पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

??

धुंद बेधुंद पावसात भिजावं म्ह्टलं तरं,
पाऊल उंबर्‍याशी अडखळलं होतं,
अखेर पावसाच्या थेंबानाच
डोळ्यातल्या थेंबाचं दु:ख कळलं होतं..

२.
वेशीबाहेरचा अन गावातला पाऊस
असा भेदभाव कधीच कोणी करू नये,
आपल्या मर्जीने कोसळणार्‍याला,
मर्यादेच्या साखळदंडात जखडू नये..

सुकी, ही दुसरी छान.....

तु पण चंगो सारखं काढ ना तुझ्या चारोळ्यांच पुस्तक Happy

आता सवयीचं झालंय मला
मी निघताना तुझं माझ्या डोळ्यांत पाहणं
आणि त्या नजरेने जखडून
माझं सवयीनं काही क्षण रेंगाळणं..

निंबुडे नक्की काढेल.. एक पॉकेट बुक. Happy

कशाला जातेस मग,
मला असं सोडून..
रंगात आलेला डाव प्रितीचा,
जातो ना उगाच मोडून Uhoh

शुभ्र गोर्‍या देहावर,
स्पर्शाची फुले सांडली,
कठीण तो संभाळता संयम,
मर्यादरेषाच जणू लांबली...

भल्या पहाटे फुलांचा सडा,
अगंणी दरवळून गेला...
चांदण्याच्या हा सुंगधी आभास,
धरेवर कसा चमकून गेला...

मिटून जातात डोळे अपोआप,
ओठांचे सवांद चालताना,
असचं काहीसं घडतं का हो,
पहिल्या सरी अंगावरून कोसळताना..

खूप वाटतं मनात
की आज ओलंचिंब भिजावं,
आपणही एक थेंब होऊन,
काळ्या मातीत मिसळावं...

Rofl तो किताब ६ वर्षापुर्वीच मिळालायं.. Wink आता फक्त पानं उलटून एका एका आठवणीला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करतोय.

double century !

तुझा सहवास आणि,
मातीचा सुवास अगदी सारखंच,
किती ही प्रीत लावली तरी,
क्षणिक विरहाला सारं पारखंच...

झूळूक मधे मी पोस्ट केलेल्या चारोळ्या लवकरचं ऑडिओ स्वरूपात ऐकायला मिळतील.

आधंळ्या न्यायदेवतेवर,
नित्याने अत्याच्यार होतो,
गुन्ह्यासाठी युक्तिवाद अन
निर्दोषाच्या पाठीत वार होतो...

आकाशातलंच चांदणं,
तुला माझ्यापेक्षा जास्त भावतं,
माझं मात्र वेडे,
तुझ्या आठवांवरचं निभावतं...

तू अन मी असे विरुद्ध किनारे,
हा आभासही जाळायला उठतो,
दोघांमधला तो प्रवाह पाहता,
माझ्यातला तो वणवा आपोआप विझतो..

चारोळ्यांच्या गारा वेचायला लावतोस,
वादळासारख्या चारोळ्या ओततोस
आणि तरीही स्वतःला मात्र
''सुर्यकिरण'' म्हणवतोस?

आपल्यावरचा दिवस मावळला तरी
सूर्य असतोच तळपत कोणाच्या तरी डोक्यावर
प्रश्नांची रात्र घेऊन झोपतो आपण
सूर्य मात्र बिन्धास्त फिरत असतो जगभर !

वैद्य मस्त चारोळी.. निंबूडे उत्तर काय गं ... Wink

ज्वालेशी माझी सलगी असली तरी,
गारव्याशी माझे वैर कधीच नव्हते,
सरींसोबत भिजताना सोडली असेल लाज,
म्हणून गैर त्यात काय होते?

Pages