Submitted by विनोद इखणकर - श... on 13 December, 2020 - 12:32
प्रत्येक माणसां कडून काही तरी चूक होत असते,त्याच विषयाला हात घालून मी एक कविता लिहिली आहे.मी तुमच्यापुढे सादर करतो,पण आवडल्यास भरपूर दाद द्या हि विनंती आहे.
कवितेचे शीर्षक आहे *"चूक तर माझीच आहे"*
*चूक तर माझीच आहे*
जीवापाड प्रेम करण्याची
आयुष्यातून दूर गेल्यावरही
परतीची वाट बघण्याची
*चूक तर माझीच आहे*
घेतले वचन जन्मोजन्मी साथ राहण्याचे
एक जन्म पण न राहिलो साथ
उरले ते फक्त स्वप्न बघण्याचे
*चूक तर माझीच आहे*
तुझ्या आयुष्यात येण्याची
तेव्हाच समजूत घातली असती मनाची
तर हि वेळच आली नसती
तुझ्या आठवणीत तडफडून मरण्याची
*चूक तर माझीच आहे*
उधळले ते रंग प्रेमाचे
माहित नव्हतं हे रंग
नंतर बेरंग होतील जीवनाचे
कवी-विनोद इखणकर
(शब्दप्रेम)7350970201
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुमच्या कविता वाचतोय. प्रयत्न
तुमच्या कविता वाचतोय. प्रयत्न चांगले आहेत. फक्त अजून थोडा विस्कळीतपणा जाणवतोय. अर्थात सवयीने सफाई येत जाईल. शक्यतो छंदोबद्ध रचना करा. पुलेशु !
नक्कीच सर, वृत्त शिकत आहे सर
नक्कीच सर,
वृत्त शिकत आहे सर
सुंदर कविता!
सुंदर कविता!
मनातल्या भावना कागदावर छान
मनातल्या भावना कागदावर छान मांडल्या आहेत.
मनातल्या भावना कागदावर छान
मनातल्या भावना कागदावर छान मांडल्या आहेत
>>>> अगदी