मनमोहन सिंग यांनी पाश्चात्य राष्ट्रांवर, त्यातूनही अमेरिकेवर, केलेली टीका आपल्या राष्ट्रीय हितांना पोषक आहे का?

Submitted by sudhirkale42 on 28 September, 2011 - 06:02

कित्येक ठिकाणी एकाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याने तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवणेच त्या देशाच्या दीर्घकालीन हिताचे असते. काल संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना आपले पंतप्रधान आपले तोंड बंद ठेवण्याबद्दलचे "पथ्थ्य" पूर्णपणे विसरले असेच मला वाटले.

बांगलादेशबरोबरच्या संबंधांतील सुधारणा, भारताचे वाढते सामर्थ्य, या वाढत्या सामर्थ्याला शोभेशी जबाबदारी उचलण्याची भारताची तयारी, संयुक्त राष्ट्रांच्या घटनेमध्ये जरूर असलेल्या रचनात्मक बदलांची निकड वगैरे योग्य मुद्दे त्यांनी उपास्थित केले पण त्यांनी एकूण उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गोळाबेरीज भारताच्या हितास पोषक होती असे निदान मला तरी वाटत नाहीं.

उदाहरणार्थ, लिबियाशी आपल्याला काय देणे-घेणे आहे? खरे तर तो देश आतापर्यंत पाकिस्तानच्याच जास्त जवळ होता. पाकिस्तानच्या अणूबाँब बनविण्याच्या प्रकल्पात लिबियाने पाकिस्तानला थोरल्या भुत्तोंच्या वेळेपासून भरघोस आर्थिक मदत केली होती व म्हणूनच कीं काय नंतर पाकिस्तानने त्यांना अणूबाँब बनविण्याचे तंत्रज्ञानच नव्हे तर सारी यंत्रसामुग्रीही विकली होती! पाकिस्तानने (कीं डॉ. अब्दुल कादीर खान यांनी) लिबियाला कालबाह्य (obsolete) यंत्रसामुग्री विकली याबाबत "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात उल्लेख आहेत, पण ती लिबियन लोकांना चालविता आली नाहीं ही शक्यतासुद्धा नाकारता येणार नाहीं.

कित्येक वर्षांपासून पाश्चात्य राष्ट्रांविरुद्ध-विशेषकरून अमेरिकेविरुद्ध-मध्यपूर्वेतील राष्ट्रांकडून सातत्याने वापरण्यात येत असलेले दहशतवादाचे तंत्र लिबिया पहिल्यापासून वापरत आलेला आहे. "पॅन-अ‍ॅम-१०३" हे विमान लिबियानेच बाँबस्फोट करून स्कॉटलंडवर पाडले होते[*१]! अशा "सद्दाम हुसेन"च्या पठडीतल्या एका जुलमी हुकुमशहाची सद्दी संपविली म्हणून पाश्चात्य राष्ट्रांचे आभार मानायचे कीं त्यांच्यावर टीका करायची?

ट्युनीशिया, इजिप्त या राष्ट्रांच्या पाठोपाठ येमेन, लिबिया, सीरिया, बहरीन अशा अनेक अरबी राष्ट्रांमध्ये प्रजा बंड करून उठत आहे. लिबियात "नाटो" राष्ट्रांनी भाग घेतला नसता तर गद्दाफींनी प्रजेचे बंड ठेचून काढले असते. अनेक दहशतवादाच्या कारवाया केल्याबद्दल पाश्चात्य राष्ट्रांचा गद्दाफींवर राग होताच. कदाचित् म्हणूनच संधी मिळताच "नाटो" राष्ट्रें गद्दाफींच्याविरुद्ध बंडखोरांच्या बाजूने उभी राहिली आणि त्यांनी गद्दाफीचे हवाई दल जमीनीवरच निकामी करून टाकले यात नवल ते कांहींच नव्हते.

पण त्याबद्दल भारताला कुठल्याही बाजूने बोलायचे कांहींच कारण नव्हते. गद्दाफी हे कांहीं प्रजेने निवडून दिलेले लोकप्रिय अध्यक्ष नव्हते तर पूर्वी एकेकाळी सैन्यात कर्नलच्या हुद्द्यावर असलेले लष्करी अधिकारी होते, कुदेताच्यामार्गे[*२] त्यांनी सत्ता बळकाविली होती आणि प्रजेवर अन्याय-जुलूम-जबरदस्ती करून ती सांभाळली होती. त्यांचा भारताला पुळका येण्याचे कांहींच कारण नव्हते आणि नाहीं. राजकारणापायी भारताला कुठल्या तरी एका बाजूला समर्थन द्यायची गरज निर्माण झाली असती तर भारताने बंडखोरांच्या बाजूने उभे रहाणे जास्त सयुक्तिक झाले असते, गद्दाफींची नव्हे.

मग उगीचच "नको तिथं श्यानपना" करून शत्रू कशाला निर्माण करायचे? केवळ आपण त्यांच्या बाजूचे आहोत असे मध्यपूर्वेतील राष्ट्रांना दाखविण्याखेरीज आपल्याला त्यात काय मिळाले? आणि आपण कुणाच्या बाजूने उभे आहोत याची या सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रांना कांहींतरी पर्वा आहे का? सौदी अरेबिया, संयुक्त अमिराती (अलीकडेपर्यंत दाऊदला आश्रय देणारे यजमानराष्ट्र), इराण[*२], इराक, सीरिया, अशी बहुतेक सर्व मध्यपूर्वेतील राष्ट्रें आपल्यापेक्षा पाकिस्तानलाच जास्त जवळचा मानत होती. मग आपल्याला या राष्ट्रांबद्दल सहानुभूतीपूर्वक धोरण ठेवायची काय गरज आहे?

People in all countries have the right to choose their own destiny and decide their own future असे या आमसभेत जगापुढे मांडणार्या सिंग यांना या लिबिया-सीरिया वगैरेसारख्या देशांतील जनतेने आजपर्यंत आपले भवितव्य कधीच ठरविले नव्हते याची तरी जाणीव होती ना? त्यांच्यावर तर हुकुमशाहीच लादली गेली होती (आणि आहे)! मग अशा तर्हेने आपल्याच देशातील जनतेविरुद्ध असलेल्या (आणि भारताशी फारशी जवळीक कधीच न ठेवलेल्या) या राष्ट्रांकडून आपल्याला काय देणं-घेणं आहे? अशा देशांच्या बाबतीत आपले तोंड बंद ठेवणे हाच मार्ग जास्त सयुक्तिक नाहीं कां?

सीरियाचीही तीच कथा. सध्याचे हुकुमशहा बशार अल-अस्सद (आणि त्या आधीचे हुकुमशहा बशार यांचे वडील हाफेज अल-अस्सद) हे आपल्या प्रजेवर जुलूम करणारे सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या अन्यायाविरुद्ध जनता जर उठाव करून त्यांची हकालपट्टी करीत असेल तर आपण जनतेच्या बाजूला उभे रहायचे कीं अन्यायी हुकुमशहाच्या? ट्युनीशिया मध्ये सुरू झालेला "अरबी वसंतऋतू" सगळीकडे फैलावतो आहे त्याचा भारताला फायदा असेल तर अशा वसंतऋतूचे भारताने स्वागत केले पाहिजे पण असा वसंतऋतू आपल्या हिताचा नसेल तर त्या विषयावर गप्प तरी राहिले पाहिजे. मग आपल्या पंतप्रधानांनी विनाकारण तोंड कां उघडले?

शेवटी आपण इस्रायल आणि पॅलेस्टाईन या विषयांवर येऊ या. इथे पॅलेस्टाईनला समर्थन देण्यापर्यंत टाकलेली पावले ठीकच वाटतात. पण आपले पंतप्रधान जेवढे ठामपणे याबद्दल बोलले त्याची गरज नव्हती. अमेरिकेने पॅलेस्टाईनला सध्या तरी एका स्वतंत्र राष्ट्राचे स्थान देण्यास मान्यता दिली नसताना आपण असे ठामपणे काय म्हणून बोलायचे? अशा परिस्थितीत "इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांनी परस्परसंमत असा ठराव करून हा प्रश्न सोडवावा" असे गुळमुळीत निवेदन करणे भारताच्या जास्त हिताचे नव्हते कां? आज ना उद्या चीनबरोबर आपला संघर्ष अटळ आहे. आपल्यात युद्ध जुंपणारच आहे. त्यावेळी आपल्या बाजूने कोण उभे राहील? सौदी अरेबिया? मध्य-पूर्वेतील इतर तेलोत्पादक राष्ट्रे? मुळीच नाहीं. कुणी उभे राहिलेच तर ते राष्ट्र असेल फक्त अमेरिका. युरोपमधील राष्ट्रें त्यांच्या स्वत:च्या दिवाळखोरीमुळे चीनला मस्का लावायच्या तयारीत आहेत. इटलीने आपले ट्रेझरी बॉन्ड चीनला विकायची तयारी दर्शविली आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर "पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि अमेरिकेला) दुखवायची काय गरज होती?

इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत पाकिस्तानचा अण्वस्त्र बनविणाचा कहूता प्रकल्प बाँबहल्ला करून उडविण्याच्या प्रत्यक्ष भाग घेऊन आपल्याला मदत करण्याची तयारी इस्रायलनेच दर्शविली होते हे आपण कसे विसरू शकतो?

अलीकडे तर चीनची "नियत" जास्त-जास्तच उघड होऊ लागली आहे. चीनने अरुणाचलप्रदेश या आपल्या एका राज्यावरच्या त्याच्या हक्काचा हेका अद्याप सोडलेला नाहीं. चीनने आपल्या दोन देशातील सरहद्दीवर चीनच्या बाजूने हमरस्ते बांधलेले आहेत पण आपण बांधायला गेलो तर आपल्याच हद्दीत येऊन आपल्याला तसे करण्याला त्यांचे सैन्य मनाई करते (आणि आपण माघारही घेतो). आपल्या उत्तरेकडील सीमेवर आपल्या जवानांना दमदाटी चालूच असते[*३]. अशा परिस्थितीत उद्या जेंव्हां आपले आणि चीनचे युद्ध पेटले (ते पेटणारच आहे!) तर आपल्या मदतीला कोण येईल? पाकिस्तान? तो तर वहात्या गंगेत हात धुवून घ्यायला चीनच्या बाजूने आपल्याविरुद्ध युद्धात उतरेल. मध्य-पूर्वेतलाही कोणीही आपली विचारपूस करायलासुद्धा येणार नाहीं. मग त्यांची भलावण करून आणि ते करताना अमेरिकेला आणि इस्रायलला दुखवून आपण काय मिळविले? आपल्या हातात अशाने धुपाटण्याशिवाय कांहींही उरणार नाही!

म्हणूनच मनात आले कीं उद्या सुपरपॉवर बनण्याचे सामर्थ्य असलेल्या देशाच्या नेत्याला आपले तोंड कधी उघडायचे व कधी बंद ठेवायचे याचे भान असले पाहिजे. आणि चुकून नको तिथे तोंड उघडले तर कमीत कमी आपल्या पायाचा अंगठा तरी त्या उघड्य़ा तोंडात घालायचे त्याने टाळावे!
------------------------------------------------------------------
[*१] या कटाच्या सूत्रधारास जन्मठेपेची शिक्षाही झाली होती पण अलीकडेच त्याला "त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे" या सबबीखाली ब्रिटिश (कीं स्कॉटिश?) सरकारने अत्यंत संशयास्पद परिस्थितीत दया म्हणून वेळेआधीच मुक्त केले. (पण तो पठ्ठ्या अद्याप जिवंत आहे!)
[*२] अलीकडे पाकिस्तानातील शियांच्या कत्तलीमुळे इराणमधील परिस्थिती जराशी बदलत आहे असे वाटते. तसेच सद्दामनंतरचा सध्यातरी स्वत:च्याच जखमा चाटत आहे.
[*३] या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि आजचे एक केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला (Lion of Kashmir शेख अब्दुलांचे सुपुत्र)यांनी "हिवाळा संपून उन्हाळा येऊ दे मग मी जाऊन चिन्याना असा सज्जड दम मारेन कीं....." अशी "उत्तर" छापातली सिंहगर्जनासुद्धा केली होती. (उन्हाळा आता संपलाच आहे आणि मी बापडा अजून या चिन्यांच्या हृदयात धडकी भरविणार्या आणि त्यांच्या "धोतरांची पीतांबरे" करू पहाणार्या "अललडुर्र" गर्जनेची वाट पहात आहे!) या घटनेचा मला वैयक्तिक पातळीवर एक फायदा झाला कारण मला शाळेत शिकतांना माहीत झालेली पण दरम्यानच्या काळात विसरलेली मोरोपंतांची खालील आर्या आठवली.
कुरुकटकासि पहाता तो उत्तर बाळ फार गडबडला
स्वपरबलाबल नेणुनी बालिश बहु बायकात बडबडला!
------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

Lol इब्लिसपंत चुकता आहात. आयएएस पास होणे म्हणजे हुशार आणि एखाद्या कंपनीचा मुख्य तो मूर्ख का? तुमचे मापदंड चुकीचे आहेत. सरकारी अधिकारी किती पाण्यात आहेत हे सर्वांना माहित आहे. इतका सारा भ्रष्टाचार, त्यालाही कारणीभूत तुमेच अधिकारी आहेत.

ते जाऊ हे असे लेख लिहिणे म्हणजे लोकशाहीचे आणि लोकशाहीत जागरूक नागरीक असण्याचे लक्षण आहे. हे मान्य नसेल तर आपण डिफरंट लेवलवर, डिफरंट फुटींगवर ऊभे आहोत. (आपण म्हणजे तुम्ही अन मी व लेख कोणीही लिहू शकतो हे मान्य करणारे)

माफ करा पण अजिबात म्हणजे अजिबात चुकीची आणि भयानक इगो ग्रस्त कॉमेन्ट आहे तुमची.
हिम्मत कशी होते वगैरे लिहिणे म्हणजे तर कहर आहे, तुम्हाला एवढा राग येण्याचे काहीच कारण नाही.
पंतप्रधान आणि सनदी अधिकारी या लोकांचे सर्वच्या सर्व बरोबर असते काहीच चूकत नाही आणि समजा बरोबर/चूक काहीही असो सामान्य नागरिकाने त्या विरूद्ध काहीच बोलायचे नाही असा रोख दिसतो आहे तुमचा एकंदरीत. एकतर ही हुकूमशाही नाही आणि समजा सरकारला त्यांचे लिहिणे अगदीच वावगे वाटले आणि ते कायद्याच्या आधारे काही सिद्ध करू शकले तर करतील ना कारवाई. आणि तुम्ही म्हणता तसे ते जर एवढे चुकीचे असते तर सकाळ सारख्या वृत्तपत्राने छापलेच नसते.

ओके. माझे चूक. तुमचे बरोबर. जमले? पुन्हा काही बोलणार नाही असले. काळे काकांचाच एक लेख उत्तम म्हणुन या पूर्वी पाठिंबा दिला आहे. असो.
सभ्य भाषेत त्यांनी तोंड बंद ठेवावे हे बोलले तरी ते चूकच, असे मला वाटते. समजा, मी, 'तुम्ही तोंड बंद ठेवा हो, मायबोलीचे भले होईल' असे कुणास बोललो तर कसे होईल? चुकेलच ना? म्हणुन संताप झाला. बाकी तुमचा व्ह्यू पॉईंट बरोबरच. everybody is correct in their own point of view.
चालू द्या.

मग उगीचच "नको तिथं श्यानपना" करून शत्रू कशाला निर्माण करायचे? ही असली वाक्ये, जी देशाच्या पंतप्रधानांस उद्देशून लिहीलेली असतात, ती बोल्ड लिहीत जा हो काका. म्हणजे मस्त गुद-गुल्या होतात वाचणार्‍यांस..

"अमेरिकेच्या विरुद्ध मत व्यक्त करूनच सिंग थांबले नाहींत तर "पॅलेस्टाईनची राजधानी जेरुसलेम असावी" इथपर्यंत बोलून इस्रायलला (आणि अमेरिकेला) दुखवायची काय गरज होती?"

त्या अमेरिकेने तुमच्या लाडक्या पाकिस्तानला आजपर्यंत कित्ती हिडीस फिडीस केली नै? कशाला दुखवायचं त्यांना? तोंड बंद ठेवलं पाहिजे. हो की नै? कित्ती छान अमेरिका?

तेंव्हा त्याच्या पाठीमागे 'आय.ए.एस.' 'आय एफ एस' वै अधिकार्‍यांची फौज उभी असते. ते जे आय ए एस असतं ना? ते जssssरा कठिण असतं पास व्हायला.
--- आय ए एस आणि आय एफ एस मधे काम करणारे शेवटी भारतिय माणसेच असतांत. आय एफ एस ची न्युयॉर्क वकिलाती मधे पोस्ट मिळावी म्हणुन लॉबी चालते. काही गोष्टी निव्वळ गुणवत्तेच्या आधारावर ठरत नाहीत. अनेक वर्षे के नटवरसिंग आपले परराष्ट्र व्यावहार मंत्री होते... त्यांची अनेक आर्थिक (काँग्रेसनेच नंतर उघडे केले) लफडी होती, त्यांच्या मुलाचीच कंपनी होती. सर्व व्यावहार मुलाची कंपनी करते :स्मित:. त्यांना खिशात ठेवले तर आय एफ एस अधिकार्‍याला ईच्छा असेल त्या ठिकणी पोस्ट मिळायचे. शेवटी 'आय.ए.एस.' 'आय एफ एस' अधिकारीच आदर्ष घोटाळ्यांत अग्रेसर असतांत. ते बुद्धिने तल्लख जरुर असतांत... पण शेवटी माणुसच आहेत. ते पण चुका करु शकतांत, त्यांना पण लोभ असतो.

गड्डाफी चे अनेक बिलीयन्स $$ परदेशांत आहेत. काही देशांनी गोठवले, ते त्याला मिळणार नाहीत. त्यातला ०.२५ % जरी डोळ्यांसमोर दिसला तर डोळे पांढरे होतील...

मनमोहनांचे भाषण फिक्स केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Happy

अमेरिका किंवा इस्रायल यांना दुखावणे मला महत्वाचे नाही वाटत. त्यांची काळजी करायची अवशक्ता नाही.

देशाचे हित कशा मधे आहे? गड्डाफी गेल्यानंतर येणार्‍या नव्या नेत्याशी जुळवणे कितपत सोपे जाणार आहे?

झक्कीसाहेबः अर्ध्याच भरलेल्या प्याल्याला 'अर्धा भरलेला' म्हणायचे कीं 'अर्धा रिकामा' म्हणायचे? आपले प्रतिसाद बर्‍याचदा असे वाटतात. जकार्ताचीच गोष्ट सांगतो. इथल्या पोलाद कारखान्यांच्या मालकांनी (जे मुख्यतः चिनी वंशाचे इंडोनेशियन नागरिक आहेत) जर्मन, जपानी, कोरियन, तैवानी अशा वेगवेगळ्या देशांतील विशेषज्ञांची पारख करून शेवटी आज जवळ-जवळ सगळे पोलाद कारखाने भारतीय Metallurgists अतीशय उत्तम रीतीने चालवत आहेत याचा मला अभिमान वाटतो. आपण असे स्वतःला कमी लेखू नये असे वाटते.
मान्य. उद्यापासून पेला अर्धा भरलेला! मला घाई झाली आहे, भारत सर्वोच्च देश होण्याची, अजून कसा नाही, असे वाटते. म्हणून. नि इतर देशात जाऊनच का चांगले काम होते? भारतात का जिथे तिथे लाचलुचपत, कामचुकारपणा!

जरा सबुरीने घेतले तर, माझ्या नाहीतरी, यानंतरच्या दोन पिढ्यांनंतर तरी, भारत सर्वोत्तम देश होवो.

इब्लिससाहेब,
मी पूर्वी गोव्यात एका कंपनीचा CEO म्हणून काम करत असताना दोन-तीन वेळी Coke बद्दलच्या समस्यांबद्दल सर्व Mini Blast Furnace Operators च्या वतीने आमच्या अडचणी मांडायला दिल्लीच्या Secretariat ला गेलो होतो. त्यावेळी Coke पहाणारे जे Secretary होते त्यांना त्या विषयावरची अद्ययावत माहितीही नव्हती. पण माणूस इतका शांत (!) कीं त्याने न लाजता आमच्याकडूनच सगळी माहिती करून घेतली व जाता-जाता सांगितले कीं तो Coke बद्दलच्या एक-दोन समित्यावर सदस्यही होता! आता असले 'बाबू'लोक भारतीय कंपन्यांच्या हितार्थ कायदे/नियम कसे काय बनवू शकतील?
दुसरे एक बाबूमहाशय चीनला गेले व त्यांनी तिथून ज्या Joint Declaration वर सही केली ते तद्दन जे आम्हाला नको होते तेच शब्दशः होते! मग ते चीनला कशाला गेले? का चीन-वारीचे समर्थन करण्यासाठी कांहीं तरी 'कर्तृत्व' दाखविण्यासाठी ते Joint Declaration त्यांनी बनविले? त्यामुळे भारतीय कंपन्यांना काय त्रास होईल याचा विचारही त्यांनी केला नव्हता हे उघड होते.
सगळे सनदी नोकर असे नसतील व नाहींतच. पण कांहीं आहेतही! आपले पंतप्रधानसुद्धा मूलतः सनदी नोकरच आहेत हे मला ठाऊक आहे!
दुसरी गोष्टः मी जकार्ताऐवजी पुण्यात रहात असतो तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर असाच 'तिरकस' हल्ला चढविला असता कां?
असो! व्यक्ती तितकी मतें!

>>> बाकी आपले पंतप्रधान फक्त गुळमुळीतच बोलू शकतात असे वाटत होते. त्यामुळे ते असे कुणाला (चुकीचे का असेना) ठकणावून बोलले हे पाहून आश्चर्य वाटले...

त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? ते गुळमळीत क्वचितच बोलतात. बहुतेक वेळा ते ठामपणे व ठणकावून बोलतात. ठणकावून बोलण्याची ही काही त्यांची पहिली वेळ नाही आणि शेवटची पण नसेल.

२००८ मध्ये "या देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा प्रथम हक्क आहे" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

२००५ मध्ये नानावटी आयोगाने १९८४ च्या शीखांविरूद्ध झालेल्या दंगलीत जगदिश टायटलरचा हात होता असा अहवाल दिल्यावर, "जगदिश टायटलर निर्दोष आहे व अशा एखाद्या अहवालात नाव आले म्हणून मी टायटलरांना मंत्रिमंडळातून अजिबात डच्चू देणार नाही" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

ए राजा निर्दोष आहे हे मार्च २०११ पर्यंत त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

राष्ट्रकुल खेळांच्या स्पर्धात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही असे जुलै/ऑगस्ट २०१० त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

विरोधकांना धूप न घालता बोफोर्स प्रकरणात विनाकारण गोवलेल्या क्वाट्रोकीची त्यांनीच ठामपणे पाठराखण केली नव्हती का?

देशाच्या प्रगतीत अडथळे आणणार्‍या रामदेवबाबांचे आंदोलन त्यांनीच ठामपणे मोडून काढले नव्हते का?

संसदेचा अवमान करणार्‍या अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य करणार नाही हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

"अण्णा हजारेंनी प्रथम निवडणूक लढवून जनतेतून निवडून यावे व नंतरच जनलोकपाल कायदा करावा" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का? (काही जण कुत्सितपणे "मनमोहन सिंग हे कधी निवडून आले होते?" असे विचारतात. असले कुत्सित प्रश्न विचारू नका असे आपण त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे.)

"राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी सर्वार्थाने योग्य आहे" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

कोणत्याही परिस्थितीत शिबू सोरेन, लालूप्रसाद अशा स्वच्छ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढणार नाही हे २००४ मध्ये त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

२०१० मध्ये सुषमा स्वराज यांचा केवळ विरोधासाठी केलेला विरोध ठामपणे मोडून काढून त्यांनीच दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी थॉमस यांची नेमणूक केली नव्हती का? नंतर २०११ मध्ये थॉमसवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यान सर्वोच्च न्यायालयाने त्याची हकालपट्टी केल्यावर, "या प्रकरणी पृथ्वीराज चव्हाण हेच दोषी आहेत. मी नाही." हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

"कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार मी सहन करणार नाही" हे तर त्यांनी अनेकवेळा ठणकावून सांगितले आहे.

"सीबीआय ही स्वायत्त संस्था असून माझे त्याच्यावर अजिबात नियंत्रण नाही" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का? (सीबीआय चा उल्लेख काही जण कुत्सितपणे "कॉन्ग्रेस बचाव इन्स्टिट्युशन" किंवा "कॉन्ग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन" असा करतात. असले कुत्सित उल्लेख करू नका असे आपण त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे.)

२००४ मध्ये पोटा रद्द करण्याचा निर्णय घेऊन तो त्यांनीच ठामपणे अंमलात आणला नव्हता का?

"मी दुर्बल नाही, मी कणखर आहे", असे आपल्या दंडातली बेटकुळी दाखवत त्यांनीच वेळोवेळी ठणकावून सांगितले नव्हते का?

"चिदंबरमने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. माझा माझ्या मंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

"महागाईसाठी शरद पवार हेच जबाबदार आहेत" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

"मी काही चुका केल्या असतील, पण तुम्ही समजता तेवढा मी दोषी नाही" हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

"मी हतबल आहे. आघाडी सरकारमुळे भ्रष्टाचाराविरूद्ध मला काहिही करता येत नाही." हे त्यांनीच ठणकावून सांगितले नव्हते का?

"अतिरेकी कारवाया अजिबात सहन करणार नाही" हे त्यांनीच पाकिस्तानला ठणकावून सांगितले नव्हते का?

असा अत्यंत कणखर, अत्यंत ठाम, कोणाच्याही हातचे बाहुले नसलेला, स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा, देशहितासाठी कटिबद्ध असलेला, अत्यंत स्वच्छ, अर्थतज्ज्ञ (जे त्यांचा उल्लेख "अनर्थतज्ज्ञ" असा करतात, त्यांचा ठणकावून निषेध केला पाहिजे), मृदु स्वभावाचा, अल्पसंख्याकांविषयी कळवळा असणारा आणि अत्यंत कार्यक्षम असलेला पंतप्रधान आपल्याला लाभला हे आपले भाग्य नाही का?

वाजपेयी काय दुधाचे धुतलेले होते का मग पंतप्रधान....? त्यांच्यासारखा बोट्चेपे करणारा पंतप्रधान अजुन झाला नाही..बायकांच्या तालावर नाचलेले पुर्ण ते आठवते ना..बंगाल मधुन ममता नाचवत होती.. तामिळनाडुमधुन जयललीता.. त्यांच्या फर्मायिश पुर्ण करण्यात जॉर्ज फर्नांडिस यांची अख्खी कारकिर्द गेली ५ वर्षात...
अतिरेक्याना सम्मानांने विमानत बसवुन आपले लोहपुरुष आलेले...हे लोहपुरुष स्वतःच स्वतःला म्हणतात..
सदभावना यात्रा चालु करुन लाहोर मधे जाउन मुशरफ यांचे लांगुलचालन कोणी केले..? का केले? इतर घटक पक्षांचा दबाब होत का..? मागुन पाकिस्तानी घुसले सुध्दा जेव्हा वाजपेयी "मेरा मुशरफ मेरा मुशरफ" करत असताना...सीमेवरुन सेना कमी करण्याची काय गरज होती...फिक्सिंग होते का..तुम्ही आमच्या वर हमला करा मग आम्ही युध्द करु...मग आम्ही जनतेच्या भावनांवर परत निवडणुका जिंकु.....? असे पण युध्दात कोण नेते मरत नाहीत जवान मरतात...!! वाजपेयींच्या कवितांच्या अल्बम मधे काम करणार्याना लायकी नसताना पद्म पारितोषिके कसे मिळतात..?

हम पाकिस्तान को ये कर देंगे वो कर देंगे असे म्हणनारे अडवाणी.. नंतर पाकिस्तानातच जाउन जिन्ना यांची चाटुन आलेले .......हे विसरलेत वाटते मास्तुरे आपण........?
उपाशी असणारे कसे अचानक जेवन मिळाल्यावर परत कधी मिळेल असे मिळेल कि नाही याचा भरवसा नसतो म्हणुन कसे अधागासारखे खातात तसे.. भाजपाने सत्तेत केले आहे...२जी हे त्यांचेच बाळ पण फळ खायला मिळाली नाहीत आणि आपसुक कॉग्रेस च्या तोंडात गेली हे बघवत नाही आहे आता अडवाणींना..... Happy
मुळातच अणुस्फोट करण्याची गरजच काय होती.....जेव्हा माहीत होते की संपुर्ण जग आपल्यावर निर्बंध लदणार आहे.....उगाचच जगाच्या नजरेत येउ........? हा मुर्ख पणा भाजपाने कोणत्या तोंडाने केलेला......? त्या आर्थिक निर्बंधाने देशाच्या किती नुकसान झाले.....हे भरणार कोण तुमचा भाजपा की अडवाणी (हवाला रॅकेट च्या पैस्यातुन) आपण आधिच अणुसंपन्न देश होतोच..त्यात नविन स्फोट करुन काय जगाला दाखवायचे होते..? इंदीरा गांधी नी जे केले ते भाजप सुध्दा करु शकते......हे दाखवायचे होते..? म्हणुन पाकिस्तानात जाउन कारगिल लढाई फिक्स केलेली का...? असे नाही तर सीमे वरुन मोक्याच्या ठिकाणांवरुन लष्कर काढुन घ्यायची बुध्दी कोणत्या हुशार मंत्र्यांच्या डोक्यातुन निघाली......?
जो पंतप्रधाना ला स्वताच्या देशाच्या संसदेला वाचवता आले नाही अतिरेक्यांच्या हमल्या तुन त्याची काय लायकी असेल......? अक्षरधाम मंदीर सुध्दा वाचवता आले नाही........
ज्या रामाचे नाव घेत सत्ते वर चढलेलात त्या रामाला तर तुम्ही सरळ वनवासातच पाठवलात.........तेव्हा लाज नाही वाटली का....??????

वरील पोष्टींचा अशा अर्थ होत नाही ....की मी कॉग्रेस च्या चुकांना दुर्लक्ष करतोय........नाही कॉग्रेस चुक आहेच...फक्त तिने ५० वर्षात जे शेण खाल्ले आणि भाजपाने ५ वर्ष आणि १३ महिन्यात खाल्ले.......

जरा हे वाचा हो!
http://www.youtube.com/user/TheYoungTurks#p/u/17/SXHoSfUjfEE

सारखे आपले भारतातले वाईट तेव्हढे लिहायचे नि मग मलाच म्हणायचे तुमचा पेला अर्धा रिकामा का? असे जर आंतर्जालावर पुष्कळ आले तर, भारताबद्दल वाईट मत कशाला होईल?

विशेषतः जे भारतातून अनेक वर्षे, फार पूर्वीपासून दूर राहिले, भारताशी अनेक वर्षे संबंध तुटला, नि आता आंतर्जालामुळे भारताशी पुनः संबंध जोडू पहातात, त्यांना काय दिसते? - मायबोलीवर तरी - भारतात किती वाईट लोक आहेत, हिंदू लोक कसे वाईट आहेत वगैरे वगैरे! जरा चांगले काय ते लिहा ना!!

प्रत्येकच बाफ वर आपण तोच कोळसा उगाळत बसलो तर चर्चा होणारच नाही. अनेक धाग्यांवर हेच विषय झालेले आहेत, पुन्हा तेच उगाळुन आपण काय साध्य करत आहोत? चुक झाली हे मान्य पुढे अशा चुकांतुन काही शिका.... हा पावित्रा महत्वाचा. जनतेला त्याच्या योग्यते प्रमाणेच त्यांचे नेते मिळतात... परिस्थिती बदलावी असे वाटत असेल तर आपल्या योग्यतेला उंच न्या... शुभेच्छा.

हे भारताच्या पंतप्रधानांचे वक्तव्य आहे. मनमोहन सिंगांनी अशी तोफ डागण्यात भारताचा दुरगामी काय फायदा आहे? ह्या मधुन कुठला मुत्सद्दी पणा त्यांना दाखवायचा आहे?

दुसरी गोष्टः मी जकार्ताऐवजी पुण्यात रहात असतो तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर असाच 'तिरकस' हल्ला चढविला असता कां?

काळे साहेब, तुम्हालाहि ही शंका येते का? आम्हाला गेली कित्येक वर्षे माहित आहे की भारतात रहात नसले की आपण सूर्य पूर्वेला उगवतो म्हंटले तरी भांडायला उठतील हे लोक!

बाकी पुनः तुम्ही भारतीय अधिकार्‍यांबद्दल असे काही लिहीले आहे की फक्त तेच असे करतात. अक्कल विचाराल तर बुश, पेलिन, छेनि इ. काय अक्कल होती? बुश येलसारख्या मोठ्या कॉलेजातून पास झाला याचा अर्थ असा नव्हे की तो हुषार होता. तिथूनहि पास कसे व्हायचे याच्या अनेक युक्त्या आहेत त्याच्यासारख्या माणसाला. त्याचे आजोबा, बाप सगळे सरकारात उच्च जागी होते!

आता कायदा करणारे लोक तुमचे ऐकून कायदा करत नाहीत, कारण तुम्ही पैसे देत नाही. त्याला तुम्ही लाच समजता, नि ते काहीतरी वाईट असे मानले जाते (आता सगळेजण राजरोसपणे करतात, हा ढोंगीपणा!) पण त्याला अमेरिकेसारखे 'लॉबी' म्हणा. मग जी लॉबी जास्त पैसे देईल त्यांच्या बाजूने कायदा!! हे सत्य इथे केवळ वस्तुस्थिती म्हणून मान्य केले जाते आणि मग जो उठतो तो पैसे गोळा करण्याच्या मागे लागतो.

तर उगाच असल्या गोष्टी उगाळण्यात अर्थ नाही. इकॉनॉमिक टाईम्स (भारतातला) मधे स्त्रिया कश्या अधिकाधिक उद्योगधंदे सुरू करताहेत ते लिहीले आहे, ती बातमी चांगली आहे. त्यासारख्या बातम्यांबद्दल बोला.

......

sudhirkale42 | 30 September, 2011 - 09:18 नवीन

महोदय,
आपली वरील पोस्ट वाचली.

तिरकस हल्ला यासाठी झाला, की कुणीही परिट राजाची बायको रावणा कडे राहून आली, मग ती बरी की बुरी? अशी शंका या देशात काढू शकतो. पण रामायण पूर्ण वाचून नंतर तुम्हाला मना पासून असं वाटत नाही का, की त्या परिटाची नरडी घोटावी?

भारत देशाचे पंतप्रधान काय बोलले ते चूक की बरोबर, याबद्दल जरूर बोला. पण त्याने तोंड बंद ठेवले असते तर बरे झाले असते, ही भाषा असहनीय. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी बोलताना / लिहीतांना. परिटाचे बोलणे पेपरात छापून नव्हते आले, ते चुकून ऐकू आले होते.

आपल्याला रामराज्यच परत आणावयाचे असल्याने वरील उदाहरण दिले. रोख आपण राहता कुठे यावर नव्हता, तो आपण मान्यवर लेखक आहात, अन आपले भान सुटले, असे दर्शविण्याचा होता.

माफी असावी.

भारत देशाचे पंतप्रधान काय बोलले ते चूक की बरोबर, याबद्दल जरूर बोला. पण त्याने तोंड बंद ठेवले असते तर बरे झाले असते, ही भाषा असहनीय.
---- त्यात असहनीय असे काय आहे हे मला समजत नाही. पत्रकाराने किंवा लेखकाने प्रतिकुल असे लिहूच नाही अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्यासारखे आहे (वृत्तपत्रांची मुस्कटदाबी यातुनच जन्माला येते).

श्री. काळे यांनी मांडलेले विचार चुकीचे कसे आहेत किंवा तुम्हाला ते विचार का मान्य नाहीत या बद्दल लिहा. तुम्ही पंतप्रधान बोलले ते कसे बरोबर आहे, दुरगामी विचार डोळ्यासमोर ठेवुनच ते तसे म्हणाले या बद्दल थोडा प्रकाश टाका.

तुमच्याकडेच मुद्दे नाहीयेत. मास्तुरे यांनी जे मुद्दे दिलेले आहेत त्यावर केवळ विरोध म्हणुन तुम्ही भाजप बद्दल मुद्दे लिहिले आहेत. भाजप, कॉन्ग्रेस, अन्य कोणी, इ. पक्षांमधे कोण किती चांगले कोण किती वाईट हे सर्व लोकांना माहित आहे.

मास्तुरे यांनी फक्त कॉग्रेस ला टारगेट केलेले हे चालते आम्ही भाजपाला केले ते का नाही चालत मग......
त्याच्यावर उत्तर तर देउन दाखवा आधी मग बोला

मास्तुरे, "ठणकावुन" ची पोस्ट अगदी मस्त वठली बर का Happy इमेल्स मधुन फिरवायला पाहिजे कुणीतरी!
उदयभौ, नका हो असा त्रागा करूत! Wink तुम्हीही मुद्देच नव्हे तर सत्य देखिल मान्डले असेल, पण कायेना, की बातमीचा विषय्/चघळायचा विषय काय होतो? कुत्रे माणसाला चावले तर ती बातमी नस्ते, माणूस कुत्र्याला चावला तर ती महत्वाची बातमी, त्याच माणूस कुत्र्याला चावला या धर्तीवरचे तुमचे बीजेपी विरुद्धचे मुद्दे आहेत हे लोकान्नाहि ठाऊक आहेच की! Lol
आता काये ना की कॉन्ग्रेसी सरकारे भ्रष्टाचाराने बरबटलेली दुतोन्डी आहेत "ही बातमी" होऊच शकत नाही! त्यातुनही मास्तुरेन्नी उपरोधात तिला ठणकावुन बातमी मूल्य दिले मग त्यान्चे त्या कौशल्याबद्दल अभिनन्दन करायचे सोडून तुम्ही हे हो काय अस करताय!

>>तुम्ही फक्त मुद्दे मांडतात...........आम्ही मांडलेले सत्य....असते.......
गुड, तुमचे सत्य फारच किमती आहे त्यामुळे शक्यतो ते कोणालाही दाखवू नका. Happy

तुम्ही दाखवलात म्हनुन दाखवावे लागले........ Happy
त्रागा नाही हो लिंबुभाउ............... दुसर्याचे दाखवायला सोपे असते स्वतःचे दाखवल्यावर पळुन जातात....... Happy

पण त्याला अमेरिकेसारखे 'लॉबी' म्हणा. मग जी लॉबी जास्त पैसे देईल त्यांच्या बाजूने कायदा!! हे सत्य इथे केवळ वस्तुस्थिती म्हणून मान्य केले जाते.
>> झक्की हे सत्य कॅपिटॅलिस्ट सत्य आहे आणि माझ्या मते ठराविक प्रमाणात योग्य आहे. पण फरक असा आहे की लॉबिस्ट वापरतात तो पैसा पांढरा असतो आणि तो पार्टीला जातो अर्थात राजकीय पुढारी
अशा संमेलनांना मौजमजा करतात पण एकंदरीत प्रत्येक लॉबीला समान संधी असते आणि जनरली धोरण
देशहिताचेच ठरविले जाते. अशी व्यवस्था भारतात नसल्याने काळे साहेब तक्रार करत असतील तर त्यात काहीच गैर नाही.

पण माणूस इतका शांत (!) कीं त्याने न लाजता आमच्याकडूनच सगळी माहिती करून घेतली व जाता-जाता सांगितले कीं तो Coke बद्दलच्या एक-दोन समित्यावर सदस्यही होता! आता असले 'बाबू'लोक भारतीय कंपन्यांच्या हितार्थ कायदे/नियम कसे काय बनवू शकतील?

>>काळेसाहेब, सरकारी अधिकार्यांचे अनेकविध कंपन्यांची कामे पाहतात, त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिंइतके त्यांना ज्ञान असणे जवळजवळ अशक्यच.

मला वाटते इथे दोघांचेही म्हणणे योग्य आहे. यावर एक उपाय आहे की जेंव्हा सरकारी अधिकार्यांच्या
आय. आय. एस. सारख्या परिक्षा घेतल्या जातात तेंव्हा खाजगी क्षेत्रातील अनुभवाला जास्त वेटेज ठेवण्यात यावे या द्रुष्टीने काही प्रयत्न करणे योग्य ठरेल.

>>> मास्तुरें कडे उत्तरे नाहीत वाटते.........

उदयवन,

तुम्ही लिहिलेल्या काही मुद्द्यांवर अनेक वेळा जोरदार चर्चा झाली आहे (उदा. काठमांडूहून झालेले भारतीय विमानाचे अपहरण). हे चावून चोथा झालेले मुद्दे तुम्ही आता पुन्हा उकरून काढत आहात. त्यात आता नवीन सांगण्यासारखे काहिही नाही. किती वेळा तेच तेच स्पष्टीकरण द्यायचे? तुम्ही जुने-नवे धागे पुन्हा एकदा वाचा. त्यात लिहिलेल्या व्यतिरिक्त अजून काही नवीन माहिती तुमच्याकडे असेल तर लिहा. नाहीतर उगाच तेच तेच दळण दळत बसू नका.

आणि तुमचे उरलेले बहुसंख्य मुद्दे इतके निरर्थक आणि निराधार आहेत (उदा. कारगिल युद्ध फिक्स केलेले आहे) की त्यावर काही उत्तर देण्याची गरजच नाही.

फिक्सिंगवरुन आठवलं. २०११ च्या विश्वचषकाच्या वेळी एक नामवंत, प्रत्येक सामना फिक्स केलेला आहे, असे टाहो फोडून सांगत होते. सुरवातीला अनेकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमादित्याप्रमाणे त्यांनी आपला बालहट्ट सोडला नाही. शेवटी सर्वांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तुमचे बरेचसे मुद्दे तसेच असल्याने सर्वांचे दुर्लक्ष होणारच.

पण फरक असा आहे की लॉबिस्ट वापरतात तो पैसा पांढरा असतो आणि तो पार्टीला जातो अर्थात राजकीय पुढारी
---- पैसा नेहेमीच पांढरा असेल असे नाही. हॅलिबर्टन किंवा हम्वी बनवणारी कंपनी ज्यांनी इराक विषयी महत्वाची भुमिका वढवली... त्यांचा पैसा पांढरा म्हणाल?

Pages