मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू एका वेळी एकच रॅक ठेवायचे.
पनीर टिक्का जमेल त्यावर. पण त्या रॅकची जाळी जाड आहे त्यामूळे पनीरचे तुकडे तसेच रॅकवर ठेवले तर खाली पडतिल. आणि ग्रिलिंग होताना पाणी सुटतं ते पण खाली सांडेल.
भाज्या ग्रिल करताना किंवा पनीर टिक्का /चिकन टिक्का करताना स्क्यूअर्स किंवा नॉनस्टिक रोटेसरी वापरावे असे माझ्या मावे पुस्तकात लिहिलं आहे. या दोन्ही वस्तू नसल्याने गेल्या वेळी मी भाज्या ग्रिल करताना हाय रॅक वर काचेच्या पसरट ट्रेमध्ये भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या. (बेबि कॉर्न्स, गाजर, मशरूम्स, बटाटे, सिमला मिरची, टॉमेटो आणि कांदे ). बराच वेळ लागला होता ग्रिलिंगला, पण एकंदरीत प्रकरण चांगलं लागलं. Happy

ओके, मी विणकामाच्या सुयांमध्ये पनीर, भो मि इ. ओवून ते काचेच्या भांड्यावर ठेवून ते परत हाय rack वर ठेवून ग्रिल करायचा प्रयत्न केला होता Proud पण कांदा भाजतानाचा फाट् असा आवाज झाला त्यामुळे घाबरून ते प्रकरण बाहेर gas वरच भाजलं होतं.
Wink

माझ्याकडे अनवधानाने ३०लिटरचे स्टँड आलेत की काय मग? Uhoh हे जाम बसत नाहीतच, कितीही प्रयत्न करा Sad एक पाय तरी घसरतोच (:फिदी:) नॉनस्टिक तवा आलाय ग्रिल करण्यासाठी.

केन्स्टारच्या मॉडेलबरोबर स्क्यूअर्स आलेत आईकडे, पण ते प्लॅस्टीकचे Uhoh

प्लास्टिकचे स्क्यूअर्स वितळणार नाहीत का ग्रिल मोड मध्ये?
पौर्णिमा, मग तू दूकानदार किंवा एलजी वाल्यांनाच गाठणे उत्तम.
मला स्क्यूअर्स आणि नॉनस्टिक तवा दोन्ही नाही मिळाले. भ्यां.... मी गेल्यावेळी या भाज्या ग्रील करताना नेहेमीचा नॉनस्टीक तवा वापरून बघावा असा विचार केला होता, पण माझा विचार ऐकून नवर्‍याने डोळे वटारले. Proud

पुनम बसतात ते स्टॅण्ड निट .थोडे पाय दाबायच्जे त्याचे आतमधे. म्हणजे ते व्यवस्थित अ‍ॅडजेस्ट होतात.

स्क्यूअर्स किंवा नोन्स्टीक रोटेसरी क्रोकरी च्या दुकानात जिथे मायक्रोवेव चे बोरोसील चे बाऊल मिळतात तिथे मिळतील

मंजुडी माझं बजेट पाच हजारांपर्यंत आहे. माझ्या बहिणीच्या नवीन घराची वास्तु:शांत आहे. त्यासाठी घ्यायचं आहे.

.

प्राची हल्ली अडीच तीन च्या रेंजमध्ये चांगले मावे येतात असं म्हणतात. माझ्याकडे घरात बिर्ला कंपनीचा मावे आहे. तो मी दहा वर्षांपूर्वी अडीच हजारला घेतला होता. त्यात सर्व होतं. पण ते मॉडेल द्यायची इच्छा नाहीये माझी.

ओके.

काही मावे फक्त अन्न गरम करू शकतात. त्यात अन्नपदार्थ शिजवणे, भाजणे(बेकिंग, ग्रिलिंग) इत्यादी होऊ शकत नाहीत. हे मावे अंदाजे साधारण तीन हजार ते सहा- साडे हजार या किंमतीपर्यंत मिळतात.
काही मावेमधे ह्या सगळ्या सोयी असतात. त्याची किंमत तुलनेने जास्त असते. साधारण अंदाजे आठ हजार ते चौदा-पंधरा हजार आणि त्याही पुढे.

बहिणीच्या गरजा बघ आणि त्यानुसार मावेचा कुठला प्रकार घ्यायचा ते ठरव.

ठमादेवी, म्हणूनच पोस्ट एडिट केली मी. Proud
मी अजून जुन्या काळातच आहे. तेव्हा किमती फार होत्या. आता स्वस्त झाले आहेत. (आमच्या वेळी नव्हतं हो असं :हाहा:)

काही मावे फक्त अन्न गरम करू शकतात. त्यात अन्नपदार्थ शिजवणे, भाजणे(बेकिंग, ग्रिलिंग) इत्यादी होऊ शकत नाहीत. हे मावे अंदाजे साधारण तीन हजार ते सहा- साडे हजार या किंमतीपर्यंत मिळतात.
काही मावेमधे ह्या सगळ्या सोयी असतात. त्याची किंमत तुलनेने जास्त असते. साधारण अंदाजे आठ हजार ते चौदा-पंधरा हजार आणि त्याही पुढे. >>> मला हेच म्हणायचे होते. मंजूने व्यवस्थित सांगितले आहे.

उषा पुरोहित यांनी लिहीलेले मायक्रोवेव्हची खासीयत हे पुस्तक घेतले.
मनात मावेबद्दल अनेक पूर्वग्रह होते, ते सगळे फंडे हे पुस्तक वाचून क्लियर झाले.

प्रस्तुत पुस्तकात पाकृ सुद्धा अगदी रोजच्या वापरातल्या दिल्या आहेत, उदा. अगदी रोजचे दूध तापवण्यापासून ते उपमा, पोहे, सा. खिचडी, उसळी, भाज्या, साधं वरण-भात, पुलाव आणि भाताचे इतर प्रकार, मिठाया, नाश्त्याचे पदार्थ..मासे, चिकन-मटण इ.इ.

पदार्थ करताना गॅस आणि मावे यांचा समन्वय कसा साधावा हे छान समजावलय!

आज हेकायनितेकाय यांनी लिहील्याप्रमाणे मावेत सा. खिचडी केली होती.. मस्त झालेली. एरवीपेक्षा कमी तेल/तुप लागते आणि फटाफट तयार झालीही! धन्यवाद! Happy

majhyakade samsung GW71B convection aahe me tyat kahich karu shakat nahi edalya kelya ekdam kadak zhalya chocolate melt kele jalun gele tyatlyatyat cake bara zhala plz mala sanga kasa temprature set karayacha..........plz....

प्रफुल्ला, तुमच्या मायक्रोवेव्हबरोबर त्याचं एक User Manual ही आलं असेल. ते नीट वाचा आणि त्याप्रमाणे पदार्थांचं तापमान ठेवा. सुरूवातीला गोंधळ होऊ शकतो, पण एकदा अंदाज आला की तुम्ही स्वतःच तापमान सेट करू शकाल.

इडल्या आणि चॉकलेट मेल्ट करण्यासाठी कन्व्हेक्शन ऑप्शन न वापरता, मायक्रोवेव्ह ऑप्शन वापरा.

प्रफुल्ला, इडली करण्यास बेस्ट ऑप्शन मायक्रोवेव्ह नाही. गॅस किंवा इंडक्षन स्टोव वर मोठ्या भांड्यात किंवा कुकर मध्ये पाणी गरम करून त्यात इडली स्टँड ठेवायचा व झाकण ठेवायचे. कुकरचे वेट ठेवायचे नाही. १५ - २० मिनिटे स्टीम केल्यास इडल्या मस्त होतात.

मला मावे घ्यायचाय, पण अजुन कधीच वापरलेला नाहीय, त्यामुळे काहीच डिटेल्ड माहिती नाहीये. इथल्याच टीप्स वाचुन घ्यावासा वाटतोय. त्यामुळे काही अडाणी प्रश्न, कोणत्या कंपनीचा चांगला? जास्त लिटरचा जास्त चांगला असे असतं का? कन्वेक्शन मोड म्हणजे काय? क. मो. असण आवश्यक आहे का? मावे चांगला की ओव्हन? दोन्हीतला फरक काय? मला सध्या तरी बेसिक गोष्टींसाठीच पाहिजे आहे, अन्न गरम करणे, पापड्/रवा/बेसन्/शेंगदाणे वगैरे भाजणे यासाठी. सध्या भाड्याच्या घरात राहतोय पाईपगॅस नाही इथे, एकच सिलेंडर ओळखीच्याकडुन घेतलाय. तो संपला कि दुसरा येईपर्यंत खाण्या-पिण्याचे हाल होतात. म्हणुन अडी-अडचणीला हवा आहे. मी सध्या प्रेग्नंट आहे, मावेतले गरम, थोडेफार शिजवलेले अन्न खाल्ले तर चालेल का?

ओह!! इतकं घातक आहे का मावेतले अन्न प्रेग. मध्ये?? इं.हॉ. वर पापड्/रवा/बेसन्/शेंगदाणे/खोबरं भाजायला गॅस शेगडी इतकाच वेळ लागतो का? जास्त वेळ उभ राहण सध्या जमत नाहीय म्हणुन.
तरीही नंतर मला घ्यायचा असेल तर इन जनरल सजेशन्स द्या ना... Happy

काही भाप्रः मावेमध्ये, शेंगदाणे कसे भाजायचे? आणि मावेसोबत आलेल्या प्लॅस्टीकच्या भांड्यांचा काही उपयोग अस्तो का? माझ्या मावेसोबत दोन मोठी भांडी आलेली झाकणवाली आणि एक इडलीपात्र. नवर्‍याने पॉपकॉर्न बनवण्यासाठी एक भांडं आत ठेवलं तर १० मि त्याचं वरचं झाकण वितळून गेलं. Proud त्यानंतर मी अजून ही भांडी वापरलेली नाहीयेत. Sad

टोकूरीका, हा बाफ पहिल्या पानापासून वाचलास तर बर्‍याच टिपा मिळतील तुला.
पान नं. ३ वर कविनची पोस्ट आहे शेंगदाणे भाजण्याबाबत...

Pages