या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)
८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर
९. उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला
१०. उत्तर कर्नाटक (९) — याना हिल्स
===============================================
===============================================
उत्तर कर्नाटकच्या गेल्या भागात आपण पाहिला नैसर्गिक चमत्कार "याना हिल्स" आणि आता या भागात पाहणार आहोत मानवी चमत्कार सिरसी येथील सहस्त्रलिंग. कुमटा पासुन साधारण ६०-६५ किमी आणि याना हिल्सपासुन ४० किमी अंतरावर उत्तर कन्नडा येथील एक आकर्षक पर्यटनस्थळ सिरसी हे शहर आहे. थंड हवामानामुळे येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ सुरू असते. शहराच्या मध्यभागी १६व्या शतकातील दाक्षिणात्य शैलीतील श्री मारिकांबा देवीचे सुंदर मंदिर आहे. या देवीच्या दर्शनाला भक्तांची नेहमीच गर्दी असते. येथे एका उल्लेख आवर्जुन करावासा वाटतो, आम्ही मरीकांबा देवीच्या दर्शनाला गेलो असता तेथे कर्नाटक पोलिंसाच्या खुप गाड्या आल्या होत्या. चौकशी केल्यावर कळले कि कर्नाटक राज्याचे वनमंत्री सी. पी. योगेश्वर येथे दर्शनासाठी येणार आहेत. आम्हाला वाटले कि आता १-२ तास दर्शन बंद करणार, पण तसं काही झालं नाही, भाविकांना देवीच्या दर्शनासाठी ताटकळत ठेवले नाही. मंत्र्यांच्या बरोबरीनेच इतर भाविकांनाही देवीच्या सभामंडपात सोडण्यात आले. आम्हीही वनमंत्र्यांच्या बरोबरीनेच देवीचे दर्शन घेतले.
राजकीय नेते, सेलिब्रीटी यांच्यासाठी इतर भाविकांना ताटकळत न ठेवता त्यांच्यासोबतच दर्शन घेण्यास देत असलेल पाहुन छान वाटलं. 
सिरसी - येल्लापूर मार्गावर सिरसीपासुन साधारण १५किमी अंतरावर आणि मुख्य रस्त्यापासुन १ किमी आत शाल्मला नदितील शिळांवर एक हजार शिवलिंग कोरलेली आहे. हा एक मानवनिर्मित चमत्कारच. याची कथा अशी कि, पूर्वी कोण्या एका राजाला मुलबाळ नव्हते, म्हणुन त्याने शिवाची आराधना केली. त्याला स्वप्नात दृष्टांत झाला कि एक हजार शिवलिंग कोरून घे आणि त्याची पूजा कर. त्या राजाने शाल्मल नदीच्या पात्रात असे एक हजार शिवलिंग कोरून त्याची पूजा केली आणि त्यास पुत्रप्राप्ती झाली. नदीच्या खळाळत्या पात्रातील ते असंख्य शिवलिंग पाहुन आपणही त्या शिवलिंगाना कोरणार्या अनामिक कारागिरांपुढे नतमस्तक होतो.
येथुन थोडे पुढे आल्यावर शाल्मला नदीवर एक झुलता पूल दिसतो. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिमरीत्या या पुलाची निर्मिती केली आहे.
श्री मारिकांबा देवीचे प्रशस्त मंदिर (मुख्यद्वार)
सभागृह (देवीचे फोटो काढण्यास मनाई होती.
)

श्री मारिकांबा मंदिरासमोरच असलेले दाक्षिणात्य शैलीतील एक शिवमंदिर



सहस्त्रलिंग













झुलता पूल
शाल्मला नदी
(क्रमश: — पुढिल अंतिम भागात "सफर मुरुडेश्वराची"
)
सहाव्या प्रचिमध्ये त्या
सहाव्या प्रचिमध्ये त्या पिंडीवरची जास्वंदीच्या फुलांची आरास कसली मस्त आलीये
माधवला अनुमोदन...
माधवला अनुमोदन... जास्वंदाच्या फुलाची आरास, रेखिव मंदिरे आणि पाण्यातल्या कातळावरची प्रत्येक पिंडी आणि नंदी... स्वच्छ आणि नितळ पाणी...
डोळ्याचं पारणं फिटलं.
जिप्स्या जर मी कधी या ठिकाणी गेले, आणि ते ठिकाण तु काढलेल्या फोटोइतकं सुंदर नसलं तर, मी परत आल्यावर तुझी काही खैर नाही.
जिप्सि त्या प्रवाहातल्या
जिप्सि त्या प्रवाहातल्या पाण्याने दगडाची झिज होत नाहिये का? सगळ्या पिंडी, नंदी, मुर्ती व्यवस्थित दिसतायेत. मस्त
ॐ नमः शिवाय /\
ॐ नमः शिवाय /\
सुंदर, बरीच अनोखी ठिकाणे
सुंदर, बरीच अनोखी ठिकाणे बघितलीस.
खरंच भारी फोटो - सौंदर्य
खरंच भारी फोटो - सौंदर्य टिपण्यामागचा डोळा......
:डोमा:, दक्षिण्णाम्मा;)
" ला अनुमोदनम्.......
"माधवण्णा;)
सर्व वर्णनही सुंदर - मंत्रिमहाशयांबरोबर देवदर्शनाचा खरंच अलभ्य लाभ........
प्रत्येक शिवलिंगासमोर एक
प्रत्येक शिवलिंगासमोर एक नंदीही आहे. मस्त दिसतंय.
सही... सहस्रलिंग व पुलाचे
सही...
सहस्रलिंग व पुलाचे फोटोज् मस्त...
दक्षिणाला अनुमोदन....
सुंदर ठिकाणं अन सुंदर प्र.ची.
सुंदर ठिकाणं अन सुंदर प्र.ची. या बद्दल धन्यवाद मित्रा
वॉव्...सहीयेत हे पण!!! मलाही
वॉव्...सहीयेत हे पण!!!
मलाही तो प्रश्न पडला...इतक्या वाहत्या पाण्यात वर्षानुवर्षे राहुन झीज झाली नसेल का?एवढ्या सुंदर स्थितीत एकेक शिवलिंग आहे.!!
दक्षिण्णाम्मा!!
माधव व द्क्षीला अनुमोदन! जास्वंदीच्या फुलांची आरास मस्तच!
गर्दी कशी दिसत नाही पण या मंदीरांमधे?
फुलान्ची आरास फार छान. किती
फुलान्ची आरास फार छान. किती मन लावुन सजवली आहे!!! आणि स्वच्छता तरी किती!! सगळी मन्दीरे, पाणी, अजु बाजुचा परीसर सगळे अगदी स्वच्छ आहे.
अशा मन्दीरात गेल्यावर सकारत्मक उर्जा येणारच भक्ता च्या मनात. खुप छान
मस्त रे जिप्सि तुला लाखो धन्स
मस्त रे जिप्सि तुला लाखो धन्स
नागराज आणि सहस्त्रलिंग अप्रतिम.
अद्भुत आहे हे ठिकाण, खरच.
अद्भुत आहे हे ठिकाण, खरच. किती सुंदर ठिकाणे आहेत आपल्या भारतात. नदीपात्रात सहस्त्रलिंगदर्शनाचा अनुभव जबरी असेल. फार भारी.
जास्वंदीच्या फुलांची आरासपण सुरेख.
ही संपूर्ण मालिका संपल्यावर एक सामायिक धागा काढशील काय ज्यात या सर्वांच्या लिंक्स असतील?
सिरसीचे प्रचि पहिल्यांदाच
सिरसीचे प्रचि पहिल्यांदाच पाहिले !
नदीपात्रात सहस्त्रलिंग... फारच भारी आहे हे
आवडले प्रचि... शेवटच प्रचि तर
आवडले प्रचि... शेवटच प्रचि तर क्लासच
योगेश थँक्स! अरे काय अदभूत
योगेश थँक्स!
अरे काय अदभूत प्रकार आहे हा... वाहत्या पाण्यातली आखीव, कोरिव शिवलिंग आणि नंदी...
जागेवर बसून पहायला मिळाले तुझ्या प्रचिंमुळे.. टू गुड!
फारच सुंदर फोटो. कलाकुसर,
फारच सुंदर फोटो. कलाकुसर, निसर्ग , स्वच्छता अप्रतिम, तितकीच तुमची फोटोग्राफीसुद्धा.
मला खूप लोकांनी अनुमोदन
मला खूप लोकांनी अनुमोदन दिलंय.. पण नक्की कशासाठी ते कन्फर्म करा..
शेवटच्या ओळींसाठी असेल तर, ताबडतोब एक सहल ठरवू, आणि आल्यावर गटाने बदडू या जिप्स्याला.. कारण माझी खात्री आहे, हा कोणत्याही गोष्टींचे फोटो सुंदरच काढतो.. आणि मूळात ती गोष्ट तितकी सुंदर नसतेच..
खुप खुप आवडेश!!!! तुझ्या
खुप खुप आवडेश!!!! तुझ्या फोटोंबद्दल हा पामर काहि बोलु शकत नाहि....शब्द्च नाहियेत यार....
मला एकही फोटो दिसत नाही (
मला एकही फोटो दिसत नाही
( मोठ्याने भोकाड पसरलय )
(१९९३ मधे मी सिरसीला गेलो होतो)
प्रतिसादाबद्दल सगळ्या "अण्णा"
प्रतिसादाबद्दल सगळ्या "अण्णा" आणि "अम्मांचे" आभार्स
कारण माझी खात्री आहे, हा
कारण माझी खात्री आहे, हा कोणत्याही गोष्टींचे फोटो सुंदरच काढतो.. आणि मूळात ती गोष्ट तितकी सुंदर नसतेच..>>>>>>>>>>>>दक्षे माझे मात्र तुझ्या ह्या वाक्याला अनुमोदन!!!
जिप्सीला देवाने 'खास' नजर देऊन पाठवलेय; त्यामुळे त्याच्या कॅमेर्यातून कुठलीही गोष्ट सुंदरच दिसते!!
जास्वंदाच्या फुलांची आरास सु
जास्वंदाच्या फुलांची आरास सु रे ख! सगळेच फोटो आवडले!
जिप्सीला देवाने 'खास' नजर
जिप्सीला देवाने 'खास' नजर देऊन पाठवलेय; त्यामुळे त्याच्या कॅमेर्यातून कुठलीही गोष्ट सुंदरच दिसते!!
जिप्स्या - शेवटचा झूलता पूल तर भारतातला वाटतच नाही.
बाकी आता या सर्व ठिकाणी भेट देणे आता मस्ट झाले आहे.
जिप्सी परत परत फोटो बघत
जिप्सी परत परत फोटो बघत रहावेसे वाटतायत! सु रे ख !
दक्षिणा, जिप्सीने तुला घाबरून पुढचे फोटो टाकले नाहीत तर त्याचे अपुर्ण काम तुला पुर्ण करावे लागेल हा
अप्रतिम
अप्रतिम
मस्तच ...
मस्तच ...:)