सचित्र बारा गटग (वृत्तांताशिवाय) - जुलै २०१०

बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला. डोळा मारा

देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!

IMG_7390.JPG

सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या.. स्मित

IMG_7391.JPG

सिंडीने आणलेल्या जिलब्या..

IMG_7392.JPG

वृंदाताईंनी आणलेला दहीभात..

IMG_7393.JPG

दहीभाता बरोबर तळलेल्या मिरच्या.

IMG_7395.JPG

बुवांनी आणलेलं चिकन.. ऑस्सम होतं !

IMG_7394.JPG

शोनूने तळलेले मासे.. मला एव्हडेच मिळाले.. अरेरे

IMG_7396.JPG

लालूचे रॉकींग बटाटेवडे.. नशिब इतके तरी उरले आम्ही पोहोचेपर्यंत !

IMG_7397.JPG

बुवांच्या हॅपीबड्डेचा केक.. पिपाण्यांचा फोटो नाहिये स्मित

IMG_7406.JPG

वृंदाताईंनी केलेले मलाई सँडवीच.. अमेझिंग होते !!!!

IMG_7410.JPG

"लालूच्या रावणपिठल्यापेक्षा माझं जास्त टेस्टी आणि फोटोजनिक होतं" असं सिंडीने सांगितल्याने त्याचा फोटो काढायचा राहिला. फिदीफिदी

माणसांचे फोटो सगळ्यांना मेल करतो.. स्मित

Submit to kanokani.com

इथेही मीच पहिला आलो का बघायला??
मस्त पण स्मित जेवणाची वेळ झालीच आहे!

--------------------------------------------------
कालपासुन कोणीतरी मासे मासे ओरडत होतं.
सायोनं केलेल्या भ. वांग्याचा मोठा फोटो पण मागण्यांमधे होता.
मलाई सँडवीच नव्हते कुठेही फोटोत. आहाहा!
काहीतरीच रेसीपी कोणी कृयोजाटा करणार आहे का?
--------------------------------------------------

भारीच!

मस्त दिसतायत एकएक पदार्थ. स्मित

जिलब्या मस्तच दिसतायत स्मित

वा, वा! वड्यांचा क्लोजअप, मिरच्या, जिलब्या मस्त आल्यात.
>>लालूच्या रावणपिठल्यापेक्षा
मी आणला होता तो पदार्थ 'झुणका'.

कॅट फिश फार भारी झाले होते. माझे तर मासे खाऊनच पोट भरलं, नंतर थोड्या वेळानी सगळ्या भाज्या एक एक ट्राय करुन बघितल्या. मलई सँडविच फारच मस्त! स्मित
झकास आलेत फोटो.

कॅट फिश ??? तिलापीया होता ना तो?.
बाकी फोटो एकदम झकास रे.

शोनू मला कॅटफीश आहे म्हंटली भाई. स्मित
असो, त्या मिरच्या म्हणजे थोडेसे वितळलेले एक्लेअर चे चॉकलेट वाटतायत.

अंबाडी खाल्लीच नाहीस होय! (मग तीच तुझी शिक्षा! फिदीफिदी)
फोटो झकास! स्मित

भारी आहेत सर्व फोटो. माझ्यासाठी खास मसाले भात आणला होता वृंदाताईंनी. त्याचा फोटो कुठाय ?

भन्नाट फोटो.

>>>शोनूने तळलेले मासे.. मला एव्हडेच मिळाले..
चाऽर चाऽर तुकड्या कमी आहेत? फिदीफिदी

वृंदाताईंनी मलई सँडविचेसची पाककृती टाकावी ही त्यांना विनंती. बाई, तुम्ही पण आपल्या अंबाडीभाजीची पाकृयोजाटा!

खास मसाले भात <<< हे बरं आहे.. राग

फिदीफिदी

अंबाडी खाल्लीच नाहीस होय! >>>>> खाल्ली ना चव बघण्यापुरती..
शेवटी ती माझ्यासारखीच होती ना (म्हणे) ! मग कशाला जास्त खा... काही नविन नको का ? फिदीफिदी

लालू.. रावण झुणका ? स्मित

धन्यवाद सगळ्यांना.. स्मित

नाही.
' झु ण का'
'रावण' कशाला आधी? टायटल देताना वापरायची फॅशन आहे काय?

चाऽर चाऽर तुकड्या कमी आहेत? >>माश्यांबद्दल बोलतोय तेंव्हा ४-४ मासेहि कमी आहेत स्मित

चांगले फोटो पग्या. पण यात लालूच्या झुणक्याचा आणि मैत्रेयीने आणलेल्या भाकर्‍यांचा फोटो कुठाय? लालूचा झुणका ही छान होता चवीला. मी तो आणि स्वातीची भाजी,कोथिंबीरीचं लोणचं, माझी कांद्याची चटणी एवढंच खाल्लं भाकरीबरोबर.

<'रावण' कशाला आधी? टायटल देताना वापरायची फॅशन आहे काय?>

असावी. तुमच्या बटाटेवड्यांना कुणितरी 'हिलरीबटाटेवडे' म्हणाले असे आठवते आहे.

स्मित

वृंदाताईंनी मलई सँडविचेसची पाककृती टाकावी ही त्यांना विनंती>> हो हो. जोरदार अनुमोदन आणि विनंती.

वृंदाताईंनी नुसती मलई सँडविचच नव्हे तर डीसी ला जाताना करुन आणलेल्या पुर्‍याही जबरी होत्या. त्याची रेसिपीही हवीच.

तिखट आणि गोड दोन्ही पुर्‍या फारच भारी होत्या! वृंदाताई, तुम्ही बघत असालच इकडे रोमातून तर तेवढं पा कृ देण्यापुरत्या तरी प्रकट व्हाच! नंतर ताबडतोब रोमात गेलात तरी चालेल फिदीफिदी

चांगले आहेत फोटो!
मलई सँडविचबद्दल खूप ऐकून झाले, आता फोटोही पाहिला, तोंपासु, लवकर रेसिपी येउ देत वृंदाताई!!!
पुर्‍यांची पण येउ देत सविस्तर !!

रेसिप्या आल्यावर करून बघाल तेव्हा क्वालिटी कन्ट्रोलसाठी माझ्याकडे सँपल पाठवा. फिदीफिदी

स्वाती, तू केल्यास की आम्हांला पाठव. 'बर्‍या' झाल्यात की नाही ते कळवू. फिदीफिदी
तेवढं अंबाडीच्या भाजीच्या रेसिपीचं मनावर घे.

माझी रेसिपी लिहिली होती ना अमृताच्या (कण्या घालून करायच्या) रेसिपीवर प्रतिसादात.

प्रतिसादात रेस्प्या लिहून आम्हाला कसं कळणार? स्वतंत्रपणे फोटूसह टाकावी.
धन्यवाद!

इथे आहे :

अंबाडी चिरून त्यात थोडी चण्याची डाळ आणि शेंगदाणे घालून कुकरमधे शिजवून घ्यायची. शिजवलेलं पाणी टाकून द्यायचं. शिजली की थोडं डाळीचं पीठ लावून डावेने घोटून घ्यायचं. चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि गूळ घालायचा, आणि भरपूर लसूण आणि एखादी सुकी लाल मिरची घातलेली खमंग फोडणी द्यायची. थोडं पाणी घालून चांगले दोन कढ आणायचे.

जमल्यास भाकरीसोबत खायची. खाताना वरून पुन्हा लसणीची फोडणी घेतली तर बहार येते. जोडीला लसणीचं तिखट किंवा तिळकूट असेल तर बहार दुप्पट होते. स्मित

मृण, टाकते. स्मित

थॅन्क्स. मी चणाडाळ, शेंगदाणे न घालता तूरडाळ. भात आणि मेथी घालते.
भाकरी शिळी असल्यास बहार किती पटींनी वाढते? डोळा मारा

>>प्रतिसादात रेस्प्या लिहून आम्हाला कसं कळणार
तुम्ही विपूत लिहिता ते? फिदीफिदी

माझ्याकडे झुणक्याचा फोटो (स्टेप बाय स्टेप) आहे.

माझ्याकडे झुणक्याचा फोटो (स्टेप बाय स्टेप) आहे.>>> मग तू काय आम्ही ला. पि. वाजवायची वाट बघतीयस का? फिदीफिदी
टाक की ती सचित्र पाकृ.

तो स्टेप बाय स्टेप फोटो आणी थोडा झुणका पाठवण्यात यावा. सिंडीनेही रावणपिठलं आणि फोटो पाठवावेत. म्ह्णजे कंपॅरिझन करणे सोपे जाइल फिदीफिदी

लाल्वाक्का, पण आम्ही स्वातीसारखी, 'प्रतिसादात लिहिलीय पाककृती. तिथे बघा' असं सूचित करून बोळवण करत नाही. कुणी विचारल्यास त्यांच्या विपूत जाऊन (पुन्हा पुन्हा) पाकृ टाकून येतो. फिदीफिदी

तुझ्याकडे पायर्‍या-पायर्‍यांनी पाकृ लिहिलीय म्हणतेस. पण इथे टाकेपर्यंत काय उपयोग आम्हाला? फिदीफिदी लापि मोडात : टाकच सखे! फिदीफिदी