Submitted by मुग्धमानसी on 30 January, 2015 - 05:07
रोज मी पुसते तिथे ते खोल रुजलेले ठसे...
उगवते तरिही तिथे जे... त्यास उपटावे कसे?
बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली
पण चुका अपराध हे पदरात मी घ्यावे कसे?
शेवटी तूही मला हसण्यावरी नेलेस ना?
मी किती गंभीर आहे... सांग सांगावे कसे?
लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे?
राखुनी असतात अंतर जवळ असणारे सुधा..
दूर असणार्या कुणाचे पाश तोडावे कसे?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राखुनी असतात अंतर जवळ असणारे
राखुनी असतात अंतर जवळ असणारे सुधा..
दूर असणार्या कुणाचे पाश तोडावे कसे?>>>> आवड्या
छान
छान
वा गझल म्हणता येइल ह्या
वा
गझल म्हणता येइल ह्या रचनेला कृपया गझल विभागात देखील समाविष्ट कराल का हे लेखन
जमीन अधिक सुस्पष्ट होणयासाठी पहिली ओळ अशी करता येइल>>> रोज मी पुसते तिथे तू खोल रुजवावे ठसे <<<
अर्थात आपली इच्छा असेल तर
नसल्यास मला माफ करा
वैवकु> धन्यवाद! रचना 'गज़ल'
वैवकु> धन्यवाद! रचना 'गज़ल' विभागात समाविष्ट केलेली आहे.
एवढे फॉर्मल नका हो होऊ...
बिलगते स्वत:स मी होऊन माझी
बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली<<< स्वतःस आणि माऊलीमध्ये अनुक्रमे एक मात्रा कमी व एक जास्त होत आहे.
पण तो खयाल मस्त आहे.
शुभेच्छा!
(सुधा आणि हसण्यावरी - अश्या सुटी टाळता आल्या तर बघाव्यात)
असो सांगायचे ते राहूनच गेले
असो सांगायचे ते राहूनच गेले
अनेक ओळी आशयासाठी खूप दर्जेदार आहेत जसे >>>बिलगते स्वत:स मी होऊन माझी माऊली<< । >>>दूर असणार्या कुणाचे पाश तोडावे कसे?<<< इत्यादी
शेर ३ व ४ जास्त आवडले त्यातही तिसरा जास्त
धन्यवाद!
धन्यवाद!
राखुनी असतात अंतर जवळ असणारे
राखुनी असतात अंतर जवळ असणारे सुधा..
दूर असणार्या कुणाचे पाश तोडावे कसे?>>>>>>
मस्त !
माउली आणि अखेरचा शेर ह्यांतले
माउली आणि अखेरचा शेर ह्यांतले खयाल फार आवडले.
शेवटी तूही मला हसण्यावरी
शेवटी तूही मला हसण्यावरी नेलेस ना?
मी किती गंभीर आहे... सांग सांगावे कसे?<< मस्त.
लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे?<< वा वा !
गझल आवडली. गंभीर बढिया.
गझल आवडली. गंभीर बढिया.
वाह
वाह
वाह
वाह
वाह
वाह
लख्ख सारे आरसे करूनी असा
लख्ख सारे आरसे करूनी असा गेलास तू...
मी तुझ्या बिंबास आता सांग शोधावे कसे? >>>> क्या बात है ....
धन्यवाद!
धन्यवाद!
मानसी मास्तच गं. खुप दिवसांनी
मानसी मास्तच गं. खुप दिवसांनी काही लिहीलेस. छान वाटले.
मस्त.
मस्त.