तू आणि तुझे केस.....!!!!!

Submitted by भुंगा on 25 October, 2010 - 10:29

"तू आणि तुझे शब्द" दक्षिणाच्या मुळ कवितेला झब्बू.........

तू आणि तुझे "लांबसडक" केस...
नक्की कोणाच्या प्रेमात पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण डोक्यातला हा गुंता क्षणात सुटला !!.

तुझ्या प्रेमात पडणं जास्त श्रेयस्कर आहे बघ,
कारण....

केसांचा काय, कधीही बॉब कट होतोच की !!!!

डॉ Wink

माझा झब्बू.....

तू आणि तुझ्या "आचरट" कविता...
कुणावर तुटून पडावं??? तेच कळत नव्हतं .......

पण डोक्याला लागलेला हा भुंगा क्षणात सुटला !!.

तुझ्यावर तुटून पडणं जास्त सोयिस्कर आहे बघ,
कारण....

कवितेचं काय, तिच्यासाठी समीक्षक असतातच की !!!!

( Light 1 )

भुंग्या...काय रे हे!!! Rofl Rofl
शॅ!!! आता कविता टाकायला पण भीती वाटते! लगेच 'विडंबन' पडेल म्हणुन!!

विशल्या सकाळी सकाळी खूप हसवलस बघ.... मस्त झब्बू दिलास.... हा घे माझा झब्बा!

तू आणि तुझे "वात्रट" प्रतिसाद...
कशावर हसावं??? तेच कळत नव्हतं .......

पण डोक्याला लागलेली ही कीरकीर क्षणात बंद झाली !!.

प्रतिसादांवर हसणच जास्त सोयिस्कर आहे बघ,
कारण....

तुझं काय, तुझ्यावर येताजाता सगळे हसतातच की !!!!

तुझं काय, तुझ्यावर येताजाता सगळे हसतातच की !!!!>>>>>

हबा, हे बरोबर नाही हा, तुझा स्वभाव (आचरट स्वभाव म्हणावे का?) तू इतरांवर का लादतोयस ?

नाही रे विशल्या ते डिलीट कर आणि काहितरी सॉलिड प्रतिसाद दे त्याशिवाय सुरूवात होणार नाही विपूत ये तुला सांगतो.... तरी काल तयारी कर म्हणून सांगितलेलं तुला.

विशाल,
(आचरट स्वभाव म्हणावे का?) >>> का रे.... दुसर्‍याला हवा तसा झब्बू देतोस आणि स्वतःचा झब्बा उतरवला की नाचाप घालतोस काय? साहित्यिकानी कोणतीही कलाकृती वैयक्तिक घेऊ नये.

(तीर सुटला तो सुटला ह बा, आता नाही माघार?>>> भोग आता)

हब्या, तीर नक्की कुठे लागलाय?>>> तुझ्या मागे कुणी असेल तर त्याला विचार तो देईल काढून तुझ्या हातात.

Pages