तू असताना...

Submitted by सुमेधा आदवडे on 17 November, 2010 - 04:52

तू असताना आयुष्याचा बहर काय वर्णावा,
दाटीवाटी करुन सुखांचा रोजच सडा पडावा!

तू असताना फुलतो निसर्ग सारा मनात माझ्या,
व्यापुन जातो कण न कण हिरवाईने ताज्या..

तू असताना घरात येती मऊ उन्हे सोनेरी,
झोतामधल्या कणाकणातुनी प्रेम तुझे पाझरी..

तू असताना दर्पण माझा दुरून हेवा करते,
रूप तुझ्या डोळ्यातच माझे खूप देखणे दिसते.

तू असताना परीसर सारा माझ्यासाठी क्षुल्लक!
केवळ तू अन तुझ्या क्षणांचा ठेवा राहतो शिल्लक!

तू असण्याचे खरेतर आहे कारण माझे जगणे..
सत्य एवढे सुंदर आता नकोच स्वप्ने बघणे!

-सुमेधा पुनकर

गुलमोहर: 

संपूर्ण कविताच सुंदर सुमे.. दिवसेंदिवस अप्रतिम लिहिते आहेस.

तू असण्याचे खरेतर आहे कारण माझे जगणे..
सत्य एवढे सुंदर आता नकोच स्वप्ने बघणे!

तू असताना आयुष्याचा बहर काय वर्णावा,
दाटीवाटी करुन सुखांचा रोजच सडा पडावा!

तू असताना परीसर सारा माझ्यासाठी क्षुल्लक!
केवळ तू अन तुझ्या क्षणांचा ठेवा राहतो शिल्लक!

हे छानच.

सुमे काय घेतेस सध्ध्या Uhoh

नाही आम्हाला सांग सिक्रेट आम्ही पण घेउ. म्हणजे आम्हाला पण अशा छान कविता सुचतील Wink

छानच ग Happy

सुमे छान जमलिये.
वर्षीचा धसकाच घेतलाय सगळ्या कवींनी हल्ली. कवितेच्या आधी हिची विडंबन तयार असतात Lol

आईशप्पत दक्षे मनात पण नव्हते याचे विडंबन.. घे आता भोगा कर्माची फळ Lol

http://www.maayboli.com/node/21276

शुकु खरच दक्षीच्या आणी माझ्या पोस्टीत १० मिनिटांचाच फरक आहे Proud

<<तू असताना घरात येती मऊ उन्हे सोनेरी,
झोतामधल्या कणाकणातुनी प्रेम तुझे पाझरी..>>
ह्या ओळी जास्त आवडल्या. Happy

आतून आलेल्या भावना रॉ स्वरुपात जश्याच्या तश्या ओतल्या आहेत. छान कविता. शुभेच्छा.

कविता सुंदर..

तू असताना परीसर सारा माझ्यासाठी क्षुल्लक!
केवळ तू अन तुझ्या क्षणांचा ठेवा राहतो शिल्लक!
हे कडवे खासच

व्वा! एक वेगळाच 'फील' येतो वाचतांना. जणू शब्दही डोळे मिटून स्वतःस कोणालातरी समर्पित करीत आहेत असा भास होतोय.

वा वा... तपशील छान आले आहेत...
शेवटचे कडवे आवडले..
क्षुल्लक आणि शिल्लक ही छान! Happy