डोळा पाणी

आयुष्यात चाललो, साथ देत एकमेका
झालो एकरूप जणू, ह्रुदयांचाही एकच ठोका
सांग सखे असे कसे, सोसतेस तू हे सारे
आनंद दु़:खांचे माझ्या, तूच वाहतेस भारे
सारख्याच जणू आता, भाग्यरेखा आपल्या भाळा
लागे ठेच माझ्या पायी, आणि पाणी तुझ्या डोळा

सुधीर