उत्तर कर्नाटक (९) — याना हिल्स

Submitted by जिप्सी on 22 November, 2011 - 23:20

[या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)

६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक

७. उत्तर कर्नाटक (६) — कित्तुर (कित्तुर किल्ला आणि कमल नारायण मंदिर)

८. उत्तर कर्नाटक (७) — इडगुंजीचा गणपती आणि गोकर्ण महाबळेश्वर

९. उत्तर कर्नाटक (८) — मिरजान किल्ला
=======================================================================
=======================================================================
उत्तर कर्नाटक भटकंतीच्या "मिरजान किल्ला" या भागात सांगितल्याप्रमाणेच काहि ठिकाणे आपल्या पूर्वनियोजित प्लानिंगमध्ये नसतात पण त्या ठिकाणाला भेट दिल्यावर नकळतच "व्वाह" असे उद्गार निघतात. मिरजान किल्ल्याप्रमाणेच अजुन एक ठिकाण म्हणजे "याना हिल्स". कारवार-मुरूडेश्वर हायवेवर कुमटा या गावापासुन एक रस्ता सिरसीला जातो (सिरसीपासुन याना हिल्स ४०किमी अंतरावर आहे). तेथुनच जवळ गर्द वनराईत लपलेले हे ठिकाण आहे. मुख्य रस्त्यापासुन सोळा किमी आत (वळणावळणाचा रस्ता असल्याने सोळा किमीहि जास्त वाटतात :-)) याना हिल्सचा पायथा आहे. पायथ्याला गाडी उभी करून अंदाजे दोन अडीच किमीची चढण चढुन आल्यावर सर्वात उंच भैरवेश्वरा शिखर (उंची १२० मी.) आणि मोहिनी शिखर (उंची ९० मी.) असे निसर्गाचे दोन चमत्कार दिसतात. या दोन अडीच किमीची प्रवासात आपल्याला साथ देतात ते उंचच उंच दाट झाडी, सोबत वाहणार्‍या नदीचे खळाळते पाणी, आपल्या अवतीभोवती बिनधास्तपणे बागडणारी फुलपाखरे (आम्हाला येथे ब्लु मॉर्मनने अगदी मनभरून दर्शन दिले, त्याच्या चंचलपणामुळे कॅमेर्‍यात बंदिस्त करता आले नाही पण आठवणीत मात्र कायमचे बंदिस्त केले. :-).), विविध पक्षी आणि निरव शांतता. याना हिल्सच्या जंगलात विविध प्रकारची मसाल्याची झाडे आहे, माझ्या अज्ञानामुळे मला फक्त तेजपत्त्याचे झाड ओळखु आले. Sad तासादिडतासाची हि चढण पार करण्यासाठी काहि ठिकाणी व्यवस्थित पायर्‍या आणि रेलिंग लावले आहेत. विशेष उल्लेख करावासा वाटतो कि मला या ठिकाणी गुटख्याची पाकिटे, दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा/पेपर प्लेटचा कचरा, पान/गुटखा खाऊन मारलेल्या पिचकार्‍या असं काहीही दिसलं नाही. Happy
हाताशी वेळ कमी असतानाहीआवर्जुन जाऊन आलो नाहीतर या जागेला भेट दिली नसती तर काहितरी खुप सुंदर पाहण्याचे राहुन गेल्याची रुखरुख राहिली असती. उंचच उंच शिखरे आणि त्यांच्या पोटातली गुहा यामुळे उत्तर कर्नाटक भटकंतीत आवर्जुन पहावी अशी हि जागा आहे.

प्रचि ०१
गर्द सभोती रान

प्रचि ०२
आकाशाशी स्पर्धा करणारी वृक्षसंपदा

प्रचि ०३
तेजपत्ता

प्रचि ०४
गुळवेल

प्रचि ०५
पायर्‍या

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८
रॉक हिल्स

प्रचि ०९

प्रचि १०
मोहीनी शिखर

प्रचि ११
भैरवेश्वरा शिखर

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८
भैरवेश्वर शिखराच्या पोटातील गुहा

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

याना हिल्सबद्दल असलेल्या माहितीचा कानडी भाषेतला फलक (भाषांतर केल्यास मलाही कळवावे :फिदी:)
(क्रमशः) Happy

गुलमोहर: 

जिप्स्या, एक आगळीच सफर घडवलीस. Happy
मोठे मोठे कातळही इतके सुंदर आणि मनमोहक असू शकतात यावर आज दुसर्‍यांदा विश्वास बसला. खूप लहान असताना मंत्रालय ला गेले होते, तिथे मोठे मोठे दगड पाहून आवाक झाले होते. आज पुन्हा झाले. Happy

जिप्सी - तू कुठे कुठे जाशील, काय काय शोधशील आणि तेथील फोटो / वर्णनातून घरबसल्या आम्हाला किती वेगवेगळे नयनमनोहर अनुभव देशील याचे शब्दात वर्णनच करता येत नाही.... आभार, धन्यवाद हे शब्दही तोकडे वाटू लागले मला...
तेथील खडकांवर त्या उभ्या रेषा दिसतात हे कशामुळे ? फार वैशिष्ट्यपूर्ण वाटतात हे खडक - दक्षिणाला अनुमोदन...

दक्षिणा, शशांक, रीमा, झकास धन्यवाद Happy

पण तो तेजपत्ता नाही. माझ्या मते ती गुळवेल आहे.>>>>>धन्स रीमा, तेजपत्त्याच्या प्रचि अपडेट केला. Happy

झकासच, या 'याना' बद्दल नुकतेच वाचले होते. सही सफर सुरु आहे आमची. कर्नाटक पर्यटन मंडळाकडून 'आभारपर मानधन' आल्यास नवल नाही. Happy

सुंदर.. खरंच अनोखे ठिकाण. मुद्दाम जावेसे असे.
अशी मोहिनी शिखरे आफ्रिकेत आहेत आणि तिथे माकडांची वस्ती असते.
आणि ती घळ थेट १२७ अवर्स वाली वाटतेय.

जबरदस्तच रे , मला तर ही अलिबाबा ची गुहा वाट्ते आहे.
जिप्स्या-तिथे परत गेलास तर जरा तिळा तिळा दार उघड हा मंत्र बोलुन बघ. Wink हा.का.ना.का.

गुळवेल म्हणजे काय ? ही वेल तर काळेमिरी सारखी आहे.

सुंदर फोटो !

गुळवेल म्हणजे काय ? ही वेल तर काळेमिरी सारखी आहे.>>>

खेड्यांमध्ये गुळवेलीचा काढा औषधी समजला जातो सर्दी पडश्यावर अक्सीर ईलाज म्हणून.

कर्नाटक पर्यटन मंडळाकडून 'आभारपर मानधन' आल्यास नवल नाही>>>>सागर Proud

आणि ती घळ थेट १२७ अवर्स वाली वाटतेय.>>>>>>अगदी अगदी. मला या घळीत जाताना मायबोलीकरांनी केलेली सांदण दरीची भटकंती आठवलेली. Happy

ह्या जागेला भेट द्यायचे फार दिवसांपासुन मनात आहे...>>>>नक्की जाऊन ये. तुझ्या नजरेतुन याना हिल्स पुन्हा एकदा बघायला आवडेल. Happy बंगळुरूपासुन ~४०० किमीवर आहे हि ठिकाण.

तिथे परत गेलास तर जरा तिळा तिळा दार उघड हा मंत्र बोलुन बघ.>>>>>:फिदी:

धन्स गीता अधिक माहितीसाठी Happy

जिप्सी, दक्षिणा आणि शशांक पुरंदरेंना १००% अनुमोदन .:)

खुपच मस्त प्र.चि. आहेत.. आणि वर्णन पण... मुद्दाम जायला पाहिजे असे वाटले. Happy

जिप्सी, फोटोग्राफीत तुझी मास्टरी आहेच पण तुझ्यातला लेखक पण प्रगट व्ह्यायला लागलाय हं!! मस्त.. फोटोंचं समर्पक शब्दांत वर्णन करणे हे सुद्धा तू लीलया करतोएस.त्यामुळे फोटोंइतकाच लिखाणालाही सलाम!