पाठीमागे

Submitted by मिल्या on 21 July, 2008 - 02:01

    वळणावरती पाऊल वळले पाठीमागे
    दोघांमधले नाते पडले पाठीमागे

      मेघ जरासे डोंगरमाथा चुंबत गेले
      आठवणींचे निर्झर झरले पाठीमागे

        तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
        दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे

          दोरी तुटली, पतंग सुटला, हातांमधुनी
          तो गेला अन मन भरकटले पाठीमागे

            सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
            फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?

              नकारातही तिच्या मिळाला एक दिलासा
              जाता जाता तिने बघितले पाठीमागे

                आरश्यास ती चरा जरासा पाडुन गेली
                तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे

                  जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
                  मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे?

                  गुलमोहर: 

                  मस्त आहे.....
                  तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
                  दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे..

                  great!!!!!!!! टाळ्या....:)

                  आरश्यास ती चरा जरासा पाडुन गेली
                  तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे

                  जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
                  मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे?
                  >> अप्रतिम!!
                  खूप आवडली.
                  Happy
                  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                  रोके तुझे कोई क्यूँ भला
                  संग संग तेरे आकाश है

                  काय हो मीटर काय झाले पाठीमागे? Happy
                  आणि पाउल वळते मागे हे रास्त वाटते. पाठीमागे पाउल वळणे - कुछ गडबड है!

                  >>आरश्यास ती चरा जरासा पाडुन गेली
                  तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे

                  हा आवडला!

                  धन्यवाद दाद, सुमेधा, आशु, चिन्नू

                  चिन्नू : पाऊल किंवा पाउल दोन्ही चालते असे मला वाटले... पण पाउल चालणार नाही असे वाटते... पण पाठीमागे पाऊल वळले ह्यात मला तरी काही चूक वाटले नाही..
                  .
                  पाठीमागे मध्ये जो माघारी जाण्यावर भर येतो तो नुसत्या मागे मध्ये येत नाही...
                  अजून कुठे गडबड वाटते आहे का? (पाडुन) सोडून Happy
                  .
                  वळणावरती पाय थबकले पाठीमागे असे करत येईल.. अजून विचार करतो आहे.. तुला काही चांगले सुचले तर नक्की सांग

                    ================
                    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
                    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

                      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                      पाऊल 'मागे' वळते, पण पाठीमागेमुळे मुद्दा अधोरेखित असेल तर, चालेल. पण
                      >>तिने अचानक पाठ फिरविली, खेद न त्याचा
                      दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे

                      >>दोरी तुटली, पतंग सुटला, हातांमधुनी
                      तो गेला अन मन भरकटले पाठीमागे

                      या दोनही ठिकाणी पाठीमागे व्यवस्थित शोभून दिसतो, सगळीकडे नाही, असे मला वाटले.
                      वेगळा प्रयत्न आहे पाठीमागे म्हणजे. प्रयोग आवडला.

                      छान...
                      निर्झर, पोपडे आणि जाता जाता हे शेर फार आवडले!

                      "वळणावरती पाऊल वळले पाठीमाग" मिसरा गोंधळात टाकणारा वाटला. तसेच काहिसे आरसा शेराबद्दल.

                      चिन्नुच्या निरिक्षणाशी मी सहमत आहे. "मागे" आणि "पाठीमागे" या दोन शब्दांच्या अर्थछटा वेगळ्या आहेत आणि एक-दोन शेरात "पाठीमागे" पुरेसे चपखल वाटत नाही. चु.भू.दे.घे. हे आलेच Happy

                      वळणावरती पाऊल सरले पाठीमागे.

                      पुलस्ती धन्यवाद

                      आरसा शेर गोंधळात टाकणारा का वाटला? सविस्तर लिहाल का? तसेच पाठीमागे चपखल वाटत नाही असे का वाटतेय.. ते पण लिहा ना...

                      अश्विनी : तुला काय म्हणायचे ते समजले नाही

                        ================
                        ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
                        रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

                          -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                          अरे पाऊल पाठीमागे वळणे यात गडबड वाटत होती ना ! म्हणून पाऊल सरले पाठीमागे असा पर्याय सुचला तो सांगितला. तुझी विडंबने खुप आवडतात. मजा येते.

                          छानच रे मिल्या दादा Happy
                          .
                          जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
                          मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे? >>>>
                          जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
                          मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे? >>>>
                          खुप आवडले Happy

                          धन्यवाद अश्विनी, केदार

                            ================
                            ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
                            रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

                              -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                              आहा......
                              मस्त.....
                              नकारातही तिच्या मिळाला एक दिलासा
                              जाता जाता तिने बघितले पाठीमागे

                              आरश्यास ती चरा जरासा पाडुन गेली
                              तुकडे माझे पुरे विखुरले पाठीमागे

                              लय भारी......

                              क्या बात है....
                              दु:ख असे, सुख तिच्या धावले पाठीमागे... वा वा.....

                              मिल्या सुरेख गजल!
                              मलातरी प्रत्येक 'पाठीमागे' योग्य अर्थानं येतोय असं वाटलं. 'भूतकाळ, तदनंतर, आणि शब्दशः' असे तिन्ही अर्थ व्यवस्थीत जाणवतात.

                              नचिकेत, मृण्मयी
                              धन्यवाद

                                ================
                                ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
                                रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

                                  -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

                                  मिल्या सगळ्यात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे ही गझल मागच्या गझलपेक्ष खूप चांगली वाटली.

                                  "वळणावरती पाऊल वळले पाठीमागे.." या ठीकाणी मला 'वळले' काढून 'सरले' घालावसं वाटलं.

                                  निर्झर, पतंग, रंग शेर आवडले.

                                  नकार आणि सुख / दु:ख हे शेर आहेत ते खूप नेहेमीचे वाटले. शेवटचा शेर आहे त्यातून अनेक अर्थ काढता येताहेत पण हवा तो अर्थ पोचतोय असं वाटत नाहीये.
                                  ~~~~~~~~~
                                  ~~~~~~~~~
                                  Happy

                                  अज्ञात, मीनू धन्यवाद

                                  वर अश्विनी ने पण 'सरले' हा बदल सुचवला होता... पण वळले चे सरले करून फार साध्य होईल असे सध्यातरी वाटत नाही.. विचार करतो ह्यावर..

                                  मिनू सुख/दु:ख शेरावर अजून विचार कर Happy

                                    ================
                                    हीच शोकांतिका तुझी माझी
                                    काच शाबूत पण चरे होते

                                      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
                                      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
                                      एस. एम. जोशी हॉल, पुणे

                                      एकदम बेस्ट Happy

                                      सगळ्यात आवडलेला शेर :
                                      >>सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
                                      फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?

                                      मान गये!

                                      छान रंगवलीय.
                                      जीवनभर तर त्यांनी माझी सोबत केली
                                      मी गेल्यावर का ओघळले पाठीमागे?

                                      हेही छान.

                                      सहवासाचे रंग खरे तर गहिरे होते
                                      फक्त पोपडे का मग उरले पाठीमागे?

                                      खोल खोल आहे हा शेर.....!!!

                                      गझल उत्तम झालीय. मला आवडली.