तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी
माझ्यासारखी माणसे
हात पसरतात पंखा सारखे
मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा
तुझ्या सारखी माणसे
फाटक्या दु:खाला
घालतात टाके, मायेने, उपजत तीक्ष्णतेने
उध्वस्थ मनात
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने
माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे
तुझ्यासारखी माणसे भेटल्यावर
माझ्यासारखी माणसे
पळत सुटतात जीवाच्या आकांताने
क्लॉस्ट्रोफोबिक होते तुझ्या आकाशात
मायेच्या तिक्ष्णतेत दिसते औषधी इंजेक्शन
आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके बळ नसते
माझ्यासारख्या माणसांच्या मनगटात



कविता जुन्या जयाच्या कवितांसारखी..
खूप आवडली.
सुरेख.
भेदक लिहिता तुम्ही. कविता आवडली मला.
आवडली.
आवडली
मस्तय!
>>माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची माप
सहीच!
पेशवा ! ग्रेट वन .. किप ईट अप अल्वेज.
माझ्यासारखी माणसे
आपुलकीच्या हातांची
कापतात बोटे नव्या कागदासारखी
बांधतात अभेद्य किल्ले
माहिती असतात प्रत्येकाच्या गळ्याची मापे >>> व्वा!!! आत्मभानाची कविता...
कळली असे नाही म्हणता येणार पण, आवडलीच.
खूप आवडली!
छान आहे
वसवतात मैफिली आपल्या हिरव्या हाताने
>>>>> हिरवे हात... सुन्दर !
मस्त
तुझ्यासारखी माणसे
टिपून जातात असे काही
म्हणून (अजूनहि) वाचतात
माझ्यासारखी माणसे.
असम्या तुझ्यासारखी माणसे अजूनही वाचतात हे आवर्जून सांगीतल्या बद्दल म.पा. धन्स
वेगळी आहे एकदम. मस्त!
आणि तुझ्या गळ्याचे माप घेण्याइतके बळ नसते
माझ्यासारख्या माणसांच्या मनगटात
सुंदर..
छान उतरलीये...
वाह !!!!!!
फार आवडली.
असामी, मस्तचं.
आवडली..... नीरजा म्हणते तसे पूर्वीचा फील आहे.
पेशवा... अप्रतिम!