*******************************************
कर्णिक काका बंटीबरोबार संगनमत केल्याबद्दल आधी माफी मागतो ......
काय करू बंटी ऐकेचना! गझल करायचा हट्ट धरून बसला हो!! ( बाल हट्ट म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव आला बघा!!).......वर यातले आबांना काही सांगू नकोस अशी शपथ घालत होता.... मी त्याला समजावले ...हे बघ बंटी ते तुझे आबा नंतर आधी माझे काका आहेत; शिवाय मी काही कोणत्या राजकीय पक्षातला पुतण्या नाहीय काकांशी फंद-फितुरी करायला ........ हे एकून तो जरा वरमला ; पण निदान गझल पूर्ण होऊन प्रकाशित करेपर्यंत तरी कुणाला काही सांगायचे नाही असे बजावले त्याने .....त्याच्यापुढे कुणाचे काही चालते का कधी?..............., म्हणून माफ कराच !!
**********************************************
तर माबो करानो ऐका हो ऐका बंटीचे आबा आता गझला करूलागालेत ही खबर वैभव काकानेच त्याला दिली ,बंटीने मग त्या गझला वाचल्या;
http://www.maayboli.com/node/31886
http://www.maayboli.com/node/31861
पण काय हे? त्यात बनुताई आणि बंटीबाबाचे साधे नाव ही नाही? .बंटी जाम रुसला आबांवर.... मीही गझल करणारच असा हट्ट धरून बसला.वैभव काकाची(वै.व.कु.) मदत मगितली त्यानं पण त्यालातरी(वै.व.कु) कुठे परफेक्ट जमतात गझला करायला
मग काय ; माबो होतीच. त्यांनी लॉगइन केलं,..... पाहतात तर होमपेजवर गझल तंत्र-आशय का काय ते होतं. वैभव्काका मुळातच जरा अर्धवट;त्याला काहीच समजेना त्यातलं ;पण बंटी कित्ती हुश्शार.... काकाचं तंत्र वाचून होईतो पठठ्यानं गझल हातावेगळी केलीसुद्द्धा !
तीच ही गझल : बंटीबाबाची गझल .... ऐका हो ऐका बंटीबाबाची गझल......
************************************************
प्रेम जडले गझलेवरी आबांचे
बनू-बंटीवर 'काव्य' असे ज्यांचे
काय त्यांच्या गझलेत की नसावे
बरे साधे नावही नातवांचे
बंटीबाबाला वाटते करावे
आज आपणही अनूकरण त्यांचे
त्यास काका तो वैवकु म्हणाला
शिष्य होवू चल बेफिकिर सरांचे
मला सांगाना बेफिकीर काका
कसे असते ते तंत्र गज्जलांचे
काय सांगा हो चालतील तिजला
बोल थोडेसे बोबडे मुलांचे
नवे आबांना सर्प्राईज देवू
नव्या वर्षी त्यांच्याच "लाडक्यांचे"
**************************************************
"लाडक्यांचे" हा खास शब्द वैभव काकाने बंटीला सुचवलाय यात म्हणे अर्थश्लेष कि काय तरी आहे असं म्हणाला तो; पण बंटीबाबाला अजून त्याचा अर्थ कळला नाही..........तुम्हाला कळाला तर सांगाल का ?
*************************************************
झकास!!!!!
झकास!!!!!
pradyumnasantu.... आभारी आहे
pradyumnasantu.... आभारी आहे .......... बराच वेळ कुणी प्रतिसाद देत नाही हे बघून चुकल्यासारख वाटलं पण आता बरं वाटतंय
वैभवकाका, काय्तरीचकाय? आबानाच
वैभवकाका,
काय्तरीचकाय? आबानाच अजून गज्ला नीट कराय्ला येत नाईत. मग मला कशा येतील? कदीतरी नंतर नक्की करीन. पण तुम्ही केलीए ती आवड्ली बरं का. थँक यू हं.
-बंटी
आबा ......आबा..... मझ्या
आबा ......आबा..... मझ्या वयाच्या एका लहान मुलाने केलेली पहिलीच गझल असेल ना ही.......माझं नाव गिनीस बुकात टाकायला हवं खरंतर नै!!