गुलमोहर काव्यधाम की जय!!

Submitted by arj on 30 August, 2010 - 10:05

एकदा एक अ‍ॅडिक्ट मायबोलीकर ह. भ. प. बोसरे महाराज "भगवंताचे अवतार आणि अवतारी पुरुष " या विषयावर प्रवचन देत होते.पण सवयीमुळे त्यांचा ओघ माबोवरील संदर्भ आणि चालु घडामोडी यावर घसरला .

"अवतारी पुरुष म्हणजे काय ? अवतारी पुरुष म्हणजे भगवंताचेच फेक प्रोफाइल. प्रकृती आणि पुरुष यांची तुलना तो मायबोली साईट आणि अ‍ॅडमिन अशी करू शकता. भगवंताचे दहा अवतार म्हणजे अ‍ॅडमिनचे निवडक दहा. गुलमोहर युगात गझलांचे मठ स्थापन करून बसलेल्या स्वयंघोषित शंकराचार्यांच्या फुटपट्टीवादाचे खंडन सच्च्या काव्यरसिकांकडून जसे होते; तश्याच प्रकारे सत्पुरुष कर्मकांडाच्या अतिरेकाला व्यर्थ ठरवून भक्ती मार्ग अनुसरतात. बाराखडीचा अट्टाहास हा अर्थाच्या विनाशास कारण असतो हे त्या कर्मठाला कळत असते पण पूर्व संस्कारामुळे ते वळत नाही.

छंदातल्या भुताचे तोडून पाय आले
का माजला पुन्हा रे सोडून काय आले

भलतीच मोजमापे मांडून ठेवलेली
त्या कृष्ण कुंतलांची काढून डाय आले

टीकास्त्र सोडलेले लावून रोज नेम
त्या त्रस्त सृजनांची देऊन हाय आले

तो बाप लागतो का साहित्य संपदेचा
मी झापले पुन्हा अन स्मरवून माय आले

मुक्तछंदाच्या रूपाने मुक्त वाहणार्‍या भक्तीसरितेला यमक, वृत्त मात्रा यांच्या बंधनात वृथा अडवण्याचा व्यर्थ यातना करू नये. 'लोकांनी गझलेतील दुसर्‍या द्विपदीतील दुसर्‍या ओळीच्या चौथ्या शब्दातील पहिली मात्रा खूप आवडली आणि चौथ्या द्विपदीतील पहिल्या ओळीच्या दुसर्‍या शब्दावरील पहिला अनुस्वार तर अहाहा खुपच सुंदर' असे म्हणून काव्यातील अभंगतेचा अपमान करु नये.
तर विषयांतर होतय म्हणुन मुद्द्यावर येते, भगवंताच्या रुपातले, गुणातले निवडून चिवडून घेण्याएवढी पात्रता त्याने अजूनतरी या मनुष्य देहास दिलेली नाही.
काव्य ज्यांचे रंजले गांजले
त्या लोकासी म्हणे जो आपुले
तोची साधु पुरुष ओळखावा
काव्यबोध तेथूनच सुधारावा

आपल्याला काय म्हणायचे ते खरे असल्यास छातीठोक(स्वत:चीच छाती असल्यास) समोर येउन सांगावे, अर्धवट मुखवटे घेउ नये. शेवटी सगळ्या खटाटोपातून काव्योपासना वाढावी आणि अर्थदेवता प्रसन्न व्हावी इतुकीच प्रार्थना आहे .

बोला आपुला थ्रेड काढुन वरी ठेवला
दे धन्यवाद पुन्हा पुन्हा

गुलमोहर काव्यधाम की जय!!

गुलमोहर: 

>>आपुला थ्रेड काढुन वरी ठेवला
>>दे धन्यवाद पुन्हा पुन्हा
Happy

मुक्तछंदात लिहलेले सगळेच वाईट नसते पण अगदी अति गद्य-कविताही लिहु नये.. पण खर म्हणजे इथे दोन्ही टोकाच्या गोष्टी चालू आहेत.... वृत्त्-लयींचा आग्रहही आणि मुक्तछंदाचा रतीबही Sad

मी तुझ्या कवितेला चांगले म्हणतो... तू माझ्या गझलेला वाहवा दे... असा प्रकार चालू आहे एकंदरीत सारा!

असो.... हे ही दिवस सरतील.... अन गुलमोहर पुन्हा बहरेल... नक्कीच Happy

खरच या कवींना /गझलकाराना कुणीतरी आवरा! बाप्पा त्याना (फार कवीता/गझला न पाडण्याची) चांगली बुद्धी दे!

<< तो बाप लागतो का साहित्य संपदेचा
मी झापले पुन्हा अन स्मरवून माय आले >>

सहीच.

आवडलं. आता दुर्बोधतेवरही काही येउद्या, पण जास्त दुर्बोध नको, समजायच नाही. Happy

मस्त !
वृत्त-लय वगैरे बंधनं पाळली गेली तर चांगलंच, पण जास्त महत्व अर्थाला आणि सहजतेला असावं ! ( असं मला वाटतं ) Happy
( माबोवर नवीन असल्याने ह्या ' प्रवचनाची ' पार्श्वभूमी माहीत नाहिये. तसा थोडाफार अंदाज येतोय. मात्र प्रवचन मनापासून पटले !)
........गुलमोहर काव्यधाम की जय!! Happy

पालथ्या घड्यावर पाणी ओतून दमलेल्या माबोकरांनो थोडे प्रवचन ऐका बघू. चित्त शांत होण्यास त्याने मदत होईल हे निश्चीत. Lol
जेव्हा जेव्हा कर्मकांड वाढीस लागेल, घडे पालथे पडून पाणी साठवायची शक्तीच नष्ट करतील तेव्हा अर्थात ह्याच कर्मासाठी हा धागा पुन्ह्याने वर काढण्यात येईलच. Happy
आणि हो इथल्या प्रवचनानेही ज्यांचे दग्ध मन प्रफुल्लीत होणार नाही त्यांच्यासाठी पुढील भजने अगदी रामबाणच!
(अर्थात, आड्यात नसल्याने पोहर्‍यात कुठून या उक्तीनुसार पुढील भजने त्याच मार्गाने गेल्यास नवल ते काय)

http://www.maayboli.com/node/19028

http://www.maayboli.com/node/19012

http://www.maayboli.com/node/18943

बोला, गुलमोहर काव्यधाम की.... जय!!!