पेशवा यांचे रंगीबेरंगी पान

ऋतू

डोळ्यात ऋतू पावसाचे
ढगाआड ऊन - हसू ओठांवरचे?

कळेना वळेना पंख निळ्या फुलपाखराचे - जपण्यास दिले का?
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?

एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!

डोळ्यात म्हणे ऋतू पावसाचे
गहिवरातले चंद्र भेटीत न्हाले!

जातकुळी

काही वर्षापूर्वी बार्न्सच्या पुस्तकभांडारात
आवडतीच्या सिंगलशॉट मोका सकट मी.
दिशाहीनतेचे डर्टी हॅरी पोईंट फोर्टी फोर मॅग्नम खेळवत...
आजूबाजूची टेबले एकटेपणाच्या गर्दीने व्यापलेली
तेव्हा भेटले होते पहिल्यांदा दहा तोंडाचे ते मूल
लॅगरांज बिंदूचा रोग झालेले...
लहानपणी आईने सांगितलेली धृवाची कथा...
अढळपदातला अध्याहृत बंदिवास...

बायकानो तुम्ही असे कपडे घालता म्हणुनच...

बायकानी कमे कपडे घातले म्हणुनच त्यांच्याशी गैरवर्तन झाले ? मग हे
जरूर वाचा : http://www.slutwalktoronto.com

वावर

असे पुरुष,
पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा
बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून
असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त
तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ

कोणत्या प्रकारचा जिनीअस तुम्ही आहात?

तिशी ओलांडाल्यावर असे वाटले का की मुलभूत, अचाट असे काही तरी करायचे राहून गेले? आपण सुधा ऑल्सो रॅन ह्या वर्गवारीचा एक भाग झालो?

असे वाटले असेल तर खालील लिंक जरूर वाचा (अर्थात तुम्ही अधी वाचले असेलच किंवा तुम्हाला हे अधिपासुनच माहीती असेलही स्मित)

जिनिअस

तुझ्यासारखी माणसे

तुझ्यासारखी माणसे
त्यांच्या पंखावर निजत आकाश
बघत स्वप्न, घेत गुडघे पोटाशी

माझ्यासारखी माणसे
हात पसरतात पंखा सारखे
मांज्याला चोळतात काचा
जिंकू पाहतात आकाशाचा तुकडा

'चिमार'

'चिमार'
ही गाठ शब्दाला आलेली (अस एक मत)
व्यक्त करण्याकरता तिलाच पुढे धरा
व्याकरणात ती बसत नाही
कुठेतरी बसावा असेही नाही
एखादे चिंब भारले पण
एखादं फळासारखं दुःख
ह्यांच्या तळव्यावर ठेवण्यास उत्सुक आहे
बिया कोया पाने फुटणारी मुळे
झारी धरणारे हात
गंजलेले पण सर्वव्यापी
ह्यांचया कुळातील
कदाचित
पण माहीत नाही!

'चिमार' ही परंपरा आहे
आत्मसात करून
स्वतः रंग होऊन
ओतून घेण्यास आसुसण्याची
कदाचित
पण तेही मला नक्की माहीत नाही

--------------------------------

रुद्रायन

असा शब्द सहज भेटायला आल्यावर काय करायचे?
जाणुन घ्याय्चे त्याचे अंतरंग
त्याचे भाजलेपण
त्याचे अस्तित्व?

असे अर्थलागण न झालेले शब्द
जमवतोय मी... उल्कांचे अवशेष
पण वापरतोय परिचित हत्यार
यमक गमक मात्रा व्रुत्ते अलंकार
त्यांच्या जपणुकिसाठी

सतत काय मिळाले हे शोधणारे लोक
कित्येकदा येतात भावार्थ हुंगत
आणि नाकारून जातात ...
खुप चिरंतन असे काही
माझा नाइलाज आहे!

रुद्रायन हे निराकार आहे!
अशा रचनेचा अर्थ काय लावाल
बापड्यांनो?

------------------------------------

श्वास पडले कमी

डोहात चांदणे,चांदण्यात मी
वेचता वेचता श्वास पडले कमी

रे भोगतो जरी स्वप्न शिक्षेपरी
पापण्या जोडतो रोज स्तवनात मी

बोलावणे

दिवस बदलत गेले शब्दा मधून माझ्या
नव्या व्याख्यांच्या ऐरणीवर घाव सोसतोच आहे
अर्थ पाळलेली सारी दारे "सावधान" च्या पाट्यांमागे...
तुमच्या गळ्यात शब्दांनो पाहतो मालकीचे पट्टे घट्ट रुतणारे
तुमच्या गुरकावण्यातले इमान ? लाळ गाळतेच आहे
चेहरे रेखलेली सांज नायकिणीच्या घरी
आज शब्दांचा गाव सारा लालदिव्यांचा बाजार आहे....
विकले नाहीच ज्यांनी इमान आपले कसल्याच अर्थाला
अशा शब्दांचा प्रदेश कोण्या अज्ञाताच्या दिशेला ...
ह्या मिथकाच्या वाटेवरचा एक हत्ती
पिसारा फ़ुलावून कित्येक दिवस खुणावतो आहे!

~ ० ~
जमले तर इथेही प्रतिक्रिया द्या: