Submitted by हरितात्या on 9 May, 2017 - 10:23
कधी काही लहान मुले असे काही बोलून जातात कि आपल्याला चारचौघात अगदी मेल्याहून मेल्या सारखे होते ... असा काही प्रकार तुमच्या बाबत झाला आहे का... असेल तर सांगा ...
मी माझाच लहापणीचा किस्सा सांगतो जो सांगून माझी आई माझा आज पण उद्धार करते
मी दुसरी तिसरी असतानाची गोष्ट ... आई बरोबर कोणाकडे तरी जेवायला गेलो होतो ... माझे वय आणि अंगकाठी पाहून काकू मला अगदीच थोडी थोडी भाजी वाढत होत्या, आणि मला तर भरपूर भाजी लागते जेवायला .. तेव्हा सारखी सारखी भाजी मागावी लागत होती, शेवटी मी कंटाळून त्या काकूंना म्हणालो कि काकू आमच्या कडे सत्यनारायणाचा प्रसादपण या पेक्षा जास्त देतात ... सगळ्या पंगती समोर ...
झालं घरी येऊन आईनं आणि बाबानी माझी वेगवेगळी उत्तर पूजा मांडली हे वेगळे सांगायला नको
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
'मुले लाजवतात तेव्हा' असा
'मुले लाजवतात तेव्हा' असा काहीतरी धागा आहे कुठेतरी.
किस्सा छान.
किस्सा छान. >>> +१
किस्सा छान. >>> +१
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/24545 >>> मुले लाजवतात तेव्हा
माझ्या पाच वर्षाच्या मुलीला
माझ्या पाच वर्षाच्या मुलीला पाहुण्याकडे गेल्यावर निघताना आम्ही सु सु करून घे म्हणून सान्गत होतो.
शेवटी माझी मुलगी वैतागून म्हणाली मला सु सु होत नाहीये माझे युरीनरी ब्लॅडर अजून भरलेल नाहीये.
थोडा वेगळा आहे
थोडा वेगळा आहे
आमच्या शेजारि एक लहान मुलगि होती साधारण ४-५ वर्षाचि नेहमि आमच्याच घरात असायचि आमच्या घ्ररातिल सर्वांची लाडकि होती. तिच्या घरची परिस्थिति गरिब होती.
शाळेत एका डान्स स्पर्धेत भाग घेतलेला. डान्स उत्तम झाला. मी तिला विचारलं फोटो आणले नाहित का? त्यावर तिने निरागसपणे सांगितल."मंम्मि म्हणालि आता पैसे (२०रु) नाहियेत नंतर आणु" हे सांगताना तिचा चेहरा हि खुप रडवेला झालेला
खुप वाइट वाटलेल.
शाळेत एका डान्स स्पर्धेत भाग
शाळेत एका डान्स स्पर्धेत भाग घेतलेला. डान्स उत्तम झाला. मी तिला विचारलं फोटो आणले नाहित का? त्यावर तिने निरागसपणे सांगितल."मंम्मि म्हणालि आता पैसे (२०रु) नाहियेत नंतर आणु" हे सांगताना तिचा चेहरा हि खुप रडवेला झालेला>>> पंदितजी ,वाचतानाच खूप वाईट वाटलं हो डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला...
कुठे अस्ते आता ती???
अजुन एक
अजुन एक
मी, दादा, वहिणि आनि माझा पुतन्या (व व २.५) संध्याकाळि फिरायला गेलेलो. समोरुन एक मुलगि येत होति वहिणिंनि चेष्टेत पुतन्याला सांगितलं आपण काकाला (म्हण्जे मला) अशि काकु आणुया. तर या पठ्ठ्याने ति जवळ आल्यावर तिला ए काकु म्हनुन अशि जोरदार हाक मारलि. त्याच्या तोंडावर हात ठेउन आम्हि पटकन पुढे आलो. ति मुलगि मोबाइल मधे गुंग अस्ल्यामुले तिच लक्ष गेलं नाहि आम्च्याकडॅ
कुठे अस्ते आता ती???>>>
कुठे अस्ते आता ती???>>> दुसरिकडे असते पण आता परिस्थिति सुधारलि आहे.
दुसरा किस्सा जबरी आहे
दुसरा किस्सा जबरी आहे
तीने ऐकायला पाहिजे होतं खरतर
केदार१२३ एकदम भारी किस्सा
केदार१२३ एकदम भारी किस्सा
माझा मावस भाऊ लहान असतानाचा
माझा मावस भाऊ लहान असतानाचा किस्सा ... तो ३-४ वर्षाचा असेल ... त्याला घेऊन आम्ही गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो ... एके ठिकाणी महाभारतातला कृष्ण रथाचे चाक फेकून मारण्यासाठी उचलले आहे आणि अर्जुन त्याला पायाला धरून थांबवतो आहे असे दृश्य होते ... पुतळे जरा नीट लागले नव्हते .. माझा भाऊ एकदम जोरात ओरडला दादा अर्जुनाचा हात कृष्णाच्या धोतराच्या आत घुसलाय ... सगळी जनता जोरात हसायला लागली आणि आमची तिथून कल्टी
दादा अर्जुनाचा हात कृष्णाच्या
दादा अर्जुनाचा हात कृष्णाच्या धोतराच्या आत घुसलाय >>>
भुत्याभाऊ
भुत्याभाऊ
>> तीने ऐकायला पाहिजे होतं खरतर >>> +१