नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तो एक्दम फुस्का बार वाटला, कडी अभिमानने लावण. मला सौम्याच्या मित्रावर डाऊट होता. कहानी में ट्विस्ट म्हणुन. ह्याला ती आधीच आवडत असेल आणि आयतीच संधी चालुन आली असेल त्याला दोघांचा ब्रेक अप करायची., असलं काहीतरी मी ईमॅजीन केलं होतं... Proud

राघव वर जेव्ह्डे सगळे रागवले होते तेव्ह्ड अभिमानला कोणीच काही बोललं नाही.

हो मलाही तसंच वाटलेलं, खासकरून जेव्हा तो सुमितला घालवून देतो तेव्हा.

अभिमानला रागावले नाही कारण त्याने चुकुन कडी लावल्याचे सांगितले. त्याला माहीतीच नव्हते की आत सौम्या आहे.

राघववर चिडण्याचे कारण तो असले उद्योग करू शकतो याची सगळ्यांना खात्री असते आणि चुकून नाही तर मुद्दाम केले असेच वाटले होते.

अभिमानने मुद्दाम करण्याचे काहीच कारण नाही इतका तो इनोसंट आहे

मला तो एक्दम फुस्का बार वाटला, कडी अभिमानने लावण. मला सौम्याच्या मित्रावर डाऊट होता. कहानी में ट्विस्ट म्हणुन. ह्याला ती आधीच आवडत असेल आणि आयतीच संधी चालुन आली असेल त्याला दोघांचा ब्रेक अप करायची., असलं काहीतरी मी ईमॅजीन केलं होतं... >>>
हाच तर फरक आहे झी आणी झी युवा मधला
झी वाले असते तर कदाचित त्यांनी तेच दाखवत एपीसोड लांबवले असते

मला तरी अजून ती लांबड वाटलेली नाही.
विनय - कालच्या एपिसोडमधला त्याचा चेहरा काय भारी होता पूर्णवेळ - नाईलाज, दु:ख, लाजिरवाणेपणा, आपण केलं ते चूक की बरोबर याची शंका, ... अशा सगळ्या शेडस त्याने खूप छान दाखवल्या. शेवटी आकांक्षाला तो जाऊन विचारतो - तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? - तेव्हाही अशा प्रसंगी कसं बोलावं, कसं वागावं याचा अजिबात गंध नसलेला माणूस म्हणून सक्षम कुलकर्णीचं काम मला खूप आवडलं.

त्यापूर्वी राघव-रूपमती सीन पण आवडला. राघव खूपच छान काम करतोय.

काव्याचं 'आकान्शा' म्हणणं तेवढं जरा कानांना खटकतं. Lol

२ आठवडे झाले तेच ते दाखवतायत. आता बोअर झालं.
आकांक्षा ने विनय वर रागवायचं काहीच कारण नाहीये अथवा नाराज व्हायचं. त्याला आकांक्षा चे feelings माहितीच नाहीत, तरी त्याने आकांक्षाचा विचार करुनच सा.पु. मोडला.
ईतरांना सांगत बसण्यापेक्शा तिने विनयलाच सांगितलं असतं तर?
होतच आहे लग्न चुपचाप म्हणुन ही शांतच बसली, ह्याला सांगू नका, त्याला सांगू नका करत.

हल्ली कुठल्याच सिरीयल्स बघत नाही इथल्या, परवा इ टा तं चा एक शॉट बघितला. काय त्या गौरीसाठी दोघांच्यात खेळी. मुर्खपणा सगळा, कपिल आणि सौरभचा. आमच्या भाचीबाई त्यात पार व्हिलन झाल्यात.
जाऊदे ती गौरी माझ्या डोक्यात जाते.

सध्या फक्त गोठ आणि रितेश देशमुख शो स्टार प्रवाह आणि दिलीप प्रभावळकर यांची सिरीयल बघतेय मनापासून.

परवा इ टा तं एपिसोड बघितला, अण्णांचे डायलॉग अगदी माझ्या मनातले होते. छान सुनावतात गौरीला आणि कपिललापण. ते डायलॉग वल्लरी तुम्ही लिहीले होतेत का. नंतर गौरीचे बाबा समर्थन करतात ते पटत नाही. सौरभची फसवणूक होतेय सर्वात. गौरीच्या दोन द्याव्यात मुस्कटात असं वाटतंय. सारखा सौरभ विचारतोय तरी ती काही उत्तर देत नाही. श्रेया खरंच आजीबाई सारखं वागतेय. तिच्या वयाला न शोभेल असे डायलॉग तिला बरेच देतायंत. आमच्या भाचीबाई तर काय व्हिलनंच झाल्यात. तिच्याबद्दलंचं डायरेक्ट तिला मेसेज करते मी.

बाकी युवावरची कुठलीतरी मालिका संपणार आहे, नवीन प्रेम हे ही मालिका येणार आहे. केतकी माटेगावकरने टायटल साँग गायलंय. परवा कुठेतरी बघितलं.

त्या रोक्स्टार मध्ये त्या कॉन्सर्ट च्या नावावर इतके जीवन मरणाचे निर्णय घेतले जात आहेत.
इतके अदभूत असे काय आहे त्यात. या सहस्त्रकातले शेवटचे वगैरे असे किंवा यानंतर आता आयुष्यात कधीच होणार नाही.
तो साइराज इतका घाण मराठी बोलतो तेही घोगऱ्या आवाजात. घे म्हणावं भाग आणि नाक कापून
पण नाही

पुढच्या आठवड्यापासून नऊ वाजता सोम. मंगळ. प्रेम हे हि सिरीयल सुरु होतेय, आठवड्याला एक लवस्टोरी असेल बहुतेक. बुध. गुरु. म्युझिक रिलेटेड प्रोग्रॅम आणि शुक्र. शनी. शौर्य. मग इ टा तं संपतेय की काय. पण मी भाचीला विचारलं तर नाही म्हणाली, आहे अजून काही महिने आहे म्हणाली, वेळ बदलणार की काय. वल्लरीला माहिती असेल. असो मी क्वचित बघते. फार ताणलंय लग्न प्रकरण. काय तिच्यावर दोन दोन हिरो फिदा. तिच्यामुळेच मी नाही बघत. फार बोअर आहे ती.

आकांक्षाने विनयला सध्या नकार दिलाय ना! म्हणून श्रीकांतचं पात्र आणलंय. श्रीकांत तिला प्रपोज करेल, मग तिला जाणवेल की आपल्याला मि.विनयशिवाय दुसरं कुणीच आवडत नाहीये.
(मी गेले ८-१० एपिसोड्स पाहिले नाहीयेत.)

मी तर बरेच भाग मिसलेयत L3 चे. मागचे दोन चार भाग सलग बघितलेत. पण आकांक्षाचं प्रेम असतं ना विन्यावर. तिनेच ते राघवला सांगितलेलं असतं. मग ती नकार कधी देते?? गावावरुन आल्यावर विनय विचारतो का तिला??

बिचारा राघव का बोलतात सगळे त्याला एवढं आणि त्या विन्याला काहीच नाही +१

निधी, विनय विचारतोच गावावरून आल्यावर. पण त्याचे बाबा ही स्वतः येऊन विचारतात. तेव्हा ही नाही म्हणते.
सा.पु मोडायच्या आधी मला एकदा विचाराय्चय तरी होतं. माझं त्यांच्यावर प्रेम होतं आता नाही म्हणते.

आजच्या भागात विनय जाणार आहे आकांक्षा च्या clients ना भेटायला. बघाय्ला पाहिजे तो काय गोंधळ घालतो.. Lol

विनय हा इतकी वर्षे मार्केटिंग करत असतो हे अविश्वसनीय आहे. त्याला इतका बावळट दाखवलाय, आत्मविश्वासाचा अभाव, घाबरत, चाचरत बोलणे आणि कशातच धड नसणे या गुणांवर त्याला पहिल्याच दिवशी कामावरून काढून टाकल असतं, आणि म्हणे मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह.

भाबडा करायच्या नादात त्याला अती अती अती बावळट केलाय.
मी आधीच प्रेडिक्ट केल्याप्रमाणे श्रीकांत आणि आकांक्षा प्रकरण आलेले आहे. अर्थात हे फक्त त्याच्या बाजूने असणारे, ती ऐन वेळी नकार देऊन त्या बावळट ला हो म्हणण्याचीच शक्यता आहे.

Thanks chaitrali. Happy

श्रीकांत आणि आकांक्षा प्रकरण आलेले आहे. अर्थात हे फक्त त्याच्या बाजूने असणारे, ती ऐन वेळी नकार देऊन त्या बावळट ला हो म्हणण्याचीच शक्यता आहे.>> हो. श्रीकांत तिच्या प्रेमात असणार आहे, असंच वाटतंय. आकांक्षा कदाचित काका काकूंच्या प्रेमाची/उपकाराची जाणीव नि विनयवरचं प्रेम या कात्रीत अडकणार.

शेवटी गंगेत घोडं न्हयलं, ज्या कॉन्सर्ट वरून आयुष्यभराचे निर्णय घेतले जात होते ते पार पडलं. मोजून दहा लोक, त्यात घरचे सात आणि दोन स्पॉट बॉईज अशा या भव्य दिव्य प्रचंड गाजलेल्या कोर्सेर्ट मध्ये एक गाणे तेही गिटारवर जुगलबंदी करून तीलगुलकार साहेब जिंकले.
त्यांच्या या भव्य यशाबद्दल महाराष्ट्रभर साखर वाटण्यात आली

आशुचॅम्प Lol
तुम्ही अजुन पाह्ता ही सिरीयल..??

Pages