तो चिडला...

Submitted by arj on 23 August, 2010 - 11:18

एकदा गझलेवारी टिके मुळे तो चिडला,
त्यापुढे प्रत्येकदा त्याच्यामुळे तो चिडला.

जे हवे ते खरडल्याने भाव नाही साधला
वाचने झाले नकोसे ह्याच्यामुळे तो चिडला.

काय केले लिहूनी हे पाहिले कोणी कुठे
पाहिले हे फक्त की कोणामुळे तो चिडला

नवकवींनी चोपले हा एक योगायोग पण
निघाली लोकात अब्रु ह्याच्यामुळे तो चिडला

ग़जल आणि कविता, कथा वा काही असो
अर्थ शब्दांचे सतत पिळल्यामुळे तो चिडला

मुर्ख मूर्खाला ठरवले, जाहले ऋणमुक्त मी
चिडले ज्याच्यामुळे, माझ्यामुळे तो चिडला

वैर घेण्याची गरज नव्हतीच या माबोवरी
रोज थोडे 'कानफाड़' फुटल्यामुळे तो चिडला

___________________अमरा. Happy

गुलमोहर: 

क्रुपया लोकांना उद्ध्ट reply देण्यास प्रव्रुत्त करु नका!>>>>>
उचललय कुठूनतरी, पण इथं बसतंय परफेक्ट! Happy
आवडेश!!!!!!!!!!!!!!

हा हा हा हा!

जबरदस्त ! काही म्हणा आपला उत्साह व निवड अत्यंत सुंदर! 'ची'डला करावेत अशी विनंती! ही रचना खरोखरच विनोदी झालेली आहे. मी ती वाचतानाच हसत होतो.

मी अजिबात चिडलेलो नव्हतो, त्यामुळे रचना वाचताना आणखीन हसू आले.

आपल्याला शुभेच्छा!

काही म्हणा, खरच हसू आले.

-'बेफिकीर'!

आपल्या माहितीसाठी - मी माझ्या लेखनावर झालेल्या टीकेमुळे कधीही चिडत नाही. त्यामुळे आपले गृहीतक चुकीचे आहे. मात्र! आपण .. हा हा हा हा!

मूर्ख मुर्खाला ठरवले... जाहले ऋणमुक्त मी.. ! अप्रतिम! खरोखर सुंदर!

शुभेच्छा!

अनुजा, काय गं हे..

नको आता शेणावर शिंतोडे,
नको ते जखमांवर असे घाव,
बदलून टाक ती चाल कपटी,
अन येवूदेत पटलावरी नवा डाव..

आपली रचना वृत्तात बसवून देत आहे. मजा आली म्हणून असे केले. लोभ असावा. गैरसमज नको!

एकदा गझलेवरी लिहिल्यामुळे रागावला,
त्यापुढे प्रत्येकदा त्याच्यामुळे रागावला.

जे हवे ते खरडल्याने भाव नाही साधला
वाचणे झाले नकोसे ह्यामुळे रागावला.

काय केले खरडुनी हे पाहिले कोणी कुठे?
पाहिले हे फक्त की कोणामुळे रागावला - हा हा ! सॉलविंवीन

नवकवींनी चोपले हा एक योगायोग पण
काढली लोकात अब्रु ह्यामुळे रागावला

ग़जल वा कविता, कथा याच्यातले काही असो
अर्थ शब्दांचे सतत पिळल्यामुळे रागावला - हे बरोबर झाले आहे (तीर्थ राजाचे सतत गिळल्यामुळे - हा हा)

मूर्ख मूर्खाला ठरवले, जाहले ऋणमुक्त मी
क्रोधले ज्याच्यामुळे, त्याच्यामुळे रागावला

वैर घेण्याची गरज नव्हतीच या माबोवरी
कानफाडे रोजची फुटल्यामुळे रागावला

-'बेफिकीर'

बापरे .. कानफाड फुटल्याचे किती हे आवाज्..कि eco effect समजायचे Uhoh

आता तरी बस करा. इतरांनाही वाचू द्या.. अन वाचवा Happy

.