मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच लायब्ररीतून मायकेल पंड्या यांचे 'इंडियन मायक्रोवेव्ह कुकिंग, हे पुस्तक आणले आहे.
चाळले असता चांगले वाटले. मावेत कसली भांडी वापरावीत, भांड्यांचे आकार काय असावेत ,काय काळजी घ्यावी हे देखील सांगितले आहे. चपाती, डोसा कसा करायचा मावेत तेही आहे. आपल्या रोजच्या जेवणातल्या पदार्थांची मावे कृती दिलेली आहे. कुठे मिळाल्यास वाचून बघा.

मी नुकताच मायक्रोवेव्ह वापरायला सुरुवात केली आहे. फ्रेंच बीन्स, गाजर, कोबी, सिमला मिरची वगैरे भाज्या त्यातच आधी शिजवुन घेते. कुकर मधे भाज्या शिजवल्यास किंवा पातेल्यात उकळल्यास त्यांचा रंग फेड होतो आणि भाजी निस्तेज दिसते. मावे मध्ये असं होत नाही.भाज्या सतेज दिसतात.
पण रोज मावेचा वापर करणे आरोग्यासाठी ठीक आहे की नाही? आंतरजालावर मावे अपायकारक आहे आणि चांगला आहे अश्या दोन्ही बाजुंची माहीती आहे.
माझ्याकडे सॅमसंग चा कॉम्बो मावे आहे. त्यासोबत एक प्लॅस्टिकचा कुकर, एक प्लॅस्टिकचे छोटे भांडे, प्लॅस्टिकचे इडलीपात्र आणि कप केक चा साचा मिळाला आहे. हे प्लॅस्टिक वापरायोग्य आहे का? रोज वापरता येऊ शकते का?
कृपया माहीती द्यावी..

प्लास्टिक मी शक्यतो वापरत नाही (गरजही पडत नाही काचेचा सेट आहे वेगवेगळ्या आकाराचा म्हणुन) पण जे मायक्रो सेफ म्हणुन लिहीलेले असतेते वापरायला सेफ असते. फक्त ते कनव्हेक्शन मोड वर वापरु नये.
तसच जास्त वेळा साठी हाय पॉवर वर ठेवल्यास व अधुन मधुन बघायच राहुन गेल्यास भांड मेल्ट होऊ शकत (मला तसा अनुभव आलाय)

धन्स कविता. मलाही प्लॅस्टिक वापरणं बरोबर वाटत नाही..पण सॅमसंग वाल्यांनीच मावे सोबत हा सेट दिल्यामुळे कदाचित ऑथेंटिक असावं असं वाटत होतं मला.

काचेचा सेट कुठल्या कंपनीचा घ्यावा?? तेही सांग ना जरा..

माझ्याकडे बोरोसिल ची ३ वेगवेगळ्या आकारातली भांडी आहेत ती कुकिंग, बेकिंग साठी पण चालतील अशी आहेत.
बाकी नुसतं गरम (३ ते ४ मिनिट ठेवण्यासाठी) करण्यासाठीचा एक सेट (एकात एक बसतील अशी ४ भांडी आहेत) मला भेट मिळालाय (कंपनी नाही आठवत पण त्यावर मायक्रोमधे गरम करण्यास सेफ अस लिहीलय) (२ मग आहेत ते देखील पाणि गरम करण्यास सेफ असे आहेत)

'बोरोसिल्'ची भांडी सर्वात चांगली असं दोन दुकानदारांनी सांगितलं मला. त्यांच्याच भाषेत- लाईफ लाँग जातील (म्हणे) Happy
'ट्रीओ' ची भांडी स्वस्त असतात, आणि टिकतातही तितपतच. (माझं ठिकर्‍या उडालेलं भांडं ट्रीओचंच :()

मुग्धा मावे सोबत मिळालेल्या प्लॅस्टीक्च्या भांड्याची क्वालिटी यथातथाच असते.
माझ्या एलजी मावे सोबत मिळालेल्या एका बाउल मध्ये पहिल्यांदाच शिरा बनवला मेनु सिलेक्ट करून ( त्यामुळे जास्त तापण्याचा संबधच नव्ह्ता) तरी भांडे खराब झाले.
काचेचीच भांडी बेस्ट. Happy

हो. प्लॅस्टिक मस्त वितळलेलं पाहिलंय ­मी.

माझ्या मित्रानं डॉमिनोज् चॉकलेट लावा केक मावेत ठेवून, त्याकडे लक्ष न देऊन, केवळ एका मिनिटात ती "मायक्रोवेव सेफ" प्लॅस्टिक डिश पार वेडीवाकडी करून दाखवलीय. Happy

बोरोसिल्'चीच काचेची भांडी वापरा. आणि ती जडच असतात त्यामुळे आपण ती जपुनच हाताळत्तो त्यामुळे फुटत नाहीत ती लवकर.
आणि प्लास्टीकची भांडी वितळातात Sad मी नुकतच डीमार्ट मधुन मावेसेफ घेतल होत त्याच झाकण पहिलयाच प्रयत्नात तडकल होतं Sad
मी जास्त काचेचीच भांडी वापरते पण प्लास्टीकही वापरते.

काचेच्या भांड्यातही प्लेन काचेची म्हण्जे कोणतेही डिझाइन नसलेली, रंगकाम-नक्षीकाम नसलेली भांडी चांगली. भांड्याचा आकार पसरट असलेला बरा. उभी भांडी शक्यतो नसावीत. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर बोरोसिल, पायरेक्स ची भांडी चांगली वापरायला.

फ्रेंच बीन्स, गाजर, कोबी, सिमला मिरची वगैरे भाज्या त्यातच आधी शिजवुन घेते. कुकर मधे भाज्या शिजवल्यास किंवा पातेल्यात उकळल्यास त्यांचा रंग फेड होतो आणि भाजी निस्तेज दिसते. मावे मध्ये असं होत नाही.भाज्या सतेज दिसतात.
>> हे कसं करतेस (कुठल्या प्रकारच्या भांड्यात) आणि त्याला साधारण वेळ किती लावतेस.

सॅमसंगवाल्यानी मला एक एकुलतं एक काचेचं भाण्डं दिलय मी जास्त करून तेच वापरते.

नंदिनी,सॅमसंगच्या कॉम्बो मावेत ऑटोकुक फिचर आहे. त्यात मेनू सिलेक्ट करुन करते.. भाजीच्या वजनानुसार थोडं पाणी टाकुन मग भाजीचं भांडं मावेत ठेवा अशी सूचना आहे त्या मावेच्या पुस्तकात. साधारण चार मिनीटं फिरतं ते भांडं आत.
माझ्यामते ९०० वॅ वर २ मिनीटे मायक्रोमोड वर झाकण असलेल्या भांड्यात भाजी शिजायला हवी.
- भाजी चिरुन मावे च्या झाकण असलेल्या भांड्यात ठेव.
- त्यात कमीत कमी २ मोठे चमचे आणि जास्तीत जास्तं चार मोठे चमचे पाणी घाल.
- झाकण लावुन २ मिनिटे मायक्रोमोड्वर होउ दे.

फ्रेंच बीन्स ला ३ मिनिटे ठेउन बघ...

अजुन तरी प्लॅस्टिकच्याच भांड्यात करते कारण काचेची भांडी अजुन घेतली नाहीत मी..मलाही एक काचेचं भांडं मिळालंय पण त्याला झाकण नाही Sad त्यामुळे वापरता येत नाही..

मला हा प्रश्न कुठे विचरु कळले नाहि म्हनुन इथे लिहित अहे....
केक पिझ्झा साठि ओवन चान्ग्ले आहे कि मावे ?
अनि ओवेन मधे पण बरेच प्रकार अस्ल्यमुले कोणता घ्यावा हे पण क्रूपया सन्गा.

मेधा२००२,
मी IFB चा मावे वापरतेय गेले ८ महिने, एकदम बेस्ट! रेडि मेन्यूज्‌ पण आहेत, Manual Setting पण आहे, डिफ्रॉस्ट बाय वेट आहे, केक, ढोकळा छान होतो, फोडणी देऊन सुक्या भाज्या पण करता येतात. सगळ्यासाठी मी शक्यतो काचेची भांडीच वापरते. (कित्येकदा काचेच्या भांड्यात स्टीलचा चमचा चुकून राहिला तरी काही भयंकर घडलं नाही.) सॅण्डविचेस्‌, पॅटिस तर मस्त क्रिस्पी होतात. शॅलो फ्राय करायचे पदार्थही मस्त होतात. वरून तेल माखून लावायचं आणि ग्रिल मोडवर २-३ मिनिटे ठेवायचं. बटाट्याच्या काचर्‍या, वांग्याच्या कापट्या, सुरणाचे काप, पॅटिस वगैरे शॅलो फ्रायवाले पदार्थ टकाटक होतात. काचेच्या बेसवरच तेल माखून ठेवायचे ग्रिल मोडवर.

खुप छान माहिती मिळाली. मी पण घेतलाय २-३ महिन्यांपुर्वि पण थोडी भिती वाट्ते.. आता जरा वाचुन करेन काहीतरी ..
धन्यवाद.

कोणी ३ इन १ ब्रेकफास्ट मेकर(oven,breakfast maker,Coffee maker) वापरला आहे, आम्च्याकडे गीफ्ट म्हणुन आलेला आहे पण तो कसा वापरतात, त्यात काय काय कस करता येइल ते कळत नाहीय, manual मध्येपण सविस्तर टीप्स नाहीत. कोणाला अनुभव असल्यास सांगावे......

http://sunrisehome.en.made-in-china.com/product/veNQushxZlkz/China-3-In-1breakfast-Maker-921-.html

यासाठी नवीन पान उघडु का? की इथेच चालेल?

कोणी ३ इन १ ब्रेकफास्ट मेकर(oven,breakfast maker,Coffee maker) वापरला आहे, आम्च्याकडे गीफ्ट म्हणुन आलेला आहे पण तो कसा वापरतात, त्यात काय काय कस करता येइल ते कळत नाहीय, manual मध्येपण सविस्तर टीप्स नाहीत. कोणाला अनुभव असल्यास सांगावे......

http://sunrisehome.en.made-in-china.com/product/veNQushxZlkz/China-3-In-...

यासाठी नवीन पान उघडु का? की इथेच चालेल?

कृपया याचे उत्तर द्यावे........

नेनिश
१)पापड नुसते तेल लावुन/ तुप लावुन (तुप लावुन मस्त लागतात)/पाणी लावुन मावेत अरेंज करुन हाय पॉवर वर ३० सेकंद ते १ मिनिटासाठी ठेवायचे. मधेच वाटल तर एकदा मावे उघडुन उलटे करायचे
२) शेंगदाणे पसरट (शक्यतो) काचेच्या बोल मधे ठेवुन मावे हाय वर ३-४ मिनिटा करता ठेवायचे (१/२ किलो असतील तर आधी ३-४ मिनिटे) लागल त र्वेळ वाढवायचा. पण हाय पॉवर वर ठेवल की अधुन मधुन उघडून हलवावे लागतील. किंवा ८०% वर जास्त वेळासाठी ठेवावेत. कमी वेळा लक्ष द्यावे लागते अशाने. (वेळ ही ट्रायल अँड एरर पद्धतीने कमी अधीक करावी लागेल)

वाटल तर एकदा मावे उघडुन उलटे करायचे>>
Uhoh काय सांगता?
अख्खा मावेच्या मावे उलटा करायचा उघडून? गॅस बराच सोयीचा की त्यापेक्षा! Proud

(दिवा घ्याच. )

गॅस बराच सोयीचा की त्यापेक्षा!>>आर्फी गॅस उलटा करता तुम्ही Wink Proud रच्याकने तो दिवा सिएफएल चा आहे का तरच घेते Wink

नेनिश तुम्ही पापडच उलटे करा हो उगाच आर्फिसारख वाटुन मावे उलटा करायला जाल Wink Proud

मला मावे मधल्या केकची रेसिपी / लिंक सांगा ना. शिवाय प्लॅस्टिकच्या / अ‍ॅल्युमिनियम च्या साच्यात केला तर चालतो का?

साध्या मावेमोड वर केक करायचा असेल तर बॅटर नेहमी प्रमाणे रिबन कंझिस्टंसी वाल पण सेटिंग ठेवताना अस ठेवायच
मावे मोड ऑन्---->सेट पॉवर अ‍ॅज हाय (१००%)--->सेट टाईम अ‍ॅज ३ मिनिट्स्---->अगेन सेट मावे पॉवर अ‍ॅज ८०%---->सेट टाईम अ‍ॅज २ मिनिट्स्--->देन प्रेस स्टार्ट बटन

अस केल्याने मावे आधी १००% वर ३ मिनिट रन होईल आणि ऑटोमॅटिक ८०% वर २ मिनिट चालेल. स्तँडिंग टाईम ३० सेकंद (केक झाला नसेल तर पुन्हा एखाद मिनिट मावे चालु करायचा)

Pages