नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रेशर्स संपली?? मला हल्ली पाहायलाच नाही मिळत सिरियल्स. Uhoh
ओझीचा पण प्राॅब्लेम आहे. ओझीवर झी युवा ओपन केलं की सिरियलच्या नावांच्या मध्येच अॅड येते. आणि कुठल्याही सिरियल्सवर क्लिक केलं तरी इटातं चे एपिसोडस् सुरु होतात. इतर कोणी ओझी वापरत का?? वापरत असाल तर असा अॅडचा प्राॅब्लेम होतोय का??

मी नाही शेवट वगैरे बघितला. झी च्या फेसबुक पेज वर १२ तारखेला, आज ह्याचा शेवटचा भाग बघा लिहीलेलं, ते वाचलं. ते पण परवा, उशीरा.

ती मनवा दुसऱ्या मालिकेत लीड म्हणून आली त्यामुळे मला अंदाज होताच की सिरीयल संपत असेल फ्रेशर्स.

ओके अंजूताई.
थँक्स रजनीकांत. बघते ट्राय करुन.

'लव लग्न.' मधे शाल्मलीच्या प्रेग्नसी ने राघवच जास्त excited असतो. तेव्हडी तर शाल्मली ही excited वाटत नाही.
तिने न्युज दिली तेव्हा ही २ एपी वाया घालवले होते राघवच्या imagination वर बाळाबद्द्द्लच्या.

'अंजली' टिपीकल आहे. मेडिकल म्हणजे लोकांची सेवा माननारी. तिला मुलगी माननारा सिनियर डॉक्टर. तेच विचार असणारा.
तिला काँपीटीटर माननारी तिची मैत्रीण. डॉक्टरचा मुलगा मात्र पेशंट = पैसा समजनारा. पुढे त्याला ही हे विचार पटणार व तो तिच्या प्रेमात पडणार.

'अंजली' सगळ्या जगाचे प्रश्न सोडवाय्ची जबाबदारी आपल्यावरच असल्यासारखी का करते?
'लव लग्न..' मधे उगाच ताणलय विनय-आकांक्षा प्रकरण ट्वीस्ट आणुन.

'लव लग्न..' मधे उगाच ताणलय विनय-आकांक्षा प्रकरण ट्वीस्ट आणुन.>> हो ना. आकांक्षाने विनयला नकार देऊन पण त्याने दिलेली रिंग स्वतःकडेच ठेवलीय. आणि उठसूट ती कवटाळत बसून उसासे टाकत बसते. आता काकू ती रिंग बघतील नि त्यांना सगळंच कळेल.
काव्या-राघवची जोडी क्यूट वाटते. पण त्यांचं पण अति ताणतायत. बोअर होतं कधीतरी.
शाल्मलीचं पोट एवढं मोठं दाखवलंय की ती आठ नऊ महिन्यांची प्रेग्नंट वाटते... काल अभिमान अजून सहा महिनेच व्हायचेत असं म्हणत होता. Uhoh

झी वाले एकाच चाकोरीतून चालले आहेत.

आधी रॉकस्टार मध्ये ती याच्याशी करणार, त्याचाशी करणार, याच्याशीच करणार असे करत शेवटी एकदाची हिरोच्या गळ्यात पडते.

इथेच टाका तंबू मध्येही सेम. ह्याच्याशी जुळणार का त्याच्याशी. शेवटपर्यंत ताण ताण ताणून शेवटी अपेक्षित सुखांत.

बन मस्का तर कमालीची ताणली होती. शेवटी इतका वैताग आला की बाबांनो आटपा आता.

फ्रेशर्समध्येही तेच होतं, ही का ती, ही का ती.

आता इथेही पार अगदी साखरपुड्यापर्यंत आणतील, विन्याचे आई बाबा येतील. चार एपिसोड ते काय करायचे यावर खल करतील. दोन एपिसोड साखरपुड्याची तयारी. दोन एपिसोड वाढलेला ताण, एक एपिसोड सगळे एकमेकांकडे बघतील. विन्याचे बाबा विन्याकडे, विन्या आईकडे, आई आकांक्षाकडे, आकांक्षा काकांकडे, काका अजून कोणाकडे. च्यायला ह्यांच्या.

आता इथेही पार अगदी साखरपुड्यापर्यंत आणतील, विन्याचे आई बाबा येतील. चार एपिसोड ते काय करायचे यावर खल करतील. दोन एपिसोड साखरपुड्याची तयारी. दोन एपिसोड वाढलेला ताण, एक एपिसोड सगळे एकमेकांकडे बघतील. विन्याचे बाबा विन्याकडे, विन्या आईकडे, आई आकांक्षाकडे, आकांक्षा काकांकडे, काका अजून कोणाकडे. च्यायला ह्यांच्या... Lol
अगदी असच होणारे

आता काकू ती रिंग बघतील नि त्यांना सगळंच कळेल... ती रिंग खरतर आधीच दिसायला हवी होती. ती नेमक्या वेळेला आता सा.पु.च्या दिवशी दिसेल फक्त.

शाल्मलीला जर खरं माहितीये की आकांक्षा श्रीकांत शी का लग्न करतिये (काकुंना नाही म्हणता आलं नाही वगैरे भंकस) तर तिने विनयला तरी ते सांगावं. म्हणजे त्याचा जो गैरसमज झालाय तो झाला नसता की आकांक्षा ने श्रीकांतला का निवडलं ते.

अगं शाल्मलीकडून वचन घेतलंय ना आकांक्षा मॅडमनी. विनयला काहीही सांगणार नाही ती असं.
शपथेऐवजी वचन.
शपथ घालण्याची/ वचन देण्या/घेण्याची बंदी टाकली पाहिजे या समस्त सिरियलींवर. Angry

ती नेमक्या वेळेला आता सा.पु.च्या दिवशी दिसेल फक्त.>> आणि आकांक्षा ती बोटात घालून मिरवत नसली म्हणजे मिळवलं. Wink

आशूचॅम्प>> Lol वैताग पोहोचला अगदी.

अगं शाल्मलीकडून वचन घेतलंय ना आकांक्षा मॅडमनी... हो पण ते मी सांगिन त्यांना स्वतः ह्या बोलीवर. आता ती काहीच सांगत नाहिये, नुस्ती रडते नाहीतर चिडते, तर शाल्मलीने सांगावं.
आशुचँप खरय .. आता विन्याचे वडिलच येऊन काय ते करणार. तोवर ही मित्रमंडळी ही काही करणार नाहीत.

शपथ घालण्याची/ वचन देण्या/घेण्याची बंदी टाकली पाहिजे या समस्त सिरियलींवर.

नाहीतर काय, स्वताची, लोकांची, मित्रांची आयुष्याची माती झाली तरी झालेल पण वचन मोडणार नाहीत हे रघुवंशी लोक.
स्वत रामसुद्धा नतमस्तक होईल यांच्यासमोर...

बाकी सर्रास खोटं बोलतील, लपवा छपवी करतील, पण वचन पाळायची वेळ आली की बाबा रे हे झालेच व्रतधारी.

विन्याचे बाबा काहीही करणार नाही. मधल्या काही एपिसोडा गंमत आणलेली त्यांनी पण नंतर त्यांना अगदीच गरीब करुन टाकलय. ते आपले पोट्टी तु असे का करून राहीली इतकेच म्हणत राहतील.

आणि ती आकांक्षा त्या श्रीकांतने कितीही घालून पाडून वागवले तरी त्याच्या पायाची धूळ असल्यासारखे सहन करत राहील. कुठल्या जमान्यात राहतात हे लोकं. ती लहानपणापासून स्वतंत्र राहीली आहे. कुणाचाही आधार नसताना एकटी हॉस्टेलला. आता यांनी घर दिले म्हणून इतका स्वाभिमान गहाण ठेवायचा.

च्यामारी दिल चाहता है मध्ये १६ वर्षापूर्वी येऊन गेलेला कन्सेप्ट यांना अजून चालवावा वाटतो हे यांचे डोके.

मुक्ताची मुलाखत बघितली, सोमवारपासून रात्री साडेनऊला सुरु होणारी रुद्रम फक्त तीन महीन्याच्या कालावधीत संपणार आहे. ज्यांनी बन मस्का काढली त्यांनीच ही काढली आहे.

http://www.loksatta.com/manoranjan-news/rudram-new-serial-starts-on-zee-...

च्यामारी दिल चाहता है मध्ये १६ वर्षापूर्वी येऊन गेलेला कन्सेप्ट यांना अजून चालवावा वाटतो हे यांचे डोके.

>> आणि दिल तो पागल हैं वाला कन्सेप्टपण. पण निदान त्यात हिरोईनला त्यांनी लहानपणापासुनतरी सांभाळलेले दाखवले आहे. मी सुरुवातीचे एपि. पाहिले नाहीत. आकांशाला श्रीकांतचे आईवडील नक्की कधीपासून सांभाळत आहेत?

आकांशाला श्रीकांतचे आईवडील नक्की कधीपासून सांभाळत आहेत?>> विनय - आकांक्षाचं लग्न ठरल्यानंतर म्हणजे साधारण वर्ष झालं असेल. पण ते सांभाळतायत कुठे तिला?? ती पेइंग गेस्ट सारखी राहायला आली त्यांच्याकडे. महिन्याचे पैसे देतेच की त्यांना.

पण ते सांभाळतायत कुठे तिला?? ती पेइंग गेस्ट सारखी राहायला आली त्यांच्याकडे. महिन्याचे पैसे देतेच की त्यांना.

>> मग दिल चाहता हैं किंवा दिल तो पागल हैं शी तुलना पण अयोग्य आहे आणि कारण नसताना आकांशावर काकाकाकुंच्या प्रेमाचे ओझे लादणे (तसे दाखवणे) पण. काहीतरी कन्व्हिन्सिंग कारण तरी दाखवायचे यार.

आणि ती आकांक्षा त्या श्रीकांतने कितीही घालून पाडून वागवले तरी त्याच्या पायाची धूळ असल्यासारखे सहन करत राहील. कुठल्या जमान्यात राहतात हे लोकं. ती लहानपणापासून स्वतंत्र राहीली आहे. कुणाचाही आधार नसताना एकटी हॉस्टेलला. आता यांनी घर दिले म्हणून इतका स्वाभिमान गहाण ठेवायचा.

>> याच्याशी सहमत. शिवाय त्यांनी घर सुद्धा दिलेले नाहिये. फक्त पीजी म्हणून राहू दिलेय आणि वट्ट वाजवुन त्याच्या दिडक्या सुद्धा घेत आहेत तिच्याकडून.

'अंजली' ला मुंबईत येऊन किती दिवस झाले? होटेल मधे कधी गेली नाही का? काल 'ईथे पाणी मिळेल का' असं चाचरत का विचारत होती.

Pages