'कोकणमय'
'कोकणमय' (१) — वालावल, नेरूरपार आणि धामापूर
'कोकणमय' (२) — "निवती"
'कोकणमय' (३) — "निवती समुद्रात फेरफटका"
'कोकणमय' (४) — श्री वेतोबा (आरवली), रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा
'कोकणमय' (५) — मालवणची शान "किल्ले सिंधुदुर्ग"
'कोकणमय' (६) — "तारकर्ली-देवबाग"
'कोकणमय' (७) — जयगणेश मंदिर, श्री रामेश्वर (कांदळगाव), श्रीभराडीदेवी (आंगणेवाडी), जलमंदिर (बिळवस)
'कोकणमय' (८) — कुणकेश्वर, वाडातर, श्रीरामेश्वर (गिर्ये)
=======================================================================
=======================================================================
बारा गावच्या, बारा राठीच्या, बारा वायवाटीच्या, बारा देशातल्या मायबोलीकरा.. म्हाराजा
सांगना करुक कारन.. म्हाराजा
तुझ्या कृपाशीर्वादाने "कोकणमय" मालिकेचो ह्यो शेवटचो भाग सादर करतय.. ही सेवा चरणी रुजू करुन घे
म्हाराजा...
देवा रवळनाथा... तुझ्या कृपेने संपूर्ण मालिकेक भरभरून प्रतिसाद गावले... ही कृपा अशीच ठेव म्हाराजा...
ज्येंनी ज्येंनी ही मालिका बगली.. आवर्जून प्रतिसाद दिले त्यांचे मनापासून आभार. ज्येंनी बगली पण प्रतिसाद देवची बुद्धी नाय झाली त्येंचेव आभार
... प्रतिसाद दिलेल्यांचा भला मागतंय, न दिलेल्यांका प्रतिसाद देवची बुध्दी.. व्हय म्हाराजा. 
सगळ्या मायबोलीकर गोतावळ्याक सुखी ठेव.. वाकड्याक सरळ कर आणि तिड्याक सिध्धो कर.. भांडनान फक्त भांडान वाडता, एकत्र इल्यात तर एकी व्हता ह्यां पटवून दी... म्हाराजा
मायबोलीची अशीच कायम भरभराट जावंदेत... म्हाराजा
एकूण सगळ्यांचा भला भला जावंदेत... म्हाराजा
आशा करतय कि दहा भागांची हि 'कोकणमय' सफर सगळ्यांका आवडली आसात.. म्हाराजा
माझ्या प्रचिंवर सगळ्यांचोच असोच लोभ कायम रवांदेत.... म्हाराजा..
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अजून नवीन उत्साहाने कोकण भ्रमंती करुक.. अशीच ताकद आणि बुद्धी दी ह्या तुका अखेरचा सांगणा... व्हय म्हाराजा..... 
=======================================================================
=======================================================================
किल्ले विजयदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील वाघोटण खाडीच्या दक्षिणेस समुद्रात शिरलेल्या एका मोठ्या खडकावर विजयदुर्ग किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्यास घेरीया असंही नाव आहे. या किल्ल्यास २००६ साली ८०० वर्षे पूर्ण झाली. अतिशय प्राचीन असा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमारातील मानाचं पान आहे. शिलाहार राजा भोज याने महाराष्ट्रात बांधलेल्या सोळा किल्ल्यांपैकी एक विजयदुर्ग हा एक. पाण्यात पसरलेला, ऐतिहासिक, वैभवशाली, सामर्थ्यवान, मराठवाडयांच्या आरमारी सामर्थ्याचा तेजबिंदू, आंग्रे घराण्याचे बलस्थान आणि शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाची साक्ष देणारा तरीपण फितुरीला बळी पडलेला विजयदुर्ग किल्ला सिंधुदूर्ग जिल्हयाच्या उत्तरेला टोकाला आहे. सुमारे ४० किमी. लांबीच्या वाघोटण खाडीच्या आणि अरबी समुद्राच्या संगमावरच हा किल्ला उभा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स.1653 मध्ये आदिलशाहीतून स्वराज्याच्या काळात कब्जात घेतला आणि त्यामध्ये अनेक सुधारणा केल्या. स्वराज्याचा भगवा ध्वज तेथे फडकविला. त्यावेळी विजय संवत्सर चालू होते. त्यावरूनच या किल्ल्याचे नांव विजयदुर्ग ठेवले. सुमारे 700 वर्षांहून अधिक काळ स्वबळावर अंत्यंत प्रभावी आरमारी केंद्र म्हणून उभ्या असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांच्यासारखे शूर व तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.जयदुर्ग गावात पायउतार झाल्यावर समोरच आपणास ऐसपैस असा विजयदुर्ग किल्ला दिसतो.गडावर प्रवेश केल्यावर मारुतीचे मंदीर लागते,हे मंदीर शिवाजी महाराजांनी गड जिंकल्यावर बांधून घेतले.या मंदीरासमोरून पुढे गेल्यावर जिबीचा दरवाजा लागतो,या दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हातासच ३० फूट उंचीची तटबंदी दिसते,इथून पुढे गेल्याणंतर गडाचे मुख्य प्रवेशद्वार लागते,भव्य अशा प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत.दरवाजातून आत गेल्यावर पोलिस चौकी आहे,तिथे दुतर्फा तोफेचे गोळे व्यवस्थित मांडून ठेवले आहेत,इथे डाव्या बाजूस खलबत्खाना आहे.तिथून पायर्यांच्या वाटेने आपण ध्वजस्तंभाजवळ येवून पोहोचतो.हा ध्वजस्तंभाचा बुरूज पाहून आल्या वाटेने खाली उतरून समोरची सदर व दारूकोठार पहायचे.या कोठारा शेजारच्या भुयारातून 'खूबलढा तोफा बारा ' या बुरुजावर यायचं या भुयाराच्या बाजूने ततावर जाण्यासाठी पायर्या असून या पायर्यांच्या मार्गाने तटावर चढायचे,इथून तटावर फेरफटका मारण्यास सुरवात करावी.
विजयदुर्गास २० बुरुज असून प्रत्येक बुरुजावर नावाचा सिमेंटचा बोर्ड लावलेला आहे,पुढे तटावरच उभे असलेले लाईट हाऊस लागते,त्याचे पुढेच तटाच्या खाली चुण्याची घाणी दिसते,या चुण्याच्या घाणीच्या बाजूलच गोड्या पाण्याची विहीर असून तिच्या पासून फक्त २० फूटांवर समुद्र आहे.विजयदुर्गास तिहेरी तटबंदी असून गडाच्या पश्चिम तटाबाहेर मोठे दगड टाकून लाटांच्या मारापासून तटबंदीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे.गडाचा तट सुस्थितीत असून त्यावर चढण्यास जागोजागी पायर्या असल्यामूळे संपूर्ण गडास व्यवस्थीत तटफेरी मारता येते.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
चुना मळण्याचे जाते
प्रचि १७
हे आमचे इंद्रवज्र 

प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
सुकलेली विहिर
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
=======================================================================
=======================================================================
कोकणचा कॅलिफोर्निया कधी होईल ते माहित नाही पण कॅलिफोर्नियाच्या तोडीचे सौंदर्य कोकणात आहे हे मात्र मान्य. या चार दिवसात मनसोक्त कोकण भटकलो आणि खर्या अर्थाने कोकण अनुभवला. कोकणातील काही ठिकाणं तर अक्षरशः वेड लावणारी आहेत. या निसर्गाच्या नशेतच खरी धुंदी आहे त्याला कुठल्याही कृत्रिम नशेची गरज नाही. कोकणच हे सौंदर्य असंच अबाधित राहो आणि त्याचा काही अति हौशी पर्यटकांमुळे बदनाम झालेला "गोवा" न होवो हिच देवाचरणी प्रार्थना.
प्रचि २९
पुन्हा एकदा कोकणात परत येण्याचे आश्वासन देत आम्ही चार दिवसाची कोकण भ्रमंती संपवून मुंबईकडे निघालो.
(तटि: विजयदुर्ग माहिती कोकण पर्यटन पुस्तकातुन साभार. गार्हाण लिहिण्यास मदत केल्याबद्दल मायबोलीकर "नीलुचे" खास आभार. :-))
(समाप्त)
अप्रतिम ! जिप्सी, ४ दिवसाची
अप्रतिम ! जिप्सी, ४ दिवसाची कोकण भ्रमंती केलीत त्याचा प्लान जर टाकलात तर कोणा माबोकरांना बर पडेल. तुम्ही कोणा ट्राव्हल वाल्याकडुन गाडी वैगेरे बुक केलीत का स्वतःहुन सगळ केलत? माझा गावी जायचा प्लान अहे कुडाळ, सावंतवाडीला, जर माबोवरुन काही माहीती मिळाली तर ३-४ दिवस वाढवुन तुमच्यासार्खी कोकण भ्रमंतीच करीन असा विचार आहे. बघा जमल तर माहीती टाका ईकडे - धन्यवाद.
जिप्सि, खुपच सुंदर झाली आहे
जिप्सि, खुपच सुंदर झाली आहे रे ही मालिका.
इंद्रवज्र तर खासच.
असाच फिरत रहा आणि आम्हाला अशिच घर बसल्या मेजवानी देत जा.
मस्त प्रचि नि वर्णन!! शेवट्चा
मस्त प्रचि नि वर्णन!! शेवट्चा फोटो तर एकदम तोपासु
सध्या कॅलिफोर्नियातच आहे पण असं फक्त कोकण असु शकतं..काहीSS गरज नाहिये त्याला बदलायची
प्रची ९, खुप आवडला.
प्रची ९, खुप आवडला.
सुंदर सैर झाली. मी बहुतेक
सुंदर सैर झाली.
मी बहुतेक ठिकाणे इथेच वघितली..
मस्त कोकण फिरवून आणलेस!
मस्त कोकण फिरवून आणलेस!
म्हाराजा सगळेच प्रचि सुंदर
म्हाराजा
सगळेच प्रचि सुंदर आहे पण प्रचि १० प्रचंड आवडला.. प्रचि १७ मधे उजवीकडुन तिसरा तुच ना?
मस्त कोकण फिरवून आणलेस!
मस्त कोकण फिरवून आणलेस! <<<<<<+१
जिप्सी, गार्हाणे, तोफगोळे,
जिप्सी,
गार्हाणे, तोफगोळे, तटाचा जिना, इंद्रवज्र आणि शेवटल्या प्रचि-२९ मधले आमंत्रण
सान्निध्य सागराचे आकाश पांघराया ।
या रम्य भूप्रदेशी मित्रांसवे पुन्हा या ॥
हे सगळे जुळवून आणायला “योजकः तत्र दुर्लभः” हेच खरे!
अशा दुर्लभ कॅटॅगरीतला मित्र आम्हाला मिळाला हेच तर “मायबोली” चे देणे आहे.
धन्य दुर्लभ मित्र, धन्य मायबोली आणि धन्य तो कोकणमय प्रवास!
आणि ह्या सार्यांचे चक्षुर्वैसत्यं साक्षीदार झालेले आम्ही सर्व मायबोलीकरही धन्यच!!
अशाच जिवंत प्रवासांची, अशीच बहारीची प्रवासवर्णने मायबोलीचरणी सतत सादर होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
तळटीपः
येवा कोकण आपलाच असां!
च्या वरील आमंत्रणाच्या रचयित्या साबांखा च्या अभियंत्यास मानाचा मुजरा.
अप्रतिम ! धन्यवाद,
अप्रतिम ! धन्यवाद, जिप्सीजी.
पूर्वी 'कोकण लाईन'च्या बोटी विजयदुर्ग बंदरात या किल्ल्याच्या आडोशालाच उभ्या रहात. रात्रीच बहुतेक वेळां हे बंदर येई व किल्ल्याचे भव्य तट अगदीं जवळ असल्यासारखे भासत. बोट सर्व्हीस बंद झाली व मुंबई- गोवा महामार्गापासून विजयदुर्ग ७०-७५ किमी. [तळेरे वरून] पडतं, त्यामुळें अज्ञातवासच आला या सुबक, ऐतिहासिक वास्तुच्या नशीबात ! [ तिथले कांही स्थानिक या किल्ल्याला त्याचं मानाचं स्थान मिळावं म्हणून बरीच वर्षं प्रयत्नशील आहेत; 'परुळेकर' कुटूंब त्यापैकीं एक. मला आठवतं, बहुतेक रविंद्र पिंगेंचं घरही विजयदुर्गनजीकचं व त्यांचंही एक छान, छोटं पुस्तक आहे त्या परिसरावर.]
जिप्सी, केवळ अप्रतिम! मनाला
जिप्सी, केवळ अप्रतिम! मनाला हुरहुर लावणारा शेवट !!
मस्त वर्णन आणि सर्वच
मस्त वर्णन आणि सर्वच प्रकाशचित्रे छान!
प्रकाशचित्र २६ मध्ये दिसणार्या तटाच्या मागे समुद्रात पाण्याखाली विजयदुर्गाची वैशिष्ट असलेली जवळ-जवळ एक किलोमीटर लांबीची तटबंदी दडली आहे.
जबरदस्त फोटो, मस्त भटकंती
जबरदस्त फोटो, मस्त भटकंती केलीयेस.
विजयदुर्ग पुन्हा पुन्हा पहाण्यासारखाच.
हेलीयम वायुचा शोध विजयदुर्ग वरच लागला
<< हेलीयम वायुचा शोध
<< हेलीयम वायुचा शोध विजयदुर्ग वरच लागला >> खरंय ? हें प्रथमच ऐकतोय. विकेपिडीयातही उल्लेख नाही याचा !!
भाऊ मला ही माहिती कोकण ऑनलाईन
भाऊ मला ही माहिती कोकण ऑनलाईन च्या साईटवर मिळाली
Discovery of helium::
On 18-08-1868, a solar eclipse day a French scientist Johnson took the spectrometer readings from this fort. The stone benches he used for taking the readings are known as “saheb’s kattas” in local language. These spectrometer readings helped in detecting the presence of “Helium”, one of the basic elements on Sun
http://www.konkanonline.com/sindhudurg/vijaydurg-fort.html
जिप्सी केवळ अप्रतिम !!
जिप्सी
केवळ अप्रतिम !!
अगदी घरी बसलेल्यांना सुद्दा कोकण फिरवून आणलस तू !!
हेलीयम वायु सूर्यावर आहे हा
हेलीयम वायु सूर्यावर आहे हा शोध विजयदुर्गवरच लागला. साहेबाचा कट्टा अशी जागा आहे किल्ल्यावर.
ही आणि ही ह्या दोन लिंकवर माहिती आहे
प्रचि २७ एकदम
प्रचि २७ एकदम झकास!!
गार्हाणो पण भारी आसा. पक्को कोकणी शोभतयस.
कोकणी मेव्याचे कोलाज पण छान!!
सुंदर नेहमीप्रमाणेच.
सुंदर नेहमीप्रमाणेच.
केवळ अप्रतिम, निशब्द .
केवळ अप्रतिम, निशब्द .
सुंदर
सुंदर मालिका..आवडली..:)
आमंत्रणाच्या रचयित्या साबांखा च्या अभियंत्यास मानाचा मुजरा.>> सिंधुदुर्गात ठिकठिकाणि असेच काव्यात्मक बोर्ड PWD ने लावले आहेत. इतकेच कशाला विजयदुर्ग ते देवगड प्रवासात वाहने काळजीपुर्वक चालविण्याबाबत असलेले बोर्ड देखिल वेगळ्याच शब्दात आहेत. उदा. ऑस्कर मिळवीण्यासाठी श्वास हा हवाच..:)
अशा दुर्लभ कॅटॅगरीतला मित्र
अशा दुर्लभ कॅटॅगरीतला मित्र आम्हाला मिळाला हेच तर “मायबोली” चे देणे आहे >>> +१
तिहेरी तटबंदी सुंदर आहे.
संपुर्ण कोकण मालिका अप्रतिम आहे.
ऑस्कर मिळवीण्यासाठी श्वास हा हवाच.. >>> लय भारी
अशा दुर्लभ कॅटॅगरीतला मित्र
अशा दुर्लभ कॅटॅगरीतला मित्र आम्हाला मिळाला हेच तर “मायबोली” चे देणे आहे >>> +१ अगदी
प्रचि १७ मस्तच.
जिप्सि >>>कोकणच हे सौंदर्य
जिप्सि >>>कोकणच हे सौंदर्य असंच अबाधित राहो आणि त्याचा काही अति हौशी पर्यटकांमुळे बदनाम झालेला "गोवा" न होवो हिच देवाचरणी प्रार्थना.<<< अनुमोदन!
सुंदर मालिकेतून माबओकरांना घडवलेली सुंदर सफर!
जिप्सी, मस्त वर्णन आणि फोटो.
जिप्सी, मस्त वर्णन आणि फोटो. गार्हाणं खूप वर्षानी ऐकलं. (खर तर वाचलं. पण मंदिरात गार्हाणं घालण चालू आहे, आणि ऐकणारे 'व्हय म्हाराजा' म्हणतायत असंच वाटल. )
नेहमीसारखेच सुंदर फोटो!
नेहमीसारखेच सुंदर फोटो! गार्हाणं ही छान जमलय!
म्हाराज्या, मस्तच झाली ही
म्हाराज्या, मस्तच झाली ही सेरीज !
स.सा व देउदत्त, हेलियमच्या
स.सा व देउदत्त, हेलियमच्या शोधाबद्दलच्या या माहितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
१८६८च्या सूर्यग्रहणाचा व जान्सन चा उल्लेख आहे विकेपिडीयात पण विजयदुर्गचा नाही .[ इथंही विजयदुर्गवर अन्यायच !]...."during a solar eclipse in 1868 by French astronomer Jules Janssen. Janssen is jointly credited with detecting the element along with Norman ...".
वास्तविक, तो ' साहेबाचा कट्टा' हेही एक आकर्षण व्हायला हरकत नसावी विजयदुर्गचं. दुर्दैवानं, ५-६ वेळ विजयदुर्गला भेट देऊनही मला मात्र तिथं कुणीही ही माहिती दिली नव्हती !
झकास मित्रा... सही सफर झाली
झकास मित्रा...
सही सफर झाली ही...
धन्स...
मित्रा फारच छान सफर झालि हि.
मित्रा फारच छान सफर झालि हि. तू अशाच नवनवीन मोहिमा काढत रहा.
Pages