देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)

Submitted by किरण on 1 August, 2010 - 14:59

देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.

अापण कधी हा विचार केला अाहे का की असा प्रकार अापल्या लिहीण्याच्या पद्धतीत देखील होतो / होअु शकतो? वर्षानुवर्षे देवनागरी लिपी अनेक लोक वापरत अालेले अाहेत. त्यातील अनेक वैशिष्ट्यांमुळे संस्कृत शिवाय अनेक भाषेतील मजकूर जतन करण्यासाठी देवनागरी लिपी वापरली गेली / जात अाहे. मराठी व हिंदी ही नेहमीची अुदाहरणे. मात्र खुप कमी लोकांना हे माहित असेल की देवनागरी लिपी १४ पेक्षा अधिक भाषांसाठी वापरली जाते.

अापल्या पुर्वजांनी देवनागरी लिपी तयार करताना अनेक बाबींचा शास्त्रोक्त विचार केला होता, मात्र वर सांगितल्याप्रमाणे त्यात वेळोवेळी बदल घडत गेले अाणि तत्कालिन कालानुरुप हे बदल ग्राह्य मानले गेले. मात्र अनेक भाषा देवनागरीचा वापर करत अाल्याने त्या त्या भाषेसाठी अनुकूल असेही काही बदल करण्यात अाले अाणि ते काही भाषांपुरते मर्यादित राहिले.

अुदाः हिंदी भाषिकांनी खासकरुन अुर्दू अुच्चारातील बदल कळावा म्हणून नुक्ता (अधोबिंदू ़ कागज़) वापरणे सुरु केले. तसेच काही हिंदी अक्षरे (अ, झ, अंक ५, ८) हे हिंदीत वेगळ्या पद्धतीने लिहीतात.

मराठीत श अाणि ल यांचे लेखन वेगळ्या प्रकारे केले जाते.

केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.

सिंधी भाषादेखील काही ठिकाणी देवनागरीत लिहिली जाते. तिथे काही अक्षरांना अधोरेषा अाहे. (ॻ)

ह्या सर्व नंतरच्या पुरवण्या अाहेत ज्या अापापल्या सोयीप्रमाणे घातलेल्या अाहेत. अॅ व ऑ ह्या अगदी अलिकडच्या मराठीतील भरी!

ह्या भरींबरोबरच काही अक्षरे (मुख्यतः स्वर) त्यांच्या अुच्चारांसकट लयासही गेली अाहेत. जसे की दीर्घ ऋ = ॠ. ऌ व ॡ. ह्यातील ऌ हा मराठीतील क्ऌप्ती ह्या अेकमेव माहित असलेल्या शब्दामुळे जिवंत अाहे.

मात्र मी जो अपभ्रंश म्हणतोय तो हा नव्हे. मूळ देवनागरी लिपीपासून फारकत व्हायला फार पूर्वीपासून सुरुवात झाली असावी. ह्याचे मुख्य कारण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे केवळ भुर्जपत्रावरील हस्तलिखीताच्या स्वरुपातच हस्तांतर झाले. शिवाय प्रत्येकाच्या लिहीण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यात बदल घडत गेले. छपाईचे तंत्रज्ञान अाल्यावर त्या वेळी वापरात असलेल्या लिपीमधे पुढील बदल घडणे थोडे स्थिरावले.

हे बदल कसे घडले असावेत ते अापण पुढच्या भागात पाहू. मात्र पुढचा भाग लिहीण्यासाठी मला किरण फाॅण्ट ची गरज पडेल कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या अावाक्याबाहेर अाहे.

किरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.

(भाग १ समाप्त)
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

काही महत्वाच्या प्रतिक्रिया
limbutimbu | 2 August, 2010 - 23:23

>>>> केवळ मराठीमध्ये असलेले ‘ळ’ हे विशेष अक्षर हिंदी व संस्कृत मध्ये देखील नाही.
माझ्याकडील पुस्तकात, श्री विष्णूसूक्तात दुसरा श्लोक असा आहे
इदं विष्णुर्विचक्रमे त्रेधानिदधे पदम
समूहळमस्य पांसुरे
हा ळ नन्तर ल ऐवजी प्रक्षिप्त असेल का? जाणकारान्नी खुलासा केल्यास बरे होईल स्मित

किरण | 3 August, 2010 - 14:28

pdf मध्ये पण कधी कधी गोंधळ होतो म्हणून बहुतेक इमेज च टाकावी लागेल नाहीतर वाचकांना द्राविडी प्राणायाम करावा लागेल.

लिंबू: संस्कृत मध्ये ळ नाही हे नक्की. बरेच संस्कृत शब्द मराठीत आहेत पण काही शब्द ज्यात मराठी रुपात ळ आहे तो संस्कृत मध्ये ल आहे उदा: कमळ = कमल नळ = नल इ.

बहुधा ती प्रिंटींग मिस्टेक असावी.

अथर्वशीर्षातही "ॐ गं गणपतये नमः" आणि "स ग हिता संधी" ह्या २ ठिकाणी ग च्या जागी वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी चिह्ने वापरलेली मी पाहिली आहेत. काही ठिकाणी आणि आता बर्‍याच पुस्तकात तर "संहिता संधी" असेही वाचले आहे. अशी बरीच चिह्ने आपण हरवलेली आहेत

उच्चाराबबतही योग्य निरीक्षण. मला तर असे वाटते की आपल्या भाषेचे ते वैशिष्ट पूर्वी तरी नक्किच असे होते की तो शब्द ऐकल्यावर त्याच्या उच्चारावरुनच त्याचा अर्थ अभिप्रेत व्हावा.

जसे सॅड गाणे ऐकल्यावर शब्दांशिवायच ते दु:खी गाणे आहे हे समजावे त्याप्रमाणे.

देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबू, तुमचा विषयही ईंटरेस्टींग आहे, वेगळा धागा काढाल का प्लीज? ह्यासंदर्भातील पोष्ट्स तिकडे हलवू.

लिंबु, खरेच वेगळा बीबी कर.

आपल्या वर्णमालेत त्या त्या गटाच्या शेवटी येणारी अक्षरे, अनुस्वारासाठी वापरणे अगदी नैसर्गिक आहे.
असे गट, हि मला वाटते, देवनागरीची खासियत आहे.

पुर्वी हिंदीमधे अ या अक्षरासाठी वेगळे चिन्ह होते. (साधारण प्र सारखे पण त्याला आणखी एक शेपूट असायचे ) हे अक्षर खास करुन हिंदी वृत्तपत्रात दिसत असे. तसेच झ साठी पण एक वेगळे चिन्ह होते. (साधारण भ आणि त्याला अर्धा त जोडल्यासारखे ) हि दोन्ही अक्षरे आता गायब झालीत.

ह मिश्रीत अक्षरांचे उच्चार (जसे घ, भ ) हिदी भाषिकांना जमेनासे झालेत. खास करुन रेडिओवरचे निवेदक, विमानातले उदघोषक हा घोळ हमखास घालतात. (मुन्नाभाई चे मुन्नाबाई करतात.)

फारसी मधून अरेबिक लिपीत येताना असेच झाले असावे. मूळ फारसी लिपीत असणारी, प, ग, च ही अक्षरेच अरेबिक लिपीत नाहीत. आणि हि अक्षरे वापरात नसल्याने, या अक्षरांचे उच्चारच त्या लोकांना येत नाहीत. (प असेलेले अनेक शब्द, अरेबिक मधे वेगळेच रुप घेऊन येतात. जसे इजिप्त हा शब्दच अरेबिक मधे नाही, त्या देशाला ते मिस्र म्हणतात. ) चंद्रकोरीचा पण गोंधळ आहे. ती नाहीच. (जशी ती गुजराथीमधे नाही.) म्हणून पॅलेस्टाईन हा शब्द नसून फिलीस्तीनी हा शब्द आहे.
जसे गुजराथी लोक, मूळ चंद्रकोर असलेले शब्द गुजराथीत आणताना, घोळ घालतात. (नॉन चे नोन करतात.) तसेच अरेबिकमधे पण होते. सॅण्डविच चे चक्क संदावितश होते (च च्या जागी ते तश वापरतात, काय तर्क आहे, अल्लाच जाणे.) असे मराठीच्या बाबतीत व्हायला नको.

>>असे मराठीच्या बाबतीत व्हायला नको.
दिनेशदा, तीच तर कळकळ आहे. काही शब्दांचे उच्चार आपण ऑलरेडीच हरवले आहेत ते शोधुन काढुन नीट करता यायला हवेत.

तसेच, तू जो हिंदीतला वेगळ्या प्रकारे लिहिलेला अ म्हणतोयस तो मला माहित आहे.
खरेतर, त्याला खाली ऋकार लावला तर तो खुपच 'ऋ' अक्षरासारखा दिसतो.
भाग २ मध्ये मी त्या अ बद्दल नाही पण ऋ बद्दल लिहीले आहे.

आपण म्हणजे मी तरी ऋ चा उच्चार फारसा विचार न करता रु असाच करतो. किंवा जर करता आलाच तर र्‍हु. अर्थात दोन्ही उच्चार चुकीचेच आहेत.

किरण, दिनेशदा, अहो सध्यातरी स्वतन्त्र बीबी काढण्यायेवढे मटेरिअल नाही हो माझ्याकडे Sad जे आहे ते खूपच विस्कळीत आहे! एनिवे...
दिनेशदा, छान माहिती सान्गितलीत

>>>> ऋ चा उच्चार फारसा विचार न करता रु असाच करतो. किंवा जर करता आलाच तर र्‍हु. अर्थात दोन्ही उच्चार चुकीचेच आहेत.

ऋ चा उच्चार लहानपणी शिकलो त्या नुसार सान्गायचे ठरलेच तर रु हा उच्चार तोन्डाचा चम्बु करुन निखळरित्या (पण जीभेची थोडीशीच थरथर करुन) होतो, तर ऋ चा उच्चार करताना, मगर पाण्यात थरथरुन जशा लाटा सदृश थरथर पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण करते त्यापद्धतीने जीभेस कम्प देऊन वरील दातान्च्या थोडे अलिकडे आपटवून रु चा तो उच्चार केल्यास ऋ बनतो, रु च्या उच्चारातिल दबवलेली थरथर इथे मात्र उघड केली जाते.
ऋ व ॠ यातिल फरक, ओठाचा पूर्ण चम्बु करुन वा तसे न होता ओठान्चा चबुत्मक आकार थोडा मागे खेचून थरथर लाम्बवुन करता येतो. हा सूक्ष्म फरक आहे, पण तो आहे.
दुर्दैवाने हल्ली उच्चारणामधले हे फरक नाही आईबापान्ना माहित असतात, ना शिक्षकान्ना! (अन हुकमी अधिकाराने सान्गायला मलाही माहित नाहीत) Sad

एक नक्की, देवनागरी, नावातिल देव शब्दानुसारच खरोखरच देववाणी आहे, श्रीमन्त आहे यात शन्का नाही Happy

(आधीच्या पोस्टमधील विषयान्तराबद्दल क्षमस्व, पण, उच्चारणाबाबत अपभ्रन्श न वापरता नेमके उच्चारण करायचे असेल, तर किरणचा वरील विषय अभ्यासायलाच हवा, अन याची गरज मन्त्रोच्चारणात सर्वाधिक असल्याने केवळ मी त्या अन्गाला स्पर्ष करु पाहिले)

आपली अंकलिपी आठवतेय ? त्यात ञ या अक्षरासाठी, काही शब्दच नसायचा. त्या वेळेपासून, त्या अक्षराची भिती वाटायला लागायची. (लिंबू ऋ बद्दलचे पोष्ट खासच !!)

रोमन लिपीने पण देवनागरीचे भरपूर नुकसान केलेय. ऋषी कपूर से स्पेलिंग Rishi kapoor झाल्याने तो रिशी कपूर झाला. आमच्या शिवसृष्टी कॉलनीचे, शिवस्रीष्टी झाले.

लता, सुधीर फडके (आणि त्यांच्या संगीतात जे गायले ते ) यांचा सणसणीत अपवाद वगळता, या क्षेत्रात योग्य उच्चारांची बोंबच आहे. बरेचसे शास्त्रीय गायक पण याबाबतीत आग्रही नाहीत.

आपला ळ तामिळ मधून आला असावा. त्यांच्याकडे ळ चे खास उच्चार आहेत (केळ्याला ते व्वाळ्ळापेळ्ळ्म असे काहीतरी म्हणतात.तो शब्द ऐकून मी माझ्या मित्राला, सीधा केला बोलो ना, असे सुनावले होते. ) मल्याळम मधे पण काही वेगळी अक्षरे आहेत. पालघाट असे आपण ज्याला म्हणतो त्याची पाटी Pallakad अशी वाचल्याची आठवतेय, म्हणजे या दोघांच्या मधलाच उच्चार असणार.

DMK मधला क वरुन सुरु होणारा मूळ शब्द काय, ते मला आजतागायत कळलेले नाही.
पण या दोन्ही लिपीत, यासाठी काही प्रयत्न केले आहेत का, त्याची कल्पना नाही. बहुतेक नसावेत. मी वाचल्याचे आठवतेय, तामिळ लिपीत, क आणि ग, आणि प आणि ब साठी एकच खूण आहे.
मल्लू लोकांना पण बाकी भाषेतील शब्दांच्या उच्चाराचा त्रास होतो ते याच कारणासाठी बहुतेक (सिंबळी, इन्कन टॅक्स, वन्ली )

दिनेश,
>> लता, सुधीर फडके (आणि त्यांच्या संगीतात जे गायले ते ) यांचा सणसणीत अपवाद वगळता, या क्षेत्रात योग्य उच्चारांची बोंबच आहे. बरेचसे शास्त्रीय गायक पण याबाबतीत आग्रही नाहीत.

अगदी बरोबर. विशेषतः 'ष' अक्षराचा उच्चार सुधीर फडक्यांच्या गाण्यातून शिकावा.

मराठी 'ळ' हा तमिळ मधल्या ல, ள, ழ ह्या ३ अक्षरांपैकी एक असावा.

फचिन, हो अरे हे लिखाण करायला खूप वेळ लागतोय. आणि सर्वांना ते मला पाहिजे तसेच दिसायला हवे ह्या (माझ्या) अट्टाहासापायी आणखीनच किचकटपणा वाढतोय. पण जसे जमेल तसे मी टाकतच राहीन. मला मुद्दाम नमूद करावेसे वाटते की तू दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे २ भाग तरी लिहीण्याची प्रेरणा मला मिळाली.

छान

ळ हे अक्षर फक्त मराठीतच आहे असं नाही, तर कन्नड आणि तामिळमध्ये देखील आहे. कन्नडमध्ये ळ हे ಳ असं लिहितात. तामिळमध्ये कसं लिहितात हे माहिती नाही.

@raageshree, मी वरती लिहिले आहेच तामिळ मधील अक्षर. ळ हे अक्षर हिंदी, संस्कृत या देवनागरी लिपीमधील भाषांमध्ये नाही असे मी म्हटले होते. वैदिक संस्कृतामध्ये त्याचा उल्लेख आहे, मात्र कालौघात संस्कृत मधूनही ते नष्ट झाले.

Pages