मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही. पोळ्या नाही करता येत.
लक्ष्मीबाई, गोडबोले नाव असूनही तुम्ही पोळीला चपाती कसे काय म्हणता?

माझ्याकडे जागेअभावी ७ वर्ष पडून असलेला electolux चा मावे फायनली वापरायला काढत आहे. मावे गिफ्ट देणार्‍याने त्याच्याबरोबरचे मॅन्युअल दिले नव्ह्ते. तसेच कुठलीही भांडी मावेबरोबर नाही आलीत. तर त्यासाठी कुठल्या प्रकारची भांडी आणावी लागतील ? यात मायक्रोवेव्ह/ कन्व्हेंशन असा मोड नाहीये. मावेचे वर्जन खूप जुने आहे. त्यातल्या त्यात या product सारखा आहे.
नेहमीचे काचेचे बाउल मावेत चालतात का?

चैत्रगंधा, म्हणजे हा केवळ मायक्रोवेव्ह आहे असं वाटतंय. त्यात ग्रिलिंग, बेकिंग होणार नाही.
जाड काचेची, कोणतंही नक्षीकाम नसलेली भांडी मावे मोडमध्ये चालतात.

तसंच, बरीच टप्परवेअर, लॉक अन सील अशी प्लॅस्टिकचीही भांडी (झाकणाशिवाय) चालतात. त्या भांड्यांवर 'मायक्रोवेव्ह प्रूफ' असं लिहिलेलं असतं. कशी वापरायची हेही लिहिलेलं असतं.

चैत्रगंधा , मावे साठी शक्यतो बोरोसीलची काचेची भांडीच वापर. प्लॅस्टीक मावे प्रूफ असेल तरी न वापरलेले उत्तम.

बटाटे टोचून धुवून एका प्लॅस्टीकच्या पिशवीत (जाड) ठेवावे व पिशवीलाही टोचे मारावे. ५-६ बटाट्यांना ५ मि लागतात व १० मि स्टॅडींग टाईम

मंजूडी , मंजू ने सांगितलेला प्लॅस्टीकच्या पिशवीचा ओप्शन खूप जणांनी सांगितला मला, पण मंजू प्लॅस्टीक ची पिशवी मावे मधे वापरू नका कारण ती थोड्या प्रमाणात मेल्ट होतेच.

मावे सेफ काचेच्या भांड्यात ठेवून ही बटाटे उकडता येतात. ३/३ मिनिटे ठेवून बाहेर काढून बघावे.

करेक्ट सामी. मलाही ते प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवून उकडणं पटत नाही.
बटाटे नुसतेच मावेत फिरवले तर ते भाजले जातात, उकडले जात नाहीत. म्हणजे बाहेरचा भाग अगदी आवळून सुरकुतून जातो.
पाण्यात घालून ठेवले तर पाणी गरम होऊन उकडले जायला बराच वेळ जातो.
या सगळ्यापेक्षा प्रेशरपॅनमधे उकडणं जास्त पटकन, सोपं आणि सोईस्कर वाटतं मला.

मी काचेच्या बाऊल्मध्ये टोचे मारुन धुवून ठेवते मलाही प्लॅस्टीकची पिशवी पटत नाही. धुतलेल्या पाण्याचा ओलसरपणा पुरेसा होतो उकडायला. खूप पाणी टाकल की वेळ व एनर्जीही जास्त लाग ते

मी काचेच्या उथळ डिशमधे बटाटे टोचे मारून ठेवते. त्यात ३/४ चमचे पाणी घालायचं. ४/५ मिनिटानी बाहेर काढून थंड पाण्यात टाकायचे.

मी कोणत्याही मावेप्रूफ सिरॅमिक बोलमध्ये पाणी घालून बटाटे उकडते. टोचे वगैरे काही मारावे लागत नाहीत.

मंजुडीला अनुमोदन. मावे मधे बटाटे सुरकुतलेच गेले जेव्हाकेव्हा केले तेव्हा. पाणी ठेऊन केले तरी. म्हणुन कुकरच वापरतो आता.

टोचे मारले नाहीत तर बटाटे फुटतात. (मिनि एक्स्प्लोजन होते) बटाटयातून वाफ बाहेर येण्यासाठी जागा हवी म्हणून बटाट्यांना टोचे मारायचे.
अर्धी वेळ झाल्यावर बटाटे उलटून (खालची बाजू वर) ठेवायचे.
लांबोडके किंवा खूप मोठे बटाटे मावेत एकसारखे उकडले जात नाहीत. बाहेरचा भाग खपलीसारखा कडक होतो. तर आतला भाग पुरेसा शिजला नाही असे वाटते.

कदाचित तिथले बटाटे वेगळे असावेत म्हणून फुटतात. इथे मी कधीही टोचे मारून उकडलेले नाहीत पण फुटण्याचा अनुभव नाही.

सायो+१. कोरडा बटाटा मावेत ठेवला तर सुरकुततात बटाते. पाण्यात ठेवून 'पटेटो' सेटिंगवर व्यवस्थित उकडले जातात.

मला हा विषय येथे चर्चिला गेलाय कि नाही माहित नाही पण माझा प्रश्न असा आहे - मावे मध्ये चहा कसा करायचा? तो उतू जात नाही का? साहित्याचे प्रमाण व वेळ काय असावी? धन्यवाद.

राजेश,
मावेमधे शक्यतो चहा करू नका.
कारणे
१) दूध घातले नाही तरी उतू जातो. दूध घातले तर जातोच. (फार लक्ष ठेवावे लागते. पण वर येताना दिसला आणि बंद करायला गेलो तरी तेवढ्यात उतू जातो.)
२) टी बॅग वापरली तर ती फुटायची शक्यता असते, पावडर वापरली तरी ती वर येते व सांडते.
३) चहा सांडल्यास अवनच्या आतल्या भागात डाग पडतात.
४) नुसते चहा पाणी उकळून, बाहेर कप काढून साखर घातली तर मिश्रण फसफसून वर येते.
५) मावेच्या तपमानात खुपवेळा चहा अति उकळला जातो आणि कडवट लागतो.

अगदीच गॅस वर करायला वेळ नसेल तर मगमधे फक्त पाणी उकळा. बाहेर काढून त्यात टी बॅग टाका. आवश्यक तितका वेळ ठेवून टी बॅग बाहेर काढा ( टी बॅग पिळू नका, त्याने जास्त टॅनिन बाहेर पडते. कडक चहा हवा असेल तर दोन टी बॅग्ज घ्या. ) मग त्यात आवडीप्रमाणे साखर व गरम दूध घाला.

अर्थात हा वैयक्तीक अनुभव व मत Happy

इथे मी कधीही टोचे मारून उकडलेले नाहीत पण फुटण्याचा अनुभव नाही >> सायो +१

मी पण बरेच दा, ओले बटाटे टोचे मारलेल्या प्लॅस्टीकच्या पिशवी त ठेऊन मावे मध्ये उकडून घेते ..
पिशवी मेल्ट झाल्याचा अनुभव आला नाही अजुन तरी

मी रोजचा सकालचा मावेतच करते. अर्थात त्यासाठी टेक्निक जमायला ४-५ वेळा तुम्हाला ट्रायल एरर करून तुमची पद्धत ठरवावी लागेल.
मी टेटली जिंजर फ्लेवरच्या २ टी बॅग्ज मग मध्ये ठेवते त्यात १ छोटं भांड( पाणी प्यायचं फुलपात्र ) भरून पाणी घालते आणि मावेत १:१५ (१ मिनिट १५ सेकंद) ठेवते. मग इकडचं तिकडचं काम कर परयंत तो मग मावेतच मुरत राहतो साधारण आणखी २-४ मिनिटे. मग त्यात हवे तितके दूध घालून मग पुन्हा साधारण १:२० सेकंद ठेवते.
बाहेर काढून टीबॅग्ज काढून टाकते आणि साखर घालून परफेक्ट चहा पिते. Happy

मावे मध्ये चहा करायचा असेल तर-
मावे प्रुफ कपा मध्ये पाउण कप पाणी घेऊन, त्यात टि बॅग टाकून (पाणी + दुध च प्र माण हे आपल्या आवडी नुसार) १ ते दिड मिनीट गरम करा
कप बाहेर काढा, टि बॅग काढुन टाका, पाहिजे तितके दुध टाकुन अर्धा ते पाउण मिनिट परत मावे मध्ये गरम करा (मावे कडे लक्ष असु द्या मात्र)

कप बाहेर काढुन चमच्याने हालवून, ह ळु हळु साखर टाका जेणे करून चहा उतू जाणार नाही..

पाणी आणि टि बॅग सोबत आल्याचा तुकडा / दालचिनी / विलायची (आवडी प्रमाणे ) टाकून फ्लेवर्ड चहा पण करू शकता

टेटलीच्या टी बॅग्ज ना नसते पिन मारलेली.
इथे मावेत जितके लोक चहा करून नियमित पणे पितात त्या प्रत्येकाची कृती थोडीफार वेगळी असणार आहे तेव्हा थोड्या ट्रायल-एरर ला पर्याय नाही - हे मघाशी सांगायचं राहिलं होतं Happy

शुम्पी, दिनेश, माधुरी१०१, राजसी - सर्वांचे आभार. मी आता प्रयत्न करून पाहतो. ट्रायल एंड एरर ला हरकत नाही. आतापर्यंत बर्याच गोष्टी मावे मध्ये तशाच केल्या आहेत. Lol

टी- ब्याग ला पर्याय म्हणून पावडर नाही का वापरता येणार? मावे साठी मावे प्रुफ कप नाही माझ्याकडे; पण थोड्यावेळासाठी म्हणून साधा प्लास्टिक चा कप चालेल काय?

धन्यवाद.

पण थोड्यावेळासाठी म्हणून साधा प्लास्टिक चा कप चालेल काय? >> नाही चालणार...
पावडर वापरून कधी मावे मध्ये केला नाहीये चहा... पावडर वापरला तर चहा गाळावा लागेल.. त्या साठी २ कप लागतील.. ते धुवावे लागतील.. बरेच कष्ट आहेत Wink

मी एक मोठा ग्लास चा मेझरींग कप चहासाठीच ठेवला होता. त्यात मॅकस २ कप चहा बनवते. उकळल्यावरही बाहेर पडायला नको. ह्या कपात २ कप चहासाठी पाणी साखर आणि चहापत्ती टाकुन १:३० मिन उकळायचा, दोन एक मिनीटांनी दुध टाकुन १:३० मिन उकळायचा. ५ मिन मधे चहा तयार. ग्लासच असल्यामुळे भांड धुवायला जास्त त्रास होत नाही. (म्हणजे गॅस वर केलेल्या भांड्यापेक्श्या कमी)

डिस्पोजेबल कागदी कपात मी मावेत चहा करायचो. टी ब्याग टाकून पाणी उकळून घ्यायचे. ३ मिन. मग बाहेर काढून दूध / मिल्क पावडर घालून टी ब्याग काढून पुन्हा अर्धा एक मिनिट मावेत ठेवायचे.

मावे मधे वाटली डाळ ( गोडाची (लाडवासाठी) आणि तिखटाचीपण ) चांगली होते. कमी तूपात/तेलात होते आणि फारवेळ परतावे लागत नाही.

Pages