तू नसताना ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 19 November, 2010 - 01:46

आमची प्रेरणा सांगायलाच हवी काय? Proud

तू नसताना बाटल्यांचा बहर काय वर्णावा,
दाटीवाटी करुन बुचांचा रोजच सडा पडावा!

तू नसताना भरतो फ्रीजर सारा घरात माझ्या,
व्यापुन जातो कण न कण वाईन्सने ताज्या..

तू नसताना घरात येती मित्र सारे पिणारे,
ग्लासांमधल्या थेंबा-थेंबातुनी मदीरा गं पाझरें..

तू नसताना ड्रेसिंग-टेबल माझा राग-राग करते,
कॉस्मेटिक्सचे ड्रॉव्हर तुझे, माझ्या चखण्याने भरते...

तू नसताना परीसर पडतो माझ्यासाठी अपुरा!
कधी इथे अन कधी तिथे मी पसरतो सर्व पसारा...

तू नसण्याचे खरेतर आहे स्वप्न माझे नित्याचे..
सत्य एवढे भीषण आता नकोच स्वप्ने बघणे!

ईरसाल म्हमईकर

गुलमोहर: 

Biggrin

Lol Lol Lol Lol

तू नसताना सखे पाहा तो सुर्य मावळत नाही
मैफील आमची धुंद पाहुनी तया जाववत नाही....

तू नसताना वैतागूनी बघ चंद्र रुसे चांदण्यावरी
घ्या आदर्श त्या प्रियेचा, सख्यांनो कृपा करा मजवरी...

तू नसताना फोनवरी मग फोन येतसे शेट्टीचा
सायबा तू येतो.., का पाठवून देवु क्रेट मी बिअरचा ...

तू पण.. म्हणजे काय सुमे...
मी पण विडंबन करतो म्हटलं Wink (तुला काही अजुन अपेक्षित होतं काय "तू पण" मधुन? Proud )

_^_ Happy

तू नसताना फोनवरी मग फोन येतसे शेट्टीचा
सायबा तू येतो.., का पाठवून देवु क्रेट मी बिअरचा ...

ह्हपुवा Happy

ये एकदम बेस्ट बिडंबन हैं मेरे भाई...

sorry...जरा घेतली आहे ना...त्यामुळे bollywood effect हून हिंदीतून
बोलायला गेलो Happy

लै भारी...खूपच् आवडलं

-परीक्षित

Proud