नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ओझीवर बघितली तंबु. ती केतकी गोड दिसते. माधवी परत व्हिलन होणार बहुतेक, कपिल काही तिला अजूनही आवडत नाही असंच दिसतंय पण ती एक आई म्हणून कपिलला बोलते ते डायलॉग छान होते.

ल.ल.लो.मधला कालचा डार्ट-सीन आवडला. तिघांच्या अभिनयातल्या स्पॉन्टेनिटीची, टायमिंगची चुणूक दिसली. त्यामुळे मजा आली. डार्टबोर्डवर श्रीकांतचा फोटो लावलेला दिसताच सुमितचा मूड एका क्षणात पालटतो ते ओंकार गोवर्धनने मस्त दाखवलं.

शाल्मलीचीही स्वत:ची एक स्टाईल आहे. त्यामुळे यात ती पण आवडते मला.

मी ओझीवर बघितली तंबु.
@अन्जूताई : मला ओझी वर फुल एपिसोड्स मिळतच नाहीत. फुल एपिसोडच्या लिंक वर क्लिक केले तरी ५ - ६ मिनिटाचा एखादा सीन दिसतोय.
लिंक द्या लललो साठी

http://www.ozee.com/shows/love-lagna-locha/video/love-lagna-locha-episod...

ही कालच्या एपिची लिंक आबासाहेब. पुर्ण कशी द्यायची कळत नाहीये.

ओझीवरुन झीच्या शोमधे जाते मी आणि मग झी युवा खाली असते तिथून सिरियलकडे जाते.

सुनील बर्वे आणि वीणा जामकर यांची प्रेम हे मधली स्टोरी बघतेय आवर्जून. दोघे मला आवडतात, स्टोरीही आवडतेय, काही गोष्टी दुसऱ्या भागात उलगडतील. त्या लहान मुलाने पण काम छान केलंय, गोड आहे तो.

ओझीवरुन झीच्या शोमधे जाते मी आणि मग झी युवा खाली असते तिथून सिरियलकडे जाते. >>>>

मी ही असच करतो पण ५ मिनिटच्या ड्युरेशनचे विडिओ आहेत सगळे, जरी फुल एपिसोड लिहिल असल तरी.

वरच्या लिंकमध्येही ५ मिनिटाचाच विडिओ आहे Sad

फ्रेशर्स वाल्याना साधे सोपे दाखवायला काय त्रास होतो, सतत काहीतरी राडा पाहिजेच का?
विन्याच सतत चाचरत बोलणं सिरियसली डोक्यात जायला लागलं आहे, एकटा मुंबईत राहतो,मार्केटिंग करतो तो असला बुजगवणा?

फ्रेशर्स बोअर व्हायला लागलीय. बाटल्या बदलतात औषध तेच.. असली परिस्थिती आहे त्यांची.
कालचा मनवाची छेड काढणारा मंग्या गँग मधलाच असणार, असं मलातरी वाटतंय.

विन्याबद्दल +1. पण त्याला जाॅब मिळाला का तो?? मला शेवटपर्यंत पाहता नाही आला.

मला आवडली प्रेम हे ची ह्यावेळची स्टोरी. बाकी मी नाही बघितल्या कारण मला जोडी आवडली तरंच मी बघते. ह्यात संवादलेखनात मायबोलीकर वल्लरी यांचं नांव दिसलं. अभिनंदन वल्लरी (म्हणजेच वेल-धागाकर्ती).

संदेश कुलकर्णी 'बन मस्का' चा निर्माता आहे . तिघ जण आहेत . एक हा दुसरा श्रेया बुगडे ( हवा येऊ द्या फेम ) चा नवरा आणि तिसरा त्यांचा मित्र. तिघ निर्माते आहेत . प्रेम हे बघायचंय मला. पाच पाच कपल्स दिसताहेत त्यात Happy

काल L3 मध्ये राघवचा अभिनय एकदम मस्त. सुमित घरी आल्याबरोबर त्याला बघूनच याला भरून येतं नि मिठी मारून रडतो.. ते तर कसलं भारी केलं राघवनं. सुमीतचं पण शांत पण ठामपणे बोलणं आवडलं. विन्या श्रीकांतसमोर तोंड उघडून बोलला हेच महत्त्वाचं.

काल L3 मध्ये राघवचा अभिनय एकदम मस्त >>>
येस्स! तो अ‍ॅक्टिंग छानच करतो. काल अपमान, चिडचिड, संताप, हतबलता सगळं त्याने डोळ्यांतून किती परफेक्ट दाखवलं. त्याला एखाद्या नाटकात छान भूमिका मिळायला हवी.

कुणालाच त्या एमाला विचारावंसं वाटत नाहीये का की बाई गं, नक्की काय झालं?

विनयला नव्या नोकरीच्या इथे ती इंटरव्ह्यू घेणारी मसल पेनच्या गोळ्यांबद्दल सांगत होती. बहुधा त्या गोळ्यांचा पहिला प्रयोग विनय एमावरच करणार.
इंटरव्ह्यू घेणारी बोलण्यात उपमा कसल्या वापरते! Lol आत्ता तरी ऐकायला मजा येतेय. पुढे अतिरेक करू नये म्हणजे मिळवली.

प्रेम हे मध्ये पुढच्या सोमवारी ललित प्रभाकर असणार आहे. >>> त्याच्याबरोबरची हिरॉईन देवयानीमधे होती राघवची भुमिका करतोय त्याच्याबरोबर.

राघव देवयानीमध्ये होता?? मी त्याला याच सिरियलमध्ये पहिल्यांदाच बघतेय.
ती हिराॅइन क्यूट आहे पण.
इंटरव्ह्यू घेणारी बोलण्यात उपमा कसल्या वापरते! Lol आत्ता तरी ऐकायला मजा येतेय. पुढे अतिरेक करू नये म्हणजे मिळवली.>> +1

एमा पण विचारत असते ना काय झालंय म्हणून श्रीकांतला . पण हा खडूस तिला काहीच सांगत नाही. हे सगळं तो मुद्दाम करतोय. आता आकांक्षाला काय वाटतंय त्यावर डिपेंड असेल सगळं.

राघव देवयानीमध्ये होता?>>> हो तर हिरो होता तो. आधी संग्राम साळवी होता मग हा. लीप घेतली बहुतेक. मला कसं ते माहीती नाही. आमची माधवी रुंजीत होती म्हणून तिने कळवल्यावर काही भाग बघितले रुंजीचे तिच्यासाठी, तर देवयानीचे प्रोमोज बघितले जायचे, ती सिरीयल मी नाही बघायचे. मग कधीतरी ही हिरॉईन जाऊन त्याची हिरॉईन म्हणून सिद्धी कारखानीस होती शेवटी.

ओह. मी तो संग्राम असतानाच मालिका बघायची सोडली होती. म्हणजे फक्त सुरुवातीचे काही भागच बघितले होते. आणि घरात झी मराठी सोडून कुठलाच मराठी चॅनेल लागत नाही Happy त्यामुळे इतर चॅनेलवरचे प्रोग्राम चुकून पण नजरेस पडत नाहीत.

श्र्रीकांत चा प्लॅन असेल हा. त्या फ्लॅट मधुन तिघांना काडुन तो फ्लॅट विकाय्चा आणि बिझनेस साठी पैसे उभे करायचे.
पण काकुंनी कसा काय विश्वास ठेवला राघव असं काही करेल म्हणुन? काका असते तर एका मिनिटात सरळ केला असता श्रीकांतला.
आकांक्षाच्या ही लक्शात आलय की श्रीकांतचा ह्यात काहीतरी डाव आहे.
काल पण राघव च्या बोलता बोलता हातवारे करण्याचा श्रीकांत्ने ईश्यु केला माज्यावर हात उचलणारेस का म्हणुन?

इंटरव्ह्यू घेणारी बोलण्यात उपमा कसल्या वापरते! Lol आत्ता तरी ऐकायला मजा येतेय. पुढे अतिरेक करू नये म्हणजे मिळवली. +१
मला कालच अतिरेक वाट्ला त्याचा. आणि तो विन्या तिचं अभिनंदन करतोय लग्न ठरलय म्हणुन.

श्रीकांत ला अमेरिकेत कामावरून काढून टाकले असणार त्यामुळे तो आलाय इथे, मला वाटलेलं त्याच्या मदतीने ते विण्याला जेलस करतील, इथे स्टोरी काहीतरी वेगळीच. त्याला पार व्हिलन केलाय पण एक आहे एखादा स्वार्थी माणूस जसा वागेल तसाच वागला आहे.
मला वाटत मोरे काका आणि विनयचे बाबा यांनाच सगळं निस्तराव लागणारे

तिकडे अली एकदाची उर्मिला,पण अजून फार काय नाही, बाकीच्यांची सहज अक्टिंग समोर ती कमी पडली असे वाटतंय.

शिरोळे पुन्हा एकदा धमाल, सगळ्यांना खाऊन टाकतो हा माणूस एक्स्पेशन्स नी, माताजींबद्दल ऐकताना तर काय चेहरा फुललेला

'लव लग्न.. 'मधे काल्चा भाग उगाच टाईमपास. परवा दाखवलेला 'उद्याच्या भागात' परत तिथेच येऊन थांबला एपी.
'बन मस्का' नेहमीप्रमाने ओढुन ताणुन चालू आहे.
'तंबू' संपेल पुढच्या महिन्यात. नविन सिरीयल चा प्रोमो दाखवतायत.

आज लव्ह लग्न मध्ये मोरे काकांनी वाक्यवाक्याला टाळ्या घेतल्यात. काय टू द पॉइंट बोललेत....

जो कुणी संवाद लेखक असेल त्याने जबराट लिहीले आहे आणि काकांनी परफेक्ट न्याय दिलाय...

दिल खुष झाला आजचा एपीसोड बघून

'तंबू' संपेल पुढच्या महिन्यात. नविन सिरीयल चा प्रोमो दाखवतायत. >>> हो फुलपाखरु, ती दुर्वा सिरीयलची हिरॉईन आहे त्यात ऋता दुर्गुळे, हिरो कोण कळत नाहीये.

आज लव्ह लग्न मध्ये मोरे काकांनी वाक्यवाक्याला टाळ्या घेतल्यात. काय टू द पॉइंट बोललेत....>>> हो आणि चक्क मी आज तो शॉट बघितला मगाशी, रिपीट होतं तेव्हा.

आज लव्ह लग्न मध्ये मोरे काकांनी वाक्यवाक्याला टाळ्या घेतल्यात. काय टू द पॉइंट बोललेत.... >>> हो, पण तरी बाहेरच्यांसमोर त्यांनी स्वत:च्या मुलाचा असा अपमर्द केला ते फारसं आवडलं नाही. चूक विक्रांतची असली तरीही हेच सगळं ते केवळ आई-वडील-मुलगा अशा तिघांमध्येही करू शकले असते असं वाटलं मला काल. (खासकरून, त्यांच्या भाड्यावर आपलं घर चालतं, तू आता मला शिकवणार का, अमेरिकेतली नोकरी सोडून आलास तेव्हा आमचा सल्ला घेतला होतास का ही कानउघडणी)

हो ते ह्यांनी दिलेल्या भाड्यावर आपलं घर चालतं हा डाय्लॉग मला ही नाही आवड्ला. काकुंनी ही फोन करुन काकांना बोलवुन घेण्यापेक्शा स्वत: का कधी श्रीकांत ला झापलं नाही? श्रीकांतने ही त्यांच्यावर ढकललं मी हिला विचारून केलं म्हणुन तरी त्या गप्पच.

सगळ्यांसमोर झापणे गरजच होती, कारण त्यानेच घाणेरडा प्लॅन करून हा उद्योग केला होता. खोटे अलिगेशन्स हा गुन्हा आहे, राघव ने अब्रू नुकसानीचा दावा केला असता तर संपूर्ण मोरे फॅमिली ला मनस्ताप झाला असता. श्रीकांतने चुक नाही केलेली, तो फोउजदारी गुन्हा आहे आणि त्या मानाने त्याला फक्त ओरडा पडला ही किरकोळ शिक्षा झाली.

Pages