परत पाठीमागे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मूळ गझल : माझीच गझल पाठीमागे Happy

सरदाराचे ’हात’ बांधले पाठीमागे
स्वत:च डावे उलटे पडले पाठीमागे

जरा कुठे तो शाहिद विद्येसोबत दिसला
पेव कसे अफवांचे फुटले पाठीमागे

पाठ फिरविली तिने जरी माधुरी प्रमाणे
केस मोकळे हाय सोडले पाठीमागे

लाडिक हसुनी मला आपल्या घरीच नेले
अन गेल्यावर श्वान सोडले पाठीमागे

’वॉल’ खरे तर जगात साऱ्या अभेद्य होती
फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे

पळता भुइ का थोडी झाली विरोत्तमांना
श्रीलंकेचे वाघ लागले पाठीमागे

थोबड्यावरी डाग तिच्या पण पसंत केली
ठेवुन गेला बाप बंगले पाठीमागे

भकारातही 'ह्यांच्या' होता एक दिलासा
त्यात तरी ’हे’ नाही पडले पाठीमागे

जीवनभर तर त्याने माझी सोबत केली
मी गेल्यावर मद्य सांडले पाठीमागे

विषय: 
प्रकार: 

मिल्या, स्वतःच्याच काव्याचे विडंबन... Happy
पण विडंबन जास्त आवडले. माधुरी (अगदी गजगामिनीची याद !!!), श्वान आणि भकार खल्लास :):-)

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal

    स्लार्टी धन्यवाद. तू एकटाच दिसतोस ज्याला हे विडंबन आवडले Happy

      ================
      ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
      रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

        -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

        नाही रे, मलाही ज्याsssssम आवडलय (उशीरा वाचल). सगळेच झक्कास. त्यातही वॉल, श्वान, बंगले, भकार, सांडले पाठीमागे.. म्हणजे उ(हु)च्च!
        स्लार्टीशी सहमत... विडंबन जास्तं छानय रे, मिल्या.

        माझाही हात वर आहे आवडलेल्यांपैकी!!
        Happy
        ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
        क्या मौसम आया है क्या मौसम आया है
        गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

        स्लार्टी धन्यवाद. तू एकटाच दिसतोस >> मिल्याभाव काभाव खाता उगी?? ब्लॉगवरही म्हटल की आवडलय! Wink

        नाही रे, मलाही ज्याsssssम आवडलय >> मी पण दिलेली आहे "दाद"

        माझाही हात वर आहे आवडलेल्यांपैकी>>>
        मला भुमिका ज्याम म्हन्जे ज्यामच आवड्ल्ये!!

        दीपू द ग्रेट
        "वक्त रूकता नहीं कहीं टिककर
        इसकी आदत भी आदमीसी है"