कंबोडियातील चिमुरडी मुलेचं माझ्यासाठी एक सुवेनियर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मी जेंव्हा कंबोडियाला गेलो तेंव्हा पाहिले अनेक छोटी छोटी मुले आमची सुवेनियर विकत घ्या ना म्हणून सारखी पर्यटकांच्या मागेच असतात. ह्या मुलांना शाळेत न जाता बर्‍यापैकी छान ईंग्रजी येत. पण ही मुले शाळेत जात नाही. कारण दयनीय गरिबी. आपल्या वस्तू विकण्यासाठी ही मुले नाना तर्‍हेचे हावभाव करतात. मला ही मुलेच एक सुवेनिअर वाटलीत. म्हणून मी त्यांची छायाचित्रे घेतलीत. ती परत परत बघताना त्यांचीशी माझा झालेला संवाद आठवतो आणि एक चांगली आठवण म्हणून मी कंबोडियाचे आभार मानतो.

१) कंबोडिया म्हणजे कमळबन! जिथे बघावं तिथे डबक्यात कमळे दिसतील. ही फिकट जांभळी कमळे मला इतकी आवडलीत आणि खास करुन माझ्या नकळत चिखलात फ्रॉकचा ओचा वर करुन उभ्या असलेल्या ह्या मुली.
247510_1956614405668_1551964083_2069356_198146_n.jpg

२) नंतर ती कमळे ह्या मुलींनी मला दिली आणि सगळ्य कमळांच्या पाकळ्या पाकळ्या करुन माझ्या अंगावर आणि त्यांच्याही अंगावर उधळलीत.
228345_1956617205738_1551964083_2069368_615735_n.jpg

३)मधल्या मुलीच्या नाकावर राग बघा किती! मी वस्तू विकत घेणार की नाही म्हणून हे हावभाव.
228265_1956627806003_1551964083_2069390_8077235_n.jpg

४) हल्लीच्या मुलांसाठी फोटो घेणे म्हणजे दोन बोटे कॅमेरापुढे करणे होय. मी न सांगता ह्या मुलांनी दोन बोट पुढे केलीत.
247760_1956627445994_1551964083_2069389_2714594_n.jpg

५) ही कन्या मला म्हणते मिस्टर तुमच्या प्रेयसीसाठी हे ब्रेसलेट विकत घ्या तिला ते नक्की नक्की आवडेल.
229305_1956607125486_1551964083_2069327_3872549_n.jpg

६) मी मधे उभा आणि ह्यांनी मला चहुबाजूनी नुस्तं घेरल!
247640_1956625525946_1551964083_2069383_2139283_n.jpg

७) अहाहा! आजवर फक्त ताज्या भाज्या पाहिल्या. पण ताज्या बांबुची खेळणी पहिल्यांदाच पाहत आहे. ह्या मुलानी हिरव्यागार बांबूपासून हा एक कंदील तयार केला आहे.
231025_1956610525571_1551964083_2069342_3898512_n.jpg

८) १ अमेरिकन डॉलरला दहा कार्डं! एकाही कार्डावर ही मुले नाहीत. फक्त चंद्रोदय, सुर्यादय, मंदीरे ईत्यादी.
248105_1956612125611_1551964083_2069348_4121977_n.jpg

९) अगदी घोळका झाला आता...
248320_1956628246014_1551964083_2069391_7361121_n.jpg

१०) हा मुलगा सर्वाधिक स्वच्छ वाटला!
250440_1956607445494_1551964083_2069329_5187143_n.jpg

११) संध्याकाळी छोट्या मुलांचा नाच बघायला गेलो होतो. अतिव गरिबी! काय वर्णन करावे! शिवाय सगळी अनाथ बालके. मदत करणारे फक्त श्रीमंत देशातले काही स्वयंसेवक. असे वाटले नाहीतरी आपला हा जन्म फुकट जाणार त्यापेक्षा इथे ह्यांची सेवा करावी. ह्यांन शिकवाव. पण विचार आणि कृतीत मैलाच अंतर असतं.
249905_1956606205463_1551964083_2069322_6731444_n.jpg

१२) ही सगळ्यात शांत आणि प्रसन्न.
228625_1956625925956_1551964083_2069384_6584021_n.jpg

प्रकार: 

बी,

संत सोहिरोबा म्हणतात तसे: संत संगतीने उमज, चिद रूपासी पुरते समज
अनुभवाविण मान, हालवू नको रे

चिद रूपासी पुरते समजण्याचे तुम्हाला चांगले जमले आहे.

अनुभव तर अद्भूत आहेच पण कशाला मान हालवावी ह्याची उत्तम जाण तुम्हाला आहे!

सगळेच फोटो छान आले आहेत. आवडले.

प्रचि-४
कुठे कुतुहल, हासते कुठे मनीषा
कुठे सह-अनुभूती, खिन्न कुठे आशा

सगळे चिंगे आणि चिंग्या निरागस आहेत. त्यांच्या गरीबी आणि अशिक्षितपणावर वाईट वाटावे अशीच परिस्थिती रहाणार. Sad

फार वाईट वाटले.९० टक्के जगांत ही परिस्थिती आहे अन सर्व गरीब देशांतील मुलांच्या चेहेर्‍यावरील गरीबीने झाळोळलेली निरागसता अशीच दिसते.माझ्याकडे फोटो नाहीत पण हेच चित्र मी केपटाऊनच्या आसपासच्या खेड्यात पाहिले आहे.विषमता जोपर्यंत अशीच राहील तोवर हे फोटो व त्यातील मुलांचे भाव बदलणे कठीण आहे.पण तुमची संवेदनशीलता सुध्दा वाखाणण्याजोगी आहे.आमच्या नाशिकजवळ गोन्देश्वराच्या मंदिरातील मुले ही अशीच दिसतात्.त्यांचा फोटो इथे आहे.
http://www.maayboli.com/node/20475

९० टक्के जगांत ही परिस्थिती आहे अन सर्व गरीब देशांतील मुलांच्या चेहेर्‍यावरील गरीबीने झाळोळलेली निरागसता अशीच दिसते>>>

अनुमोदन

सुरेख फोटो आहेत.