबईत इतका गुळ असेल तर दमट हवेनं पाणी सुटेल ना?
नॉर्मली नाही सुटत.
नॉर्मली नाही सुटत.
मी नेहमी काळा गुळ आणते छोटी
मी नेहमी काळा गुळ आणते छोटी ढेप, आणि तशीच पिशवी सकट ढेप डब्यात ठेवते. लागेल तसा कापुन वापरते. अजुन तरी कधि खराब झाला नाहिये.
यावेळी मला स्टार बझार मधे कनक
यावेळी मला स्टार बझार मधे कनक गुळाचे पाकीट मिळाले. ते ढेप स्वरुपात नसुन बारिक खडे / गोळे स्वरुपात आहे. वापरायला सोपे.
मला एक सांगा. उन्हाळ्यात खजूर / खजूर लाडू / खजूर दाणे लाडू खाणे उष्ण पडेल का? लेकीला आवडलेत लाडू पण अजून आणण्याआधी इथे विचारतेय.
सावली, गल्फमधे उन्हाळ्यातच
सावली,
गल्फमधे उन्हाळ्यातच खजूर पिकतो आणि तिथे तरी तो उन्हाळ्यात खाल्ला जातो. त्यामूळे थोड्या प्रमाणात खाऊन काही त्रास झाला नाही, तर आणखी खाल्ला तरी चालेले असे माझे मत. फक्त तो स्वच्छ आहे ना ते बघून घ्यावे.
दाणे मात्र पित्त प्रकृती बघूनच द्यावेत.
शक्य असल्यास, स्वास्थ्यवृत्त ( ले. शरदिनी डहाणूकर ) हे पुस्तक मिळाले तर पहा. त्यात सोप्या भाषेत, काय खावे काय टाळावे, ते लिहिलेले आहे.
सावली दिवसाकाठी १-२ लाडू
सावली दिवसाकाठी १-२ लाडू खाल्ले तर काहीही होणार नाही, डोन्ट वरी.
ओके दिनेशदा, दक्षिणा.
ओके दिनेशदा, दक्षिणा.
थँक्यु.
आता अजुन आणेन ( किंवा वेळ मिळाल्यास करुन बघेन. )
आंबट मँगो पल्प आहे
आंबट मँगो पल्प आहे फ्रीजमध्ये. आइसक्रिम, कुल्फी, मलई बर्फी, मँगो शेक सोडून अजून कशात वापरुन संपवता येईल?
तिखट टीकाऊ चटणी, खाटी डाळ ..
तिखट टीकाऊ चटणी, खाटी डाळ ..
अल्पना, मँगो शिरा, मँगो केक,
अल्पना, मँगो शिरा, मँगो केक, नाहीतर सरळ साखर घालून आटवून ठेव.
अल्पना, गव्हाचे पीठ धिरडी
अल्पना, गव्हाचे पीठ धिरडी कन्सिस्टन्सीला भिजवून त्यात गूळ, वेलची, दालचिनी वगैरे घालून गोड धिरडी करते मी. त्यात आमरस ढकलला तर जी चव येते तीही अप्रतिम असते.
वेलची आणि दालचिनी दोन्ही एकदम
वेलची आणि दालचिनी दोन्ही एकदम घालायची नीधप?
आंबट मँगो पल्पचा
आंबट मँगो पल्पचा गुळाम/गुळाम्बा (गूळ+मिरची पूड+ चवीसाठीचे मसाले/मेतकूट घालून शिजवून) करता येईल. हा कैरी भाजून गर काढून/कैरीच्या फोडींचा केला जातो.
नाही नाही. हे किंवा ते.
नाही नाही. हे किंवा ते.
मागे आप्पेपात्राबद्दल झालेली
मागे आप्पेपात्राबद्दल झालेली चर्चा,सध्या आलेलय आप्प्यान्च्या बर्याच रेसिपीज आणि थोडा माझा आळशीपणा ... या सर्वांचा एकत्रित परिणाम :
फायदे : १.येता जाता तोंडात टाकता येतात .
२. प्रवासात बाळगायला सोपे
३. खाताना क्रम्ब्स खाली पडत नाही .. त्यामुळे बायकोचे/आईचे/साबांचे जळजळीत कटाक्ष टळतात.
आंतर्जालावर एकदा 'unconventional recepeies' म्हनून सापडल होत.
बरेच दिवस मनात होत काल मुहुर्त लागला.
१५ जणांसाठी पावभाजी करायचीये.
१५ जणांसाठी पावभाजी करायचीये. पाव जेवायच्या वेळेआधी ४ तास भाजून ठेवून ऐनवेळी मावे मधून गरम केले तर चालतील का ?
सायोच्या पाभा च्या धाग्यावर
सायोच्या पाभा च्या धाग्यावर तुला युक्ती साप्डेल बघ.
http://www.maayboli.com/node/33502?page=1
मंजुडीची कमेंट वाच
लेकीच्या शाळेत इंटरनॅशनल डे
लेकीच्या शाळेत इंटरनॅशनल डे साठी महाराष्ट्रीयन फिंगर फुड/ किंवा छोट्या आकारात पटकन तोंडात टाकता येईल असे काहितरी बनवायचे आहे. २ मोठे ट्रे भरुन करावे लागेल. नट्स फ्री, आणि खूप तिखट पदार्थ नको आहे.
त्या दिवशी लेकीचा डान्स पण आहे तिला तयार करायच आहे त्यामुळे जास्ती घाट न घालता पटकन होणारं किंवा आधी करता येऊ शकेल अस काही हव आहे.
काय काय करता येऊ शकेल??
खारे शंकरपाळे
खारे शंकरपाळे
चकल्या, मठरी. साबुदाण्याच्या
चकल्या, मठरी. साबुदाण्याच्या पापड्या तळून नेता येतील.
थॅन्क्स वेका लिंक बद्दल...
थॅन्क्स वेका लिंक बद्दल... आणी मंजूडीला पण..
स्वस्ति, आप्पेकेक मस्तच
स्वस्ति, आप्पेकेक मस्तच दिसतोय !
आप्पे केकची रेसिपी द्या ना
आप्पे केकची रेसिपी द्या ना ...........
मुग्धा स्वस्तिने अंजलीच्या
मुग्धा स्वस्तिने अंजलीच्या सोप्प्या केकची कृती घेतलीय.
http://www.maayboli.com/node/36281.
स्वतिच्या हे मिश्रण वापरले मध्येच ती लिंक आहे.:स्मित:
घरात ४००ग्रॅम 'मिष्टी दोई'
घरात ४००ग्रॅम 'मिष्टी दोई' आहे (डॅनवन). या रविवारपर्यंत, मला एकट्याला, संपवायची आहे. काय करता येईल?
गुरुवार ते रविवार चार दिवस
गुरुवार ते रविवार चार दिवस आहेत. तेव्हा रोज १०० ग्रॅ. खाऊन संपवता येईल
घरात ४००ग्रॅम 'मिष्टी दोई'
घरात ४००ग्रॅम 'मिष्टी दोई' आहे (डॅनवन). या रविवारपर्यंत, मला एकट्याला, संपवायची आहे. काय करता येईल<<
लस्सी करुन प्या.
फळं घालुन स्मूदी करुन प्या.
रुमालात टांगुन पाणी काढुन टाका आणि मिष्टी दोई श्रीखंड करा.... ४००ग्रॅम चे २०० ग्रॅमच होइल
फ्रोझन योगर्ट करा.
शेजार्यांना देऊन टाका.
लाजो, मला पण जरा अजून पदार्थ
लाजो, मला पण जरा अजून पदार्थ सुचव ना...
वरील शाबुदाण्याच्या पापड्या, आणि खारे शंकरपाळे चांगले वाटत आहेत.
Pages