तू असताना...

Submitted by वर्षा_म on 17 November, 2010 - 06:09

आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21274

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

तू असताना...

तू असताना आयुष्याचा कहर काय वर्णावा,
दाटीवाटी करुन दुखांचा रोजच सडा पडावा!

तू असताना फुलतो राग सारा मनात माझ्या,
व्यापुन जाते वाक्य न वाक्य शिव्यांनी ताज्या..

तू असताना डोळे माझे होतात पानेरी,
नजरेतल्या तिरातिरांतुन राग तुझा पाझरी..

तू असताना दर्पण माझा दुरून द्वेश करते,
रूप माझे तुझ्याविनाच खूप देखणे दिसते.

तू असताना परीसर सारा माझ्यासाठी क्षुल्लक!
केवळ राग आणि शिव्यांचा ठेवा राहतो शिल्लक!

तू असण्याचे खरेतर आहे कारण माझे असने..
जाते निघुन नकोच तुला बघणे!

गुलमोहर: 

सही !! Biggrin Biggrin