IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पर्धेची पहिली मॅच डेक्कन चार्जर्स आणि कोलकता नाईट रायडर्स.. गेल आणि मॅकलम दोघही अनुपस्थित असल्याने दादाची टिम बरीच ढपलेली दिसतेय.. तेव्हा डेक्कनवाल्यांचं खातं उघडणार असं एकुण पहाता दिसतय..

यूट्यूब वर अमेरिकेतही फुकट आहेत? मोदी असे करेल असे वाटत नाही.

आपण मुंबईच्या साईडने. त्याखालोखाल कोलकाता. मग बंगलोर. जुन्या निष्ठा!

अमेरीकेत पण दिसणार? आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार उसगावात सोडुन सगळीकडे दिसेल असेच वाचले होते.
ह्या बातमीनुसार , युएस मधे री-ब्रॉडकास्ट करणार म्हणे.

केदार
सॉरी रे, तु विलोचे पॅकेज घेऊन टाक.

महागुरू/फार एंड
अमेरिकेत नाही दिसणार लाईव किंवा ५ मिनिटे उशिराचे प्रक्षेपण. मॅच संपल्यावर पुन्हा दाखवतील तेव्हा दिसेल बहुधा.

KKR Vs DC

KKR बॅटिंग , पहिल्या बॉल लाच विकेट .. Proud मनोज तिवारी आउट.. दादा आलेत

आमच्याकडे पण चकटफू दिसत्यं, मज्जा रे भौ!...क्रिकेट नाही म्हणून होणारी नवरोबाची चिडचिड एकदम बंद Proud दुसरी विकेट Lol

मागे एकदा दादांवरचा मॅगी बनवण्याचा जोक वाचुन ते खेळायला आल्यावर मॅगी बनवायला घेतलं पण आज दादा तितका वेळही थांबले नाहीत! Happy

इच्छुकांसाठी विलो वर IPL & वल्डकप १२० ला आहे.

दादाची विकेट पडल्यावर लै वाईट वाटलं. शाहरुखची टिम मात्र हारायला पाहिजे. Proud

दादाची टीम जिंकणार नाही ..... जुन्या निष्ठा Happy

आत्ताच मिळालेली लिंक. इथे उसगाववासीयांना पण पहायला मिळेल.
ipl2010.bbindas.com/2010/03/11/link-4/

परदेसाई | 12 March, 2010 - 11:09 नवीन
मॅच चालू आहे... www.tvnsports.com ला २०$ ला ६० मॅची आहेत
IE वर मस्त दिसतेय... Replay पण आहेत...

ऑफीस मध्ये असल्यामुळे ट्राय करत नाहीये पण कदाचीत ह्या लिंकवर लाईव मॅच असेल , घरी गेल्यावर ओपन करुन बघेन . कोणी घरी असेल तर ओपन करुन सांगेल का ?
www.ustream.tv/channel/IPL-2010-free-live-streaming

मी पन पहिली पारी बघोन झोपले. रात्री रीडिफ वर कळले क्क्क्क्क्क्क्क्केक्क्क्क्क्क्क्केआर जिंकले.
पण पहिल्या दोन विकेटी काय गेल्या वा वा. पैसे वसूल. ओपनिन्ग सेरीमनी का केला होता? दीपिका
वगैरेचे काय प्रयोजन. शेवट्चा बाबा तर ते चर्चातली जीजस विल सेव यू टाइप गात होतासे वाट्ले. शारुक
नसलेल्या मिशीला तूप लावून येणार आज. नवी झू झू जाहिरात मस्त.

Pages