अस नेहमीच कस होत गं ... .. ... मलाही काही कळत नाही !!
काल संध्याकाळीच तासभर गप्पा मारल्या असताना आज पुन्हा सकाळीच स्वातीचा फोन बघुन मी थोडेसे आच्शर्यानेच 'हॅलो' म्हणाले. माझ्या हॅलो ला तिचा प्रतिसाद च मुळी आला तो, 'अस नेहमीच कस होत ग ?', आणि माझे उत्तर होते 'मलाही काही कळत नाही', बास, पुढची ५ मी. ना मी काही बोलु शकले नाही तिने काही ऐकले. ती फक्त खो - खो - खो हसत राहीली.
लहान पणी एकदा, शेजारचे बिर्हाड बदलुन गेले होते आणि दुसरे येण्या आधि त्यांच्या अंगणात सगळे गवत वाढले होते. कधितरी लपंडाव / शिवणापाणी खेळण्याच्या निमीत्ताने त्या अंगणात जाणे झाले, आणि तिथे शेजारी - शेजारीच दोन लिंबाची रोपे उतरलेली दिसली. त्यानंतरच्या रविवारी मी आणि माझी मोठी बहिण असे आम्ही दोघींनी जाउन ती आणली आणि आमच्या बागेत लावली. तुझे आधि मोठे होते की माझे अशी पैज लावल्याचे पण आठवते. माझ्या रोपाभोवती मी आधि विटांचे कुंपण मग एक लोखंडी ड्रम अशी सतत वेगवेगळी सुरक्षा कवचं चढवल्याने अर्थातच माझे रोप टिकले - वाढले आणि तिचे त्याच उंचीचे राहुन पुढे कधितरी मरुन गेले.
पण माझे रोप नुसतेच वाढले. काही केल्या त्याला लिंब येईनात. कंटाळुन एके वर्षी वडिलांनी आपण आता हे झाड तोडुन टाकुया असे सुचवले. पण मी आपले, नको तोडायला ची भुणभुण चालु ठेवल्याने ते वाचले. आणि आच्शर्य म्हणजे पुढच्या वर्षी त्याला भरपुर फुल आली आणि छोटी-छोटी लिब देखिल आली. पण लिंब जरा जास्तच मोठी होऊ लागली. मग मात्र मी थोडी खट्टु झाले, कारण ती लिंब नसुन ईडलिंब असणार याची मला खात्री पटली.
थोडेसे पिवळे झालेले एक लिंबु मी तोडले, नखाने त्याच एक टवका उडवला आणि सवईने फळाचा वास घेतला, लगेच लक्षात आले की हे ईडलिंबु नसुन ही मोसंबी आहे. खुप आनंद झाला. कारण त्याआधी कधिच आमच्या कडे एकही मोसंबीचे झाड नव्हते. बर जात ही एकदम उत्तम निघाली, पातळ सालीची, रसदार आणि चविला अत्यंत गोड अशी ती मोसंबी अचानकच , अपेक्षा नसताना आपल्या बागेत बघुन मजाच वाटली.
त्यानंतर आमच्या घरी हा एक कायमचा चेष्टेचा विषय होऊन बसला, लिंबाचे म्हणुन लावलेल्या, फळाची भरपुर वाट बघायला लावलेल्या झाडाला शेवटी बहर आला तो मोसंबिचा.
*
या वर्षी नोहेंबर च्या सुरुवातीला कचरा साठवलेल्या एका कुंडीत थोडी माती टाकुन दोन गुलाबाच्या काड्या लावल्या. त्या काही फुटल्या नाही, पण रोज पाणी घालत असल्याने, कुंडीत वेगळीच कसली रोपे उतरलेली दिसत होती. थोडी मोठी झाल्यावर पानांच्या आकारवरुन ती दुधी भोपळ्याची असल्याचे लक्षात आले. पाने तशी थोडी लहान वाटत होती पण कुंडीत निट पोसली नसतील असा विचार केला. बराच आठवायचा प्रयत्न करुनही आठवेना, मी भोपळ्याच्या बिया कधी टाकल्या ते. रिलायन्स मधुन आणलेला भोपळा किडका निघाल्याचे आठवत होते, पण तो तर कोवळा होता.
वेल फुटभरच वाढला असेल नसेल तर कळ्या आल्या, फुले उमलली आणि भोपळे धरले सुद्धा. पहीला भोपळा मोठा झाला, पण ठराविक लांबी नंतर त्याची लांबी वाढेचना. तो जागच्या जागीच गोल - गोल होऊ लागला. तो लाल भोपळा [डांगर] तर नक्कीच नव्हता. थोड्याच दिवसांत मस्त हिरवागार असा तो भोपळा अचानक सुकु लागला आणि त्याच्या रंग ही बदलु लागला पहिले फळ आहे सुकले असेल म्हणुन मी दुर्लक्ष केले. मधले ८ दिवस कामवाली बाईच झाडांना पाणि घालत होती. त्यामुळे माझी - भोपळ्याची कहीच गाठ-भेट नव्हती. रविवारी सुट्टी म्हणुन निवांत झाडांना पाणि घालत होते. आणि लक्षात आले की भोपळा पुर्ण सुकला आहे. बिचारा म्हणुन प्रेमाने जरा हात फिरवला तर तो हातातच आला. आणि पुन्हा एकदा सवईने मी त्याचा वास घेतला. मस्त गोड वास होता त्याचा. त्या क्षणी लक्षात आले की हा भोपळा नसुन हे खरबुज आहे.
आता मात्र आनंद खरच गगनात मावत नव्हता. भलत्या सिझन मधे, कुंडित भोपळा-भोपळा म्हणुन सांभाळलेल्या वेलाला चक्क खरबुज आले होते. लगेच वडिलांना फोन करुन खुष खबर दिली.
आणि हिच बातमी स्वाती पर्यंत पोहोचल्यामुळे तिने मला फोन केला होता, 'अस नेहमीच कस होत ग ?'.
*
खरबुज कमी बियांचे आणि अतिशय गोड होते. अजुन बरिच आली आहेत मोठे होण्याची वाट बघते आहे.
काय मस्त लिहिलय आणि कित्ती
काय मस्त लिहिलय आणि कित्ती छान सरप्राइज. लिंबाच्या जागी मोसंब आणि भोपळ्याच्या जागी खरबुज..
डुचका म्हणजे काय ??
डुचका म्हणजे काय ??
सहिये, लिंबाऐवजी मोसंब आणि
सहिये, लिंबाऐवजी मोसंब आणि भोपळ्याऐवजी खरबुज.
आरती, छान लिहिलं आहेस.
आरती, छान लिहिलं आहेस. वाचायला मजा आली.
मस्त लिहीलस आरती, झाडावरचं
मस्त लिहीलस आरती, झाडावरचं मोसंब, खरबुज पाहून एकदम सुखद आश्चर्याचा धक्का वगैरे बसला असेल ना
आरती, जबरी.. तुझ्या हातात
आरती, जबरी.. तुझ्या हातात कमालीची जादू दिसतेय..
खरबुज पाहून एकदम सुखद
खरबुज पाहून एकदम सुखद आश्चर्याचा धक्का वगैरे बसला असेल ना >> हो खरच ..
आणि आज पण मला सुखद धक्काच बसला, इतके दिवसांनी एक्दम ११ नविन प्रतिक्रीया

मयुरेश, पूर्णा, फचिन मामा, फुलपाखरू, पग्या, अमृता
अल्पना, नानबा, प्रिती, बस्के
.. धन्यवाद सगळ्यांना .
आरती, तू आता कारले आणि दोडके
आरती, तू आता कारले आणि दोडके लावून बघ ना, मला अशी गच्चीतल्या बागेत उगवलेली संत्री आणि डाळिंब खायची फार इच्छा आहे...
जीएस
जीएस
इलायचि घालुन ज्युस>>> करुयात
इलायचि घालुन ज्युस>>> करुयात खरच्.......... अजुन खरबुज आले कि येतो आम्ही.
आता तो अननस लावला आहेस.........म्हणजे फणस मिळणार लवकरच
आरती हे फक्त तुझ्याकडेच होते
आरती हे फक्त तुझ्याकडेच होते असे नाही. ब्रम्हीभूत प.पू . दादा कोंडके यांच्याकडेही असेच होत असावे. म्हणून त्यानी त्यांच्या कवनात पुढील निरीक्षण नोन्दवले आहे.
'कलियुगात झालीया भेळ
लावलं रत्ताळं , आलया केळं '
प.पू .>>
प.पू .>>
जी एस ,मस्त प्रतिक्रिया
जी एस ,मस्त प्रतिक्रिया
मजेदार अनुभव! एखाद्यानं
मजेदार अनुभव! एखाद्यानं पेरलेलं सगळं उगवलं, टिकलं, वाढलं की 'green thumb' आहे म्हणतात तसं आरतीला 'mystery thumb' आहे!
'mystery thumb'
'mystery thumb'
कधी येऊ खरबूज खायला?
कधी येऊ खरबूज खायला?
कधीही .... एक अजुनही आहे
कधीही .... एक अजुनही आहे वेलावर
आरतीला 'mystery thumb' आहे!
आरतीला 'mystery thumb' आहे! >>सहीच!!
मनीप्लँट लावून बघा बरं काही होतंय का? 
तिने मनी प्लॅन्ट लावला तर
तिने मनी प्लॅन्ट लावला तर त्याला कर्जफळे येतील
आरती एकदम चक्राउनच जाइल. मी
आरती एकदम चक्राउनच जाइल. मी काय काय लाउ? आणी मला त्याच काय मिळेल?
आरती फटफट लाउन टाक बघु मनी प्लॅन्ट
काय हो रॉबीन, किमान "मोहरा"
काय हो रॉबीन, किमान "मोहरा" तरी म्हणायचे ..
महेश, सुजा
]
प्रयोग करायल हरकत नाही [हे माझ्या लक्षात कसे आले नाही बरे
काय हो रॉबीन, किमान "मोहरा"
काय हो रॉबीन, किमान "मोहरा" तरी म्हणायचे ..
>>
मोहरा कशा येतील. ? तू रताळं लावल्यावर त्याला केळं येतय ना?
अस बहुदा फ्लॉट संस्क्रुतित
अस बहुदा फ्लॉट संस्क्रुतित जास्त घडते . जागा कमी न कुंड्या जास्त . रुजने हा बी चा धर्म आहे . नंतर अचानक ते लक्षात येते . पण फळे लागल्याशिवाय कुठला वेल ते नाही कळत .
मस्त आहे हे! मिसलं होतं
मस्त आहे हे!

मिसलं होतं वाटतं
@जीएस
किती मस्त अनुभव! छान लिहिलय.
किती मस्त अनुभव! छान लिहिलय.
आरती आज तुझा हा लेख वाचला..
आरती आज तुझा हा लेख वाचला.. अशीच रंगिबेरंगीत फिरतेय सगळ्यांच्या..


लेख मस्तंच झालाय एकदम... खूप आवडला..
काश माझ्याबाबतीत असं झालं तर.. असं वाटून गेलंच एक क्षणभर..
ते खरबूज तुझ्या हातात आल्यावर तुझ्या चेहर्यावरचे भाव कसे त्याची कल्पना करून पाहिली.. तुझ्या लिखाणातून नीटच जाणवतय ते..
प्रज्ञा, मामी, दक्षिणा
प्रज्ञा, मामी, दक्षिणा धन्यवाद सगळ्यांना.
मी आज बघितल्या तुमच्या पोस्ट
मस्त. मज्जा आलि खरच
मस्त. मज्जा आलि खरच
Maayboli's Luther Burbank
Maayboli's Luther Burbank
धन्यवाद आरतीसाय. बीव्ही,
धन्यवाद आरतीसाय.
बीव्ही,
Pages