IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार जाधवने ५०(२९) ची झंझावती खेळी केली आज. पहिल्याच सामन्यात अर्धशतक. Happy
दिल्ली १८३/४

पुणे टीम साठीचा कदाचित एक महत्त्वाचा खेळाडू असेल केदार जाधव... कारण गेल्या तीन वर्षात दोन वेगवेगळ्या टीम्स कडून खेळलाय तो..

हारले बंगळूरकर. दिल्लीवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल. Happy
डी विलीयर्स ने एक अफलातून झेल घेतलाय असे वाचले cricbuzz वरती. कुणी पाहिला काय?

तूनळीवर असेल की... तिथे अख्खी मॅच दिसते... अर्थात अमेरिका सोडून.... किंवा.. iplt20 ह्या साईट वर जा.. तिथे मिळेल..

कुणी पाहिला काय? >>>> नाआआआआअद खुळा होता कॅच तो... अल्टिमेट.. त्याला पण दोन मिनिट विश्वास नाही बसला.. बाउंडरीलाइन वर पकडला..
http://www.gcricket.com इथे लाइव्ह स्ट्रीमिंग लिंक्स आहेत. तूनळीपेक्षा भारी.

आता मुंबई वि. चेन्नई .. धोनी खेळतोय आज

डी विलियर्सचा कॅच अगदी जवळून पाहिला चिन्नास्वामी मधे . अफलातून ...

केदार जाधव ची खेळी तर निव्वळ अप्रतिम

"पुणे आयपीएल टीम" बाफ वर मी काही दिवसापुर्वी लिहिलेलि पोस्ट :

गुरुजी ,
केदार जाधव ला बेन्गलोर / दिल्ली गेले ३ वर्षे बाहेरच बसवत आहेत.
ही त्याची आकडेवारी .

Batting and fielding averages Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
First-class 19 34 6 1282 114* 45.78 2517 50.93 2 7 183 11 10 0
List A 13 13 1 567 141 47.25 553 102.53 2 2 47 14 8 0
Twenty20 8 8 2 115 60* 19.16 84 136.90 0 1 9 2 6 0

प्रत्येक फॉर्मॅट मधे त्याचा पर्फोर्मन्स सध्या आयपीएल खेळत असलेल्या कितीतरी खेळाडुपेक्शा चान्गला आहे . किमान त्याला सन्धी तरी मिळेल .

भरत मयेकर मस्त पोस्ट. तोनगा अनुमोदन. साहेब फॉर्मात आहेत. धोनीचा चेहरा सुरुवातीपासूनच पड्ला होता. लगे रहो. अजून एक महिन्याने फायनल्स.

सेमी फायनलच्या ४ पैकी मुंबई, बेंगळूरू, हैदराबाद चौथी कोण दिल्ली की चेन्नई.
राजस्थान्,कोलकोता ७-८. ब्रेट ली आणि शॉन मार्श चालले तर पंजाब वर येईल.
आयडियाच्या जाहिरातीतला अभिषेक डोक्यात जातोय.

सचिन तेंडुलकरचे वय काय?

सचिन तेंडुलकरचे वय काय असा प्रश्न मला आणि जगभरच्या क्रिकेट रसिकांना पडला आहे. याचा अर्थ , येत्या २४ एप्रिलला त्याच्या वयाला ३६ वर्षे पूर्ण होतील हे आम्हाला माहीत नाही असे नव्हे. ते कोणीही स्वप्नातही सांगू शकेल.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5725743.cms

एकंदर किती सांमने होणार आहेत?
आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात कुणाचे गुण सर्वात अधिक आहेत?

माझ्या मोजणीप्रमाणे, मुंबई व बंगलोर यांना प्रत्येकी ८, त्यानंतर दिल्ली सहा, डेक्कन ५, चेन्नै, कोलकत्ता यांना प्रत्येकी ४, राजस्थान ला ३ व पंजाबला एक असे आकडे आहेत. बरोबर आहेत का?

झक्की बरोबर लिहिलेले आहे तुम्ही...

प्रत्येक टीम एकूण १४ सामणे खेळणार आहेत.. आणि त्या नंतर २ सेमी फायनल आणि फायनल.. पहिल्या चार येणार्‍या टीम्स मध्ये.

झक्की मुंबई , बंगलोर प्र. ८, दिल्ली हैद्राबाद प्र. ६, राजस्थन, कलकत्ता, चेन्नई प्र. ४ आणि पंजाब २ गुण. प्रत्येक विजयासाठी २ गुण पराभव ०. टाय झाली तर सुपर ओव्हर.
प्रत्येक टीम इतर ७ टीम्सबरोबर दोनदा खेळणार म्हणजे त्या ५६ मॅचेस, २ सेमि फायनल, विजेतेपदासाठी १ आणि तिसर्‍या क्रमासाठी १ अशा एकूण ६० मॅचेस. यावेळी ३ नं साठी एक मॅच जास्त आहे. पहा www.iplt20.com

साहेबांनी पुन्हा एकदा बाजी मारली. यावेळेस भज्जी चमकला. १८ बॊलमध्ये ४९ रन. डेक्कन चार्जर्सला नमवले.
महत्वाची घटना म्हणजे लिटल मास्टर सुनील गावसकरांनी म्हटल्याप्रमाणे भर मैदानात मास्टर ब्लास्टरला वाकुन अभिवादन केले. मला वाटते एवढा मोठा सन्मान अजुन कुठल्याही क्रिकेटपटूला मिळाला नसेल.

हा हा. साहेबांची ते आऊट झाल्यावर तंतरली होती. आणि माझ्यासारख्या पाठीराख्यांचीही.१२० च्या दरम्यान स्कोअर होता आणि संघाला बुळकांडी लागलेली. हरभजनच्या इनिंगनंतर धोतरात जीव आला. गिली बाद झाल्यावर तर म्याच जिंकल्यासारखेच वाटले. मलिंग्या ग्रेटच बोलर आहे.

Pages