खूप काही अनाउन्समेंट कानावर पडतायत...
त्यात फेरीवाल्यांचे आवाज वेगळेच...
ट्रेनचा डबा तसा फारसा भरला नाहीये पण नजरेला कोणी भावत नाहीये ...खिडकीतून पाऊस दिसतोय .. ofcourse मला विंडो सिट यासाठी तर आवडते ...खूप दिवसांनी गावाला जातेय ..एक्साईटमेंट होती ..पण आता कमी होत चालली आहे कारण ट्रेन अर्धा तास झाला आहे तिथेच आहे ....
स्टेशन फारसं ओळखीचं नाहीये म्हणून खिडकीतून जमेल तेवढा जमेल तसा पाऊस जमा करतेय मग तो ओंजळीतून निसटताना चा असो की डोळ्यात भरून घेतानाचा ....
घडी बघून बघून डोळे थकले होते .. त्याचे काटे पुढे सरकत होते पण माझी ट्रेन नाही...
तेवढ्यात....
एक विज कोसळावी तसा तो आत आला ..तापलेल्या जमिनीला पावसाची प्रतीक्षा असते तसंच काहीसं झालं तो आला आणि ट्रेन सुरू झाली.. योगायोग म्हणावा की काय समजलच नाही ...
पावसाने भिजलेले अंग झटकत माझ्यासमोर आला ...नकळत मलाही भिजून गेला .. उडालेल पाणी पुसण्यासाठी हात चेहर्या समोर जाताच त्याच्या सारखा त्याचा मधुर आवाज कानावर पडला "सॉरी"
स्वतःला सावरत तो समोरच बसला .. तो सावरत असला तरी माझा तोल जात होता.. दिसायला गोरापान नसला तरी त्याचा सावळा रंग मन वेधून घेत होता... त्याचे निळेशार डोळे आणि त्यावर हलके-हलके येणारे त्याचे केस ...एखाद्या चित्रकाराने निसर्ग चित्र रेखाटताना भरलेल्या समुद्रावर नारळाच्या झावळ्या पांगाव्यात तसाच तो दिसत होता...
एका नवीन प्रवासाची सुरुवात असावी असेच भासत होतं...
शेवटी भासच...
पुढच्या स्टेशन वर ट्रेन थांबता तो आणि पाऊस दोघे गेले..
बघता बघता नाहीसे झाले..
तो गेला तरी तो क्षण,ते स्टेशन तिथेच थांबल होतं...
नसून पाऊस तेव्हा मन मात्र भिजून गेलं होतं...
त्याच्यात...
आता या प्रवासाला खूप दिवस गेले सरून ....
पण पाऊस आणि तो अजूनही आहे ..
माझ्या मनात भरून ...
अजून ही आहे माझा मनात भरून....
छान लेख!
छान लेख!
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
मायबोलीवर स्वागत..
मायबोलीवर स्वागत..
छान लिहलयं आहे.. लिहत राहा.
फक्त ते स्टेशन "फारसा ओळखीचा" ऐवजी "फारसं ओळखीचं" करता का प्लीज
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
आवडली कथा.
आवडली कथा.
खुपच छान लिहिलं आहे!
खुपच छान लिहिलं आहे!