या आधी,
गाण्यातला तात्या - १ - वृक्षवल्ली आम्हा..
व्हायलीन ब्रदर्सची
बंदिश सिंफनी.. (येथे ऐका)
उस्ताद अमज़द अली खान. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व..त्यांचे शिष्य देबशंकर आणि ज्योतीशंकर हे 'व्हायलीन ब्रदर्स' म्हणून प्रसिद्ध आहेत.. हे व्हायलीन बंधु हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य अभिजात संगीतात खूप चांगलं काम करत आहेत..पं रविशंकर, उस्ताद अमजदालि खासाहेब, त्याचप्रमाणे झुबिन मेहता यांच्याकडूनही त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे..
'बंदिश सिंफनी'ची मूळ संकल्पना आणि संगीत उस्ताद अमजद अलींचे. राग यमन! यमनाची अगदी सुंदर सुरावट बांधली आहे खासाहेबांनी. आलाप-जोड-झाला आणि गत या अंगाने जाणारं प्रत्येक स्वरावलीतलं स्वरांचं नक्षिकाम आणि लयीची गुंफण अतिशय सुरेख..लयीचं काम तर विशेष छान झालं आहे! व्हायलीन ब्रदर्सनी अर्थातच अगदी लयदार, सुरेल, वाजवलं आहे. तानक्रिया सफाईदार आहे. तबला-मृदुंगासहीतचा सारा वाद्यमेळही त्यांनीच बांधला आहे..
अवघ्या तीन-साडेतीन मिनिटांचा हा यमन निश्चितच भव्यदिव्य आहे, श्रवणीय आहे.. यमनची ही सुरेख हार्मनी-सिंफनी मनाला आनंद देऊन जाते!
-- तात्या अभ्यंकर.
छान आहे... तीन मिनिटात
छान आहे... तीन मिनिटात वायोलीनवर यमन कधी ऐकला नव्हता... आणखी अशा लिन्क द्या..
धन्यवाद तात्या.. इलयाराजा आणि
धन्यवाद तात्या..
इलयाराजा आणि पं. हरिप्रसाद चौरसियांच्या एका सिंफनीतही यमनचा सुरेख वापर केला आहे..
@चिनुक्स, कृपया दुवा देऊ शकाल
@चिनुक्स,
कृपया दुवा देऊ शकाल का?
तात्या.
ऑनलाईन शोधायला हवं. ..Nothing
ऑनलाईन शोधायला हवं. ..Nothing but wind हे या अल्बमचं नाव आहे.
@चिनुक्स, ओके सर, शोधायचा
@चिनुक्स,
ओके सर, शोधायचा प्रयत्न करतो..
तात्या.
वाह!!! अतिशय सुरेख!
वाह!!!
अतिशय सुरेख!
जबरी !
जबरी !
वाह तात्या !
वाह तात्या !
अहाहा !! मस्तच.. धन्यवाद !
अहाहा !! मस्तच..
धन्यवाद !
मस्त.. छान वाटले ऐकायला अजून
मस्त.. छान वाटले ऐकायला
अजून नवीन क्लिपा टाका
वा तात्या.. मजा आली , धन्स...
वा तात्या.. मजा आली , धन्स...
तात्या.. मस्त आहे ही सिंफनी.
तात्या.. मस्त आहे ही सिंफनी.
सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे
सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे आभार..
तात्या.
तातोबा, तुस्सी ग्रेट हो....
तातोबा, तुस्सी ग्रेट हो....
सही !!... एक नंबर
सही !!... एक नंबर
ह्या सिफंनीने वेड लावलं. (एक
ह्या सिफंनीने वेड लावलं. (एक पोस्ट पुरेसी नाही की काय म्हणून दुसरीही. तातोबा हे उधार राहीलं आपल्यावर, एक सुंदर कम्पोझिशन ऐकवून ह्याचा भार उतरविला जाईल.)
तात्या, याची सी डी मिळते का?
तात्या, याची सी डी मिळते का? नाव काय आहे?