भारतीय रुपयाला आता नवी ओळख मिळाली आहे. अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पाउंड, युरो आणि जपानी येनप्रमाणे आता रुपयाला नवीन संकेतचिन्ह मिळालं आहे.

भारत सरकारनं हे चिन्ह रेखाटण्यासाठी एक स्पर्धा घेतली होती, व आयआयटीतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डी. उदय कुमार यांनी रेखाटलेलं संकेतचिन्ह आज केंद्र सरकारनं निवडलं. येत्या काही महिन्यांत हे चिन्ह आपल्या संगणकावर उमटू शकेल, व या चिन्हाचा सार्वत्रिक वापर सुरू होईल.
रुपयाला मिळालेल्या या नव्या ओळखीचं स्वागत!!!
याबद्दलची अधिक माहिती इथे वाचता येईल - http://business.rediff.com/slide-show/2010/jul/15/slide-show-1-iit-ians-...



छान वाटतय ओळख चिन्ह.
ईंटरेस्टींग माहिती - धन्यवाद चिनूक्स.
नुसते 'रू' लिहीले असते तर का चालले नसते?
म्हणजे आता Rs. च्या ऐवजी हे चिन्ह लावणार का?
नवे की-बोर्ड घ्यावे लागतील का सर्वांना?
अरे वा मस्तच
मस्त
Soni said it would also help in distinguishing the Indian currency from rupee or rupiah of countries like Pakistan, Nepal, Sri Lanka and Indonesia.
Currently, the abbreviation of the Indian Rupee, 'Re' or 'Rs' is also used by Pakistan, Nepal and Sri Lanka.
>>>> हे त्या वर दिलेल्या लिंक मधे वाचलं. हे कारण असावं Rs. सोडून वेगळा असा युनिक सिंबॉल निवडण्यामागे
मस्तच ! छान आहे चिन्ह. ते रुपया रुपया रुपी वगैरे लिहिण्यापेक्षा मस्त वाटतंय. वाचताना तर आपण रुपयेच म्हणणार आहोत
अगदी पाऊंड, डॉलरच्या लायनीत बसल्यासारखं वाटलं.
it would also help in distinguishing the Indian currency from rupee or rupiah of countries like Pakistan, Nepal, Sri Lanka and Indonesia.
>>>> हेच म्हणायचं होतं मला.
मंजू.. हे चिन्ह कीबोर्ड वर टायपायला किती दिवस जातील अंबिका देवीच जाणे...
अरे वा, मस्तच दिसतय.
हो ,टाइप कसं करणार हा गहन प्रश्न आहे.
अंबिका देवीच जाणे>>
मी अंबिका देवी कोण याचा मिनीट्भर विचार करत होते.
काय नाय ! आपला देवनागरीतला 'र' टायपायचा आणि काळ्यापेनाने प्रिंटवर अजून एक रेघ काढायची
अरे बेस्टच की.. कधी जाहीर झाले निकाल? काहीच दिवसांपुर्वी सगळ्या वर्तमानपत्रात ५-६ शॉर्टलिस्टेड सिम्बॉल्स आले होते..
ह्म्म्म, सकाळमध्ये वाचली होती ही बातमी.
शॉर्टलिस्टेड सिम्बॉल इथे टाकता येतील का टण्या तुला?
पाहायची उत्सुकता आहे.
टण्या,
निकाल आज दुपारी जाहीर झाले..
छान आहे चिन्ह..
छान आहे चिन्ह. आता रुपयाला वजन पण मिळो. परदेशात कुठलेच व्यवहार रुपयात होताना दिसत नाहीत, ते बघायचे भाग्य, या आयूष्यात लाभो.
आता BUCK (डॉलर), QUID (पाउंड) प्रमाणे एक नवीन शब्द शोधा. भारतात बरेच लोक रुपयाला BUCKS म्हणतात पण ते चूक आहे..
(आपण काळवीट म्हणू शकतो)
आणि अमेरीकेत देसी लोक डॉलर्सना रुपये म्हणतात.
साध्या टेक्स्टमध्ये भारतीय रुपये वेगळे दाखवायवे असल्यास INR असे लिहिले जाते (अमेरीकन डॉलर करत जसे USD तसे).
टण्या, शॉर्टलिस्टेड चिन्हे पहायला नक्कीच आवडतील.
शॉर्ट्लिस्टेड चिन्हे इथे आहेतः
http://timesofindia.indiatimes.com/India/Cabinet-decides-on-rupee-sign-t...
ह्या यादीत जिंकलेलं चिन्ह कुठे आहे ?
का ६ झाली होती शॉर्टलिस्ट ?
अरे वा रुपयाचे चिन्ह झाले का निवडून.. चांगले आहे.
छान! ''र'' आणि R ह्या दोन्ही अक्षरांशी साधर्म्य असल्याने अगदी परिचित वाटत आहे हे चिन्ह!
ह्या यादीत जिंकलेलं चिन्ह कुठे आहे ? <<< त्यांचा वशीला होता
मस्तय चिन्ह. चिनूक्स इथे दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहित, धन्यवाद चिनुक्स.
अरे वा मस्त बातमी! आवडले चिन्ह!
चिनूक्स नेहेमीच अप टू डेट माहिती देतो.
छान.
मस्त आहे चिन्ह. मला वरच्या शॉर्ट्लिस्टेड लिंक मधलं ४ थं आवडलं.