IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेडोसनी हैदोस घातलाय.... चेनै किरकोळीत मॅच मारणार अस दिसतय... आणि आऊट नाही झाला तर हेडोस शतक नक्कीच मारणार..

गिलीची टीम फेवरेट...फक्त लक्ष्मण त्याच्या बरोबर ओपनिंग ला पहावत नाही>>>> लक्ष्मण हा बळीचा बकरा वाटतो.. दुसरा कोणी धड ओपनर नाहीये तर तू ओपन कर म्हणून सांगितलेला..

सध्यातरी मुम्बई विजेता होईल असे वाटतंय. मुम्बईला सौरभ तिवारी आणि रायडू हे दोन जबरदस्त फलंदाज मिळाले आहेत. अमोल तारे सुद्धा उपयुक्त धावा करतोय. साहेब फॉर्मात आहेतच. ब्राव्हो आणि पोलार्ड हे उपयुक्त अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहेत. झहीर, मलिन्गा व भजी हे तीन प्रमुख गोलंदाज आहेत. तिघेही जबरी गोलंदाजी करत आहेत. फक्त जयसूर्या ही weak link आहे. त्याच्या ऐवजी ड्युमिनी किंवा अभिषेक नायर हे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. एकंदरीत मुम्बईचा संघ खूपच भारी वाटतो.

बराच काळ चर्चेत असलेली 'mongoose' आज हेडनने वापरली ! हेडनच्या खेळाच्या क्षमतेबद्दल मला अजिबात प्रश्न नाहीत, rather माझ्या अत्यंत आवडत्या खेळाडुंपैकी हा एक !
पण ही अशी खास बॉलर्सची धुलाई करणारी 'लांब दांड्याची, जाड mongoose' वापरणं बॉलरच्या दृष्टीनी कितपत fair आहे, याबद्दल मला जरा शंका आहे !
हेडन + mongoose हे combination आज सनसनाटी ठरलं हे मात्र खरं Happy

मस्त मॅच झाली कालची... डेक्कन हरता हरता वाचले.. पठाण ने चोपला शेवटी.
हल्ली प्रत्येक मॅच मधे कॅचेस आणि रन आउट्स खुप होत आहेत.. भारतीय लोकांची फिल्डिंग सुधारलीय की काय ? Proud

आज परत २ मॅचेस.. मुंबै वि. बेंग्लोर आणि कोलकाता वि. राजस्थान.
मुंबै आणि कोलकाता जिंकतील असे वाटतेय.

आपलं पण मत मुंबई आणि कोलकाता... :)..

आज पुन्हा एकदा मुंबईवाल्यांनी धावांचा पाऊस पाडावा.. साहेब पुन्हा एकदा फॉर्मात यावेत.. :)..

आज गेल असेल कोलकत्याच्या टिममध्ये.. त्यामुळे कोलकत्याची फलंदाजीची बाजू बरीच मजबूत असणार आहे..

माझा पण कौल मुंबईलाच पण बंगळूरवाल्यांचे काही सांगता येत नाही... त्यांचे बॉलर लईच फार्मात आहेत... प्रविण कुमार, कॅलिस आणि स्टेन.. जोडीला कुंबळे आहेच.... आणि बॅटींग मध्ये पण कॅलिस अजून पर्यंत एकदाही बाद झालेला नाही.. उथ्थप्पा मारतोच आहे.. आजची मॅच बघायला मजा येणार...

फायनलला मुंबई विरुद्ध बंगळूरु खेळणार असं दिसतय..

राजस्थानचा पहिला विजय. जोपर्यंत दादा मैदानात असतो तोपर्यंत प्रतिपक्षाला हरण्याची काळजी नसते. राजस्थानकडे आता शेन वॉटसन आला की त्यांची घोडदौड सुरू होईल.

Happy गो बेन्गलोर गो Happy
आधी म्हटल्याप्रमाणॅ

बेन्गलोर सगळ्यात स्ट्रॉन्ग वाटतेय
तरुण्/अनुभवी , Batsman/Bowler , hitters/anchors balance छान साधलाय .
महत्वाचे म्हणजे त्यान्चे ७ही होम प्लेयर्स इन्टरनॅशनल लेव्हल्चे आहेत .
Pande , Dravid , Kohli , Uttapa ( ?) , Kumble , Pravin , VinayKumar

मयुरेश, सहमत. दादा कितीही आवडला तरी साहेबांपुढे नाही
<<< म्हणजे 'दादा' पण आवडतो का अजुनही खरच ? Uhoh

दादा मैदानात असतो तोपर्यंत प्रतिपक्षाला हरण्याची काळजी नसते >> Proud
कोलकाता ला ख्रिस गेल किंवा मॅकुलम ची नितांत गरज आहे, बॅटिंग एकदम बेकार.

जॅक कलिस परत नाबाद राहिला.. द्रविड ने एक कॅच अफलातून घेतला..

आज डेक्कन वि. दिल्ली आणि चेन्नई वि. पंजाब.

शेवटी साहेबांचे धोतर सुटले ते सुटलेच अन वार्‍यावर उडाले खूप उड्या मारूनही मागच्यासारखे मात्र ते हातात काही आले नाही Proud

पहिल्या दिवशी मर्तिकाला आलेले बंगलोरियन्स एकदम भांगडा करू लागले आहेत. मल्ल्याला तर एकदम विअ‍ॅग्रा घेतल्यासारखे वाटू लागले आहे. काही म्हणा आय पी एल हॅज इट्स ओन ब्युटी.

तेही मान्य. या खेळाडूंना त्यांच्या लोकप्रियतेमुळे पहिल्या आयपीएल मधे घेतले होते (सचिन, दादा, द्रविड, लक्ष्मण) - मला आठवते त्यावरून त्यांचे नाव लिलावात नव्हते, अजूनही नसते बहुतेक. स्पॉन्सरर्सना ही हे लोक हवे असतील खेळायला कारण मैदानात आणि टीव्हीवर बघाणारे लोक वाढतात निदान त्यांच्या त्यांच्या भागात तरी सर्वसाधारणपणे. सचिन चा अपवाद.

Pages