मिक्स भाजी पराठा

Submitted by मनःस्विनी on 21 September, 2007 - 16:11

मिक्स भाजी पराठा,

हा एक पौष्टीक पदार्थ आहे. तसा वेळखाऊ असला तरी आधी तयारी असतेच कापून ठेवलेल्या भाज्यांची तेव्हा माझ्या मते पटकन होईल असा.

वेळः जसे म्हटले की आधी भाज्या तयार असतील नक्कीच अर्धा तास लागेल.
२ वाटी जाड कणीक(हो, जाड चांगली लागते. मी घरून जाड दळून आणली. जाड कणकीची चपाती ही चवीला नक्की वेगळी लागते, करून पहा. तेव्हा इथे जाडच कणीक वापरा(स्टोन ग्रांईड पिठ घ्या),
अर्धा वाटी बेसन,
मूठभर बाजरी पिठ,
मूठभर ज्वारी पिठ,
पराठा मसाला(हा आधी तयार करून ठेवा, धणा पुड,जीरा पुड, आमचूर पुड, किंचीत ओवा पुड(भाजुन), अनारदाणा पुड(आधी हलका भाजून बारीक वाटा),

१ छोटी वाटी बारीक किसलेले गाजर,
१ छोटी वाटी वाफ़वलेले कोरडे केलेले वाटाणे(mashed),
१ छोटी वाटी किसलेला कोबी,
लहान उकडलेले बटाटे(२),
भिजवून लाल मिरच्यांची paste(चवीला तिखट हवे त्याप्रमाणे घ्या लाल मिरच्या),
१ बारीक चिरलेला कांदा,
बारीक कापलेली कोंथीबीर,
१ लहान वाटीभर वाफ़वलेला फ़्लोवर,
हळद,
मिठ,
किंचीत लाल तिखट,
किसलेले आले,

कृती: जरासे तेल टाकून कांदा,हिंग परतवून त्यात आले,गाजर,कोबी टाकून साधारण शिजवून घ्यायचे. हळद,मिठ,लाल तिखट,लाल मिरची,पराठा मसाला,बारीक चिरलेली कोथींबीर,बटाटा सगळे टाकून एकत्र गोळा करून ठेवयचे.

पिठ: अडीच वाटी पाणी उकळवून त्यात मिठ,तेल किंवा चमचाभर तूप टाकून जरासे कोमट असताना त्यात वरील पिठं टाकून मळून घ्यायचे( कोमट पाणी चांगले कारण ज्वारी, बाजरी पण आहे ना). पिठ घट्टच असावे. तेलाचा हात लावून ५ मिनीटे झाकून ठेवून चटणीची तयारी करावी.
एकतर उंडा करून हे मिश्रण भरा नाहीतर दोन पातळ पोळ्या करून लाटा ने त्यात भरून पसरवा.
आधी non-stick तव्यावर दोन्ही बाजू परतून मग दोन्ही बाजुला olive oil लावून तो पराठा 315c वर आलटून पालटून भाजुन घ्या oven मधून. oven मध्ये भाजल्याने वेगळी खरपूस चव येते. पाहीजे तर तूप लावून किंवा बटर लावून भाजा.

पुदीना चटणी: १ जुडी पुदीना(निवडून साफ केलेली), १जुडी कोथींबीर,३-४ हिरवी मिरची वाटून घ्या बारीक; पाणी कमी टाकून, त्यात लिंबू नी मिठ घालायचे.

दही: दही आदल्या दिवशी कपड्यात बांधून श्रीखंडाला करतो तसे करून घ्यायचे. घोटायचे, त्यात चाट मसाला,पातीचा कांदा टाकून ठेवावे.

ताटात पराठा, चटणी आणि दही असे वाढावे.
एकदम पुर्ण आहार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं आहे ही पण रेसिपी.
आणि दह्याची आयडीया पण आवडली.