उसवण

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मी विणलेल्या नात्यांची वीण,
उसवत जाताना..
उसवत जातं.., माझ्या आतही काही..
तुटलेले काही धागे.. आणि जीर्ण काही..
भकासपणे त्यांच्याकडे पाहताना,
मी म्हणाले "आता थांबवायलाच हवंय वीणकाम,
आणि नको आटापिटा, ठीगळ लावण्याचाही.."

(माझ्या आठवणीप्रमाणे ही माझी पहिली कविता. खुपदा मला असं वाटतं की गुलजार यांचं 'मुझको भी तरकीब सिखादे यार बुनारे' हे माझ्या डोक्यात कुठे तरी असावं त्याची परीणती कदाचित या ओळीत झाली पुढे कधीतरी.)

प्रकार: 

आता थांबवायलाच हवंय वीणकाम,
आणि नको आटापिटा, ठीगळ लावण्याचाही..">>>>क्या बात है!
पुन्हा वाचतानाही तेवढीच आवडली

श्यामले धन्यवाद!

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy